खूपच मस्त आहेत फोटो..
मी कन्नूर पाहिले आहे.. एकदम सहीईईईईईईच आहे.
चहाचे मळे, डोंगरातून जाणारे छोटे छोटे हिरवेगार रस्ते, गार गार हवा, थंड वातावरण, गरम मसाल्याची शेती ...
(मल्याळम) मनस्वी
माहे केरळात नाही. मी तीन वेळा तेल्लीचेरी माहे मार्गे केरळात गेलो आहे. माहे सुंदर तर नक्कीच नाही. माहे म्हणजे भेंडीबाजारासारखे बकाल वाटले. केंद्रशासित प्रदेश आहे. युनिअन टेरिटरी ऑफ माहे ऍड पाँडिचेरी. परंतु बाकी संपूर्ण केरळातील निसर्गसौंदर्याच्या बाबतीत मी तुमच्या मताशी सहमत आहे. पलक्कड उर्फ पालघाट पाहिले. कालडीला गेलात की नाही?
अनिकेत राव!
पूर्वपुण्याईमुळे आम्ही केरळासारख्या निसर्गरम्य जागी शिकतो.
खरच नशीबवान!
मी असेही म्हणायचे धाडस करीन की केरळासमोर कोकण काहीच नाही.
हे मात्र मान्य नाहि. मी इतकंच म्हणेन की तुम्ही खरा कोकण पाहिलेला नसावा म्हणून असं बोलु शकताय. केवळ गर्दीने डबडबलेली पर्यटनस्थळे म्हणजे कोकण नव्हे! एकदा कोकण मनापासून पूर्वग्रह न ठेवता फिरा आणि बोला
बाकी फोटु सुंदर.. त्यातहि डर्ट रोड वाला सह्हीच आला आहे. अजुन येऊ देत :)
-ऋषिकेश
केरळ मी कोकणाइतके फिरलो नसलो तरी तुलना करु शकेन इतका बघितला आहे. म्हणूनच म्हणतो कोकण ते कोकणच!.. कोणा केरळाला ती सर येणार नाहि. याचा अर्थ केरळ सुंदर नाहि असं मला म्हणायचं माहि आहे. मुळात या दोन्हि स्थळांची तुलनाच चुकीची वाटते. पण करायची झाली तर मी अजूनहि म्हणेन कोकण ते कोकणच! :)
तेव्हा सादर नमुद करु इच्छीतो की (एक दारिद्रय सोडल्यास) निसर्ग सौदर्याच्या बाबतीत कोकण केरळाच्या खचितच काकणभर सरसच आहे!
काय वो गावकर्यांनु म्या म्हणतो ते खरं का न्हाय?
-(कोकणी) ऋषिकेश
याचा अर्थ केरळ सुंदर नाहि असं मला म्हणायचं माहि आहे. मुळात या दोन्हि स्थळांची तुलनाच चुकीची वाटते.
ऋशिकेशा, तुझ्याशी सहमत आहे..!
अर्थात, माझे व्यक्तिगत मत विचाराल तर केरळच काय, आमच्या कोकणापुढे सर्वच प्रदेश फिके आहेत!
आपला,
(आंब्या-फणसातला) तात्या.
प्रतिक्रिया
ग्रेट!
छान छायाचित्रे. पण....
माहि हे
फोटो मस्तच..
मस्त!
पूर्ण आदरासहित.......
कोकण ते कोकणच!
सहमत..
आवडले....