✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हे शब्द कोठे गेले

व
विजुभाऊ यांनी
Mon, 02/25/2008 - 16:49  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
47094 वाचन

💬 प्रतिसाद (99)

प्रतिक्रिया

अडचण -

अवलिया
Mon, 02/25/2008 - 16:56 नवीन

अडचण - हल्ली लोक सर्रास प्रोब्लेम असा आंग्ल शब्द वापरतात

मंडळी - मिसेस (उच्चार मिशेस)

कुटुंब - फ्यामिल्ली

सोडुन दे - ड्रोप कर

भोजन, जेवण - लंच डिनर

भेटायला कुणी आले आहे - गेस्ट आले आहेत

पाहुणे  - रिलेटिव

डोके दुखत आहे - डोक्याला हेडेक आहे

 

नाना

 

  • Log in or register to post comments

नाना आपण

विजुभाऊ
Mon, 02/25/2008 - 17:05 नवीन

नाना आपण मराठी शब्दांबद्दल बोलुया....

उदा:मातेरं...... त्याने चांगल्या गोश्टीचे मातेरं केलं ( मातेरं नेहमी चांगल्या गोश्टीचे च होते.....वाइट  गोश्टीचे होत नाही)

 मातेरं हा शब्द कोणत्या भाशेतुन मराठीत आला? त्याचा नक्की अर्थ काय?

  • Log in or register to post comments

मातेरं

जुना अभिजित
Mon, 02/25/2008 - 19:20 नवीन

माझ्या माहितीप्रमाणे चांगलं कापड वापरून जूनं झालं की पाय पुसणी म्हणून किंवा फरशी पुसायला वापरतात त्याला मातेरं म्हणतात.

 

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

ते मातेरं नव्हे

चतुरंग
Mon, 02/25/2008 - 20:53 नवीन

पोतेरं! (मातेरंचं पोतेरं करु नकोस रे अभिजिता!;)

चतुरंग

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुना अभिजित

पोतेरं!

फ्रॅक्चर बंड्या
Fri, 07/31/2009 - 19:42 नवीन
पोतेरं : घरातल्या भिंतीना कापडाच्या सहाय्याने मातीचा लेप देणे.. बहुतेक वेळा चुलीच्या खोलीत देतात कारण तिथे भिंत काळी होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

पोचारा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 07/31/2009 - 19:44 नवीन
पोचारा : असाही शब्द वाचण्यात आहे. चुलीभोवती पांढर्‍या मातीने लेप दिल्या जायचा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फ्रॅक्चर बंड्या

मातेरं

सृष्टीलावण्या
Tue, 02/26/2008 - 13:31 नवीन

म्हणजे कुठल्याही गोष्टीला मुठमाती देणे, ती गोष्ट पूर्ण मातीत गाडणे...

मातेरं नेहेमी चांगली गोष्ट वाईट होण्याबद्दल म्हटले जाते पण जर एखादी गोष्ट चांगली झाली तर त्याला त्या गोष्टीचे सोने झाले असे म्हणतात.

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

फडताळ

वडापाव
Mon, 02/25/2008 - 17:55 नवीन
हा शब्द सर्वजण विसरलेच आहेत जणू.
आता तर कपाट हा शब्द सुध्दा 'कप्बोर्ड' या नावाने संबोधला जातो. अर्थातकपाट हा शब्द याच इंग्रजी शब्दामुळे अस्तित्वात आला.
        
  • Log in or register to post comments

कपाट जुना शब्द आहे

धनंजय
Mon, 02/25/2008 - 18:53 नवीन
कपाट शब्द महाभारतात सापडतो. तिथे आणि जुन्या मराठीत, अर्थ दरवाजा. (म्हणजे द्वार नव्हे, तर जे उघड-बंद होते ते.)
दरवाजे असलेल्या फडताळाला कपाट म्हणू लागले असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडापाव

ते कपाट नाही...

