हो. मीच ती.
भारतात `गॅरेज सेल` नामक प्रकार नाही.म्हणून माझ्या अनुभवाचा लेख पाठवला होता. तोच प्रकाशित झाला.
मिपावर या लेखाबद्दल माहिती दिल्याबद्दल तुझे आभार.
मीनल.
चांगला लेख. मलाही सुरूवातीला असं वापरलेलं विकत द्यायचं/ घ्यायचं हे फारसं पचलं नाही. पण पुस्तकांच्या(टेक्स्टबुकांच्या) किमती, थंडी आणि असिस्टंटशिपचा दणदणीत पेचेक अश्या सगळ्याच्या मेळ घालायचा म्हणल्यावर काही बेसिक फर्निचर, गादी इत्यादी कुणीकुणी टाकलेल्या मधून उचललं. काही स्वेटर्स साल्व्हेशन आर्मी मधून घेतले. तर पुस्तकं बहुतांशी वापरलेलीच घेतली.
बादवे, जॉर्जियात कुठे असता तुम्ही? मी अथेन्सला होते.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
अरे वा! मीनलतैंचे अभिनंदन....
आणि सोनालीचे आभार..
अवांतर - सोनाली, बाकी सर्व क्षेमकुशल ना? तिकडची काय खबर? सर्व मंडळी ठीक ना? महेशरावांना म्हणावं तात्या विचारत होता! :)
तात्या.
ह्या धाग्याच्या निमित्ताने कोदांचेही हार्दिक अभिणंदण !! त्यांचे लेख बर्याच "दिनां"च्या वेळी बर्र्याच पेप्रांत छापून आलेले आहेत !!
मिनल ताईंचेही अभिनंदन ...
चतुरंगांचेही अभिनंदन ...
मिसळपावच्या लेखिकेचा लेख छापून आल्याबद्दल मिपाचेही अभिणंदण ,
मिसळपावचे च्येयरमॅन तात्याबांचे ही अभिनंदण ,,,
हा धागा काढल्याबद्दल सुवर्णमयींचेही अभिणंदण. ..
आणि आम्ही हे वाचू शकलो ह्या बद्दल आमचेही अभिणंदण !!
हा सप्ताह "अभिणंदण सप्ताह" जाहिर करण्यात यावा अशी मी मागणी करतो ! कळावे !
- (अभिणंदक) टारझन
काय केलं बॉ मी ? मी कुठे कोणाच्या मागे लागलोय ? मी काही एक शब्द खोटं बोललो असेल तर प्रतिसाद मागे घेतो !!
"जो जे वांच्छिल तो ते लाहो" हे वाक्य माझ्या मनाला बालपणीपासून भिडले आहे .. ज्यांना जे हवं त्यांना ते मिळावं .. प्रसिद्धी हवी .. प्रसिद्धी मिळो .. मी उलट हातभारंच लावतोय ना ? की कुठे शिवीगाळ केलीये ? की अर्वाच्य भाषा वापरली आहे ? की आणखी काही ?
असो ..
अजुन कोणी असता तर स्पष्टीकरण देणे लागू होत नव्हतं .. पण आपल्याला दिलं .. का? विचारा !! कारण मी तुम्हाला ओळखतो ना ;)
लेख कालच पेपरात वाचला होता.. मात्र लेखिका मिपावरच्या आहेत याची खात्री नव्हती.
अभिनंदन! :)
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
सहमत आहे
--अवलिया
===============
बिपिन कार्यकर्ते स्युडो पुरोगामी असले तरी माझ्या ओळखीचे असुन माझे चांगले मित्र आहेत म्हणुन हा प्रतिसाद त्यांना अर्पण.
हायकोडताच्या निर्णयाशी याचा काहीही संबंध नाही.
मिनलताई,
तुमचे अभिनंदन!
लेखात असलेले आपल्या सासूबाईंचे विचार पटले.
मी फक्त एकदाच अश्या सेलमध्ये मुलासाठी सँडबॉक्स खरेदी केली........ज्यावस्तूसाठी तो इतके दिवस हट्ट करत होता ती सँडबॉक्स त्याने एकदाही नंतर वापरली नाही. आम्ही ज्यांच्या सेलमध्ये ही वस्तू घेतली त्यांची परिस्थिती फार खालावलेली होती व जॉब नसल्याने अगदी उदास चेहर्याने त्यांचा तिथला वावर होता. त्यांची मुले विकल्या जाणार्या खेळण्यांकडे बघत होती त्यानेच मनात कालवाकालव झाली. आता पुन्हा मी अश्या सेल मध्ये जाईन की नाही शंका आहे.
