बाप्पा मोरया!
काही दिवसापूर्वी देवकाकांनी 'एखादी ५-६ ओळींची छोटीशी बंदिशीसारखी रचना केलीस का? असं विचारलं, आणि नुकतीच मशकूर अली खान यांची मालकौंसातली "मुरख मन मेरे" ही बंदिश ऐकून तिच्यात मराठी शब्द बसवता येतील का, असा विचार करता करता ही गणेशवंदना मनातून कागदावर उतरली. उद्या गणेशचतुर्थी, आणि मिपाचा वर्धापनदिन. त्यानिमित्त माझ्याकडून ही छोटीशी भेट.
सकल कलांचा उद्गाता
गुणेश गजानन भाग्यविधाता
प्रथम पूज्य हा शिवगौरीसुत
गणनायक शुभदायक दैवत
या विश्वाचा त्राता विनायक
या विश्वाचा त्राता
आदिदेव ओंकार शुभंकर
मी नतमस्तक या चरणांवर
तू विद्येचा दाता गजमुखा
तू विद्येचा दाता
इथे देवकाकांनी दिलेल्या चाली ऐकता येतील.
इथेही
इथे देवकाकांनी दिलेल्या चाली ऐकता येतील.
इथेहीकाव्यरस
वाचने
2659
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
भेटल्या नाहीत
झाली गडबड!
गणेशवदंना आवडली
छान...
मागे तू ही
सुंदर
सुंदर