चित्तथरारक अनुभव! त्याचा लेखाजोखा आवडला!!
"ट्रेक द सह्याद्री" पुस्तकात हरीश कापडी यांनी पदभ्रमणाचे चिरंतन रहस्य सुरूवातीच्याच पानावर नोंदवले आहे. गुजरातीत (त्यांच्या मातृभाषेत).
घटमा घोडा थनगने आतम विंझे पांख |
अणदिठेली भौमपर यौवन मांडे आँख ||
तेव्हा नवे अनुभव येणारच. त्यांच्याच तर शोधात आपण जात असतो.
बाकी माणुसकी काही भारतातली आणि अमेरिकेतली निराळी असत नाही. हेच यातून सिद्ध होते. मात्र हेलिकॉप्टरनी शोध घेण्याचा प्रकार भारतात तरी असंभवच आहे. याकरता अमेरिकन प्रशासकीय व्यवस्थेचे कौतुक अवश्य करायला हवे.
मात्र हेलिकॉप्टरनी शोध घेण्याचा प्रकार भारतात तरी असंभवच आहे. याकरता अमेरिकन प्रशासकीय व्यवस्थेचे कौतुक अवश्य करायला हवे.
हेलिकॉप्टरचे कसले करायचे कौतुक ? पुष्पक विमानाची आमची आयडिया पाश्चात्यांनी चोरलेली आहे. मुळात माणुसकीचीही आयडिया आमचीच. पदभ्रमणाचीही आयडीया आमचीच. चित्त थरारणे ह्यातील चित्त ही देखील आमचीच संकल्पना.
(अमेरिकेचे गुणगान करणार्या कुठल्याही लेखनास येथे फा*वर मारण्यात येईल.)
-- मिसळभोक्ता
>>"अमेरिकेत काय आवडलं?" असं कुणी विचारलं तर "तिथली लोकं, त्यांचं प्रेम आणि त्यांच्या वागण्याबोलण्यातली तेहजीब, अदब" हे आणि हेच उत्तर असेल माझं.
हे अगदी खरं आहे आणि फार थरारक अनुभव आहे तुमचा, नशिब एखादं अस्वल नाही आलं ते...
दिपाली :)
अनुभव लेखन उत्तम केले आहे..
डिस्कवरी वर एक कार्यक्रम मी नेहमी पहायचो- 'I Shouldn't Be Alive'... त्याची आठवण आली!
-
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
"अमेरिकेत काय आवडलं?" असं कुणी विचारलं तर "तिथली लोकं, त्यांचं प्रेम आणि त्यांच्या वागण्याबोलण्यातली तेहजीब, अदब" हे आणि हेच उत्तर असेल माझं.
अगदी खरंय!!
अतिशय थरारक अनुभव आहे हा. प्रशांत... सॉल्लिड!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
तुम्ही सांगीतलेल्या प्रसंगावरुन मला हिमालयात आलेला एक प्रसंग आठवला, १९८४ साल असावे.
आदल्या दोन दिवसात हनुमानचट्टी (यमुनोत्रीच्या वाटेवरचे गांव - पुर्वी यमनोत्रीला जाताना बस या गावापर्यंतच जाइ. पुढे पायी चालत जावे लागे) ते धोदिताल असा १४००० फुटांवरून जाणार तब्बल ३०कि.मि. चा ट्रेक केल्या मुळे सारे थकले होते.
धोदिताल हून आमचा गट, उत्तरकाशीला मिळणार्या रस्त्यापर्यंत ट्रेकिंग करत येत होता. अंतर अंदाजे १८ कि.मि. वाट पूर्ण उताराची व घनदाट झाडीची.
हा ट्रेक नेहमीची वाट नसल्याने एका अनुभवी ट्रेकरला वाटेच्या डाव्या अंगाला खडूने खूणा करत पुढे पाठवले होते. तो पठ्या काही काळाने खूणा करायचे विसरला.
तशात मी मागे पडलो. रस्ता काही सापडेना.
