Skip to main content

खेळ मनाचा

लेखक जयवी यांनी रविवार, 17/05/2009 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी मन.... एक नाचरा मोर फुलवतं पिसारा इंद्रधनुषी, होऊन भावविभोर जगलेले काही क्षण... काही आठवणी विलक्षण... येतात उचंबळून वर आणि देऊन जातात असीम सुख अगदी तस्सेच .....पुन्हा एकदा ! त्या सरींचा कोसळ आणतो शहारा नवा नवी हुरहुर, नवी थरथर गंधही नवा नवा ! कधी हेच मन झाकोळतं होतं हताश....निराश गढूळ बुडबुडे आठवणींचे करतात नकोसे सारे पाश. सारं काही गडद काळं दीनवाणं....उदास उदास गुदमरलेला जीव..... अन्‌ सारं काही भकास ! खेळ सारा मनाचा डाव कधी जिंकलेला कधी दुबळ्या हातांनी स्वत:च घालवलेला. हसरा, नाचरा मोर की खिन्न काळोख... असतं आपल्यालाच ठरवायचं मनाला ताब्यात ठेवून जिंकायचं की हरायचं. जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2671
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

हसरा, नाचरा मोर की खिन्न काळोख... असतं आपल्यालाच ठरवायचं मनाला ताब्यात ठेवून जिंकायचं की हरायचं. क्या बात है! तात्या.

सुंदर मुक्तक. :) खेळ सारा मनाचा कधीच न-उमगणारा वेग मात्र असावा याचा कुणालाच न-मोजता येणारा... मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

ही मनाला दिलेली उपमा फार आवडली. मोर हसरा नाचरा असला तरी काळजांत एक वेदना घेऊनच हासत नाचत असतो. (निदान अशी एक कविकल्पना आहे) जियो.

खेळ सारा मनाचा डाव कधी जिंकलेला कधी दुबळ्या हातांनी स्वत:च घालवलेला. सुरेखच पंखांना क्षितीज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे आभाळ असते.

In reply to by स्वप्नयोगी

खेळ सारा मनाचा डाव कधी जिंकलेला कधी दुबळ्या हातांनी स्वत:च घालवलेला. मलाबी त्याच ओली आवड्ल्या */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

सुंदर, जयवी सुंदर!!! "मन एव मनुषः" म्हणतात ते काही खोटं नाही..... कविता आवडली... (अवांतरः आमच्याकडून एखाद्या कवितेला 'आवडली' हा प्रतिसाद मिळणं हे एखाद्या शाकाहारी जैनाने मटण "आवडलं" म्हणण्याइतकंच दुर्मिळ आहे!!:))

अप्रतिम कविता! :) क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***