धूतवस्त्रांकिता

शरदिनी's picture
शरदिनी in जे न देखे रवी...
26 May 2009 - 5:33 pm

निम्नबावरी सुप्तपहाडी कलियुग सडता बोगनवेली
तप्तशहाळी वित्तडहाळी अलगद शीतल भूतलबोली

समतादुस्तर प्रतीकअस्तर प्रीतलावणी दुष्टकापणी
सचिंत अधरी बलाक समरी चपखल बाला मूर्तवारुणी

झाला जोडे आलाप ताना तरुवर प्रस्तर दृष्यआननी
की रोगाची भलती चिन्धी दुर्धर तव परमाणुचाचणी

निरलस अनघड कलाकऋजुता तीव्राषाढा धूसर चोली
प्रत्येकाची कांचनवटवट तीव्रदुधारी तरुवरढोली

मथुरापर्वा चाळणदूर्वा भ्रष्टचिकोडी लोळणफ़ुगडी
गलितगात्र शतसूर्यविहारी वस्त्रवृत्र अवकाशरांगडी

भिन्नशहारी साजणगर्वी तप्तसहाणी उगळचंदनी
धूतवस्त्र उलगडे शरीरी लोभसबाला आरसपानी

२६ मे २००९, पुणे

कविताप्रकटनविचार

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

26 May 2009 - 5:37 pm | श्रावण मोडक

तेच आणि तसेच... आम्ही वाचत राहूच.

धनंजय's picture

26 May 2009 - 10:23 pm | धनंजय

असेच म्हणतो.

परिकथेतील राजकुमार's picture

26 May 2009 - 5:42 pm | परिकथेतील राजकुमार

निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे
शावस घेत्तो मोकले की मी अत्ता निविरुत आहे

परिश
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अवलिया's picture

26 May 2009 - 5:55 pm | अवलिया

तुम्ही लिहित रहा आम्ही वाचुन समजुन घेण्याचा प्रयत्न करत राहु :)

--अवलिया

भडकमकर मास्तर's picture

26 May 2009 - 5:57 pm | भडकमकर मास्तर

शेवटची ओळ कळाली...


_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 May 2009 - 6:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

शेवटच्या कडव्याचा मला जो अर्थ कळला, त्याप्रमाणे तुम्ही एकदम योग्य चित्र टाकलंत हो मास्तर!

त्यातून उद्या कोणी दुसरी कंगनाच्या जागी मधुबालेचं काम करायला तयार झाली तरी तीसुद्धा कशी कुरूप आहे, अश्लीलपणा करत कमी कपडे घालते हे वाचायची तयारी आहे! यातली कोणी नटी मिपा वाचत असेल तर खरंच चित्रपटसंन्यासही घेईल!

शरदीनीताई, तुमची कविता समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे. दुसर्‍या कवितेच्या धाग्यात श्रावण मोडकांनी लिहिल्याप्रमाणे समजतंय असं वाटतं तोच निसटतं सगळं डोक्यातून! पण तरीही बुद्धीला च्यालेंज म्हणून आता निश्चयाने तुमच्या कविता समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

अनंता's picture

26 May 2009 - 6:12 pm | अनंता

नाही झेपले हो माझ्या बालबुद्धीला!
मराठी साहित्यातले मला फार समजते, हा गैरसमज आता दूर झाला.
कृपा करुन आता क्लाससाठी नको, माससाठी लिहा हो.

अवांतर : तुमच्या कविता मी माझ्या खरडवहीवर डकवू शकतो का?

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

निखिल देशपांडे's picture

26 May 2009 - 6:06 pm | निखिल देशपांडे

तुम्ही लिहित रहा आम्ही वाचुन समजुन घेण्याचा प्रयत्न करत राहु

==निखिल

ऋषिकेश's picture

26 May 2009 - 6:12 pm | ऋषिकेश

पहिली कविता आणि हि यात काय फरक आहे हे शोधतोय!
दोन्हि नादमय आहेत .. मात्र दोन्हिचे अर्थ कळलेले नाहित

रामदासजी, मुक्तराव आता तुम्ही ट्राय करून बघा अथ्र लागतोय का ते हि विनंती

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

लिखाळ's picture

26 May 2009 - 6:16 pm | लिखाळ

मस्त :)

आपल्या कवितेतला ठेका आणि त्यातले काही शब्द ऐकून मला जावेद अख्तर यांची तर्कश या नावाची ध्वनिमुद्रिका आहे तीची आठवण झाली.

जिस्म दमकता, जूल्फ घनेरी, रंगी लब आँखे जादू
संग-ए-मरमर, ऊंदा बादल, सुर्ख शफक, हैंरा आँहू

तुमसे दूरी, ये मजबूरी, जख्म-ए-कारी, बेदारी
तनहा रातें, सपने कातें, खुदसे बातें, मेरी खू

अश्या शेरांचा ठेका आठवला :)

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

लवंगी's picture

27 May 2009 - 6:21 am | लवंगी

तुमची मागची कविता आवडलेली म्हणुन अगदी मनापासुन प्रयत्न केला काही कळतय का हे पहायचा.. काहि शब्द तर ऐकलेलेच नाहीत..

देशपांडे१'s picture

26 May 2009 - 6:59 pm | देशपांडे१

अप्रतिम रचना , अवर्णनीय काव्य सौंदर्य ...

अनेक शुभेच्छा
सन्मय देशपांडे

चन्द्रशेखर गोखले's picture

26 May 2009 - 8:05 pm | चन्द्रशेखर गोखले

आपली कविता समजून घेण्याचा प्रयत्न मी अजिबात करणार नाही, नाहीतर माझ्या कविता लिहायच्या मी विसरून जाईन . पण कविता मात्र नक्की वाचेन कारण आपले शब्द सामर्थ्य अफाट आहे!!

प्राजु's picture

26 May 2009 - 8:20 pm | प्राजु

रामदास , मुसुराव यांच्यापेक्षा धनंजय यांनीच या कवितेचे रसग्रहण करावे. त्यांनाच ते जमते. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

घाटावरचे भट's picture

27 May 2009 - 2:46 am | घाटावरचे भट

पुन्हा तेच, इथेही तबल्याचे / तराण्याचे बोल किंवा काहीही चाललं असतं...
उदा.

तागेन्ना धित्ता किटतक गदिगन, धा धा तिरकिट कत् ता धिन्ना
धागेना धिनक धिन्, तागेना तिनक तिन्, ता तिरकिट तिन्, ना धिन् धिन् ना |

(काय भारी लय साधली आहे नै??? ~X( ~X( ~X( )

अभिजीत's picture

27 May 2009 - 6:08 am | अभिजीत

आकाशात कडाडणार्‍या विजेची विविध रुपे (स्तुती, आरती???) रंगवली आहेत असं वाटतंय...

जयवी's picture

29 May 2009 - 2:15 pm | जयवी

ए कसल्या लयबद्ध कविता लिहितेस गं !!
पण गुणगुणायला पण भारी आहे. अर्थ तर अजिबातच कळला नाही.
पण वाचाविशी मात्र वाटते. खरंच अफाट शब्दसामर्थ्य आहे तुझं....!!

इनोबा म्हणे's picture

29 May 2009 - 2:33 pm | इनोबा म्हणे

अगदी धोबीपछाड कविता...

विसोबा खेचर's picture

29 May 2009 - 5:12 pm | विसोबा खेचर

जबरा कविता..!

ही अशीच आपली थाप मारली बर्र का! कविता जाम कळली नाही! :)

तात्या.

मराठमोळा's picture

29 May 2009 - 6:12 pm | मराठमोळा

कविता (?) १% सुद्धा कविता कळली नाही.
कवितेतील शब्द मराठी भाषेत खरच अस्तित्वात आहेत की कवियित्रीला नवे शब्द बनवण्याचा छंद आहे? कृपया खुलासा करावा..

असे बरेच शब्द बनविता येतील.
लुप्तडहाळी, मित्रटवाळी, काव्यसहाणी, जप्तशहाळी , कवितादुस्तर, लेखनप्रस्तर, लांछनवटवट, गाळणफुगडी, भिन्नप्रहारी
असे काही तरी...

(अरे वा जमतय की..मी पण अशी एक कविता लिहावी काय? ;) )

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!