सहमत !
मला आठवते मी लहान असताना आम्ही दौंडच्या पोलीस (SRPF)लायनीत राहात होतो. दौंडला तेव्हा SRPF चे दोन गृप होते, पाचवा आणि सातवा.
तेव्हा पाचव्या गृपचे कमांडंट होते श्री. सुजाणसिंग पारधी, हा माणुस पारधी जातीमधुनच आलेला होता. अतिशय गरीबीतुन वर आलेले पण अतिशय बुद्धिमान आणि सुस्वभावी. इंजिनिअरिंग केलेले होते त्यांनी. त्यांनी त्याआधी काही काळ मिलिटरी इंटेलिजन्ससाठी देखील काम केले होते म्हणे. त्यांच्या दौंडच्या तीन चार वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी गृप हेडक्वार्टरचे स्वरुपच बदलुन टाकले होते. अगदी सामान्य रनरला देखील त्यांच्या कार्यालयात कधीही मुक्त प्रवेश असायचा.
दहावीला ८८% घेतल्यावर पाचव्या गृपकडुन त्यांच्याहस्ते माझा सत्कार झाला होता. पुढे इंजीनिअरिंग करणार आहे असे कळल्यावर त्यांनी त्यांच्याकडची जवळपास तीन चार हजार रुपये किंमतीची पुस्तके मला भेट म्हणुन दिली होती.
माझे आण्णा साधे हेड काँन्स्टेबल होते तेव्हा. पण त्यानंतरही मला त्यांच्या घरी मुक्त प्रवेश होता. बारावीच्या परिक्षेचा अभ्यास तर मी त्यांच्या कमांडंट बंगल्यातल्या अभ्यासिकेत बसुनच केला होता. तुमचा हा लेख वाचला आणि पारधी साहेबांची खुप आठवण झाली. माझ्या जडणघडणीत त्यांचा खुप मोठा वाटा आहे. धन्यवाद.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
हळूहळू का होईना पण सुधारणा होतेय, हेच आशादायक आहे.
एक शंका आहे. सगळ्याच पूर्वाश्रमीच्या क्रिमिनल ट्राईब्ज ह्यांना भटक्या आणि विमुक्त असे नाव दिले गेले आहे काय? बहुधा नसावे. ठाणे आणि रायगड जिल्यात प्रामुख्याने वारली, ठाकर, कातकरी ह्या भटक्या-विमुक्त जमाती राहतात. परंतु त्यापैकी कोणत्याही जमातीवर "गुन्हेगारी जमात" असा शिक्का पूर्वीही नसावा.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
बरोबर आहे. हे सगळे शासकीय भाषेत आदिवासी आहेत. त्यातले वारली, ठाकरं (क. ठाकूर, म. ठाकूर) , कोकणा यांच्यावर गुन्हेगार असा शिक्का नव्हता. पण त्यातले कातोडी किंवा कातकरी यांच्यावर मात्र पोलिसांचा डोळा असायचा. आजही कातकर्यांवर फारसा विश्वास ठेवला जात नाही.
आदिवासी मित्रांमध्येच बालपण घालवेलला (भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
कमी लोकांना माहीत असलेली माहिती दिलीत पुनेरीभाऊ ... :)
सकाळी उठलो अन सहजच तारीख बघितली तर आज ३१ ऑगस्ट. हाच तो ऐतिहासिक दिवस. ५७ वर्षांपुर्वी याच दिवशी इंग्रजांनी केलेला कुप्रसिद्ध क्रिमिनल ट्राईब्ज अॅक्ट भारत सरकारने रद्दबातल केला अन शेकडो जमातींच्या लाखो भारतीयांना स्वतंत्र केले, भटक्या व विमुक्त जाती असे नाव देऊन अन देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी.
नाहीतर आजकाल स्वतःच्या वाढदिवसा अन् अॅनिव्हर्सर्यांबरोबर १५ आगष्ट , २६ जानेवारी हे सुट्टीचे दिवस म्हणून लक्षात राहिले जातात. त्यात ३१ ऑगस्ट ची महती कळाल्यामुळे दिवसेंदिवस माहितीच्या साठ्यात भर पडते आहे...
