✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बस....

म
मसक्कली यांनी
Tue, 10/06/2009 - 11:13  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13595 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

आधी ...

बिपिन कार्यकर्ते
Tue, 10/06/2009 - 11:20 नवीन
बसने प्रवास करायचा फारसा अनुभव नाही. (|: 8| 8> त्यामुळे काय लिहू? :SS [( #o पण तुम्ही तुमचा अनुभव मांडा की. नुसता धागा टाकून का पळताय? >:) X( ~X( ... :) B) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

एवढा वेळ

पर्नल नेने मराठे
Tue, 10/06/2009 - 11:22 नवीन
8| एवढा वेळ वाट पाहण्यापेक्शा कॅबने जावे :| चुचु
  • Log in or register to post comments

आमाला रोज

मसक्कली
Tue, 10/06/2009 - 11:31 नवीन
आमाला रोज बरेच आनुभव आसतात हो...आमी काय मीडल क्लास लोक बसच परवडते हो आमाला.... @) आमी लोकान्चे आनुभव जानन्याचा प्रयत्न करत आहोत... हा मनोरन्जन म्हनुन टाकलेला धागा आहे.... लोकानी चन्गले वाइट कसेही अनुभव टाकले तरी चालतात ना... ;)
  • Log in or register to post comments

चेन्नई ते कारेकल (Chennai to Karaikal)

विशाल कुलकर्णी
Wed, 10/07/2009 - 12:36 नवीन
मुंबईहुन विमानाने चेन्नईला उतरलो. भारतातील रुटीनप्रमाणे रात्रीची फ्लाईट असल्याने लेट झाली. १०.३० ची फ्लाईट दिड तास लेट होवुन १२.०० वाजता चेन्नईत लँड झाली. साहजिकच मी बुक केलेली चेन्नई ते कारेकल वॉल्वो ११.३० लाच निघुन गेली होती. ६०० रुपयाला बांबु लागला होता. शेवटी मी वैतागुन स्टेट ट्रान्सपोर्टची बस पकडली. चेन्नई सोडले आणि पाऊस सुरु झाला. म्हणुन खिडकी बंद केली तर गरम व्हायला लागले. बसमध्ये पंखा होता पण नियमाप्रमाणे ;-) तो नादुरुस्त होता. कंडक्टरला विचारले तर त्याने आपले सुंदर (सोन्यासारखे पिवळे) दात दाखवले आणि म्हणतो "साब, गरमी लगते है,तो विंडो खोलनेका ना!" त्याला विचारले, "अरे भाई, लेकीन बारीश हो रही है!" त्याचे उत्तर होते... "सोsssssरी साब, वो उपरवालेका काम है, हम कैसे इंटरफीर करेंगा !" सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मसक्कली

सोsssssरी साब,

भडकमकर मास्तर
Fri, 10/09/2009 - 16:51 नवीन
सोsssssरी साब, वो उपरवालेका काम है, हम कैसे इंटरफीर करेंगा !" हेय लै भारी.. :) _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

सोsssssरी साब,

भडकमकर मास्तर
Fri, 10/09/2009 - 16:51 नवीन
सोsssssरी साब, वो उपरवालेका काम है, हम कैसे इंटरफीर करेंगा !" हेय लै भारी.. :) _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

सध्या

चिरोटा
Tue, 10/06/2009 - 11:48 नवीन
इकडे बस येणे हाच आधी मोठा अनुभव असायचा.वेळेवर येणे तर दूरच राहो.पुर्वी ५ रुपयांचे तिकीट असले तर फक्त २ रुपये देवून तिकीट न घेता ३ रुपये वाचवायचे असा प्रकार होता. तो आता बराच कमी झाला. सध्या नविन वॉल्वो बसेस चालु झाल्या आहेत. त्या बर्‍याच्श्या वेळेवर येतात. वातानुकुलीत बसेस आणि FM radio आणि आजुबाजुला 'जंटल्मन' लोक ह्यामुळे प्रवास सुसह्य होतो. Image removed. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

हे पहा

अमोल केळकर
Tue, 10/06/2009 - 12:23 नवीन
हे पहा आमच्या कडे पण तुमच्यासारखीच बस आली आहे १०५ नं - स्वामी विवेकानंदनगर ( सी.बी.डी ) ते बान्द्रा Image removed. -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

मस्तच ...