मस्त कलंदर
Sat, 08/01/2009 - 01:53 नवीन
कपाट म्हणजे दरवाजा नाही.. तो शब्द कवाड आहे... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

कवाड आणि कपाट दोन्हींचा अर्थ दरवाजा

धनंजय
Sat, 08/01/2009 - 02:49 नवीन
मोल्सवर्थच्या शब्दकोशाचे दुवे बघावेत : कपाट कवाड *
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

मित्रानो

विजुभाऊ
Mon, 02/25/2008 - 18:26 नवीन

मित्रानो आपण फक्त मराठी शब्दांबद्दल बोलुया

कपाट याला फडताळ हा अस्सल मराठी शब्द आहे.

पण फडताळ हा शब्द तरी कोठुन आला?

पण अंमळ आणि खुश्की हे दोन शब्द हल्ली वापरातच नाहीत

कोडगा  : मारावयाचे एक साधन(Hunter) 

हा शब्द निगरगट्ट या अर्थाने केंव्हा पासुन वापरायला सुरुवात झाली?

रोडगा म्हणजे काय? आणि तो मरिआई ला का वहातात?

  • Log in or register to post comments

कोडगा, रोडगा

धनंजय
Mon, 02/25/2008 - 19:02 नवीन
कोडगा म्हणजे लाथाबुक्क्यांचा मार, चाबकाचा नव्हे
चाबकासाठी "कोरडा" असा शब्द प्रचलित आहे.

कोडगेखाऊ म्हणजे मार=कोडगे खाऊन निर्ढावलेला, निर्लज्ज. कोडगा शब्दाचा तोही अर्थ - लघुकरण असावे.

रोडगा रोट शब्दापासून, कणकेत थोडे बेसन आणि मसाले घालून त्याची जाडी पोळी. तो मरीआईला का वाहातात माहीत नाही - एकनाथांच्या भारुडात तसा उल्लेख आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

कालाय ...

सुधीर कांदळकर
Mon, 02/25/2008 - 20:52 नवीन
तस्मै नमः। दुसरे काय? ज्ञानेश्वरांच्या काळचे शब्द आता अस्तंगत झालेले आहेत. शतपत्रांतील भाषा, टिळक आगरकारांची भाषा आठवा. किती वेगळी आहे. आपले वय ठाऊक नाही. पण किमान २५ धरतो. १५ वर्षापूर्वीची भाषा आता तशीच कशी राहील. जशी शेकस्पीअरची इंग्रजी बदलली तशीच ज्ञानदेवांची मराठी देखील  बदलली. तिने मोगलाईत फारसी शब्द उचलले. इंग्रजांच्या राज्यात इंग्रजी शब्द उचलले. गोव्यात तिने पोर्तुगीज शब्द उचलले. उदा. शेटजी या अर्थाने बोलला जाणारा पात्रांव हा शब्द. भाषा बदलणारच. बदल हे जिवंतपणाचे लक्षण आहे. नाही बदलली तर ती मृत होईल. काळजी करू नये. आता तर मराठी बोलणारांची कॉल सेंटर्स उघडत आहेत. या बदलाला सम्यक दृष्टीने सामोरे जायला हवे. नव्हे बदलाचे स्वागतच करायला हवे.
  • Log in or register to post comments

खरंय..

प्राजु
Mon, 02/25/2008 - 21:33 नवीन

सुधिर कांदळकर म्हणतात ते खरंच आहे. बदल हे जिवंतपणाचे लक्षण आहे.

