Skip to main content

मज वाटे ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 21/07/2009 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
मज वाटे पावसाशी नाते माझे नित्य असावे आसवांनी शुष्क माझ्या पावसात सचैल न्हावे पांघरुनी पाऊसधारा हिरवे मी गवत बनावे क्षणभंगुर जलथेंबाचे हलकेच तोल सावरावे हिरवाईचे हळवे स्पंदन श्वासांनी अलवार टिपावे मुग्ध ओल्या जाणिवांनी पावसाचे गाणे शिकावे पावसात अन भिजताना हलकेच तुज मनी स्मरावे ओलेत्या स्मृतीत तुझिया भान सखे क्षण विसरावे विशाल.
लेखनविषय:

वाचने 1238
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

दुसरे कडवे फार आवडले. चौथे कडवे पावसाच्या नात्याबरोबर फारकत घेऊन एकदम 'तिच्या' आठवणीमध्ये नेते, त्यामुळे तिसर्‍या कडव्यापर्यंत असलेली लय बिघडल्यासारखे झाले.

बाकी कविता मस्त झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड