चंपी
श्वान कुत्तरा निखळ जात ही भुंके सदानकदा
भुकेचे उसासे केकाटून गेले हाडूक जिव्हारी लागून मेले
रस्त्यातूनी जाताजाता काय मनाला हरखून गेले
लडबडत्या पुच्छा मागे मित्र करिती भाद्रपद चाळे..
भुंकून भुंकून दातपिसून गुरगुराटी स्वरनक्षी केली
हिंस्त्र ठसे चाव्यांचे युद्धाचे क्षण वागवती झाली
कुत्री म्हणॉनी हिणवी कोणी दगड मारी पेकाटी
जीणे जगणे लाजीरवाणे ; संसार मांडते रस्तोरस्ती
निळ्याजांभळ्या जिभा काढते हातभर पाहून पाव बिस्कुटी
रस्त्यातच फिरेन रस्त्यातच मिटेन एका चाकाखाली
क्षणी एका होत्याची नव्हती होईन ; शांत आकांत होईल
हडुत हुडूत मधुनी सुटेन मी धाकटी चंपी
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1963
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
-१
विजुभाउ हल्ली लिहित नाहीत