मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मंजूर नाही

क्रान्ति · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
नको बंधने, जाच मंजूर नाही नदीला किनाराच मंजूर नाही ! कशी साथ द्यावी तुझ्या कीर्तनाला? मृदंगास ठेकाच मंजूर नाही ! तुला शिंपडावे सुखाच्या सरींनी, तुझ्या श्रावणालाच मंजूर नाही हसू तेच ओठी, खळी तीच गाली, कशी आज ही लाच मंजूर नाही ? तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे? वसंता, तुझा जाच मंजूर नाही ! मिळेना तुझ्या साक्षिने न्याय येथे, दिलेला पुरावाच मंजूर नाही लपेटून घ्यावे तुला मी, मला तू, दुरावा कुणालाच मंजूर नाही ! अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा, 'तुझी भेट आताच मंजूर नाही '

वाचने 17666 वाचनखूण प्रतिक्रिया 37

मदनबाण 11/09/2009 - 14:42
कशी साथ द्यावी तुझ्या कीर्तनाला? मृदंगास ठेकाच मंजूर नाही ! मस्तच... मिळेना तुझ्या साक्षिने न्याय येथे, दिलेला पुरावाच मंजूर नाही व्वा. अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा, 'तुझी भेट आताच मंजूर नाही ' लयं भारी... :) मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई.

मनीषा 11/09/2009 - 15:24
तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे? वसंता, तुझा जाच मंजूर नाही ! अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा, 'तुझी भेट आताच मंजूर नाही ' खूपच छान ..

In reply to by यशोधरा

अनिल हटेला 11/09/2009 - 15:56
अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा, 'तुझी भेट आताच मंजूर नाही ' क्या बात है......:-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

In reply to by अनिल हटेला

अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा, 'तुझी भेट आताच मंजूर नाही ' क्या बात है ! आवडल्या ओळी.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राघव 11/09/2009 - 17:25
अतिशय उत्तम! प्रत्येक शेर अगदी खणखणीत. संपूर्ण गझल आवडली! :) (क्रांतीतैच्या गझलांचा फॅन) राघव

sujay 11/09/2009 - 19:37
तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे? वसंता, तुझा जाच मंजूर नाही ! केवळ अप्रतीम !! (तुमच्या गजलांचा फ्यान) सुजय

प्राजु 11/09/2009 - 19:49
खणखणीत गझल... !!! जबरदस्त !! कशी साथ द्यावी तुझ्या कीर्तनाला? मृदंगास ठेकाच मंजूर नाही ! तुला शिंपडावे सुखाच्या सरींनी, तुझ्या श्रावणालाच मंजूर नाही तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे? वसंता, तुझा जाच मंजूर नाही ! या खूप खूप आवडल्या ओळी. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

संदीप खरेंची नामंजूर कविता ह्यामागची प्रेरणा आहे का? मंजूर नाही पेक्षा नामंजूर जास्त ठसकेबाज वाटते. इथला रदीफही बदलून नामंजूर करता येईल का? जपत किनारा शीड सोडणे नामंजूर! कसं एकदम त्वेषात म्हणावसं वाटतं.

In reply to by निमीत्त मात्र

अन्वय 11/09/2009 - 23:46
संदीप खरेंची नामंजूर कविता ह्यामागची प्रेरणा आहे का? संदीप खरेंना लिहिता येते????

In reply to by निमीत्त मात्र

क्रान्ति 12/09/2009 - 09:22
निमित्तमात्रजी, मी संदीप खरे यांच्या कविता वाचल्या नाहीत, कधीतरी काही कविता ऐकल्या आहेत. नामंजूर ही तर कधीच ऐकली नाही. मिपावर स्वाक्षरीत काही ओळी वाचल्या आहेत. माझ्या याच नाही, तर प्रत्येकच गझलमागची प्रेरणा माझे आद्य गझलगुरू स्व. सुरेश भट, त्यांच्या नावाचं संकेतस्थळ sureshbhat.in, तसंच आणखी एक संकेतस्थळ marathigazal.com, या संकेतस्थळावर गझल आणि गझलविषयी लेख लिहिणारे सर्व मान्यवर, मिपा आणि मायबोली या संकेतस्थळांवरचे मान्यवर कवि आणि गझलकार, त्यांच्या रचना, वाचकांच्या हुरूप वाढवणार्‍या प्रतिक्रिया आणि सगळ्यात शेवटी माझं मन, माझे विचार! याशिवाय अन्य कोणतीही प्रेरणा माझ्या गझललेखनामागे नाही, हे सविनय सांगावेसे वाटते. क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

लवंगी 12/09/2009 - 12:43
तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे? वसंता, तुझा जाच मंजूर नाही ! अप्रतिम..

