Skip to main content

मायावतींचा असाही दलित उध्‍दार

लेखक मड्डम यांनी मंगळवार, 29/09/2009 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
दलितांच्‍या नेत्या असल्‍याचा आणि त्यांच्‍या उत्‍थानासाठी झटण्‍याचा दावा करणा-या बसपा सुप्रिमो मायावती सत्तेत आल्‍या. आणि अनेकांना आता सोन्‍याचे दिस येतील असे वाटले. मात्र झाले वेगळेच सत्तेवर आल्‍या-आल्‍या यापूर्वी त्रासदायक ठरलेल्‍या अधिका-यांच्‍या बदल्‍या, चौकशा आणि निलंबने यातच सुरूवातीची वर्षे घालविल्‍यानंतर आता बहन मायावतींनी पार्क उभारणीचे (स्‍वतःचे पुतळे उभारण्‍याचे) महत्‍कार्य हाती घेतले आहे. ते बरेच वादग्रस्‍तही ठरले. अनेक राजकीय पक्षांचा विरोध आणि न्‍यायालयाचा आदेश डावलून ते अजुनही सुरूच आहे. उत्तर प्रदेशचे राजकारण असूयेच्‍या पायावर उभे आहे. ही गोष्‍ट तर सर्वमान्‍यच आहे. त्‍यामुळे सत्तेवर आल्‍यानंतर मायावतींच्‍या पुतळ्यांवर बुलडोझर चालवू अशी घोषणा मुलायम बाबूंनी केल्‍याने नवा वाद उभा राहिला आहे. मुलायम यांच्‍या घोषणेला मग मायावतींनीही असे दमदार उत्तर दिले आहे. हे उत्तर आपल्‍याला इथे वाचायला मिळेल... आता हे महाभारत पाहिल्‍यानंतर कुठला दलित उध्‍दार आणि कसचा काय असा प्रश्‍न पडणे साहजिकच आहे, की नाही.

वाचने 2988
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

मुलायम यांनी पुतळे पाडण्याएवजी अजुन पुतळे बांधावेत. आणि तेवढाच रोजगार निर्माण होइल. काही रक्षक नेमावेत. काही प्रमाणात इअतर राज्यावरील बोजा कमी होइल.

.

बाबासाहेबां नंतर सर्वांनी केवळ दलितांचा राजकारणासाठी उपयोग करुन घेतला. उध्दार मात्र स्वतःचा केला -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

बाबासाहेबां नंतर सर्वांनी केवळ दलितांचा राजकारणासाठी उपयोग करुन घेतला. उध्दार मात्र स्वतःचा केला -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

आपण युपी बद्दल बोलू नये. युपीचे लोक राज ठाकरे सोडले तर महाराष्ट्राबद्दल, आपल्या इतर काही समस्यांबाबत बोलत असतील काय? अजीबात नाही. असल्याच काही बातम्या वर्तमानपत्रे पाकिस्थानच्या बद्दल देतात. असे वाटते की आपला प्रतिनीधी दररोज तेथे जातो व बातम्या आणतो. अरे आपल्याला काय कर्तव्य त्याच्या बद्दल? अरे जागाच भरवायची कॉलममध्ये तर ताकद वाढवायच्या जाहीराती तरी टाका. दोन पैसे तरी सुटतील जास्तीचे. पण ते युपी बिहार पाक नको. ----------------------------------- - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

मायावती हा शब्द उच्चारला तरी मला मळमळतं !! उघड उघड भीक मागताना दिसतात मायावती बर्‍याचदा !! मायावती काय न तो फोकलीचा मुलायम काय .. साला ह्या धतुर्‍यांमुळेच ते भय्या लोकांचे लोंढे इकडे येत आहेत ! भिक्कारचोट साले !! आपल्या इकडे मायावतींच्या तोडीचा एक नेता आहे , त्याचं सामान सरकारी घराबाहेर फेकल म्हणे , सवलत देउन ही हालत नव्हते ते घरातून

