अश्वमेध

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in कलादालन
6 Jul 2009 - 12:53 pm

खुप वर्षापुर्वी कॉलेज संपले तेव्हाच स्केचिंगही सोडुन दिले होते. काही दिवसांपुर्वी नाशिकला जाण्याचा योग आला. एक स्नेही श्री. सी.एल. कुलकर्णी यांच्याकडे गेलो होतो. तिथे त्यांचे चित्रकार मित्र श्री. धनंजय गोवर्धने उर्फ धनुकाकांशी ओळख झाली. त्यांच्या प्रेरणेने पुन्हा स्केचिंग करायला सुरुवात केली आहे. माझा पहिला प्रयत्न... आंतरजालावर मिळालेल्या एका घोड्याच्या क्लोज अप ची मी केलेली भ्रष्ट नक्कल..

From vishal" alt="" />

रेखाटन

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

6 Jul 2009 - 12:58 pm | विशाल कुलकर्णी

च्यामारी, स्केच अपलोड केले खरे. पण मलाच दिसत नाहीये. तुम्हाला दिसतेय का? :S

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Jul 2009 - 1:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चित्र चढवण्यासाठी आधी पिकासावर चढवा, अल्बममधे जाऊन ते चित्रं उघडा. (नेम धरून) चित्रावरच'राईट क्लिक' केलंत की 'व्ह्यू इमेज' असा पर्याय येईल तो निवडा. आता ब्राऊजरमधे फक्त चित्रं दिसेल, तेव्हा ती यूआरएल इथे डकवा.

चित्रं सुंदर आहे.

विशाल कुलकर्णी's picture

6 Jul 2009 - 1:24 pm | विशाल कुलकर्णी

माझ्या पीसीवर व्हु इमेज असा पर्यायच येत नाहीये. शो पिक्चर म्हणुन एक पर्याय दिसतो पण तो हायलाईट होत नसल्याने वापरता येत नाही. :&

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

दिपक's picture

6 Jul 2009 - 1:31 pm | दिपक

लय भारी विशाल. :)

तुला काय काय येते रे अष्टपैलु आहेस.

माधुरी दिक्षित's picture

6 Jul 2009 - 12:59 pm | माधुरी दिक्षित

नाही दिसत आहे चित्र.

दिपक's picture

6 Jul 2009 - 1:02 pm | दिपक

घोडा पराच्या मिपाभारतात गेला की काय युद्ध करायला. ;)

अश्विनि३३७९'s picture

6 Jul 2009 - 3:00 pm | अश्विनि३३७९

फारच बळ्कट आहे घोडा..

अश्विनि ....

अश्विनि३३७९'s picture

6 Jul 2009 - 3:01 pm | अश्विनि३३७९

फारच बळ्कट आहे घोडा..

अश्विनि ....

टारझन's picture

6 Jul 2009 - 3:25 pm | टारझन

काय माहीत , पण चित्र नाही आवडले , शरीर आणि डोक्याचा रेशो मिळत नाही असं वाटलं !!
शेडींग्ज उत्तम आहेत मात्र !!

(सुस्पष्ट) टारझन

चतुरंग's picture

6 Jul 2009 - 7:21 pm | चतुरंग

तोंडाच्या मानाने बाकी अंग फारच मोठे वाटते आहे. शेडिंग उत्कृष्ट झाले आहे. घोड्याची आयाळही छान जमली आहे.

(अडीच)चतुरंग

llपुण्याचे पेशवेll's picture

7 Jul 2009 - 3:14 am | llपुण्याचे पेशवेll

असेच म्हणतो. थोडेसे प्रमाणबद्धतेत मार खाते आहे असं वाटतं.

-पुण्याचे पेशवे
काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणार्‍यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाही ? आणि समलैंगीकांचे उदात्तीकरण पण केले नाही ? अरेरे ! स्वतःला आधुनीक कसे म्हणवते तुम्हाला ?
Since 1984

विमुक्त's picture

6 Jul 2009 - 5:15 pm | विमुक्त

टारझन शी सहमत....

लवंगी's picture

6 Jul 2009 - 7:40 pm | लवंगी

शेडींग्ज उत्तम आहेत

धनंजय's picture

7 Jul 2009 - 2:32 am | धनंजय

आग्नेय-वायव्य कर्ण काढून खालच्या त्रिकोणात घोडा बसवायची कल्पना वेगळीच आहे. अजून स्वतःला आवडली की नाही ते पटवून घेतो आहे. उधळलेल्या घोड्याची नेमकी पोझ काय आहे ते माझ्या लवकर लक्षात येत नाही आहे.

शेडिंग छानच आहे.

लिखाळ's picture

7 Jul 2009 - 2:58 am | लिखाळ

छान. दणकट आणि वेगवान. धनंजय म्हणतात त्याप्रमाणेच मांडणी आवडली.
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

विशाल कुलकर्णी's picture

7 Jul 2009 - 9:15 am | विशाल कुलकर्णी

मित्रहो, मनःपुर्वक आभार. मी वर एक शब्द वापरलाय "भ्रष्ट नक्कल" तो यासाठीच की स्वतःचे डोके न वापरता जसेच्या तसे त्या चित्राची नक्कल केली आहे. अर्थात डोक्याचा आकार थोडा विसंगत असल्याचे नंतर लक्षात आले. पण सुधारण्याचा कंटाळा केला. धन्यवाद.

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

दिपाली पाटिल's picture

7 Jul 2009 - 12:38 pm | दिपाली पाटिल

येतं की हो तुम्हाला विशाल... अजुन पर्यंत फक्त पाकृ नाही टाकलीत ती.
बाकि चित्र छान आहे.

दिपाली :)