रंगाकाकाचा गोडाचा लेख वाचला आणि लगेच प्रितिक्रिया लिहायचा विचार केला. पण गोडाचा विषय त्याला घाईत काय प्रतिसाद देणार असे म्हणुन शेवटी लिहायला उशिरच झाला. खरे तर गोड पदार्थ म्हणजे आपला एकदम जिव की प्राण. अगदी लहानपणा पासुन मला आजी आई सगळे गोडघाश्याच म्हणायचे. म्हणजे माझे गोडाचे वेड इतके होते की कधी कधी आई झोपल्यावर हळुच डब्बा काढुन चोरुन साखर खायचो. बरेच वेळा पकडल्याही जायचो त्या साठी अगदी आइच्या हातचे धपाटे पण अनेक वेळा खाल्लेत. आता जर मला कोणी विचारले "तुझा आवडता गोड पदार्थ कुठला?" तर मी उत्तर नाही देउ शकणार.
तर सुरवात करुयात जालन्यापासुन, आमचे घर अगदी भर चौकातच होते. घराचा खालिच एक हॉटेल होते तिकडे रोज सकाळी खवा पोहचवायला दुधवाले यायचे. ह्यातल्या काही दुधवाल्यांकडुन आई खवा विकत घ्यायची. मग व्हायचा तो गुलाबजामुन बनवायचा एक राजेशाही कार्यक्रम. गुलाबजामौन मी कितीही आणि केव्हाही खाउ शकतो. तर आई च्या हातच्या गुलाबजामुनची चव कधी बाहेरच्याला कधीच नाही येणार. आमच्या घरा खालच्या हॉटेलाची खासियत म्हणजे बालुशाही,अप्रतिम अशी बालुशाही इथे मिळायची. माझ्या मुंजिच्या वेळेस सुद्धा घरच्यांनी ह्याच हॉटेलच्या आचार्याकडुन बालुशाही बनवुन घेतलेली. तर जालन्यातली अजुन एक आठवण म्हणजे आजीच्या हातच्या पाकातल्या पुर्या. आहाहा आतापण त्या पुर्यांची चव तोंडात आहे. अजुन एक आजिच्या हातचा पदार्थ म्हणजे अनारसे. एकदा आमच्या ओळखिच्या जोशि कांकुकडे गेलो असताना त्यांना स्टॉव वर खाली बसुन अनारसे करताना बघितले होते. त्याचा दुसर्याच दिवशी आइच्या मागे लागुन अनारसे बनवायला लावले. माझ्या हट्टापायी आईने अनारसे बनवले खरे पण मी ते खायला तयार नव्हते कारण काय तर ओईने जोशी काकु सारखे खाली बसुन अनारसे नव्हते बनवले. तसे जालन्याला मला बाहेरचे गोड खाल्लेले आठवत नाही.
बाबांच्या होणार्या बदला मुळे अमरावती-नागपुर्-अमरावती असा प्रवास घडलाच. अमरावतीच्या रघुवीर मिठाईया मधेली काजुकतली तर अप्रतिमच होती. नागपुर मधे असताना तसेच हल्दिराम चे सोनकेक. त्यावेळेस हल्दिराम अमेरिकेत पोहचले नव्हते. चिखलदर्या जवळ मेळघाट मधे सेमाडो ह येथे जि रबडि खाल्ली तशी रबडी आजगायत नाही खाल्लि हो. त्या नंतर औरंगाबाद मधे मिलन मिठाई मधले बर्फी किंवा अप्पा हालवाईचा पेढा जबरदस्त होता. उत्तम मधल्या सारखी इमरती तर कुठेच मिळात नाही. आजही औरंगाबाद ला गेल्यावर बरेच वेळा उत्तम मधे जाउन इमरती घेवुन येतो. आता पेढ्यावरुन आठवतो तर कुथंलगिरीचा प्रसिद्ध पेढा. कुथंलगिरी बिड जिल्हातले एक छोटेसे गाव. पण तिथला कलमी पेढा म्हणजे काय विचारुच नका. ह्या गावावरुन कुठे तरी एकादा गेल्याचे आठवते. हायवेच्या दोन्ही बाजुला फक्त खव्याची व चक्क्याचिच दुकाने. तर ह्या कुथंलगिरीची प्रसिद्ध पेढे खुलताबादच्या भद्रा मोरोती मंदिरात सुद्धा मिळते. भद्राला गेलो आणि पेढे आणले नाहीत असे कधिच झाले नाही. पेढ्याची पुढची आठवण म्हणजे आंबाजोगाईतील योगेश्वरी देविच्या मंदिराबाहेरिल कलमी पेढे. घरात पेढे आणलेले असले तर आइच्या हातात यायचा तो रिकामा डब्बाच.
ह्यात सगळ्यात महत्त्वाचे दोन गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी आणि श्रिखंड. आमच्या घरात सगळेच लोक पुरणपोळीचे शौकिन आहेत. घरी पुरणपोळी वर्षातुन कितीहि वेळा बनवली तरि नेहमई आईला त्रास द्यायला म्हणनार "पुरणपोळी खाउन खुप वर्ष झाली ग आई". होळी, श्रावणातला शुक्रवार, नवरात्रात नवमीला, पुरणपोळी नक्कीच बनायची पण सर्वात वेगळ्या चवीची बनते ती फक्त महालक्ष्मीच्या (गौरी) नैवेद्याची. आमच्या कडे नेहमी स्पर्धा लागते कोण सगळ्यात जास्त पुरणपोळी खाते ह्याची. जिंकतो अर्थात मीच. पण ती तव्यावरुन गरम सरळ पानात वाढलेली त्यावर मस्त तुपाची धार सोडलेली पुरणपोळी मी कोणत्याही वेळेस खाउ शकतो. तसेच शिळी झाले पण पुरण पोळी मी कितिही पोट भरलेले असेल तरी खाउ शकतो. श्रिखंड मला आवडते ते चक्क्यापासुन घरी बनवलेले. काही ठरावीक दिवशी आमच्या कडे श्रिखंड नक्किच बनते. माझ्या कडे ह्यातले दोन काम असायचे एक तर औरंगाबाद्ला भावे आणि कं कडुन चक्का घेउन येणे आणि दुसरे म्हणजे चक्का पुरण यंत्रातुन काढुन देणे. साखरभात हाही माझ्या आवडत्या पदार्थापैकी एक आहे.
काही विचित्र पदार्थ सुद्धा मी गोड खायची इछा झाल्यावर खातो. दाण्याचा कुट साखर ही त्यातलिच एक. कधी गोड खायची इच्छा झाली व काहिच सापडत नसेल तर सरळ वाटीत शेगंदाण्याचा कुट घ्यायचा त्यात थोडी पठी साखर टाकायची किंवा साधी साखर टाकायची झाली आमची स्विट डिश तयार. ह्याच प्रकारचा शेंगदाण्याचा लाडु, साबुदाण्याचे लाडु. तसेच एक गडगिळ नावाचा पदार्थ आहे ज्याची पाककॄती मला माहित नाही. पण गुळ आणि कणिक ह्या पासुन बनवतात असे वाटते. आजीच्या हातचा खाल्लेला आज पण आठवतो. खिर हा प्रकार मला फारसा काही आवडला नाही. आता बंगाली मिठाई वैगेरे खातो पण ती सुध्धा फारशी आवडत नाही.अरे ह्या सगळ्यात आईच्या हातचा कलाकंद राहिलाच. दुध नासले की मी नाचायचो आता कलाकंद मिळणार म्हणुन. तसेच फक्की हा प्रकार म्हणजे तर विचारु नका. शाळेत असताना डब्ब्यात फक्की कितिदा नेली असेल सांगता येत नाही. अजुन बरेच पदार्थ आठवतायत पण आता इतकेच लिहितो.
==निखिल
जुन्या धाग्यांत उचकापाचक करताना हा ना वाचलेला धागा उघडला आणि कुठुन दुर्बुद्धी झाली असे वाटले. किती रसिकपणे तसेच निगुतीने सर्व पदार्थांच्या आठवणी लिहिल्या आहेत! वाचता वाचता तोंडचे पाणी आवरेना.
पणा आता इकडे यातला एक तरी पदार्थ डोळ्याला दिसेल तर शप्पथ. त्यामुळे त्यांच्या आठवणीतच पुढचे किमान चार-आठ दिवस झुरतच काढावे लागणार असं दिसतंय. रंगा भाऊजी, कुठे फेडाल हे पाप?
त्यात प्रतिसादकर्त्यांनीही एकाहून एक प्रतिसाद लिहिले आहेत. निदेंचा प्रतिसाद तर मूळ लेखाला पुरवणीच आहे.
(हा धागा वाचून जश्या माझ्या आत्म्याला यातना झाल्या तश्याच आणखी काही आत्म्यांना व्हाव्या या एकाच 'पाशवी' उद्देशाने हा धागा प्रतिसाद देवून वर आणत आहे.)
स्मिता, 'खाणकाम' केल्याबद्दल धन्यवाद!
रेवती आणि मकी, तुमचे नवरे दुष्ट आहेत! ;) मला एक क्रीम बिस्कीट खाल्लं तर मोठं पाप केल्यासारखं वाटतंय आणि इथे...
जाऊ दे झालं...
रंगाशेट, त्या मूगडाळीच्या शिर्याने माझी पण विकेट एकदा घेतली होती. एका लग्नात हे काय आहे खाऊन बघूया म्हणून सुरुवातीलाच खाल्ला आणि मग आणखी काही न खाताच परत आले!
भारी लेख. नगरचा खवा आणि बासुंदी खूपदा खाल्लीय. रगडा कचोरी हा प्रकार पहिल्यांदा नगरलाच खाल्ला होता.
नृसिंहवाडीच्या बासुंदीला आता पूर्वीची मजा नाही. साखर ओतू ओतू खूपच गोडमिट्ट करतात आताशा.
इथे अमेरिकेत आल्यापासून एकतर आजूबाजूला गोड खाणार्या लोकांचे प्रमाण कमी; सारखे 'ओ, माय गॉड सो मेनी कॅलरीज!' करुन चिंताक्रांत असतात बरेचसे लोक!
अमेरिकेन लोक साखर खात नाहीत किवा कमी खातात अस सुचवत असल्यास ते बर्याच अंशी चुकलेले वाक्य आहे पुढील पदार्थामधून सामन्यता: अमेरिकन लोक बरीच साखर घेतात जस की कॉफी , सॉफ्ट ड्रिंक्स , विविध प्रकारचे केक , कप-केक , स्मूदिज , पाय , गोळ्या , चॉकलेटस , चुइन्ग गम्स , आईसक्रीमस असे अनेक पदार्थ आहे , नुसत मॅकडोनाल्डच 1 महिना सतत खाल्ल्ल आणि प्याल तर एक 4 X 3 च टेबल भरून साखर पोटात जाते (संदर्भ :- बिग फॅट मिल डॉक्युमेंट्री)
ज्या दिवशी मला मधुमेह होईल त्यादिवशी माझ्या जगण्यांतला आनंदच संपेल. आमच्या तीन पिढ्यांनी रोज गोड खाल्ले आहे आणि तरीही त्या साखर खाण्याच्या साईड इफेक्ट मधून सगळे सुटलेत.
रंगाशेठचा हा जुना लेख आज परत वाचून आता लवकरात लवकर बासुंदी खाल्ली जाईल, असे मनाशी नक्की केले आहे.
का कुणास ठाऊक, आज अचानक सुरतच्या अस्सल घारी ची आठवण झाली.
प्रतिक्रिया
रंगाकाकाच
का वाचला हा लेख?
आSSSब्ब्ब ....ढ्ढर्र्र्र्र्र्र्र्र्र्र....
स्मिता धन्यवाद!
भारी लेख. नगरचा खवा आणि
इथे अमेरिकेत आल्यापासून एकतर
गोड गोड
वाह काय एकेक आठवणी काढल्यात!!
मजा आली वाचून. गोडाचं विशेष
साखरेचे