Skip to main content

शब्द

लेखक जागु यांनी शुक्रवार, 03/04/2009 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
वाटते तुझ्यावर काही लिहावे मनातील भावनांना कागदावर निरखावे न्याहाळताना तुला, तंद्रित जावे सहवासी तुझ्या वाहवून यावे. शब्द शब्दांना जुळवून घ्यावे सुगंधी रचनी तुला हुंगावे शाईतून तुझे प्रेम पाझरावे. मखमली लालीत तुला पसरावे. वाचताना तुज ओठ हसावे डोळ्यांतून भाव पाझरावे दाखवताना तुज हे शब्द तुझ्या ओठचा शब्द व्हावे.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1848
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

वाचताना तुज ओठ हसावे डोळ्यांतून भाव पाझरावे दाखवताना तुज हे शब्द तुझ्या ओठचा शब्द व्हावे. खुपच सुंदर! - सँडी नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते.

कविता आवडली. :) वाचताना तुज ओठ हसावे डोळ्यांतून भाव पाझरावे दाखवताना तुज हे शब्द तुझ्या ओठचा शब्द व्हावे. हे मस्त :)

सँडी, प्राजू शितल. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

सुन्दर कविता. तुझ्या ओठचा शब्द व्हावे, वा! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}