रेवती
"आम्ही ज्यांच्या सेलमध्ये ही वस्तू घेतली त्यांची परिस्थिती फार खालावलेली होती व जॉब नसल्याने अगदी उदास चेहर्याने त्यांचा तिथला वावर होता. त्यांची मुले विकल्या जाणार्या खेळण्यांकडे बघत होती त्यानेच मनात कालवाकालव झाली. "
खरे आहे. माझ्याही मनात कालवाकालव झाली.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
एखादी वस्तू जुनी झाली तर गराज सेलमधे विकायला काढतात. जर विकली गेली नाही तर ती कचर्यात जाते. म्हणजे काय होते? लाखो टन कचरा जिथे टाकला जातो त्या खड्ड्यात ती वस्तू जाऊन पडते. वस्तू कसली बनली आहे त्यावर त्या वस्तूचे नष्ट होणे अवलंबून आहे. धातूची असेल तर तो धातू वितळवून पुन्हा वापरात येऊ शकेल. पण ह्या सगळ्या प्रकाराकरता बरीच ऊर्जा खर्च होते. प्लास्टिक वा अन्य काही पदार्थ शेकडो वर्षे विघटन न होता तसे रहातात. काही पदार्थ जसे शिसे, पारा, विषारी असतात आणि त्यांची विल्हेवाट लावणे ही एक डोकेदुखी असते. (सगळ्यांकरता कारण ह्याकरता नागरिकांकडून कर, शुल्क घेतले जाते).
उदाहरण म्हणजे एक काही वर्षे वापरलेली सायकल. गराजसेलमधे एखाद्याने ती विकत घेऊन अजून काही वर्षे वापरली तर त्या वस्तूचा पर्यावरणावरील बोजा कमी होईल. उलट ती सायकल कचर्यात टाकून दिली आणि ज्याला ती हवी होती त्याने महागड्या किंमतीत नवी सायकल घेतली तर पर्यावरणावरील बोजा दुप्पट होतो.
दुसर्याची जुनी वस्तू कशी वापरायची वगैरे भावनिक अडसर असतील पण हा फायदाही विचारात घेतला पाहिजे. कित्येकदा लोक उत्साहाने वस्तु घेतात पण ती नुसती पडून रहाते आणि मग कधी तरी गराजसेलमधे विकायला येते. व्यायामाची उपकरणे ह्या गटात मोठ्ठ्या प्रमाणात आढळतात. अशा वस्तूंकडे वापरलेली वगैरे म्हणून नाके मुरडण्यापेक्षा इच्छा असल्यास ती विकत घेणे खूप स्वस्त पडते.
मी अनेकदा अशा सेलमधे चांगल्या वस्तू मिळवून त्या अनेक वर्षे वापरलेल्या आहेत. तसेच वस्तू विकल्याही आहेत.
अभिनंदन मिनल. मी बरेचदा गराजसेल मधून पुस्तक, मूळ किमतीचा स्टिकरही तसाच असलेले table cloth, napkins वगैरे गोष्टी घेतल्यात.
मला स्वत:ला freecycle हा प्रकार जास्त आवडतो. यात लोकं मी वापरलय/ मला उपयोग नाही, पण दुसर्याला उपयोगी पडेल म्हणून खुशीने वस्तू देतात.
मी प्रथम चतुरंग वाचतों. नंतर इतर पानें. चतुरंगच्या पहिल्याच पानावर मीनलताईंचा लेख पाहून जाणवलें कीं या मिपावरच्या तर नव्हेत?
लेख आवडला. छान.
सुधीर कांदळकर.
प्रतिक्रिया
मीच ती.
अभिनंदन !
चांगला
अरे वा!
ह्या
+१
टारझनसाहे
काय केलं
सहमत !
अभिनंदन
बापरे!! आमच
असहमत आहे!
अभिनंदन! :)
असेच
अभिनंदन !!!
वा !
मस्त लेख!
+१
+२
अभिनंदन मिनल
खूप खूप
मिनलताई, तु
माझ्याही
एक मुद्दा : पर्यावरण
अभिनंदन
अभिनंदन. .........
अरे वा!!! माहीतीच नव्हते...
लेख आवडला...