मित्रः काय रे काय गोंधळ चाललाय आज जंगलात?
मी: काय नाय रे कोणी तरी श्वापद परत आलंय म्हणे.
मित्रः च्यायला! मग एवढी पळापळ कसली? जंगलात काय श्वापदं कमी आहेत काय?
मी: मुर्ख आहेस! अरे निम्मे बुरखा पांघरलेले, काही नुसतेच खाजगीत गुरकावणारे. काही उगाच गरीब सश्यांवर वगैरे फोक उगारणारे, काही नुसत्याच जंगलनीतीच्या सभा घेणारे, काही नखांची धार गेलेले अन काही दात पडलेले. मग आता फुकटात काही लचके तोडायला मिळताहेत तर कोण सोडील?
मित्रः काय कळलं नाय राव!
मी: कीती दिवस झाले तुला जंगलात येउन? तु फक्त तमाशा बघायचा अन हा ला हा जोडायचा, काय समजलास?
मित्र: अरे पण साला कोणाला हा जोडायचा हे कसे कळणार?
मी: ते कळेल तुला ते हळु हळु. फक्त जरा उंचावरुन हे सगळं करायच काय? म्हणजे धुमकेतु पण नीट दिसतो.
मित्र: ते सगळं ठीक आहे रे. पण कुर्हाड आपल्यावरच आली तर?
मी: त्याची काळजी नको करु, कुर्हाड यायला लाकुड्तोड्या यायला हवा ना आधी?
मित्रः तो कधी येईल?
मी: चपला सापडल्या की येईल. आणि आल्यावर चपला घ्यायला तुझ्यापुढे बरेच जण आहेत रांगेत, घाबरु नकोस.
मित्रः कसला गोंधळ चाललाय रे तिकडं? थांब बघुन येतो. ..
(सन्माननीय सहजरावांना अर्पण...)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3482
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
लै भारी
(हा प्रतिसादही सहजरावांना अर्पण!)
च्यायला!!!
बिर्कीटमहोदय
In reply to च्यायला!!! by बिपिन कार्यकर्ते
फोकाचे वळ !
In reply to बिर्कीटमहोदय by मिसळभोक्ता
भारी
लगे रहो
(हा प्रतिसाद सहजरावांना सादर समर्पण)
(सन्माननीय
लै भारी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी