गे आई!
नको वध करू माझा तुझ्याच या चिमण्या जीवाचा
आकांत तुझ्याच उदरी तुला पाहवेल का ग माझा?
मातृत्व तुझे मिळावे म्हणूनी मी देवाकडे हट्ट धरिला
जन्मत:च माझा मृत्यूदिन तू का ग ठरविला?
मुलगी म्हणूनी दु:स्वास का ग? शेवटी मी तुझीच ना?
भीतीने वधाच्या बिलगून उदरी तुझ्या लपले ना!
जरी मुलगी मी जन्मानंतर आयुष्य वेचेन तुझ्यासाठी आई
दादासारखीच मलाही ऐकव ना गोड अंगाई!
ते बघ घेउन येत आहेत डॉक्टर काका ती करवत
भीती वाटते ग मला स्वर माझा अजुनही अस्फुट
माहित्येय मला तू पोटात किती प्रेमाने गं जपले
पाहवेल का तुला होतांना माझ्या बाळतनूची शकले?
मलाही वाटते ग आई या सुंदर जगी जन्म घ्यावा
फक्त तुझ्या सुखासाठी क्षण प्रत्येक कृतार्थ व्हावा
नको संपवू अस्तित्व माझे जन्मतःच मुलगी म्हणून ग!
कोमल पाकळीसम काया माझी होईल रक्तलांछित ग!
तूच म्हटली होती गोड माझी परी ये ना लवकर
आई! आई! वाचव मला तो बघ हात यमाचा निष्ठुर!
बाबांना बोलाव ना गं आई करेल मी त्यांना विनंती
वधू नका मला बाबा घ्या हो मला कडेवरती!
खूप बोलूनी आई थकले गं झोप मला येत आहे
बोट तुझे चिमुकल्या बाळमुठीत धरीले घट्ट आहे
आई बाबा दादा नमस्कार करते तुम्हा शेवटच्या क्षणी
पण.....................................
आई म्हणूनी फक्त तुझी कूस लाभो मला पुढच्या जन्मी!
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4965
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्वितेचा
क्वितेचा
In reply to क्वितेचा by अविनाशकुलकर्णी
आयचा घो ... .
In reply to क्वितेचा by चन्द्रशेखर गोखले
अविनाश
In reply to क्वितेचा by अविनाशकुलकर्णी
ठ्ठ्यॉ...!
In reply to अविनाश by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद्.म
In reply to ठ्ठ्यॉ...! by प्राजु
छान लिहिले
छान संदेश
कविता
कविता
हेच