या निमित्ताने घेतलेला हा आढावा मनाला हेलावून गेला
ज्या दिवशी जन्मापेक्षा माणसाची लायकी हीच त्याची जात ठरेन तो सुदिन समजेन मी....
धन्यवाद
सागर
असे इतरही अनेकजण असतील, मी न पाहिलेले अनाम वीर. त्यांच्यासाठी मी नाही लढा देवु शकत. तो त्यांनाच द्यायचा आहे अन ते तो देतीलही. जोवर ते आहेत, तोवर आशा जिवंत राहिल.
खरयं! बस पण थकल्यावर कुणी पाठीवर थाप टाकली तर हुरुप येतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
... लेका छानच अनुभव रे... खूप छान वाटलं. या समाजांबद्दल सहसा जे ऐकतो त्यापेक्षा अगदी वेगळं. पारधी वगैरे म्हणलं की काही तरी दुर्दैवी ऐकायला मिळणार असं वाटतं. पण हे वेगळंच. छान.
बिपिन कार्यकर्ते
छान लेख...
प्रभुणेंचं पारधी पुस्तक वाचलेलं होतं...
त्यात या लोकांचे प्रश्न मांडलेले आहेत... पुस्तकाची आठवण झाली...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
छान समयोचित लेख. शिवाय सकारात्मक!
आजपर्यंत ह्या जमातींचा संबंध आरक्षणामुळे (बहुतांश वेळा)हेटाळणीयुकक्त कारणाने/उल्लेखांनी येत होता. सगळं काहि मिळत असताना अभ्यास करूनहि कॉलेजातील जागा जातात म्हणून एकेकाळी ओरडणार्या आम्हाला ही दुसरी बाजु वाचली की आपण एकाच्या आयुष्याला अजाणतेपणी सकारात्मक वळण दिलं असं वाटु लागतं.
तुमची शैली भन्नाट आहेच, त्याला वास्तविकतेची जोड मिळाल्याने लिखाण प्रचंड प्रभावी ठरले आहे.
अजून वाचायला आणि यानिमित्ताने स्वतःच्याच अनेक भुमिकांवर/मतांवर पुनर्विचार करायला आवडेल
ऋषिकेश
------------------
सकाळचे १० वाजून ३५ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक भजन "वैष्णव जन तो तेणे कहिए जे...."
फासेपारधी वगैरे जमातीना अजूनही गुन्हेगार जमाती मानले जाते. ते ब्रिटीशांचे लॉर्ड बेम्टिंगच्या आशिर्वादाने नन्तर तयार झालेले गॅझेट अजूनही रेफर केले जाते. ते रद्द व्हावे यासाठी डॉ लक्ष्मण गायकवाड / डॉ गणेश देवी आणि बंगाली ज्ञानपीठविजेत्या महाश्वेतादेवी हे तिघे या बाबत सरकार बरीच खटपट करीत आहेत
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
सगळ्याच उदाहरणांतील व्यक्तींनी स्वतःच्या हिंमतीवर आणि प्रयत्नपूर्वक मिळवलेलं यश दैदिप्यमान नसलं तरी आशादायी नक्कीच आहे.
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखारूह की शायरी
सोलापुरात पण, एक सेटलमेंट म्हणून एक भाग आहे. इंग्रजांच्या काळात पारधी, भामटी वगैरे जमातींच्या लोकांना राहण्यासाठी एक वस्ती करून त्याला तारेचं कुंपण लावले होते. रोज रात्री घरातल्या प्रत्येक पुरुषाची हजेरी घेतली जायची.
आता सुद्धा तो भाग आहे. आणि शहरात कुठेही दरोडा पडला की पोलिस प्रथम तिथे जातात!
प्रतिक्रिया
सकारात्मक
सकारात्मक चित्र !
आशादायक
सुनीलराव
धन्यवाद.
बरोबर आहे.
अतिशय
हेच
हेलावून सोडले पुनेरीभाऊ
आशा
पम्या...
छान
मस्त लेख.
वाह!
+१
प्रचंड प्रभावी
छान लेख...
फासेपारधी
उत्तम
लेख आवडला.
वा ! फार
सोलापुरात
खरंय
सक्सेस