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments

ह्या बाबतीतला एक किस्सा आठवतो

चतुरंग
Mon, 02/25/2008 - 21:51 नवीन

बी.बी.सी. रेडियोच्या अनेक भाषातील वाहिन्या आहेत त्यातल्या हिंदी वाहिनीवर एकदा एका चर्चेत एक इंग्लिश माणूस हिंदीतून बोलत होता अचानक त्याने असा एक शब्द वापरला की जो हिंदी वाटावा, पण तो हिंदी नव्हता. लगेच तिथल्या हिंदी भाषक भारतीयाने त्याला सांगितले "आप ने जो शब्द अभी इस्तेमाल किया उस तरह का शब्द हिंदी में नहीं हैं." ताबडतोब इंग्लिश माणसाने उत्तर दिले "नहीं हैं तो होना चाहिये!" आणि ते खरं आहे. इंग्लिश भाषा वेगाने विकसित होण्यामागचे एक मोठे कारण त्या भाषेने स्वीकारलेले नवनवीन शब्द - धोती, कुर्ता, पजामा, गुरु असे कितीतरी शब्द आज इंग्लिश भाषेने आत्मसात केलेले आहेत.

चतुरंग

  • Log in or register to post comments

विजुभाऊ, आणखी काही शब्द...

पिवळा डांबिस
Mon, 02/25/2008 - 23:33 नवीन

किंबहुना = परंतु = पण

पोशाख

मतलई = खारे वारे आणि मतलई वारे

एकसमयावेच्छेदेकरून = ?

वस्तुतः

सध्या इतकेच आठवतात, आज रात्री "पण लक्षात कोण घेतो?" उघडून बसतो, बख्खळ शब्द मिळतील! :))

 

  • Log in or register to post comments

किंबहुना

प्रमोद देव
Tue, 02/26/2008 - 09:44 नवीन
किंबहुना = परंतु = पण
हा अर्थ योग्य नाही.
योग्य अर्थ खालीलप्रमाणे आहे.
किंबहुना= बहुधा, किंवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

असू शकेल.

पिवळा डांबिस
Wed, 02/27/2008 - 02:23 नवीन

आपण म्हणता तो अर्थ असू शकेल.

चू. भू. द्या. घ्या.

-पिवळा डांबिस

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

अजून काही

चतुरंग
Tue, 02/26/2008 - 01:16 नवीन

माझे आजोबा वापरत ते काही शब्द -

काळोख (अंधार)

रुची (चव) (आज तोंडाला रुची नाही.)

भुरका (कढीचा वैगेरे मारतात तो भुरका, घोट मधे ती मजा नाही:)

कढत (गरम. पण कढत ह्या शब्दात एक वाफाळलेपणाची छटा आहे उदा. ऊनून भातावर कढत पिठले वाढले!:)

थट्टा (चेष्टा, मस्करी.) ह्या मधे मित्रत्वाने केलेली असल्याचा भास आहे.

स्नेही (मित्र). ह्या मधे आपलेपणा, जिव्हाळा अशाही छटा जाणवतात.

चतुरंग

  • Log in or register to post comments

आजीचे एकदोन शब्द

धनंजय
Tue, 02/26/2008 - 01:51 नवीन
"मळभ" - ढग भरून आलेले आकाश (बहुतेक पावसाळी ढग नव्हेत)
"आंबोण" - म्हशीला घालायचे आंबलेले अन्न
  • Log in or register to post comments

माझ्या आजीचा

प्राजु
Tue, 02/26/2008 - 06:37 नवीन

माझ्या आजीचे शब्द :


मोरी : बाथरूम्/न्हाणीघर
शिंकाळं : वरती टांगून ठेवलेलं मडकं
परसदार : बॅक यार्ड
चुलवण : चूल्(बहुतेक)

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments

चुलवण

जुना अभिजित
Tue, 02/26/2008 - 09:27 नवीन

Image removed.

ह्या चित्रात बाजूची कढई ज्यावर ठेवली आहे त्याला चुलवण म्हणतात.

जाळाच्या नुसत्या धगीवर कढई गरम राहते. स्लो हीटींग.