छोटा डॉन
Tue, 10/06/2009 - 15:21 नवीन
वा वा, शहरी बस वहातुकीसाठी महाराष्ट्रातपण वॉल्वो आल्याचे पाहुन आनंद झाला, मस्त आहे. आता सौजन्य सप्ताह कधी मग ह्या बस चा ? "भांचुत, एक दिवस झंटलमनासारखे वागाल तर काय मराल काय ? " : इति कंडक्टर ( भाईकाकांच्या एका लेखातुन साभार ... ;) ) ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर

पुन्यातले

सखाराम_गटणे™
Tue, 10/06/2009 - 11:53 नवीन
पुन्यातले का तुम्ही? टुकार बससेवा पुण्यात येउन अनुभवावी.
  • Log in or register to post comments

क्रूपया

मसक्कली
Tue, 10/06/2009 - 11:58 नवीन
क्रूपया इथे चर्चा करवि निन्दा नाही....धन्यु.. आनुभव शेअर करन्याकरिता आहे .
  • Log in or register to post comments

म्हणायचे बस, ...पण जायचे उभ्यानेच.

मॅन्ड्रेक
Tue, 10/06/2009 - 12:01 नवीन
at and post : janadu.
  • Log in or register to post comments

आमचाबी आणभव....

विशाल कुलकर्णी
Tue, 10/06/2009 - 12:18 नवीन
लै भारी आणभव हायती आमचेबी. एका टायमाला पुन्यात चतुरशिंगीचं तिकट काडलं पगा, आन म्हायिती नसल्याने चुकुन चवाणनगरला उतारलो, तर कंडाक्टरमामांनी आसलं काय काय ऐकिवलं की इचारु नगासा...... Image removed. दुसरा आणभव होता डेन हाग (हॉलंड) चा. इतनं बस पकाडली आन मडुरोडमचं तिकट काडलं बगा. चुकुन बस दोन ठेसनं फुडं गेल्यावर लक्षात आलं. आनं डायवरदादांची माफी मागुन उतराया गेलो, तर येडं त्येच आमची दहा येळा माफी मागायला लागलं. आमाला चुकीच्या ठेसनावर उतरीवलं म्हुन. Image removed. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

आपल्या कड

मसक्कली
Tue, 10/06/2009 - 12:29 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आपल्या कड शिव्या घातल्या आसत्या तुला तुज कळत नाय का म्हनुन.... X( ~X( तीकडे माफी,,,, =)) =)) =)) =)) =)) हसु हसु लोळ्ले रे बाबा... :D
  • Log in or register to post comments

तेच झालं

विशाल कुलकर्णी
Tue, 10/06/2009 - 12:42 नवीन
तेच झालं होतं पुण्यात ! अगदी मुंबईत देखील अनुभव वेगळा नव्हता. अर्थात हॉलंडमध्येदेखील शहरातुन चांगला अनुभव येतो. पण तुम्ही जरा इंटेरिअरमध्ये गेलात की लक्षात येतं ..... "घरोघरी मातीच्याच चुली!" ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मसक्कली