सचिन 12/09/2009 - 13:44
क्षमस्व....! पण मला ही कविता विशेष समजली नाही. भटांच्या कवितांशी खूप साधर्म्य वाटते, आणि वाचताना त्यांच्याप्रमाणेच एक र्‍र्हिदम जाणवतो...म्हणून छान वाटली. पण, कुठल्या मानसिक परिस्थितीत ह्या ओळी सुचल्या आहेत वा प्रसंग काय आहे...समजले नाही. नको बंधने, जाच मंजूर नाही नदीला किनाराच मंजूर नाही ! --- येथे बन्धने नकोत असे वाटत असताना, लपेटून घ्यावे तुला मी, मला तू, दुरावा कुणालाच मंजूर नाही ! --- येथे बन्धने हवीत असे वाटत आहे. तसेच, अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा, 'तुझी भेट आताच मंजूर नाही ' हे जरा विषद केलेत तर बरे होईल. - माझ्या स्पष्ट प्रतिक्रियेबद्दल प्लीज गैरसमज नसावा. कविता मला समजली नाही असे माझे मत आहे. अधिक नीट समजावी आणि आनन्द घेता यावा म्हणून लिहिले आहे.

अजिंक्य 13/09/2009 - 18:22
अतिशय छान गझल. तुला शिंपडावे सुखाच्या सरींनी, तुझ्या श्रावणालाच मंजूर नाही मस्त. अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा, 'तुझी भेट आताच मंजूर नाही ' आवडलं. असेच लिहीत राहावे. -अजिंक्य.

निशांत५ 15/09/2009 - 11:06
लपेटून घ्यावे तुला मी, मला तू, दुरावा कुणालाच मंजूर नाही ! अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा, 'तुझी भेट आताच मंजूर नाही ' या ओळी आवड्ल्या......

पाषाणभेद 15/09/2009 - 12:13
तुमची गझल न वाचणे मंजुर नाही. ----------------------------------- काय! तुमच्या घरी 'गोदरेज' च्या कपाटांवर सुटकेस, अडगळ सामान इ. ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

सोनम 15/09/2009 - 12:57
तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे? वसंता, तुझा जाच मंजूर नाही ! मिळेना तुझ्या साक्षिने न्याय येथे, दिलेला पुरावाच मंजूर नाही खूपच छान... :) :) "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

लपेटून घ्यावे तुला मी, मला तू, दुरावा कुणालाच मंजूर नाही ! >> वा! सुंदर. हा शेर गझलेच्या मूळ भावनेशी विसंगत आहे खराच. पण मला मात्र तोच जास्त भावला आहे. दुर्लक्षून जावे अशी ही कविता नाही. मात्र लक्ष देऊन पाहणार्‍यांस विसंगतीच जास्त दिसत आहेत.

In reply to by नरेंद्र गोळे

मिसळभोक्ता 16/09/2009 - 02:02
गोळे काका, ही गझल आहे, कविता नाही. गझलेचा प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविता असते. कलोअ -- मिसळभोक्ता

In reply to by नरेंद्र गोळे

उत्खनक 22/04/2013 - 22:27
लपेटून घ्यावे तुला मी, मला तू, दुरावा कुणालाच मंजूर नाही ! यात दुरावा असण्याला कारणीभूत असणारं कोणतंही बंधन मंजूर नाही असा भाव व्यक्त होतोय. त्यामुळे उलट गझलेची भावना जास्त उत्कटपणे पोचतेय असे वाटते. अप्रतीम गझल! :)

श्वेता२४ 24/12/2019 - 11:42
तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे? वसंता, तुझा जाच मंजूर नाही ! मिळेना तुझ्या साक्षिने न्याय येथे, दिलेला पुरावाच मंजूर नाही लपेटून घ्यावे तुला मी, मला तू, दुरावा कुणालाच मंजूर नाही ! क्या बात!