Skip to main content

कळावे लोभ असावा..

लेखक अरुण वडुलेकर यांनी शनिवार, 30/05/2009 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी भक्त पुंडलिकापर्यंत, जाण्याची गरज नाही खूप अलिकडच्या काळांतही वडिलांची बूज राखली जाई कोट टोपी अन् बार काड्यांची छत्री यांचाही आदर वाटत होता गावाकडचा 'म्हातारा', शहरांतले 'बाबा' वेदवाक्यासमान त्यांचा शब्द वाटत होता श्रीकाराखालील निमंत्रण पत्रिकेत 'कुलस्वामिनी कृपेंकरून..' इत्यादि नंतर 'वडिलांचे विनंतीस मान देऊन.......' बाकी नांवे छापण्याची कुलिनता होती पुढें निमंत्रणे मोअर प्रॅक्टिकल झाली 'मिस्टर अँड मिसेस इन्व्हाईट कॉर्डियली...इट्सेट्रा, इट्सेट्रा' आटोपशीरपणाने जिव्हाळा बेतला नीड टु नो पॉलिसीचा बोलबाला झाला आता तोही एक इतिहास झाला. ' नितु वेडस् चिंपू ' ; एस्सेमेस आला कुठे ? .......... कधी ?......... कॉलबॅक तुम्ही करायचं आहे, त्यांच्या मोबाईलला इनकमिंग फ्री आहे कुठून कुठे आलो; पहायचीही सवड नाही मात्र...... कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत तरीही !
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2459
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

एक अफलतून कविता!! खूप खूप आवडली!!!!

कुठून कुठे आलो; पहायचीही सवड नाही मात्र...... कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत तरीही ! हे महत्वाचं! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा

अफलतून अफलतून अफलतून ..........सुन्दर........ कुठून कुठे आलो; कुठून गेलो; पहायचीही सवड नाही.....email पहायचीही सवड नाही. "मात्र...... कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत तरीही !" उद्देश आवडला.....

क्या बात है!

वेगळं लिखाण.. मस्तच..

मदनबाण, नक्शत्रा (नक्षत्र्रा ??), हभप, सर्वांना प्रतिक्रियेबद्धल धन्यवाद. मी मे २००९ मध्ये मिपावर प्रसिद्ध केलेल्या या इटुकल्या-पिटुकल्या कवितेचे वाचन इतक्या कालावधीनंतरही वाचन होते आहे आणि त्यावर पसंतीची प्रतिक्रियाही येते आहे हे पाहून मनाचा एक कोपरा हुळहुळला.फार बरं वाटलं. अर्थात्‌ ’मिसळपाव’वर हेही घडू शकतं याचाही खूप आनंद वाटला. मधला कांही काळ हायबरनेशनमध्ये गेला असावा आणि पुन्हा ’डरांव-डरांव करावं,, अशी उचकीही लागलीच. असो. पुन्हा भेटूच, नव्हे भेटावंच लागेल! कळावे लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा. अरुण वडुलेकर