 

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

वैल

धनंजय
Tue, 02/26/2008 - 19:02 नवीन
छान आठवण आली चित्र बघून. आमच्याकडे त्या शेजारच्या जागेला "वैल" म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुना अभिजित

आणि

रम्या
Mon, 08/03/2009 - 14:20 नवीन
आणि आमच्या कोल्हापूरात त्याला "वाईल" म्हणतात. माझी आत्ती म्हणते "भात मुरायला वायलावर ठेव". आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

भुरका

विजुभाऊ
Tue, 02/26/2008 - 11:00 नवीन

भुरका (कढीचा वैगेरे मारतात तो भुरका, घोट मधे ती मजा नाही:)

घोट घोट घेतात ते वेग्ळेच असते रे चतुरंगा

उसासे टाकणे म्हणजे काय?

माळवद म्हणजे काय?

वानगी म्हणजे उदाहरण्...उदः वानगी दाखल.

दाखल.....दखल आणि दाखला हे समानार्थी शब्द आहेत काय?

त्यांचे नक्कि अर्थ काय? ते कोणत्या भाषेतुन आले?

  • Log in or register to post comments

उसासे

चतुरंग
Tue, 02/26/2008 - 20:49 नवीन

उसासे टाकणे म्हणजे काय?
उसासे टाकणे = म्हणजे तात्या आणि डांबिसकाका छानपैकी मैफिल जमवून 'घेत' बसले आहेत आणि विजुभाऊ नुसतेच बघत बसले आहेत त्यावेळी जे सुस्कारे टाकतील त्याला म्हणतात ;)

ह्या शिवाय शिवकालीन किंवा पेशवेकालीन खापरी नळांमधून जे पाणी गावात आणीत असत त्या नळांतून मधे अडकलेली हवा बाहेर निघून जाण्यासाठी नळांवर उंच जागी दीपमाळेसारखे झरोके ठेवलेले असत त्याला 'उसासे' म्हणत (आजच्या तांत्रिक भाषेत "एअर रिलीज वॉल्व")

माळवद म्हणजे काय?
माळवद = गच्ची (हा शब्द अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक इ. भागात प्रचलित आहे)

वानगी म्हणजे उदाहरण्...उदः वानगी दाखल.

दाखल.....दखल आणि दाखला हे समानार्थी शब्द आहेत काय?
दाखल = हजर होणे / भरती करणे (शिपाई सैन्यात दाखल झाला),
(रोग्याला इस्पितळात दाखल केले)

दखल = नोंद घेणे  (इस्पितळात आलेल्या रोग्याची डॉक्टरांनी दखलही घेतली नाही)

दाखला = उदाहरण/सर्टिफिकेट (हा महाराजांच्या मुत्सद्देगिरीचा दाखला होता) (त्याने जन्माचा दाखला मागितला).
चतुरंग

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

व्वा!

पिवळा डांबिस
Wed, 02/27/2008 - 02:28 नवीन

उसासे टाकणे = म्हणजे तात्या आणि डांबिसकाका छानपैकी मैफिल जमवून 'घेत' बसले आहेत आणि विजुभाऊ नुसतेच बघत बसले आहेत त्यावेळी जे सुस्कारे टाकतील त्याला म्हणतात ;)

क्या बात है चतुरंगजी, आज नुसती फटकेबाजी चाललीये!! :))

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मुमुक्शू :-

विजुभाऊ
Tue, 02/26/2008 - 11:02 नवीन
मुमुक्शू :- याचा अर्थ काय?
  • Log in or register to post comments

मुमुक्षु

सृष्टीलावण्या
Tue, 02/26/2008 - 13:24 नवीन

म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा (आणि अर्थातच त्यासाठी कठोर तपाचरण 

करणारा असा)

 

असाच एक सध्या निर्वापरातला शब्द म्हणजे निर्जळा जो संकष्टी, 
एकादशीला उपासासाठी वापरत असत. 


पूर्वी उपास साबुदाणा खिचडी, शेंगदाणा आमटी, वेफर्स असा चविष्ट न 
करता शरीराला झीज होईल असा केला जायचा, निर्जळा एकादशी ही 
त्यापैकी एक. 

निर् +जल = पाणी सुद्धा न घेता.