त्या किर्र जंगलात सायंकाळी पक्षांचे विविध प्रकारचे आवाज भेसूर वाटू लागले. हळू हळू मिट्ट काळोख पडला.
अस्वले, बिबटे आदी श्वापदांच्या भितीने काही सूचेना.
असा अंदाजे दिड एक तास गेला.
रात्री ७.३० - ८ च्या सुमारास, मागे उंचावरून एक टॉर्चलाईट दिसल्या वर जीवात जीव आला. चुकल्या माकल्यांना बरोबर आणण्यासाठी माझा चुलतभाऊ शंतनू व कुलकर्णी असे अनुभवी ट्रेकर सर्वात मागे ठेवले होते.
आम्ही सगळे मिळून खडूच्या खूणा शोधू लागलो, त्या काही सापडल्या नाहीत.
शेवटी शंतनूने निर्णय घेतला की येथेच सकाळपर्यंत पाथरी पसरायची.
तेव्हढ्यात, हिमालयातला तो भीषण मुसळ्धार पाऊस सुरु झाला.
स्वतःला तंबूच्या कापडात गुंडाळून आम्ही डारादूर झोपून गेलो.
भल्या पहाटे एका गुराख्याने आम्हाला हाळी दिली. आमची कथा ऐकल्यावर तो चकीत झाला. त्याने सांगीतलेकी त्याचा पडाव आमच्या पासून हाकेच्या अंतरावर होता. त्याने त्याच्या तंबूतल्या मिणमिणत्या दिव्या कडे बोट दाखवले व म्हणाला की त्याने आम्हाला किमान थोडे दुध व छप्पर दिले असते.
त्याने आमच्या हाका ऐकल्याच नसाव्यात व आम्हालाही अंदाज नव्हताकी या किर्र जंगलात कोणाचे वास्तव असेल.
शेवटी चांगले उजाडल्यावर गुराख्याने दाखवलेल्या वाटेवरुन आम्ही मुख्यरस्त्यापर्यंत पोहोचलो.
आणी हो, तो खूणा करणार्या महाभागाच्या खूणा पुढे दोन कि.मि. नंतर परत दिसु लागल्या.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
सुबक ठेंगणी,
माझा कॅमेरा तेव्हा बिघडला होता. त्यामुळे फोटो काढले नाही. तसं ग्रुपमधल्या काही लोकांनी फोटो काढले आहेत. त्यांच्याकडून अनुमती मिळाल्यास टाकीन नक्की इथे काही फोटो. (पण त्यात "त्या" जागेबद्दल काहीच नसणार. ;) )
संजयकाका,
तुमचाही अनुभव चित्तथरारक आहे. शेवटी सुखरूप सुटल्यामुळे आता काही वाटत नाही. पण ती वेळ आली होती तेव्हा लै टरारली होती...अर्थात, काही उपयोग नसल्यामुळे कसं रिऍक्ट व्हावं तेच कळत नव्हतं.
नरेंद्रकाका, मिसळभोक्ता, भाग्यश्री, प्रकाशकाका, दिपाली, एकलव्य, ९६-मराठा, प्राजु, क्रांती, संजयकाका, कर्क, अभिज्ञ, सहज
अभिप्रायांबद्दल धन्यवाद.
हेलिकॉप्टरची व्यवस्था अमेरिकेत सुबत्ता असल्यामुळे होऊ शकली. भारतात आजतरी ते शक्य नाही. पण अमेरिकेला सलाम आहे तो हेलिकॉप्टरमुळे नव्हे, तर तिथल्या लोकांच्या सर्व्हिसमुळे.
एक हरवलेला मनुष्य सापडल्यानंतर त्याला भूक लागली असेल, तहान लागली असेल, झोप झालेली नसेल, थंडी वाजत असेल, त्याचे लोकं येईपर्यंत त्याला जास्तीतजास्त कंफर्टेबल कसं वाटेल, याचा विचार तिथल्या लोकांनी केला, तो आपल्याइथे लोकं करतात का, याबद्दल मला शंका आहे.