बंगलूरू ते मुंबई

आशिष सुर्वे
Tue, 10/06/2009 - 14:36 नवीन
जेव्हा विमानप्रवास आजएवढा स्वस्त नव्हता, तेव्हा मी बंगलूरू ते मुंबई आणि परतीचा प्रवास 'बस' ने करायचो.. बंगलूरू ते मुंबई प्रवासाला कमीतकमी १६ आणि जास्तीतजास्त १८ तास लागतात. 'कोंडुसकर', 'व्ही.आर.एल.', 'शर्मा', 'नॅशनल', 'के.स.आर.सी.टी.' ह्यांच्या छान 'व्हिडीओकोच' व्होल्वो बसेस आहेत.. ह्या सर्व बसेस 'मॅजेस्टिक' ह्या ठिकाणाहून सुटतात.. ('मॅजेस्टिक' म्हणजे मुंबईचे 'मुंबई सेंट्रल') ह्यांचे बुकींग 'आंतरजाला'वरून केले तर सुरक्षित असते.. कारण काही 'बुकींग एजंटस' त्यांच्या मर्जीप्रमाणे एन वेळी तुमच्या आरक्षित जागेची अदलाबदली करू शकतात.. असो, तर्र हा १६ ते १८ तासांचा प्रवास अगदीच कंटाळवाणा नसतो. कारण अंदाजे ८ वाजता ह्या व्होल्वो निघतात आणि लगेचच एखादा नवा हिंदी चित्रपट लावला जातो.. हा चित्रपट संपायच्या सुमारासच बस एखाद्या हॉटेलात शिरते (अंदाजे ११ वाजता) .. जेवण झाल्यावर मग टी.व्ही बंद केला जातो.. आणि मग बहुतेक सर्व प्रवाशी आपापल्या निमुळत्या जगात झोपण्याचा प्रयत्न करु लागतात.. जे यशस्वी होतात, त्यांचे डोळे जेव्हा उघडतात, तेव्हा 'के.ए.' च्या पाट्यांची जागा 'एम.एच.' च्या पाट्यांनी घेतलेली असते.. मग अंदाजे ७-८ च्या सुमारास बस एखाद्या टुमदार हॉटेलात शिरते आणि तिथे प्रवाशी आपापली झोप चहा, कॉफी, सिगारेट, इत्यादी मार्गाने उडवितात.. प्रवासास परत सुरूवात होताच अजून एखादा नवा हिंदी चित्रपट लावला जातो.. जो साधारण ११ च्या सुमारास संपतो.. मग जे उदारमतवादी बसवाले असतात, ते तिसरा चित्रपट लागोलाग सुरू करतात आणि बाकीचे 'आकाशवाणी' सुरू करतात.. ह्या सुमारास मग आमच्यासारखे 'पामर' प्रवाशी आपापली उर्वरित झोप शोधण्याचा प्रयत्न करू लागतात.. - कोकणी फणस
  • Log in or register to post comments

हा हा हा ...

छोटा डॉन
Tue, 10/06/2009 - 15:00 नवीन
मस्त लिहले आहे मालक, आवडले. आठवणी चाळवुन पाहिल्य तुमच्या लिखाणामुळे ... ------ के.स.आर.सी.टी.व्ही.आर.एल.छोटा डॉन शर्मा कलसिपल्या, मॅजेस्टिक, बंगरुळु ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे

सिटीबस का?????

प्रभो
Tue, 10/06/2009 - 14:45 नवीन
हा लेख्/काथ्याकूट फक्त सिटीबस साठी आहे का सगळ्या प्रकारच्या बस साठी????? -(बसलेला)प्रभो
  • Log in or register to post comments

मुम्बईत

JAGOMOHANPYARE
Tue, 10/06/2009 - 15:07 नवीन
मुम्बईत असताना कान्जुर्मार्ग ते मरोळ गाव ३९८ ने जायचो.... मुद्दाम पवई तलाव बघायला मिळावा म्हणून.. आणि कान्जुरचे बस स्टॉप अगदी गावातल्यागत वाटते.. झाडाखाली ८-१० लोक उभारलेले... घाटकोपरवरुन जायला मला अज्याबात आवडायचे न्हाय... नंतर मग कंपनी बदल्ल्यावर सी एस टी ते चर्च्गेट बस ३ रु. तिकिट ... लई भारी वाटायचे... आता हितं... मालदिवमध्ये.... एकूण २०० बेटं हायेत मानसं ( कोन रं त्यो मनसे म्हनाला ?)रहात्यात अशी.. ( उरलेली १८०० बिन मानसान्ची..... ) तर त्यापैकी फक्त २ बेटावर बशी हायेत.... एक मालदीव एरपोर्टवर ... ही बस लई झ्याक........ आर्टिफिशियल बेट हुलुमाले पत्तुर जाते.... दोन्ही बाजूला २ फूट खोलीवर समुद्र आणि मधी चिचोळा रस्ता.. त्यावर बस जाते.... निस्ती बसच... बाकी कशाला जायची परवानगीच न्हाई.. दुसरी बस अद्दू म्हनुन बेट हाय तिथे हाय म्हने... म्या अजुन नाय गेलो.... ते बेट दक्षिण गोलार्धात हाय म्हनं ..... उरलेलं देशभर सगळं ट्याक्षीनं न्हायतर चालत चालत चालत फिरायचं........ *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments

आहो मी

मसक्कली
Tue, 10/06/2009 - 15:13 नवीन
आहो मी सिटीबस च सन्गितल पण......... :P आपन इथे आनुभव शेअर करु शकता.... :D फक्त बस शी रीलेटेड्...आसाव..... B)
  • Log in or register to post comments

ब स

भडकमकर मास्तर
Tue, 10/06/2009 - 15:37 नवीन
दिवसभरची मरमर करून बसमध्ये खिडकी मिळवून दीड तास झोपण्यासारखं सुख नाही,... (दोन वर्षे ४२ नंबरने प्रवास केलेला..) मास्तर _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments

कात्रज

फ्रॅक्चर बंड्या
Tue, 10/06/2009 - 15:41 नवीन
कात्रज -निगडी की कात्रज ते भोसरी बस ४२ नंबर आहे... आठवतय की मला पण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

मी बारावीत

फ्रॅक्चर बंड्या
Tue, 10/06/2009 - 15:39 नवीन
मी बारावीत असताना क्लास ला जायचो कात्रज ते लक्ष्मीनगर तिकीट ५ रुपये आहे. पण वाहक (conductor) आमच्याकडुन ५ रुपये घ्यायचा अन आम्हाला ३.५० चे तिकीट द्यायचा , अन १ रुपया परत द्यायचा. आमचा १ रुचा फायदा अन त्याला ५० पैसे त्यामुळेच बहुतेक तोट्यात गेली असावी :? :?
  • Log in or register to post comments

प्रकाटाआ.

गणपा
Tue, 10/06/2009 - 16:13 नवीन
प्रकाटाआ.
  • Log in or register to post comments

बस: जिवनाचा अविभाज्य घटक

गणपा
Tue, 10/06/2009 - 15:55 नवीन
शालेय जीवनात बेस्ट हा दि बेस्ट पर्याय होता. ६ वी ते १० वी ३२२ कालिना ते हनुमान रोड (पार्ले) बसने प्रावास केला. कंडक्टर आणि ड्रायवर दोघे ओळखीचे झाले होते, क्व्चीत जर कंडक्टर आणि ड्रायवर ची शिफ्ट बदलुन बदली कंडक्टर आणि ड्रायवर आले तरी त्यांच्याशी ओळखी काढायचो. ड्रायवरच्या बाजुला इंजीन जवळ जो दांडा त्यावर बसुन प्रवास करयचो, मग भले बस रिकामी का असेना. मग डिप्लोमाला असताना ३ वर्ष तीच ३२२ पण विरुद्ध दिशेने जाणारी कालिना ते विद्याविहार पकडायचो. अशी एकंदर ८ वर्ष सलग बेस्ट प्रवास केला. एकदा गंमत झाली, टिकिटाचे पैसे रोज मिळत वर रुपया २ रुपये. शाळा सुटल्यवर भुक लागली म्हणुन टिकिटा पुरते ठेवुन वरचे पैसे संपवले. आणि चक्क बस मध्ये डोळा लागला.(त्यादिवशी नवीन ड्रायवर असल्यने मागे बसलो होतो.) .उठलो तो डायरेक्ट शेवटच्या स्टॉपला. पाचावर धरण बसली, खिशात दमडी नाही, चालत जायच तर रस्ता माहीत नाही. रिक्षा करुन गेलो तर घरी समजेल आणि मार बसेल तो वेगळा. कंडक्टरला सगळ खर खर सांगीतल, बापड्याने चकटफु घरापर्यंत सोडल. डिप्लोमा नंतर ऐरोलीला कॉलेज ल होतो. कुर्ला ते ठाणा बाय ट्रेन, आणि मग ठाणा ते ऐरोली सेक्टर ३ आसा ३ वर्ष एस्टी ने प्रवास घडला. अरारारारा काय तो प्रवास लै बेक्कार राव, गाडी कधी कुठे लागेल भरवसा नाही . गाडीचा नंबर अनाउंस केला जायचा, मग ही गर्दी उसळायची. हातातल्या ड्रॉईंग शिट्स , मिनी ड्राफ्टर सांभाळत कधी दारातुन तर काधी मागच्या इमर्जंसी खिडकीतुन घुसायचो.. पण त्यात पण मज्जायाय्ची. बरेच वेळा कंडक्टर बांधलेला असायचा ८-१० मित्रांच्या टोळक्यात ३-४ टिकीटच काढायचो :)
  • Log in or register to post comments