  • Log in or register to post comments

धन्यवाद

विजुभाऊ
Tue, 02/26/2008 - 13:34 नवीन

धन्यवाद सृष्टीलावण्य 

तुम्हाला मायंदाळ धन्यवाद.

असेच आमच्या टकुर्यात जरा भर घालत जा.

 

  • Log in or register to post comments

चुलीच्या ब

रिकामटेकडा
Tue, 02/26/2008 - 13:46 नवीन
चुलीच्या बाजूला आहे तीला वैल म्हणतात.
सध्या
किल्ली या ऐवजी चावी आणि कुंचा या शब्दा ऐवजी झाडू हे शब्द प्रचलित आहेत

  • Log in or register to post comments

दळभद्री : ह

विजुभाऊ
Tue, 02/26/2008 - 16:23 नवीन

दळभद्री : ह शब्द खरेतर हद्दपार झालेला....पण तो टिकवण्याचे श्रेय मात्र थोरल्या ठाकर्यांचे.

पण हा शब्द ही कसा कोठुन आला?

  • Log in or register to post comments

दळभद्री : ह

विजुभाऊ
Tue, 02/26/2008 - 16:23 नवीन

दळभद्री : ह शब्द खरेतर हद्दपार झालेला....पण तो टिकवण्याचे श्रेय मात्र थोरल्या ठाकर्यांचे.

पण हा शब्द ही कसा कोठुन आला?

  • Log in or register to post comments

दळभद्री : ह

विजुभाऊ
Tue, 02/26/2008 - 16:24 नवीन

दळभद्री : ह शब्द खरेतर हद्दपार झालेला....पण तो टिकवण्याचे श्रेय मात्र थोरल्या ठाकर्यांचे.

पण हा शब्द ही कसा कोठुन आला?

  • Log in or register to post comments

चुलवण आणि वैल हे ...

सुधीर कांदळकर
Tue, 02/26/2008 - 21:24 नवीन
दोन शब्द आताच कळले. चुलवण वाचला होता. पण अर्थ आता कळला. माळवद हा शब्द अडगळ ठेवलेला पोटमाळा या अर्थाने वाचल्याचे आठवते. एका कथेत आजी नैवेद्यासाठी फराळ शिजवईत असते. त्यात आजोबा हात घालू नये म्हणून ती आजोबांना माळवदावर चढून काहीतरी काढायला सांगते. व ते चढले की शिडी काढून घेते. शेजारचा ८ वर्षाचा मुलगा तेथे असतो. शिडी लावावी म्ह्णून आजोबा वरून तर लावू नये म्हणून आजी खालून त्याला दटावत असतात. अशी गंमतीदार गोष्ट होती. म्हणून खास लक्षात राहिली.
  • Log in or register to post comments

विजूभाऊ व

सुधीर कांदळकर
Tue, 02/26/2008 - 21:25 नवीन

वरील बाकी सर्वांस धन्यवाद. 

  • Log in or register to post comments

मॅनिला..

प्रभाकर पेठकर
Tue, 02/26/2008 - 23:17 नवीन

मॅनिला = सदरा = शर्ट
विजार = पँट
श्मश्रू = केस कापणे
जाजम = गालिचा = कार्पेट
ओगराळं = आमटी वाढण्याचं पात्र
डोया = माठातून पाणी काढण्याचा डाव किंवा दांडी असलेलं भांडं
परस = घराची मागची बाजू
घडवंची = तिवई = तीनपायी (ज्यावर माठ, छोटे पिंप ठेवतात)
छबिना = आरसा (?)
चंची = कमरेला अडकवायची पानाची कापडी पिशवी.
कसा = कमरेला अडकवायची पैशाची कापडी पिशवी.
चंबू = लहान मुलांचे विशिष्ट आकाराचे पाण्याचे भांडे.
गुडदाणी = गुळ आणि दाण्याची चिक्की (?).
छकडा = अच्छादित बैलगाडी.
पांगुळगाडा = लहान मुलांस चालायला शिकण्यास मदत करणारा गाडा
अवजारं = व्यावसायिक हत्यारं (शेतीची, सुताराची, नाव्ह्याची इ.)

