कधी कधी मन.... एक नाचरा मोर
फुलवतं पिसारा इंद्रधनुषी, होऊन भावविभोर
जगलेले काही क्षण...
काही आठवणी विलक्षण...
येतात उचंबळून वर
आणि देऊन जातात असीम सुख
अगदी तस्सेच .....पुन्हा एकदा !
त्या सरींचा कोसळ
आणतो शहारा नवा
नवी हुरहुर, नवी थरथर
गंधही नवा नवा !
कधी हेच मन झाकोळतं
होतं हताश....निराश
गढूळ बुडबुडे आठवणींचे
करतात नकोसे सारे पाश.
सारं काही गडद काळं
दीनवाणं....उदास उदास
गुदमरलेला जीव.....
अन् सारं काही भकास !
खेळ सारा मनाचा
डाव कधी जिंकलेला
कधी दुबळ्या हातांनी
स्वत:च घालवलेला.
हसरा, नाचरा मोर
की खिन्न काळोख...
असतं आपल्यालाच ठरवायचं
मनाला ताब्यात ठेवून
जिंकायचं की हरायचं.
जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2671
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
हसरा,
सुंदर
हसरा नाचरा मोर..
सुंदर कविता
+१
In reply to सुंदर कविता by स्वप्नयोगी
मनाच्या
सुंदर,
आवडली..थोडीशी या
अप्रतिम!
शुक्रिया