Skip to main content

(इंग्रजी प्रतिशब्द हवेत)

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 05/08/2009 05:25 या दिवशी प्रकाशित केले.
वर्षा ताई कामाचे बोलतात तर मी त्याचे विडंबन करतो. क्रू. ह.घे. मला खालील शब्दांसाठी इंग्रजी शब्द हवे आहेत. (खरं तर काही काही शब्द इतके अवघड आहेत की जाम सुचत नाहीयेत किंवा सुचले तरी पटत नाहीये ) १) खुळखूळा (उदा. सिग्रेटी फुंकून फुंकून त्याच्या छातीचा पार खुळखूळा झाला. त्याने खिशातले पैसे खुळखूळवले. बाळू खुळखूळा खेळतो. ) २) नादखूळा ३) भेळभत्ता ४) कडबोळी (म्हणजे Maharashtrian recipe prepared in Diwali ?) ५) टांगाटोळी (म्हणजे forcibly pull someone ?) मराठी -इंग्रजी असा शब्दकोश आंतरजालावर आहे का एखादा? - पाषाणभेद
लेखनविषय:

वाचने 2318
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तरांकडे मी एकदा असले शब्द आणि त्याचे इंग्रजी,उर्दू आणि स्वाहिली प्रतिशब्द असलेला शब्द-कोश पाहीला होता. त्याना विचारा... नक्की माहीती मिळेल. कवटी

भडकमकर मास्तरांकडे मी एकदा असले शब्द आणि त्याचे इंग्रजी,उर्दू आणि स्वाहिली प्रतिशब्द असलेला शब्द-कोश पाहीला होता. त्याना विचारा... नक्की माहीती मिळेल. कवटी

डानरावांचं विंग्रजी चांगलं हाये देवा, त्यास्नी इचारा की ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

१) खुळखूळा (उदा. सिग्रेटी फुंकून फुंकून त्याच्या छातीचा पार खुळखूळा झाला. त्याने खिशातले पैसे खुळखूळवले. बाळू खुळखूळा खेळतो. ) insanity-mad (खूळ-खूळा ) २) नादखूळा sound-mad ३) भेळभत्ता Bhelpuri ४) कडबोळी (म्हणजे Maharashtrian recipe prepared in Diwali ?) platcki केक, टोफू, रिसोटो, पिझा, टोड इन द होल, बर्गर, म्लेको, ताबास्को, बिअर, तिरामिसु, बटर क्रंबल अ‍ॅपल पाय यांच्यासाठी वरिजनल मराठी शब्द हवे आहेत. भाषा आणि संस्कृती हातात हात घालून जातात. खाद्य संस्कृतीचं भाषांतर करण्यापेक्षा आस्वाद घेतलेलाच बरा नाही का? ५) टांगाटोळी (म्हणजे forcibly pull someone ?) buggy-gang हा शब्द मराठी आहे? स्वारी माहित नाही. उगाच काहीतरीच धागा, त्यात ना क्रिएटीव्हीटी ना करमणूक, सबब धागा पकाऊ वाटला. संपादक, माझा प्रतिसाद अवांतर वाटल्यास खुशाल उडवून लावावा. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

संपादक, माझा प्रतिसाद अवांतर वाटल्यास खुशाल उडवून लावावा. आपणच अवांतर प्रतिसाद टाकून वर स्वतःच दाखवून देउन चांदणी मागण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर असून नियमातील पळवाटेचा आधार घेउन स्वतःचा स्कोर वाढवण्यासाठी केलेली गंडवागंडवी आहे. सबब निषेध! हे दाखवून दिल्याबद्दल आम्हाला चांदणी का मिळू नये? कवटी