आमचा प्रवास

सोनम
Tue, 10/06/2009 - 16:23 नवीन
आमचा बसचा प्रवास कधी तरीच होत असतो. :) त्यामूळे जास्त काही अनुभव नाही सांगता येणार. :( काही दिवसापूर्वी (म्हणजे परवाच ;) ) बस मध्ये इतकी गर्दी होती की, बसायला जागा नव्हती. :( त्यामुळे सुमारे १.३० -२ तासाचा प्रवास उभे राहूनच करावा लागला. ~X( एकदा तसेच एस.टी . ने प्रवास करताना बसमध्ये जागा नव्हती. :( फक्त एक जागा शिल्लक होती. ती जागा पाहून आनंद झाला :D , तिथे बसल्यावर कळले की ती जागा कंडक्टर ची जागा होती. #o मी ही मुद्दाम तिथेच बसून राहिले. :) बिचारा कंडक्टर रागाने माझ्याकडे पाहत होता. :( पण मी काही जागचे हालले नाही. :D शेवटी त्याला दुसरीकडे जागा भेटल्यावर तो तेथे बसला. :)
  • Log in or register to post comments

पि.एम.टी ची कहानी......

नाम्या झंगाट
Tue, 10/06/2009 - 17:06 नवीन
याच्यावरून मला मिसळ्पाव वर असलेल्या एका मस्त लेखाची आठवण झाली. कृपया जरुर वाचावे... आमची पी.एम.टी.
http://uddhavraj.blogspot.com/2008/11/blog-post_9554.html
(आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट
  • Log in or register to post comments

चोर चोर चोर

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 10/06/2009 - 17:23 नवीन
अरे हा लेख तर या उद्धवराजने चोरलाय. आपल्या टार्झटाने त्याच्या कुबड्या खवीस अशा पूर्वजन्मात तो लिहीला होता. ही घ्या लिंक! व्वा! या वाङमयचोर माणसाने नावपण काय घेतलं आहे, "उद्धवराज" ...आवडलं एकदम!! शिवाय पर्‍याचाही एक लेख चोरलाय. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाम्या झंगाट

आईच्यान....

बिपिन कार्यकर्ते
Tue, 10/06/2009 - 17:26 नवीन
खरंच की... या उध्दवराजने तर जबरीच चोरी केली आहे. तो कधी टार्‍याच्या तावडीत येऊ नये अशी देवाकडे प्रार्थना. नीलकांत / तात्या... मिपावर लेखन कॉपी पेस्ट करता येऊ नये अशी सोय करता येईल का? काही साइट्सवर अशी सोय आहे असे आठवते. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

चोराविरुध

सखाराम_गटणे™
Tue, 10/06/2009 - 17:28 नवीन
चोराविरुध काहीत्री करा[
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अरेच्च्या

टारझन
Tue, 10/06/2009 - 17:57 नवीन
अरेच्च्या ,,,
खरंच की ... बाकी काय लोकं आहेत =)) अगदी डिस्क्लेमर सहित लेख ढापतात :) अंमळ मौज वाटली. असो .. आमचा लेख चोरण्यात आला ह्यात आम्हाला फारंच आनंद आहे. कारण लोकं दुनियादारी सुद्धा चोरून वाचतात (आमचे लेख स्वतःच्या नावावर खपवतात इतकंच !! असो ... आणखी अवांतरपणा करत नाही , अन्यथा खाते उडायचे :) उद्धवराज (वा उद्धव + राज !! क्या बात है !!! ) टेमकरांना अजुन लेखण चोरायचे असल्यास आमच्या ब्लॉगची दारे सताड उघडी आहेत. कोणी त्यांच्या ओळखीचे असले तर निरोप पोचवावा :)
असं लिहीणारंच होतो ... पण च्यामारी .. .त्याने बहुदा तो ब्लॉग आत्ताच ऊडवला ! तो इथे कोणत्या तरी फेक आय.डी. ने वावरत असावा :) - (अंमळ फेमस) टारझन छ्या .. कैच्याकैच !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

टारझन

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 10/06/2009 - 18:02 नवीन
टारझन टेमकर अशी सही नाही टाकायची?? ;-) (अवांतरेतर) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

+१

प्रभो
Tue, 10/06/2009 - 17:34 नवीन
तेच म्हटलं...अपल्या टारभारांच्या खव प्रस्तावनेतच त्यांनी ह्याची लिंक दिलेली आहे.. -प्रभो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

वा!

धमाल मुलगा
Tue, 10/06/2009 - 17:43 नवीन
आयला, दुसर्‍याचे लेख सरळसरळ ढापायचे आणी स्वतःच्या ब्लॉगवर टाकायचे? इतकी हौस कशाला असते बॉ लोकांना? नाही स्वतःला काही लिहिता येत तर गप पडावं ना...असल्या चोर्‍यामार्‍या करुन काय मिळतं कोण जाणॅ! बरं...उचललं तर निदान कोणाचा लेख आहे ह्याचीही टीप लिहिता येऊ नये? इतकी फुकटेगिरी??? लय भारी!! ज्यांना ह्याबद्दल (अश्या चोर्‍यांबद्दल) खरोखरच काही वाटते त्या आपण सगळ्यांनी त्या पंटरच्या ब्लॉगवर जाऊन कमेंटींचा पाऊस पाडायचा का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

शेरलॉक होम्स!

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 10/06/2009 - 17:47 नवीन
उद्धवराज टेमकर मिपा वाचक असणार! लगेच पाच मिनीटात पान गायब झालं आहे. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मिपा वाचक

नाम्या झंगाट
Tue, 10/06/2009 - 18:04 नवीन
होय. मी मिपा वाचक आहे. आवडलेला लेख लिंक केल्याबद्द्ल आणि त्यामुळे काहींच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून ही क्षमायाचना.....!! बाकी बर्याच जनांनी चांस मारून घेतला.....!!!! (दुखावलेला पण तरीही सर्व काळ मिपाप्रेमी राहणारा - नाम्या झंगाट)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही

अनामिक
Tue, 10/06/2009 - 18:11 नवीन
तुम्ही चोरी पकडून दिलीत, मग तुम्ही का दुखावताय? की तुम्हीच ते उद्धवराज टेमकर? फक्तं एक शंका म्हणून विचारतो आहे. -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाम्या झंगाट

आत्ताचं माझे आवडते लेख काढून टाकले......

नाम्या झंगाट
Tue, 10/06/2009 - 18:14 नवीन
आत्ताचं माझे आवडते लेख ब्लॉग वरुन काढून टाकले...... (आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाम्या झंगाट

आत्ताचं

टारझन
Tue, 10/06/2009 - 19:32 नवीन
आत्ताचं माझे आवडते लेख ब्लॉग वरुन काढून टाकले......
तुमचे हे शब्द वाचून उर भरून आला हो (आता ओसंडून वहातो आहे) !! कृपया मी आपली सर्व मिपाकरांतर्फे माफी मागतो , आपण आपल्या ब्लॉगवर टाकलेले लेख "केवळ आपल्याला आवडतात" म्हणून टाकले होते , तरीही मिपाकरांनी (तिथं तसं लिहीलेलं दिसलं नाही म्हणून काय झालं ?) आपल्यावर तोंडसुख घेतल्याबद्दल त्यांच्या तर्फे मी तुमची माफी मागतो. बाकी नाम्या झंगाट जी, आपल्या प्रामाणिक पणा वर आम्ही बेहद खुष झालोत, तेंव्हा माझा उरलेला ब्लॉगपण तिकडे "केवळ आवडला" म्हणून लावावा, अशी मी जाहीर याचना करतो हो :) आणि आपल्या ब्लॉगच्या वाचकांची संख्या भरगोस वाढो अशी आशा करतो ! त्याच बरोबर अवांतर प्रतिसाद लिहील्याबद्दल राजे,नाना बरोबर माझेही खाते उडु नये म्हणून तात्याची जाहीर माफि मागतो. - (ब्लॉग वर केवळ आवडते (दुसर्‍यांनी लिहीलेले) लेख लावणारा ) झाम्या झुंगाट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाम्या झंगाट

मोठेपणा...

