सनई-चौघडे हा चित्रपट अद्याप मी पाहिलेला नाही पण तुम्हाला जे म्हणायचे आहे ते लेखामधुन कळत आहे.
आपण ज्या बेसीक्सवर जगतो ते योग्य आहे की नाही हेच कळत नाही. मग काही छोटया मोठया प्रश्नातून हे मोठे प्रश्न वारंवार पुढे येत राहतात. आणि समाज द्विधा अवस्थेत सापडतो. अशा वेळी या चौकटींची पुर्नबांधणी करणे गरजेचे असते. आणि त्यासाठी हे कलाक्षेत्र कामास येते.
समाजाच्या चौकटी बदलण्यास कलाक्षेत्र किती कामास येते याबद्दल मी जरा साशंक आहे. असो..
माझ्या मते कोणत्याही समाजाची, देशाची अथवा ठराविक भागाची संस्कृती ही तिथल्या भौगोलिक जडण्-घडण, खाणं-पिणं आणी इतिहास यावर अवलंबुन असते. प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचा फार अभिमान असतो आणी तिच्यात बदल करणे फारसे कुणाला आवडत नाही. उदा. तुम्हाला एखादी गोष्ट योग्य वाटते ती तुमच्या पालकांना पुर्णपणे अयोग्य वाटते आणी तुमच्या मुलांना तुमची तत्वे कदाचित पटणार नाहीत. दुसरी गोष्ट अशी की माझी संस्कृतीच सर्वात चांगली आहे आणी दुसर्याची वाईट (Ethnocentric) अशी एक भावना प्रत्येकाच्या मनात असते. (उदा. च्यायला साऊथ ईंडियाचे लोकं काय मुर्ख आहेत, दोन्ही वेळेस भातच खातात असे आपल्याला वाटणे, तसेच रस्त्यावर चुंबन घेणे आपल्याकडे योग्य समजले जात नाही तर काही पाश्चात्य संस्कृतीत त्यास कोणताही आक्षेप नाही). तसेच संस्कृतीच्या बांधणी मागे काही वैज्ञानिक कारणे आहेत की नाहीत हे तपासले पाहिजे. (बर्याचशा गोष्टी लोप पावलेल्या आहेत.)
आजकाल जागतिकिकरणाच्या नावाखाली पाश्चात्य संस्कृतीचे अवलंबन केले जाते. या गोष्टी चांगल्या किवा वाईट ते काळच ठरवेल.
पण काही गोष्टी आपल्या हातात आहेत हे नक्कीच खरे आहे. जसे एखाद्या पाश्चात्य संस्कृतीचा भाग आपलासा करताना तो आपणास योग्य तो फायदा देइल (दुसर्याना त्रास न होता) की नाही हे तपासायला पाहिजे. बदल हे होतात आणी होणारच पण ते आपण आत्मसात करायचे का नाही हे आपणच ठरवायचे असते. समाजाची सुरुवात आपल्यापसुनच होत असते.
उदा. ईंग्रजी भाषेत एक प्रकारचा सभ्यपणा आहे. जसे छोट्या चुकीवर सुद्धा खेद प्रकट करणे. दुसर्याची माफी/परवानगी मागणे. या गोष्टी मला आवडतात. (I am sorry, please, excuse me, thank you, pardon या शब्दांचा योग्य ठिकाणी आणी वारंवार वापर).
टीपः विषयांतर झाले असेल तर क्षमस्व.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
प्रतिक्रिया
सनई-चौघडे