  • Log in or register to post comments

छकडा

फ्रॅक्चर बंड्या
Fri, 07/31/2009 - 19:35 नवीन
छकडा = बैलगाड्यांच्या शर्यतीत वापरला जाणारी हलकी बैलगाडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

घडवंची

प्रमोद देव
Wed, 02/27/2008 - 08:45 नवीन
घडवंची(स्त्री): चार पायांची व वर फळी असलेली लाकडी वस्तू
(राजहंस व्यावहारिक मराठी शब्दार्थकोश... प्रमाणे)
  • Log in or register to post comments

चंबू = लहान

विजुभाऊ
Wed, 02/27/2008 - 12:59 नवीन

चंबू = लहान मुलांचे विशिष्ट आकाराचे पाण्याचे भांडे.
त्याला गडु  हाही शब्द आहे.

गडगा हाही शब्द आहे......तो बहुधा समानाअर्थी असावा

 

  • Log in or register to post comments

गडगा

प्रमोद देव
Wed, 02/27/2008 - 13:05 नवीन
म्हणजे...दगडावर दगड रचून तयार केलेला बांध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

गुडदाणी =

विजुभाऊ
Wed, 02/27/2008 - 13:00 नवीन

गुडदाणी = गुळ आणि दाण्याची चिक्की (?).

होका.मी गुड्दाणी म्हणजे गुडगुडी समजायत होतो....

  • Log in or register to post comments

छबिना =

विजुभाऊ
Wed, 02/27/2008 - 13:11 नवीन

छबिना = आरसा (?)

छबिना = देवाचा छबिना असतो......त्याची पालखीत मिरवणुक कढतात

  • Log in or register to post comments

छबिना =

विजुभाऊ
Wed, 02/27/2008 - 13:12 नवीन

छबिना = आरसा (?)

छबिना = देवाचा छबिना असतो......त्याची पालखीत मिरवणुक कढतात

  • Log in or register to post comments

छबिना

प्रमोद देव
Wed, 02/27/2008 - 13:19 नवीन
म्हणजे..... १. देवाच्या पालखीची मिरवणूक. २. राजाची मिरवणूक.
३. घोडेस्वाराचा रात्रीचा पहारा.
  • Log in or register to post comments

खण, मांडणी

लिखाळ
Wed, 02/27/2008 - 16:03 नवीन

छान चर्चा !

खण = कप्पा किंवा ड्रॉवर

खरेतर फडताळ हा शब्द शेल्फ या शब्दाला वापरला जातो असे मला वाटते. ज्या फडताळाला दारे आहेत ते कपाट. उघडे असेल तर फडताळ. किंवा मांडणी.

-- लिखाळ.

'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

  • Log in or register to post comments

झब्बा

llपुण्याचे पेशवेll
Wed, 02/27/2008 - 21:39 नवीन

झब्बा: हा सदर्‍यासारखा पुरुषांनी परीधान करायचा कुडत्यासदृश कपडा

पुण्याचे पेशवे

  • Log in or register to post comments

फोकलीच्या

विजुभाऊ
Sat, 05/17/2008 - 15:25 नवीन
फोकलीच्या या शब्दाचा अर्थ काय. शिंदळी हा शब्द फक्त शिवी साठे राहीला आहे. शिंदळी म्हणजे चहाडी चुगली चहाडी हा अस्सल देशी शब्द. चुगली हा शब्द चुगाली असा हिंदी मध्ये वापरला जातो .पण चुगाली चा अर्थ रवंथ करणे असा होतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

जाजम   ... 

भडकमकर मास्तर
गुरुवार, 02/28/2008 - 01:30 नवीन

जाजम   ...  ते गालिच्यासाऱखं खाली अंथरतात ते??

 

  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा