कोण म्हणाले हे तुजला ; ऐसे मी करणार नाही
खोट्या शपथाना या पुढे अजिबात बधणार नाही
दिल्या घेतल्याशिवाय होतात व्यवहार हे मी सांगणार नाही
दिल्या घेतल्या शिवाय व्यवहार अजिबात मी करणार नाही
प्रतीज्ञेत " भावंड्"म्हणेन; आप-पर मानणार नाही
स्वार्थ माझा येता समोरी ; आप-पर जाणणार नाही
"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" हे मिथ्य मांडणार नाही
"दिल्या घेतल्याने होत आहे आधी दिलेघेतलेची पाहिजे: हे सत्य सोडणार नाही
जमवेन जरी नाठाळांची गर्दी ;नाठाळ मी ठरणार नाही
तालावरी नाचेन त्यांच्या मग विरोधच उरणार नाही
लाचार जरी कोणी म्हणेल ; लाज मला वाटणार नाही
लाचारीमुळेच मिळे मलीदा ;सत्य त्यांस सांगणार नाही
बोलेन त्या शब्दास जागेन ; ऐसे मी करणार नाही
शब्द असती फुगे हवेचे सांगण्यास कचरणार नाही
करीता कोणी विरोध मजला ; मी त्यास डरणार नाही
हातपाय तोडेन ऐसे; चालता तो उरणार नाही
तुला तोडले ते फौज माझी ;हे जाहीर सांगणार नाही
तुझ्या सांत्वना मेळावे भरविण्या मागे मी रहाणार नाही
नेतेपद हे तत्व माझे ; बाणा हा सोडणार नाही
लक्ष वेळा वाकेन परी ;कणा हा मोडणार नाही
लक्ष तडजोडी करेन ; सत्तेस मी मुकणार नाही
अढळपद मिळो देवा ; प्रार्थना कधी चुकणार नाही
..................विजुभाऊ सातारवी
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1632
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त !
+१
In reply to मस्त ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जोरदार!
पोल्टिक्स
सर्वाना