And then they say "Gravity is not needed to fall in love!!" So true.So beautiful.
माणुस प्रेमात "पडतो" हे वाक्यच मुळी पिक्चर "पडला",गड "पडला" , सर्कशीतला सायकलस्वार धड"पडला" आणि मग एकदाचा खाली "पडला" या वाक्यांच्या लायनीवर वाटतं.पण तरीही असं "पडणं" कुणालाही हवहवसं, निदान एकदा तरी पडुन पहावं असं वाटायला लावणारं आहे. प्रख्रोग "हृदयरोग" तज्ञ डॉ मुन्नभाइ MBBS ह्यांनी सांगिअतल्या प्रमाणे
कुठल्याही औषधाला जोड हवी "जादु की झप्पी" मिळायची. औषधी जगायला शक्ती देते. "जादु की झप्पी" औषधं घ्यायला उद्युक्त करते!!
तस्मात् माणसानं "जादु की झप्पी" या अनुभवातुन जावच. वरच्या पडण्याचं ते प्रकटीकरण आहे.
आता कदाचित विचारशील हे सगळं "लिहितोस" कशासाठी?"इ मेल " च्या जमान्यात जिथं विचार निर्माण होण्याच्या गतीनच पोहोचवले जातात, तिथं हे "लेटर"(हार्ड कॉपी) कशाला?हे लेटर लिहुन होणार काय आहे?लिहिलं नाही तर काय होणार नाही?
मा़हं उत्तर अगदी साधं आहे. एक्विसाव्या शतकात लोकशाहीचं भक्कम वरदान असलेल्या देशात "Long Live the Queen"का हवं? जेवुन झाल्यावर "अन्नदाता सुखी भव" म्हणत हाताच्या ओंजळित पाणीका घ्यावं ?आपण कुठही जाणार नसलो तरी गोबर्या गलाचा गोड पापा घेत छकुल्या बाळाला आपण "चल तुला भूsssssssssssssssssssssर नेतो" असं लाडानच क असेना खोटं खोटं का सांगावं? वकिलांनी नियमित काळा आणि डॉक्टरांनी नेहमी काळा पांढरा कोट किंवा अॅप्रन का घालावं?लहान लहान बछडे गुरकावत्र, अगदी ऐटित चपळाइ शिकत असतानाही वाघोबानं त्यांना अगदी "पेश्शल" ट्रेनिंग का द्यावं?
ह्यासगळ्याचं कारणं एकच आणि ते हेच की "तसं केलेलं शोभतं" म्हणुन. म्हणुन हे सगळं लिखाण आणि डायलॉगबाजी.
अरे हो ....
काहीतरी सांगणार होतो ना मी?खरं सांगु? सगळच सांगायचय.त्यातलं नक्की काय आधी आणि काय नन्तर ते ठरवायचय.
आणि सांगु तरी काय काय? इथं न सांगण्यासारखं काही नाही. तुला ह्या पत्रात सगळं सांगत बसलो तर कडाक्याच्या थंडीत ....
हिमलयाच्या सीमेवर ऐन रण धुमाळितही आपल्या जरबेचा पहारा देणार्या सहकार्याला मोकळं करता येणार नाही. त्याचा चार्ज घेता येणार नाही. तुझ्या आठवणी उरात घेउन इथं लढता लढता हौतात्म्य मिळायची संधी पुन्हा दिसणार नाही.
तुझाच
कॅ अशोक
जाता जाता :- A picture is worth thousand words. But a TOUCH is worth millions of picutres!
मला निरोप देतानाचा तुझा स्पर्श अजुन अनुभवतोय.
शब्द थिटे उण्या जाणिवा
स्पर्श तुझा उर्मी देइ जीवना ||
दि ३ मे १९९९
उपसंहार :- दि ४ मे १९९९ वर्तमन पत्राचा ठळक मथळा " घुसखोरांना थोपवताना कॅ अशोक ह्यांना कारगिल नजीक सीमेवर वीर मरण"
उपशीर्षक :- बाल्टिस्तान आणि कारगिल इथे भारतीय सैन्य आणि घुसखोरात धुमश्चक्री सुरु.
वाचने
2181
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
मनसाहेब...
मनः पुर्वक धन्यवाद आणि कडक निषेध
In reply to मनसाहेब... by अनामिक
कारगिल
In reply to मनः पुर्वक धन्यवाद आणि कडक निषेध by मन
मनसाहेब,
लेखनात कारगिल
In reply to मनसाहेब, by अनामिक
जनातलं