कै. गंगुबाईंबद्दल पहिल्यांदा सुनीताबाईंच्या पुस्तकातुन वाचले होते, कॉलेजच्या दिवसात. प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष गाणे ऐकण्याचा योग काही आला नाही. कधी दुरचित्रवाणीवर इतर गायकांच्या तोंडुन त्यांचा उल्लेख आणि गाणी (?) ऐकली असतील तेवढीच. पण त्यांच्याबद्दल जे ऐकले ते चांगलेच होते. माझीही भावपुर्ण आदरांजली.
विशाल
माझीही भावपुर्ण श्रध्दांजली!
संगीत आणि संगीतसाधनेला पुजा मानुन त्यात स्वतःला झोकुन देणार्या अशा फार थोड्या उरलेल्या जुन्याजाणत्या संगीत उपासकांमधील आणखी एक तारा निखळला.
ईश्वर त्यांच्या आत्मास शांती देवो.
वयाच्या ९२ व्या वर्षी, असाध्य रोगाने पिडीत असतानाही, गाण्याचा कार्यक्रम करणार्या, गंगुबाई हनगल यांची आयुष्याची वाटचाल थक्क करणारी आहे.
माझी भावपुर्ण आदरांजली!
माझीही आदरांजली. बेळगाव, हुबळी, कुंदगोळ आणि पुणे येथे त्यांना अनेकदा ऐकायचा योग आला होता. सवाईंचं गाणं त्यांनी शेवटापर्यंत जपलं.
आज आमच्या अण्णांची 'आक्का' गेली. अण्णा त्यांना आपली थोरली बहीण मानत. गंगुबाईंचादेखील अण्णांवर खूप जीव होता..
आपला,
(किराणाप्रेमी) तात्या,
विनम्र श्रद्धांजली..
त्यांची आणि अण्णांची मुलाखत पु.लंनी घेतलेली अजुन आठ्वते आहे..त्यात त्यांनी गाण्यासाठी जे जे कष्ट घेतले आहेत त्या वरुन त्यांच्या निस्सीम गुरुभक्ती, अपार कष्ट, मायाळु आणि निगर्वी व्यक्तिमत्वाची कल्पना येते.
अण्णासुद्धा त्यांचा शब्द खाली पडु देत नव्हते..
असो..अशी माणसं आता होणे अवघड आहे...
- वाटाड्या...
सवाईला एकदाच त्यांचे गाणे ऐकण्याचा योग आला. ज्येष्ठ गुरुभगिनी म्हणून भीमसेनजी त्यांचा केवढा मान ठेवून त्यांना नमस्कार करत हे प्रत्यक्ष बघितले.
त्यांच्या निधनाने संगीताच्या इतिहासाचा आंणखी एक दुवा निखळला!
-चतुरंग
सवाई ला ४ / ५ वेळा गंगुबाईंना ऐकले. धबधब्यासारखे गाणे . सवाईंचा ठसा अगदी खास !
भिमाण्णांची थोरली बहीणच आज गेली.
भावपुर्ण आदरांजली !!
किराणा प्रेमी ---- केशवराव .
ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगल यांचे गाणे ऐकण्याचेच नव्हे तर त्यांच्याबरोबर चार शब्द बोलण्याची संधी मला मिळाली होती. ते क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. इतक्या महान पण साध्या व्यक्ती फारच दुर्मिळ असतात. त्यांनी आयुष्याची शंभरी गाठावी अशी इच्छा त्यांच्या सर्वच चाहत्यांना असणार, पण ती अपुरी राहिली.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
गंगुबाईंसारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिकेला माझीही विनम्र आदरांजली.
खाली त्यांच्या गाण्याची झलक ऐका.
Get this widget | Track details | eSnips Social DNA हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
प्रतिक्रिया
आदरांजली
कै.
भावपुर्ण
भावपुर्ण आदरांजली
माझीही
आदरांजली!
आदरांजली
आदरांजली.
वयाच्या ९२
गंगूबाईंन
माझीही
विनम्र श्रद्धांजली..
गंगूबाईंना माझी श्रद्धांजली!
माझीही
माझीही
भावपूर्ण
आदरांजली !
ही तर
आदरांजली
माझीही
भावपूर्ण
माझी ही
भावपुर्ण आदरांजली
इथे ऐका गंगुबाईंना!