मिसळभोक्ता,
>>अमेरिकेचे गुणगान करणार्या कुठल्याही लेखनास येथे फा*वर मारण्यात येईल<<
हेलिकॉप्टर वगैरे राहू द्या. तिथली सुबत्ता आणि टापटीपसुद्धा सोडून द्या.
माणुसकीची आयडिया असेलही आपलीच. पण पुढे काय झालं त्या आयडियाचं, ते महत्त्वाचं.
साधी गोष्ट आहे. "पब्लिक ट्रान्स्पोर्ट" म्हणून अस्तित्वात असलेली आपल्या भारतातली बस कुठल्या पब्लिकच्या कंफर्टचा विचार करून तयार केली जाते हेच कळत नाही. म्हातारी माणसं, पांगळी माणसं, गरोदर स्त्रिया यांना बसचा प्रवास करणं सुरक्षित वाटेल का?
या लोकांना कमी कष्टांमध्ये बसमध्ये चढता येण्याची व्यवस्था आपल्याकडे असते का? अमेरिकेत म्हातारे, अपंग आणि गरोदर स्त्रिया यांना बसमध्ये/ट्रेनमध्ये शिरण्यासाठी स्पेशल व्यवस्था असते. तसेच, या व्यक्ती आत शिरल्याशिवाय इतरांना आत शिरता येत नाही. तसेच आत जर आधीपासून अपंग,इ. व्यक्ती असताना त्यांना जिथे उतरायचं आहे, त्या स्टॉपपाशी हे लोकं उतरल्याशिवाय इतर कोणालाही आत चढता येत नाही/उतरता येत नाही. या व्यक्ती आत शिरल्यावर त्यांच्यासाठी आरक्षित जागेवर ते व्यवस्थित स्थानापन्न झाल्याशिवाय बस सुरू होत नाही. वास्तविक अमेरिकेत स्वत:च्या वाहनावर प्रवास करणार्या लोकांचं प्रमाण जास्त आहे. तरी पब्लिकचा विचार करून पब्लिक ट्रान्स्पोर्टच्या गाड्या बनवल्या असतात (किंबहुना, कुठल्याही सार्वजनिक ठिकाणची व्यवस्था तशी असते.). इथे भारतात बहुजनसमाजासाठी असलेली बस (no pun intended) समाजाचाच घटक असलेल्या अपंग, वृद्ध व गरोदर स्त्रियांच्या दृष्टीने गैरसोयीच्याच आहेत.
असो. असे कितीतरी मुद्दे आहेत ज्यांमध्ये प्रामाणिक तुलना करायची झाली, तर अमेरिकेचं पारडं जड ठरेल. (राजकीय, परराष्ट्रीय संबंधांबद्दल मी बोलत नाही. पण देशातला अंतर्गत कारभार अमेरिकेत जास्त प्रामाणिकपणे चालतो हे दुर्दैवानं सत्य आहे. :( )
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो.
कारण तू नुसता हरवला नव्हतास, अस्वलांच्या प्रदेशात होतास!
तुला शोअधण्यासाठी केलेले प्रयत्न आणी नंतर तुझी घेतलेली काळजी ही खरोखरच अवर्णनीय म्हणायला हवी.
हेलिकॉप्टरची व्यवस्था अमेरिकेत सुबत्ता असल्यामुळे होऊ शकली. भारतात आजतरी ते शक्य नाही. पण अमेरिकेला सलाम आहे तो हेलिकॉप्टरमुळे नव्हे, तर तिथल्या लोकांच्या सर्व्हिसमुळे.
एक हरवलेला मनुष्य सापडल्यानंतर त्याला भूक लागली असेल, तहान लागली असेल, झोप झालेली नसेल, थंडी वाजत असेल, त्याचे लोकं येईपर्यंत त्याला जास्तीतजास्त कंफर्टेबल कसं वाटेल, याचा विचार तिथल्या लोकांनी केला, तो आपल्याइथे लोकं करतात का, याबद्दल मला शंका आहे.
तू म्हणतोस ते खरे आहे.
पण माणसाच्या जिवाचे मोल हे आपण भारतीयांनीच कमी करुन ठेवले आहे असे मी म्हणेन. एवढी प्रचंड लोकसंख्या असताना अजूनही मुलाचा हव्यास किती ठिकाणी दाखवू? किती लोक एक मूल झाल्यावर दुसरे दत्तक घेतात? मला परवडते आहे, मी का करु, सामाजिक जाणिवेचा मक्ता काय मीच घेतलाय का? इ.इ. अशा वागणुकीने सगळेच हळूहळू ढेपाळत जातात. देशांतर्गत कारभार हा फक्त पैसा ह्या एकाच गोष्टीवर चालतो असे चित्र दुर्दैवाने बर्याचदा दिसते हेही खरे आहे. त्यामुळे सापडलेल्या माणसाची काळजी वगैरे अशक्यच आहे! (सापडलास ना, मेला तर नाहीस ना? असे म्हणले नाहीत म्हणजे मिळवली!!)
चतुरंग
हो रे! आणि त्या दिवशी लॉस ऍन्जेलिसमध्ये एका लोकल वर्तमानपत्रात बातमी आली होती असं प्रो. ऍना क्रिलाव म्हणाल्या मला (शेरीफ़च्या ऑफ़िसमधून सोडवल्यानंतर). आधीच गिल्टी वाटत होतं त्यानंतर आणखीनच वाटायला लागलं. नंतर हसीमजाक करताना प्रत्येकाला हेलिकॉप्टरमधे बसायची इच्छा होती आमच्या लॅबमधल्या. :D
आणि मला हेलिकॉप्टरचं बिल येतं की काय, अशी भीतीही होती. :O :S #:S
अर्थात, तसं बिल आलं, तर हेल्थ इन्श्युअरन्समधून ८०% कसं क्लेम करायचं यासाठी मार्गदर्शन करेन असं प्रो. क्रिलाव म्हणाल्या होत्या, ते वेगळंच. म्हणजे अगदी लहानसहान बाबतीतही १००% मदत आणि तीही मनापासून करणारे लोकं मिळाल्यामुळे त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. सुदैवानं तसं बिल वगैरे काही आलं नाही. :) पण साधारणपणे $१००००च्या घरात बिल जातं असं मला कळलं होतं. म्हणजे मेडिकल इन्श्युअरन्समधून क्लेम केलं, तरी मला किमान $२००० भरावे लागले असतेच.
(भारावलेला) प्रशांत
@चतुरंग,
सहमत आहे.
---------
मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? ;)
बापरे!!
कसला खतरनाक अनुभव!!
सहिसलामत वाचलास हे सगळ्यात महत्वाचे!
म्हातारी माणसं, पांगळी माणसं, गरोदर स्त्रिया यांना बसचा प्रवास करणं सुरक्षित वाटेल का?
या सगळ्यांना फाट्यावर मारण्यात आलेले आहे.;)
रेवती
लेख आणि वर्णन. सॅन हासिंटोचा ट्रेक केला होता दोन-एक वर्षांपूर्वी. वरपांगी सरळसोट वाटत असला तरी बराच आडवळणी आणि बर्याच खाचाखोचांचा आहे (ट्रेक), हे नक्की.
प्रतिक्रिया
अरे प्रशांत
चित्तथरारक अनुभव! त्याचा लेखाजोखा आवडला!!
च्छ्या
अगदी
अरे वा!
>>"अमेरिकेत
:)
अनुभव
"अमेरिकेत
चित्रदर्शी
मनोहरशेट मान लिया!
फारच छान
भारी अनुभव
सुबक
बापरे जिवावरचाच प्रसंग म्हणायला हवा की!
'बाप रे!!'
हो रे! आणि
जबरदस्त अनुभव
बाप रे!!!
कसला
थरारक
बापरे!! कसल
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी