✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आलो होतो ! (स्फुटिका)

ल — लिखाळ, Tue, 04/21/2009 - 21:15

प्रतिक्रिया द्या
2597 वाचन

💬 प्रतिसाद (15)

पचका

शितल
Tue, 04/21/2009 - 21:18 नवीन
केला. =))
  • Log in or register to post comments

समीक्षा!

चतुरंग
Tue, 04/21/2009 - 21:33 नवीन
वा काय फाउंड आहे! (खरं तर त्या मुलीनं काळा विनोद केल्याने ह्याला 'ग्रे हाउंड' असं म्हणणं जास्त योग्य आहे असं माझं वैयक्तिक मत! ;) ) अर्थात हा काळा विनोद होता की मुलीकडून अजाणतेपणाने घडलेली चू़क ह्याबद्दल कोणतीही वाच्यता न करता कवीने तो विचार वाचकांवरच सोपवलाय. मुलीच्या हाकेला ओ देऊन कोणी प्रेमिक तिच्याकडे लगोलग जातो आणि ती नाही असे पाहून तो खट्टू होतो पण तरीही तिला चिठ्ठी लिहून ठेवण्याचा मोठेपणा तो दाखवतोय वा वा केवढ्या मोठ्या मनाचे लक्षण आहे. प्रेमात समर्पण भाव असावा तर असा. जर्मनीत नुकत्याच सुरु झालेल्या वसंतऋतूने लिखाळांच्या काव्य प्रतिभेला नव्याने फुटलेल्या ह्या फाउंडच्या अंकुरातून अनेकानेक कवने प्रसवोत अश्या शुभेच्छा मी त्यांना देतोय! (नमूद करावेसे वाटलेले - अशा प्रकारच्या फाउंडला जालिंदर महाशयांनी सुरुवात केलेली नव्हती असे मला पक्के आठवते आहे. अधिक माहितीसाठी भडकमकर मास्तरांच्या 'फाउंड, हाउंड आणि उंडारलेल्या कविता' ह्या काव्यसंग्रहाची दीर्घ प्रस्तावना वाचावी! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

वाव्वा!

बेसनलाडू
Tue, 04/21/2009 - 22:25 नवीन
रंगासेठ, आज एकदम श्टेपाउट् होऊन?! (पंच)बेसनलाडू लिखाळशेठ, फाउन्ड कविता आवडली. रंगाशेठच्या समीक्षेने चार चाँद लागले ;) (अन् फाउन्ड्)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

वाहवा असे

लिखाळ
Sat, 04/25/2009 - 23:23 नवीन
वाहवा असे रसग्रहण पाहून आनंद झाला. फाउंड हाउंड आणि उंडारलेल्या कविता हा संग्रह वाचला नाही. आता वाचेन म्हणतो :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

दुपारी

उमेश कोठीकर
Tue, 04/21/2009 - 22:44 नवीन
दुपारी घरी कोणी नसेल नक्की ये! म्हणालीस. आलो होतो;उशीर झाला. दुसर्‍याच मुलासोबत होतीस! काय हे?
  • Log in or register to post comments

वा वा!

llपुण्याचे पेशवेll
Wed, 04/22/2009 - 07:15 नवीन
वा वा! लिखाळशेठ सुंदर कविता... :) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

एकदम

विनायक प्रभू
Wed, 04/22/2009 - 07:16 नवीन
छान फाउंड. मी फुल्टू मधे ग्राउंड
  • Log in or register to post comments

शक्यता...

भडकमकर मास्तर
Wed, 04/22/2009 - 07:48 नवीन
फार छान कविता... इतक्या कमी ओळीत सामाजिक आशय व्यक्त करणे लिखाळभाऊंच्या समर्थ लेखणीलाच शक्य आहे. या सशक्त कवितेचे सामाजिक परिमाण दर्शवणार्‍या काही शक्यता सुचल्या. _____________ १.मुलीने मुलाचा पचका इ.इ. करण्यासाठी असे केले आहे आणि मुलाची एकांत-भेटीची ओढ अजमावून पाहण्यासाठी ती असे करत आहे किंवा २.तिलाही या मुलाला भेटण्याची तितकीच ओढ आहे परंतु ऐन वेळी अदिस अबाबाचे काका काकू आले आणि त्यांच्याबरोबर तुळशीबागेत किंवा लक्ष्मी रोडवर खरेदीला जायची बाबांची आज्ञा झाली ( बाबांनी फोनवरून आज्ञा केली.)... किंवा चिंचपोकळीची आजी आली आणि तिला भाजीराम मंदिरातल्या कीर्तनाला घेऊन जावं लागलं; तिने हे टाळण्याचा खूप प्रयत्न केला पण हाय रे दैवा, ते शक्य नाही झाले..... गमतीची गोष्ट अशी की ही फाउंड कविता वाचून समस्त नागरिकांना ( मुलगा कविमनाचा ..चांगला) आणि मुलीने थट्टेखोर पणाने मुलाची प्रतारणा केली आहे, असेच वाटत आहे.... यात स्त्रियाही खूप..... यावरून आजकाल स्त्रियांचाही स्त्रियांवरचा विश्वास उडत चालला आहे , हे जालिंदरजींचे ( तेव्हा वादग्रस्त ठरलेले )वाक्य आजच्या समाजासाठी किती चपखलपणे लागू पडते हे दिसून येते. ____________________________________-- ही चिठ्ठी मुलीच्या खिडकीबाहेर कशी काय पडलेली होती...?अजून एक प्रश्न. ... ती चिठ्ठी दाराबाहेरच पडलेली असायला हवी होती. किंवा तो मुलगा नेहमी खिडकीतून आत प्रवेश करत असावा, तिथे त्याला ही चिठ्ठी मिळाली आणि त्याने वैतागून ती तिथेच फेकली असावी. किंवा पुढच्या एकांतातल्या भेटीत त्याने तिला ही चिठ्ठी दाखवून जाब विचारला आणि तिने "जाउदेत रे" असे खिदळत म्हणत आपले चांदण्यांचे हात त्याच्या गळ्यात टाकत ती चिठ्ठी खिडकीबाहेर फेकून दिली. ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

नतमस्तक

दशानन
Wed, 04/22/2009 - 07:53 नवीन
नतमस्तक तुम्हा सर्वांच्या समोर ! माझा साष्टांग नमस्कार घ्यावा व मला आपला शिष्य बणवावा ही विनंती ;) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

हा हा हा ..

लिखाळ
Sat, 04/25/2009 - 23:25 नवीन
हा हा हा .. लै भारी.. मस्तच :) खिडकीबाहेर चिट्ठी असण्याचे कारण चांगले शोधले आहे ;) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

सह्ही

विसोबा खेचर
Wed, 04/22/2009 - 09:40 नवीन
सह्ही कविता भिडू...! 'आलो होतो' वरून 'हासत मी, काही श्वासांसाठी फक्त!' हे शब्द सहजच आठवले! तात्या.
  • Log in or register to post comments

मस्तचं...

मदनबाण
Wed, 04/22/2009 - 09:46 नवीन
मस्तचं... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

खि: खि: खि:..

राघव
Wed, 04/22/2009 - 10:25 नवीन
मस्त कविता! :D त्यात चतुरंगांनी भर टाकली आहेच!! राघव
  • Log in or register to post comments

:)

ऋषिकेश
Wed, 04/22/2009 - 13:46 नवीन
कविता आणि दोन्हि समिक्षा आवडल्या :)) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

प्रतिसाद,

लिखाळ
Sat, 04/25/2009 - 23:26 नवीन
प्रतिसाद, रसग्रहण आणि समिक्षेबद्दल सर्वांचे आभार :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा