“शूप”, “शूप”, “शूप” ....

निखिलचं शाईपेन's picture
निखिलचं शाईपेन in कलादालन
10 Jun 2009 - 1:14 am

“और क्या ?”
“आरे आणि ठिक, सॉफ्टवेअर जीव मी लेका, एक विकऎन्ड ते नेक्स्ट”
“नाही रे तरीपण? वाचतोयस का काही?”
“पेपर, ब्लॉग्स, बाकी विशेष नाही.”
“फॉऊंटन हेड वाच खरं तर आतापर्यंत दहादा वाचलयं मी”
“हम्म्म्म्म, बघतो शनिवारी आणतो, क्रॉसवर्ड मधून”
“हो फॉऊंटन हेड, बाय आयन रॅंड, चल रे ठेवतो,स्क्रीन सेव्हर आला असेल एव्हाना, बॉस घिरट्या घालतोय आज”
“अछा, चल, बाय”
“हो, वाच पण”
“नक्की”

आयचा घो, ह्या आयन रॅंड च्या. पुस्तक आहे का डिक्शनरी ची जाहिरात? निरक्षर आहे कि काय मी अस्सं दिवसभरात पाच एक वेळा वाटून गेलं. डोकं फुटायच्या आत पुस्तक गादिखाली घुसवून मी पळायला निघालो... आल्यावर आठवणही नको या टॉर्रचर ची, लई फिलॉसॉफिकल झालंय दिवसभरात, आता नो thoughts, जस्ट run आणि येऊन मग जेवून एक वेल डिझर्वड झोप, नो thoughts.

“शूप” “शूप” “शूप” (असं पळताना म्हणून बघा, प्रत्येक ढांगेला एकदा “शूप”, छान रिदम येतो),

कसलाही विचार करायचा नाही, असा विचार केल्या केल्या आपण काय विचार करतो? मुळात कसलाही विचार न करणे पॉसिबल आहे का? म्हणजे काही नाही, नो विचार, ब्लॅंक एकदम.
ट्राय करतो. “शूप” “शूप” “शूप”.

वा जमतयं, जमतयं, कित्ती वेळापासून काहीच डिस्ट्रॅक्टींग विचार नाही फक्त “शूप” “शूप” “शूप”,

“शूप” “शूप” “शूप”.

आररे, आंबेवाला – आहेत घरी, पोचल्यावर हाणूयात दोन... नाही तीन.. बरं, ठिके, now concentrate. “शूप” “शूप” “शूप”

म्हैस – छान आहे “शूप” “शूप” “शूप”

पूर्वा – कसली एक-नंबर आहे, डायरेक्ट बघू नको, काकू आहेत शेजारी, जोरात पळून दाखवा
गेली का? गेली.. दमलोय, “शूप” “शूप” “शूप”

बसूयात ? नको आवाज आहे फार, आणिक थोडं पुढे जाऊन
चल च्याक च्याक...हैक हैक शूप शूप..

लग्न ! हा आवाज आहे तर .. कोणाचं आहे ?

गायकवाड वेड्स हगवणे.

आरे का पण ?
आता यापैकी पोराचं नाव गायकवाड असेल तर ठिक आहे, एक हगवणे(णी) तरी कमी होईल, नाहितर, हगवणे च हगवणे.
शूप ... शूप ...

ऑफिस मध्ये एकाचं आडनाव जी. ए. एन. डी. यू. आहे, दुस-या प्रोजेक्ट मधल्या एकाचं काय तर महाबूब, सुश्मितम्हणाला हे दोघं एका प्रोजेक्ट मध्ये आले तर काय धिंगाना होईल!

सुश्मित चाप माणूस आहे परवा काय तर अशीच वरातीत बस अडकली तर हा बाबा हात बाहेर काढून एकदम नाचायलाच लागला वरातीतल्यांबरोबर, “ओ, ओ, ईकडं ईकडं, वर बघा, हा..., ते जरा गुबू गुबू वाजतयं रिवाईंड घ्याना” वर अशी फर्माईश वगैरे. मला मजा आली पण एकूणच लाज आणली अगदी आख्ख्या बसला.

फारचं अवांतर झालं, काय? “शूप” “शूप” “शूप”

आज पुरे?

अजून थोडडं ..सु-याच्या घरापर्यंत जाऊन येऊ, त्याच्याकडून मेजरींग टेप परत घ्यायचा आहे

किस्साच आहे, तो, प्रोफेसर पोस्ट साठी अप्लाय करायच्या फॉर्म मध्ये, उंची, छाती (न फुगवता,फुगवून) असले कॉलम होते म्हणे, कडी म्हणजे याने ते भरले, आणि तेही ईंच विचारले असताना खुशाल सेंटीमिटर मधले रिडिंग्ज लिहून फॉर्म भरून आलाय. काल म्हणत होता, “खरं कळायला हवं होतं फॉर्मात काहितरी घोळ आहे ते, शिवाय त्या ईंच सेंटीमिटरच्या घोळात आता अशा अचाट मापांमुळे चाचा चौधरींच्या साबू ने अप्लाय केलयं असलं काही त्याफॉर्म घेणा-यांना वाटलं असणार”.

“मुग्धा, सु-या कुठायं?”

“येईल, खालीच गेलाय, आरे, टेप ठेवून गेलाय, कशाला रे घेतला होता?”

“अं?”

“आरे टेप कशाला आणला होता? मिल्कशेक फिरवू एक?”

“हो फिरव, आगं काही नाही एल आय सी ची पॉलिसी, त्याचा फॉर्म भरत होता” आता हिला काय सांगायचं तुझानवरा, काय भारी आहे ते.
मिल्कशेक झालं..
साबू काय आला नाही, मुग्धाला काय सांगितलं त्याचा एस एम एस सु-याला करून मी निघालो.

परत,
शूप..
शूप..
नव्या पिक्चरचं पोस्टर,

परवेजला मी खूप वर्षांपूर्वी ...
“पड्ड्या, सून तो”
“अपन पिक्चर निकालते है, स्टोरी सून”
“हा बता”
“अपन क्या दिखायेंगे कि, एण्ड मे हिरो हिरोईन, ऍक्चुअली मे भाई – बहन है ऎसा पता चलता है.”
“येडा हैं क्या, साले पब्लिक मारेगी”
“अछा? ओके फिर कुछ और, बताता हूं”
आता बघा या स्टोरीवर एक मराठी सिनेमा येतोय, पड्ड्याला कुटायला पाहिजे,
आयन रॅंड ला पण,
बट, फॉर नाऊ...
नो थॉट्स,
जस्ट run
शूप...
शूप..
शूप ....

-निखिल

वाङ्मय

प्रतिक्रिया

टारझन's picture

10 Jun 2009 - 1:30 am | टारझन

लय भारी दोस्ता ... चका किमान शुप शुप म्हणत का होईन पळतोय लेकाचा हल्ली.. आनंद आहे :) झकास लेखन

(शेपु नको ,शेपु नको ,शेपु नको) (बटाटा) टारझन
हल्ली प्रतिसाद नजरकैदेत आहेत :)

हरकाम्या's picture

10 Jun 2009 - 1:40 am | हरकाम्या

आयला काय टुकार लिहिलय या प्राण्याने दहादा वाचुनही टाळक्यात
काही शिरल नाही.याच्या लिखाणावर बंदीच घातली पाहिजे.

Nile's picture

10 Jun 2009 - 4:54 am | Nile

=)) =)) त्यात टाळक्यात शिराय सारखं काय आहे? त्यांच्या पण टाळक्यात फाउंटन "हेड" शिरलं नाही म्हणुन ते शूप शूप शूप करताहेत. तुम्ही पण फक्त शुप शुप शुप करा! =)) =))

प्राजु's picture

10 Jun 2009 - 1:44 am | प्राजु

जे काही आहे .. ते खूप आवडलं..
शूप.. शूप .. शूप!!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनामिक's picture

10 Jun 2009 - 2:44 am | अनामिक

मजा आली वाचायला....

शूप... शूप... शूप...
-अनामिक

रेवती's picture

10 Jun 2009 - 2:50 am | रेवती

मस्त!
सतत विचार आणि विचार चालू असतात डोक्यात.
त्यांना गप्प करायला छान आयडीया आहे.
शूप्....शूप्....शूप!

रेवती

गोगोल's picture

10 Jun 2009 - 4:40 am | गोगोल

.

अवलिया's picture

10 Jun 2009 - 6:13 am | अवलिया

शुप ! शुप !! शुप !!!

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

भाग्यश्री's picture

10 Jun 2009 - 8:33 am | भाग्यश्री

छान आहे.. पण ते रात्रीचा दिवस करून इतकं नाही छान! आणि फाउंटनहेडला नावं ठेवल्याने अज्जिबातच नाही!! :) :)

www.bhagyashree.co.cc

छोटा डॉन's picture

10 Jun 2009 - 11:52 am | छोटा डॉन

फारच सुरेख रे भौ ...

आयला अस्सं लेखन जमायला फार विचार करावा लागतो का ? मुळात विचार कसा करतात ?
शुप.. शुप.. शुप..

लेख उत्तम जमला आहे ह्यात वादच नाही, अजुन असेच येऊ देत म्हणावे का ? आल्यास आपल्याला वाचण्यासाठी कॉन्संट्रेट करणे झेपेले का ?
शुप ... शुप ... शुप ...

आयचा घो, मरु देत.
लेख आवडला, पुलेशु ...
शुप ... शुप ... शुप ...

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

ऋषिकेश's picture

10 Jun 2009 - 6:38 pm | ऋषिकेश

मनातील विचारांचा स्वैर आलेख आवडला
अजून येऊ द्या!

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

सूहास's picture

10 Jun 2009 - 8:07 pm | सूहास (not verified)

सुहास

लिखाळ's picture

10 Jun 2009 - 8:23 pm | लिखाळ

:)
गणी गण गणात ....
लिखाळा आता चूप चूप चूप....

--(अ-विचारी) लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)