हल्ली शाळेत निबंधासाठी 'बाप' असा विषय देतात? आमच्या वेळी 'माझे वडील' असा विषय असायचा.
पेठकरांशी सहमत!
("आमच्यावेळी" हा शब्द वाचून आमच्या वयाबद्दल गैरसमज करून घेवू नये)
राजमुद्रा:)
काय बोलू?
निब॑धातल्या त्या दिवट्या॑च्यात आणि आमच्यात काही प्रमाणात का होइना पण साम्य सापडल॑.
त्या वेळी नाही पण आता कळत॑य, आबा असे का वागायचे.
असो, देर आये..दुरुस्त आये. धन्यवाद दुनियाजी.
मी हा लेख वर्षभरापूर्वी आंतरजालावर बघीतला होता. त्यात लेखिकेचे नाव सौ. निर्मला आपटे असे दिले आहे! नक्की कुठून मी ऊतरवला होता ते लक्षात नाहीये, पण दुवा शोधून ठेवतॉ.
त्या विद्यार्थिनीने सरळ-सरळ सगळेच मूळ लिखाण उचलले आहे - एका अर्थी हे बरोबर नाही कारण हे तिचे स्वतःचे विचार नाहीत.
पण असो, असे चांगले विचार उचलण्याची बुध्दी झाली हे ही नसे थोडके!
मूळ लेख छानच आहे.
चतुरंग
खरंच पाणी आलं डोळ्यांत. माझ्या लग्नाचे वेळी बाबांनी डोळ्यातून अजिबात पाणी नाही काढले पण नंतर आई आणि भावाकडून समजले की कितीतरी वेळ बाबा माझ्या खोलीत जाऊन एकांतात माझ्या आठवणीनी रडले...
माझ्या पहिल्या नोकरीच्यावेळी.. मला तेव्हा मिळणार्या पगाराइतकीच रक्कम दर महिन्याला माझ्या हातावर ठेवताना त्यांचा अभिमानाने फुललेला चेहरा मला अजून आठवतो. .... माझे बाबा.... बास..!
- (बाबांची अतिशय लाडकी)प्राजु
कोणी का लिहीलेला असोत लेख/निबंध नक्कीच चांगला आहे.
वरील प्रतिक्रीया पाहून जालावर शोधल्यावर अजून काही दुवे मिळाले:
या दुव्याप्रमाणे हा लेख सायली दिवेकर यांचा !
या दुव्याप्रमाणे देव जगताप हे लेखक आहेत.
विभास नावाच्या ब्लॉगस्पॉट प्रमाणे हा निनावी लेख आहे.
थोडक्यात एक कोणीतरी निनावी लेखक/लेखिका आहे बाकी सगळी "बाप" माणसे आहेत!
पण खरच छान आहे....आणि महत्वाचे म्हणजे कधी नव्हे ते पुरुषांबद्दल, पुरुषांच्या संवेदनशीलतेबद्दल जाणईव ठेवून लिहिले आहे, त्यामुळे मनाला फारच भावले! त्यावरून माझी एक जुनी कविता आठवली, तिचा दुवा इथे देत आहे.
http://ramblings2reflections.wordpress.com/2006/11/24/papa-wont-preach/
मुळ कविता इंग्रजीत असल्यामुळे ती इथे दिली नाही.
- मनिष
ब्-याच महिन्यापुर्वी विरोपात वाचला होता. मला वाटते 'फादर्स डे' च्या दिवशी. असो निबंध जसाच्या तसा परीक्षेत लिहिणे हेहि नसे थोडके. स्वतःचे लिहिणारे फार थोडे असतात. त्यात ती फारशी (नव्हे जरादेखील) भर टाकू शकली नाही. तिची शैली त्यात जाणवली नाही. भावनिक आवाहनाचा जमाना आहे बाबांनो. ही व्यवहारचतुर मुलगी आयुष्यात यशस्वी होईल.
प्रतिक्रिया
खरंच अप्रतिम!
डोळे भरून आले....
पेठकरांशी सहमत!
ग्रेट
हम्म्म....
अचानक...
हा लेख पूर्वी प्रकाशित झाला आहे
चा॑गला आहे
हा लेख मला विरोपातून खूप पूर्वीच मिळाला होता.
असेच
खरंच पाणी
जालावरील दुवे
कोणाचाही असू दे...
चांगला निबंध
खास नाही!
मी देखील ....