In reply to by टारझन

सवलत देऊन ही हालत नव्हते घरातून अस नाही आहे.आठवलेंनी मुदतवाढ मागीतली होती आणि इतर जे राजकारणि नोटिसा बजावूनही घरातून हालत नव्हते त्याचे काय?यांच्यावर अन्याय आणी दुसर्‍याला एक न्याय हे बरोबर नाही.आणि एक आपण मान्य केले पाहीजे आठवले कितिही झाले तरी एक यशस्वी राजकारणि आहेत.आजवर तथाकथित सवर्ण नेत्यांनी त्यांचा वापर केला त्या विषयी कोणिही बोलत नाहीत.यांच कस आहे यांना सवलत मिळते ना............... पण एक सांगावेसे वाटते की सवलत घेणार्‍या अनुसुचित जातीत एकूण ४८ जाती(१३%) सामाविष्ट आहेत.या खेरीज ओबीसी,एसटी,एनटी हे ही येतात.खुला प्रवर्गाला कीती टक्के मिळतात ते पहा.

In reply to by विकि

आपण खास एक कट्ट्त करु तुमच्यासाठी. बाकी तुमचे कैड चे काय झाले?

In reply to by विकि

अजून काही उंडगे बसले आहेत म्हणून मी सहा महिने घर सोडलं नाही हे कसलं समर्थन? मंत्री जाऊ दे .. खासदार पण नाही आता. मग सरकारी जागा सहा महिने न सोडणं हे अनधिकृत पणे एखादी जागा बळकावण्यासारखंच आहे. आणि अर्थात हे सगळ्याच अशा लोकांना लागू आहे. फक्त आठवले नाही. आता त्याबद्दल महाराष्ट्रात तोडफोड आणि आंदोलनं करण्याचं कसलं समर्थन आहे ते सांगाल का? चार पाच महिन्यांपूर्वी दोन्ही काँग्रेस पक्षांच्या आधारासह शिर्डीत जबरदस्त पराभव झालेले कसले यशस्वी राजकारणी? मला राज्यसभेतून मंत्रीपद मिळालंच पाहिजे म्हणून जाहीर हट्ट धरून, काहीच मिळत नाही - खासदारकी हरल्यामुळे गेली आणि आता वाटेला लावलं म्हणून आपल्या इतर बांधवांचा पुळका आला... मग इतके वर्ष अगदी गेल्या वर्षी केंद्रात बसताना का आठवले नाहीत हे रिडालोस चे सहकारी पक्ष ... तेही दलितांसाठीच काम करतात ना? म्हणजे वैयक्तिक काही तोटा झाला तर तो दलितांचा आणि फायदा झाला तर माझा ! मग प्रकाश आंबेडकरांशी का पटलं नाही... कारण नेतेपद हवं आहे... (याचा अर्थ दोन्ही काँग्रेस / भाजप - दोन्ही सेना यापेक्षा खूप महान आहेत असा अजिबात नाही. पण या समर्थनाला काही अर्थ नाही इतकंच)

मायावती, लालुप्रसाद, मुलायम अश्या दिग्गज भिक्काचोटांनी युपी \ बिहार सारख्या नैसर्गिक साधन संपत्तीने समृध्द आणि बेहिशोबी कष्ट करण्याची तयारी असलेले नागरीक अश्या सोन्यासारख्या प्रांतांची अक्षरशः धुळधाण केली आहे. स्वतःच्या तुंबड्या व्यवस्थित भरुन घेताना जनतेला पार पार नागवले आहे. त्याचा त्रास अपरिहार्यपणे इतर राष्ट्रांना भोगावयास लागतो. अश्या रावणांचे सामुदायिक दहनच केले पाहीजे...

In reply to by हर्षद आनंदी

बरोबर बोलला तू. अशीच काही परिस्थीती अजून काही दशके चालू राहिली तर इतर राज्ये ही छोटी छोटी राष्ट्रेच दिसतील. ----------------------------------- - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

हे लोक आता आपलि हालत खराब करतील. तिकदच खाउन झाल आता मुम्बै सौरभ