मनसाहेब... वरच्या पत्राची तारीख ३ मे १९९९ आहे ज्यात मुन्नाभाई एम बी बी एस ह्या २००३च्या चित्रपटाचा उल्लेख आलाय... हे कसे काय बुवा?
इ-मेल मधून आलेले फॉरवर्डस् इथं छापण्या आधी तपासून तर पहा.
-अनामिक
मुन्नभाइ बद्दलची चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद.
मात्र .....इ-मेल मधून आलेले फॉरवर्डस् इथं...
ह्याबद्दल निषेध निषेध निषेध
हे कुठल्या ढकलपत्रातुन आलय ते पत्र खुशाल इथं सादर करा
अन्यथा काही आरोप करण्यापुर्वी खातरजमा करुन घ्या ही नम्र पण गंभीर विनंती.
हवं असल्यास माझ्या इथल्या "रेपो" तुम्ही खुश्शाल खात्री करुन घ्यावी इथल्या मान्यवर सदस्यांकडुन.
आपण वेळ काढुन प्रतिक्रिया दिलीत, वाचलत, ह्याबद्दल पुनश्च आभार.
आपलाच,
मनोबा
कारगिल नंतर अश्याप्रकारच्या ढकलपत्राचा सुळसूळाट झालेला. आता हेच पत्र जसंच्या तसं वाचलेलं आठवत नाही, परंतू हा ढकलपत्रातून आलेला संदेश आहे असे वाटले म्हणून तसे लिहिले. तो आरोप नव्हता. माझ्या मनात तुमच्या वाटचालीबद्दल कुठलाही किंतू नाही. तुम्ही दुखावला गेला असाल तर मी माफी मागतो. पण वर दिलेले पत्र हे ढकलपत्रातून आलेले नसले तरी ते तुमचे स्वतःचे नाही असे जाणवते (निदान पत्रातल्या कॅ. अशोक यांच्या नावावरून). तुम्ही ते प्रकाशित करण्यापुर्वी कॅ. अशोक यांच्या घरच्यांची परवानगी घेतली आहे का? दुसर्यानी लिहिलेलं वैय्यक्तिक पत्र स्वतःच्या नावखाली प्रकाशित करताना ते तुम्हाला कुठून मिळालं आणि ते तुम्ही ईथे का देताय याचं स्पष्टीकरणही तुम्ही दिलेलं नाही. तेव्हा वाचकांनी काय समजावे?
-अनामिक
मनसाहेब, मला खालच्या दोन-तीन लिंक्स मिळाल्या कारगिलमधे शहिद झालेल्या जवांनांच्या नावांच्या. त्यात कॅ. अशोक हे नाव कुठे दिसले नाही. ही यादी पुर्ण आहे की नाही ते माहीत नाही, तेव्हा माझी काही चुक असल्यास आधीच माफी मागतो.
http://www.angelfire.com/in2/kargil/
http://www.indianarmy.nic.in/ota/arotakheros.htm
http://ikashmir.net/kargilheroes/
http://www.kashmir-information.com/Heroes/index.html
तुम्हाला कॅ. अशोक (त्यांच पुर्ण नाव काय हो?) यांच्या बद्दल अधीक माहिती असल्यास जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तसेच तुमच्याकडे ज्या वर्तमानपत्रात कॅ. अशोक यांच्याबद्दल बातमी आली होती त्याचा काही दुवा आहे का?
-अनामिक
हा उल्लेख असला तरीही लेखन पुर्णतः काल्पनिक आहे.
काल्पनिक असलं तरी वरिजनल आहे.
बहुदा हा डिस्क्लेमर आधिच टाकला असता तर बरं झालं असतं.
कॅ अशोक हे नावही काल्पनिक आहे.
असं काही लिहिणं चुक असेल तर सॉरी.(कायद्याचं काटेकोर ज्ञान मला नाही.)
जवानांचा उल्लेख अनवधानाने होउ नये याची काळजी घेइन. शक्य असल्यास कथा दुसरिकडे व़ळवत जाइन.
अवांतरः- लेखन लिहुन तयार होतं. पण पत्र नक्की कुणी कुणाल्का पाठवलय तो भाग अधिक स्प्ष्ट करावा म्हणुन जवानाचा उल्लेख.
थोडक्यात कायः- पत्र तयार होतं ....कारगिल प्रकरण हे "अॅड्-ऑन" कांपोनंट म्हणुन लिहिण्याच्या भरात घातलं गेलं.(लिहिताना जे जसं येइल तसं मी टंकित जातो....फारसं बांधेसूद करणं सध्यतरी जमत नाही. प्रयत्न नक्की करेन.)
आपलाच,
मनोबा
जनातलं मनातलं हे सदर साहित्य म्हणून गणले जाते. त्याला काटेकोर अचूकतेची पट्टी लावून मोजू नये असे वाटते. तेथे काही माहितीतील घटनांबद्दल / व्यक्तींबद्दल लिहिले असेल तरच अशी पट्टी लावता येईल.
काथ्याकूट मध्ये मात्र अशी पट्टी लावणे मान्य आणि ग्राह्य असावे.
अनामिक यांचा सौम्य निषेध. (ह. घ्या)
खराटा
(रंग माझा वेगळा)
प्रतिक्रिया
मनसाहेब...
मनः पुर्वक धन्यवाद आणि कडक निषेध
कारगिल
मनसाहेब,
लेखनात कारगिल
जनातलं