धमाल मुलगा
Tue, 10/06/2009 - 18:14 नवीन
नाम्याभौ, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही जाहीरपणे 'आपण हे केलं होतं 'असं सर्वांसमक्ष सांगितलं. माहिती नसेल तर अशा गोष्टी घडु शकतात, त्याबद्दल काहीच म्हणणे नसते कोणाचे...उदाहरणादाखल तुमचाच हा प्रकार घेऊ :) पण बर्‍याचदा असं दिसतं की स्वतःच्या ब्लॉगवर इकडुन तिकडुन चोरुन लिहिलेलं असतं...आणी त्या लेखकाचं श्रेय स्वतः घेण्याचा विचारही असु शकतो...अश्या प्रवृत्तींविरोधात वरील प्रतिसाद होते. तेव्हा आपण गैर मानुन घेऊ नये. छोट्या-छोट्या चुका कधीमधी सगळ्यांकडुनच होतात की :) फिकीर नॉट! मोठ्या मनानं तुम्ही जाहीर केलं आणि ब्लॉगवरुन ते लेखन काढलंत ह्यातच सर्व काही आलं की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाम्या झंगाट

धमुशी

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 10/06/2009 - 18:18 नवीन
धमुशी सहमत. फिकीर नॉट! फक्त पुढच्या वेळेस आपले आवडते लेख ब्लॉगवर देताना योग्य माणसाला त्याचं श्रेय मिळेल हे पाहिलंत की झालं. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

अदितीशी

निखिल देशपांडे
Tue, 10/06/2009 - 18:28 नवीन
अदितीशी सहमत.. मला आवडलेला एक लेख मुळ लेखकाचे नाव किंवा लिंक दिले की झाले... जमल्यास त्याची परवानगी सुद्धा घ्यावी :-) निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

वर

llपुण्याचे पेशवेll
Wed, 10/07/2009 - 09:03 नवीन
वर प्रतिसाद दिलेल्या सर्व मित्र मैत्रिणींशी सहमत. :) (जालीय सहमतीकार) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

.

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 10/06/2009 - 18:22 नवीन
प्रकाटाआ (आज मी एकच विचार दोनदोनदा का करत आहे? चढलेली नसावी! ) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

काल हत्तीवरुन गेली होतीस का?

चतुरंग
Tue, 10/06/2009 - 19:53 नवीन
;) (चौकस)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

याच्यावरू

नाम्या झंगाट
Tue, 10/06/2009 - 17:32 नवीन
याच्यावरून मला मिसळ्पाव वर असलेल्या एका मस्त लेखाची आठवण झाली. (त्यामुळे सांगीतले कि मिसळ्पाव वर असलेल्या एका मस्त लेखाची आठवण झाली. ) लेख आवड्ला म्हणून लिंक केला........कशासाठी????? फ्क्त मिसळ्पाव आणी मराठी साठी.... (आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाम्या झंगाट

लिंक

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 10/06/2009 - 17:37 नवीन
लिंक दिल्याबद्दल धन्यवाद! चोरी सापडली ना! तुम्ही नका एवढे अपसेट होऊ!! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाम्या झंगाट

खरंच की

निमीत्त मात्र
Tue, 10/06/2009 - 17:33 नवीन
खरंच की सरळ सरळ ढापलाय! नावही हायब्रीड आहे उद्धव-राज!! टारझनराव तुमच्या सोयीसाठी त्याने फोटू पण दिला आहे, एक विमा काढून या पटकन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाम्या झंगाट

पृष्ठ

पर्नल नेने मराठे
Tue, 10/06/2009 - 18:30 नवीन
पृष्ठ आढळले नाही क्षमस्व, आपण zzz zzz ब्लॉगवर शोधत असलेले पृष्ठ विद्यमान नाही. 8| चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाम्या झंगाट

अछु दे आं....

धमाल मुलगा
Tue, 10/06/2009 - 18:44 नवीन
तुला नाऽऽय गं तडी.... तु खेल आं...... च्यामारी...वाच की जरा...उडवलं ते लिखाण त्यांनी स्वत:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा