पाककृती सांगा

तिमा's picture
तिमा in पाककृती
30 May 2009 - 2:05 pm

ही पाककृती नसून प्रश्न आहे. तो कुठे विचारायचा हे न कळल्यामुळे इथे विचारत आहे.
कोबीची भाजी घरोघरी करतात. पण आमच्याकडे त्यावर रणें माजली आहेत.
आमच्याकडे जी कोबीची भाजी करतात ती फार स्ट्राँग वाटते. तसेच ती थोडी कडवट ही लागते. ती बहुतेक फोडणी करताना काहीतरी गडबड होते असा माझा समज आहे. पण स्वयंपाक येत नसल्यामुळे मी काय चूक होते ते दाखवू शकत नाही. तरी सुग्रण्/सुग्रणींनी मार्गदर्शन करावे ही विनंती.

प्रतिक्रिया

ही तसा तो खातो. बाकी कोणत्या प्रकारचा कोबी आहे व त्यावर उत्पादक शेतकर्‍याने कोणकोणती औषधे फवारली आहेत ते बघितले पाहिजे.कोबी चिरुन चांगला धुवुन घ्यावा.वाटलेस चिरुन पाण्यामध्ये १५ मिनिटे ठेवा.फरक पडेल.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

यन्ना _रास्कला's picture

30 May 2009 - 7:53 pm | यन्ना _रास्कला

ढवळ्या कोबीएैवजी हिर्वागार कोबी घ्यावा. चव बदलल.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

नितिन थत्ते's picture

30 May 2009 - 7:57 pm | नितिन थत्ते

उन्हाळ्यात कोबीच्या आणि फ्लॉवरच्या भाजीला उग्र वास येतो. उन्हाळ्यात शक्यतो कोबीची भाजी करूच नये.
=))

खराटा
(रंग माझा वेगळा)

पक्या's picture

31 May 2009 - 4:10 am | पक्या

कोबीची भाजी छान लागते. कच्च्या कोबीचे सॅलड तर अप्रतिम.

हळद जास्त होत असेल किंवा मोहरी. हळ्द जास्त झाली तरी भा़जीला कडवट पणा येऊ शकतो.

आमच्याकडे करतात त्या पध्द्तीच्या भाजीत मूठभर भिजवलेली हरभर्‍याची डाळ घालतात. फोडणी मध्ये मोहरी , लसूण ,थोडीशी हळद , १-२ हि. मिरच्या तुकडे करून घालतात. चिरलेली भाजी फोडणीवर घातली की काळा मसाला एक चमचा आणि एक छोटा गुळाचा खडा घालतात...अप्रतिम भा़जी होते. मला अजून तरी कोबीची भा़जी कधी कडवट लागली नाही.

रेवती's picture

31 May 2009 - 4:58 am | रेवती

धन्यवाद पक्याभाऊ!
आता अश्याप्रकारेही भाजी करून बघते.
मलाही कोबीची भाजी मनाजोगी बनवता येत नाही.
कधी त्यात हरभरा डाळ, कधी बटाट्याच्या काचर्‍या तर कधी मटार घालते पण भाजी फसतेच.
माझी काकू जी कोबीची भाजी स्पेश्यालिस्ट आहे आमच्याकडे, ती तर अशी काही सहजपणे करते भाजी की
मी ज्याकाही कसरती करते त्यांची कीव येते. काकू फोडणीत मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता, हि. मिरचीचे तुकडे
एवढेच घालून त्यावर बारीक चिरलेला कोबी घालून बराचवेळ परतत राहते. भाजी शिजली कि चिमूटभर साखर .....एवढेच!
पण मला नाही बुवा जमत!:(
असं म्हणतात की कोबीची भाजी जितकी बारीक चिरता येइल तितकी भाजीची चव खुलत जाते.
काकूला विचारल्यावर रागावून फक्त "शहाणी आहेस, बघ मी कशी करते भाजी आणि तशी कर मला ज्यास्त काही माहित नाही" असं म्हणाली.
तिरशीगरावांनी अगदी दुखर्‍या नसेवर बोट ठेवले म्हणून हा इतका मोठ्ठा प्रतिसाद!

रेवती

विसोबा खेचर's picture

31 May 2009 - 8:54 am | विसोबा खेचर

कधी त्यात हरभरा डाळ, कधी बटाट्याच्या काचर्‍या तर कधी मटार घालते पण भाजी फसतेच.
मी ज्याकाही कसरती करते त्यांची कीव येते.
पण मला नाही बुवा जमत!

तरी रंगाला वारंवार बजावून सांगत होतो की लग्न करू नकोस, फसशील! :)

तिरशीगरावांनी अगदी दुखर्‍या नसेवर बोट ठेवले म्हणून हा इतका मोठ्ठा प्रतिसाद!

तिरशिंगराव हा रंगाचाच दुसरा आयडी तर नव्हे ना? :?

तात्या.

रेवती's picture

3 Jun 2009 - 6:11 pm | रेवती

काहीतरीच काय तात्या!
तिरशिंगराव यांच्याकडे कोबीवरून वाद तरी चाललेत, म्हणजे सुधारणेला वाव दिसतो तरी आहे.
आमच्याकडे कोबी म्हटल्यावर सगळे गप्प बसतात.
आमच्याकडे कोबीची मस्त भाजी बनणं कुणाला नजिकच्या भविष्यात दिसतही नाही. :)
त्यावरून असा निष्कर्ष निघतो की तिरशिंगराव हे रंगराव नव्हेत्....नक्की!

रेवती

विसोबा खेचर's picture

31 May 2009 - 8:49 am | विसोबा खेचर

आमच्याकडे जी कोबीची भाजी करतात ती फार स्ट्राँग वाटते.

थोडीशी साखरेची चिमूट घालून पाहा. त्यामुळे स्ट्राँगपणा मारला जातो..

त्याचप्रमाणे खराट्याशीही सहमत..

आपला,
(बल्लवाचार्य) तात्या.

तिमा's picture

3 Jun 2009 - 6:02 pm | तिमा

सर्वांना प्रतिसादांबद्दल धन्यवाद. ज्याची भाजी केली जाते तोच कोबी, कच्चा खाल्ला तर कडु लागत नाही. कोबी आणताना हिरवागार बघूनच आणला जातो. बहुतेक जास्त हळद हेच कारण असावे. आता या सूचना सौ. ला, ( हेल्मेट घालून) सांगण्याचा प्रयत्न करीन.
मी रंग्या का कोण तो नाही. तात्यारावांनी नोंद घ्यावी.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

परिकथेतील राजकुमार's picture

3 Jun 2009 - 6:16 pm | परिकथेतील राजकुमार

अरे रे हा धागा माझ्या नजरेतुन कसा काय सुटला ? :?

हुह्ह ! एक सुंदर पाककृती द्यायची संधी हुकली.

परा कपुर
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

लिखाळ's picture

3 Jun 2009 - 9:15 pm | लिखाळ

पक्या यांची सुचना छान आहे.

कोबीच्या भाजीत थोडा कांदा घातला तर उग्र वास जातो आणि कोबी झाकण न ठेवता शिजवावा. या दोन ऐकीव सुचना आहेत.
अनुभव घेतलेला नाही.

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)