"पैज"
लेखनप्रकार
आयुष्यात एकदाही एखादी ही "पैज" लावली नसेल असा मनुष्य प्राणी शोधुनही सापडणार नाही.
काय म्हणता? पटलं नाही? अहो खरंय हे, लावता का पैज ?
तर अशा पैजा लावण्यात काही लोक पटाईत असतात, कोणी जिंकण्यात सातत्य दाखवतात तर कोणी हरण्यात पीएचडी करतात. पण खोड काही जात नाही.
लहानपणी आम्ही मुलं खेळून झाल्यावर एका कट्यावर बसत असू जिथून ३-४ रस्ते जाताना दिसत असत. बरीच माणसं चालत, गाडीवरून वगैरे जाताना दिसायची. मग तो / ती कोणत्या रस्त्याकडे वळेल यावरून आमच्यात पैजा लागायच्या. परीक्षा आली की, "पेपर मध्ये हा प्रश्न येईलच बघ, लावतेस पैज?" किंवा वर्गात ह्या वर्षी कोण प्रथम क्रमांक पटकावते/तो ह्यावर पण पैज लागली जायची. काही मुलांची तर वर्गात दिवस भरात कोणाकडूनही शिक्षा न मिळण्याची पैज लागायची बिचार्यांची पैज पाहून आम्हाला हसू येत असे, आणि आम्ही हसल्यावर आमच्याकडे पाहिल्यामुळे बिचारे पैज हमखास हरत.
त्यावेळी पैज कशाची लावली जायची तर चॉकलेट, पेरू,पेन, पेन्सिल, रबर ह्यांची!!! त्यावेळी तेवढीच औकात होती.
पुढे कॉलेज मध्ये गेल्यावर जरा विचित्र पैजा लावायला लागलो, कोण फास्ट खाते, जास्तीतजास्त खाण्याची, पिण्याची, स्कुटी, बाईक चालविण्याची, फुगे फुगविण्याची अशा अनेक.
एकदा रस्त्यावरून सगळा ग्रुप प्रॅक्टीकल संपवुन चालला होता, मध्ये कोणाला लहर आली काय माहित जो सर्वात जलद चालेल आणि एका ठराविक ठिकाणी पोचेल त्याला "खाईल तितके, जे हवे ते" अशी पैज लागली आणि आमच्या ग्रुप मधली ३-४ मुले गर्दीच्या रस्त्यावर अश्शी भराभरा चालायला लागली आणि त्यांच्या मागे आम्ही मुली निवांत हसत हसत त्यांची गंमत पहात चालत होतो, चालण्याच्या पैजेत मात्र आम्ही मुली शक्यतो भाग घेत नसू.
आमच्या ग्रुपमध्ये आम्ही मैत्रिणींनी आमच्या वर्गातील एका मुलीच्या आणि तिच्या बॉयफ्रेन्डच्या लग्नाबद्दल पैज लावली होती, ती मुलगी खूपच सुंदर होती, आणि त्याच्या विरूध्द तिचा मित्र, आम्हाला वाटले त्यांचे लग्न काही होत नाही पण गुपमधली मुले म्हणाली बघ कॉलेज संपायच्या आधी ते लग्न करतात की नाही आणि तसेच झाले, आम्ही मुली ती पैज हरलो.
काही कपल मध्ये पैज लावून भांडण लावायचो आणि पैज जिंकली की मग त्या कपल मध्ये जाऊन मांडवली करायचो. असे ग्रुप मध्येही करत असू.
कॉलेज मधुन बाहेर पडलो, पुढील शिक्षण, लग्न, नोकरी असे करत ग्रुप मधले एकमेकांपासुन दूर गेले, पैजा लागणे कमी झाले, परंतु पुन्हा नविन ग्रुप जमला आणी परत पैज लावण्यात मजा वाटु लागली पण ह्या पैजे मध्ये खेचाखेची नसायची, आणी पैज हरली तरी पहिल्यासारखे वाईट वाटायचे नाही.
लग्ना नंतर नवर्याबरोबर अनेक गोष्टी पैज लावून वसूल केल्या, मग नवराही हुशार झाला. आज जेवण काही न जाळता, करपता, खाण्यालायक तू बनवू शकलीस तर तू सांगशील त्या हॉटेल मध्ये किंवा आठवडाभर नेहमी रात्री जेवून झाल्यावर मस्तानी देईन. पण त्याने पैज जिंकली तरी त्याला हॉटेल मध्ये नेण्याशिवाय पर्याय नाही हे त्याला समजल्या पासून पदार्थ बनवायच्या बद्दलच्या पैजा बंद झाल्या. लग्ना नंतर काही वर्षानी पहिला मुलगा होईल की मुलगी ह्यावर लागलेली पैज हरल्या पासुन नवर्याने माझ्या बरोबर पैज लावणे कमी केले आहे.
पण पैज लावण्यात एक मजा असते की नाही हो? तुम्हीही नक्कीच काही पैजा लावल्या असतील. तर आम्हालाही सांगा तुमच्या "पैज" बद्दलचे काही किस्से. ऐकायला नक्की आवडेल.
वाचने
7097
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
लावतेस पैज?
In reply to लावतेस पैज? by बिपिन कार्यकर्ते
(विषय दिलेला नाही)
हे माहिती नव्हतं
पैज!
In reply to पैज! by चतुरंग
सध्या
पैज लावणे
>>आज
मस्त..
पुण्यात वैशालीच्या बाहेरचा किस्सा!
In reply to पुण्यात वैशालीच्या बाहेरचा किस्सा! by चतुरंग
हाहाहा... भन्नाट एकदम!!
In reply to हाहाहा... भन्नाट एकदम!! by प्राजु
+१
In reply to +१ by शितल
भन्नाट !!!
In reply to पुण्यात वैशालीच्या बाहेरचा किस्सा! by चतुरंग
च्यायला!!!
In reply to पुण्यात वैशालीच्या बाहेरचा किस्सा! by चतुरंग
त्यादिवशी
सह्ही
हहपुवा..
In reply to हहपुवा.. by योगी९००
+१
पैजा
उत्तर मिळेल काय?
In reply to उत्तर मिळेल काय? by चित्रा
मी ही
In reply to उत्तर मिळेल काय? by चित्रा
बाठ
In reply to बाठ by सहज
हो.. कैरीची
In reply to हो.. कैरीची by प्राजु
आमच्याकडे
आंद्याचीआंब्याची बाठ! (पहा कसा अनुप्रास पण होतो, कैरीची कोय, आंब्याची बाठ!) लिहीताना आंबाच लिहायचं होतं, पण चुकून आंद्या लिहिलं गेलं; मग त्याला चिडवायची अंमळ संधी घेतली! अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.In reply to आमच्याकडे by ३_१४ विक्षिप्त अदिती
पैज
In reply to उत्तर मिळेल काय? by चित्रा
तुम्ही कोय म्हणा किंवा बाठ म्हणा
आवडला
सही
:)
झक्कास
जबरी !!
आमचा एक किरण .......
झकास !
सहमत...
धन्यवाद !
आज मी लेट करंट!
मुलांची टेर खेचण्याची पैज !!
शीतल मॅडम,
कारण?
In reply to कारण? by विसोबा खेचर
खाजवू खरूज कशाला??
In reply to खाजवू खरूज कशाला?? by प्राजु
तात्या!!!
मस्तच