✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(झुल्यावरची छावी)

स
सुनील यांनी
Wed, 03/18/2009 - 14:50  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9219 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

फोटो झुला

अवलिया
Wed, 03/18/2009 - 14:52 नवीन
फोटो झुला मागे जातांनाच्या ऐवजी पुढे येतांना घेतला असता, तर अजुन डिटेलिंग झाले असते. (वैयक्तिक मत) संपादक कात्री चालवु शकतात. :) --अवलिया
  • Log in or register to post comments

निर्णय

विनायक प्रभू
Wed, 03/18/2009 - 16:00 नवीन
बा़की झुला पुढे येतो आहे का मागे ह्या निर्णयाला कसे आलात हे कळाले तर बरे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

का भौ..

chipatakhdumdum
Wed, 03/18/2009 - 21:31 नवीन
त्यान्च माहीत नाही, पण जरा चित्र नीट बघितल तर कळत की मुलीचे केस पाठून पुढे असे फुललेले आहेत. म्हणजे झुला पाठी जातो आहे.........................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

राहील..

chipatakhdumdum
Wed, 03/18/2009 - 21:36 नवीन
झगा सुद्धा बघा. पाठूनच फुललेला आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chipatakhdumdum

बापरे

नरेश_
गुरुवार, 03/19/2009 - 13:17 नवीन
काय अफाट निरीक्षणशक्ती आहे ;-) सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chipatakhdumdum

एक नंबर !!

आनंदयात्री
Wed, 03/18/2009 - 14:56 नवीन
एक नंबर लॉजिकल !! मस्त !! (आता तुमची कॉपी करुन अजुन ५-१० बोळा तुंबलेली विडंबने नाही पडली म्हणजे मिळवले)
  • Log in or register to post comments

निव्वळ ह.घ्या

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 03/18/2009 - 14:58 नवीन
  • अय्या, तिच्या केसांतल्या निळ्या बटा किती छान दिसत आहेत ना?
  • मुलगी घाबरल्यासारखी वाटते याचा अर्थ:
    1. झुला खूप जोरात झुलत असणार, पण तो वेग त्या झुल्याच्या रेखाटनात दिसत नाही आहे, तेव्हा ही शक्यता बाद.
    2. कोणी हिंस्त्र प्राणी (उदा. झुरळ, पाल, उंदीर इ.) जर जमीनीवर उभा असेल तर मात्र मुलगी घाबरू शकते.
  • मुलीचा ड्रेस सगळ्या बाजूंना उडत आहे पण केस फक्त एकाच बाजूला हे काही पटत नाही.
  • शिवाय ड्रेसची रंगसंगती आवडली नाही. आणि काळं लिप्स्टीकही भावलं नाही.
  • मुलीच्या डाव्या हातावर जिथे तीळ आहे, तिथे मलाही आहे! पण हे माझं चित्रं नाही. (कुंभमेळ्यात एखादी जुळी बहिण हरवली का काय?)
अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

सहमत

श्रावण मोडक
Wed, 03/18/2009 - 15:04 नवीन
अय्या हा पहिल्या मुद्यातील शब्द, शेवटचा मुद्दा आणि 'अदिती' या सहीच्या खालील मजकुराचा अपवाद करून उर्वरित मजकुराशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हे हे हे

आनंदयात्री
Wed, 03/18/2009 - 15:07 नवीन
>>अय्या हा पहिल्या मुद्यातील शब्द, शेवटचा मुद्दा आणि 'अदिती' या सहीच्या खालील मजकुराचा अपवाद करून उर्वरित मजकुराशी सहमत. हे वाक्य अय्या हा पहिल्या मुद्यातील शब्द, शेवटचा मुद्दा आणि 'अदिती' या सहीच्या खालील मजकुर असा अदितीचा प्रतिसाद वाचला. असे वाचले :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हम्म

सुनील
Wed, 03/18/2009 - 15:09 नवीन
अय्या, तिच्या केसांतल्या निळ्या बटा किती छान दिसत आहेत ना? लॉरिएलची कमाल!! मुलगी घाबरल्यासारखी वाटते याचा अर्थ: झुला खूप जोरात झुलत असणार, पण तो वेग त्या झुल्याच्या रेखाटनात दिसत नाही आहे, तेव्हा ही शक्यता बाद. सहमत. कोणी हिंस्त्र प्राणी (उदा. झुरळ, पाल, उंदीर इ.) जर जमीनीवर उभा असेल तर मात्र मुलगी घाबरू शकते. शक्य आहे. मुलीचा ड्रेस सगळ्या बाजूंना उडत आहे पण केस फक्त एकाच बाजूला हे काही पटत नाही. मुलीने गंगावन लावले आहे हे गृहित धरलेत की प्रमेय झटकन सुटते! शिवाय ड्रेसची रंगसंगती आवडली नाही. आणि काळं लिप्स्टीकही भावलं नाही. ड्रेस - पसंद अपनी अपनी. लिपस्टिक - खरे म्हणजे ओठ भितीमुळे काळे-निळे पडले आहेत. मुलीच्या डाव्या हातावर जिथे तीळ आहे, तिथे मलाही आहे! पण हे माझं चित्रं नाही. (कुंभमेळ्यात एखादी जुळी बहिण हरवली का काय?) नो कमेन्ट्स Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

शक्य आहे

विंजिनेर
Wed, 03/18/2009 - 15:38 नवीन
ही ताई जपानी मांगा कॉमिक्स मधल्या (जास्त चावट) तायांसारखी दिसते. त्यांच्यात काळे लिपस्टिक, मोठे डोळे इ. खूप कॉमन आहे. हे बघा उदाहरणः Image removed. ------------ कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

आदिती..

प्राजु
Wed, 03/18/2009 - 21:19 नवीन
___________/\____________ कोपरापासून दंडवत गं बाई तुला... जाम मजा आली तुझा प्रतिसाद वाचून. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

काय हो

सहज
Wed, 03/18/2009 - 15:08 नवीन
सुनीलभौंचा विकांत आताच सुरु झाला की काय? ह्या छावीने एकदा "कोणाची तरी" चांगली भादरली असणार म्हणून न्हावी म्हणल्याबरोबर लगेच ....... :-)
  • Log in or register to post comments

सुनीलभौंच

सुनील
Wed, 03/18/2009 - 15:12 नवीन
सुनीलभौंचा विकांत आताच सुरु झाला की काय? अगदी वीकांत नसला तरी बुधवार आहे!! ह्या छावीने एकदा "कोणाची तरी" चांगली भादरली असणार म्हणून न्हावी म्हणल्याबरोबर लगेच ....... =)) =)) =)) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

मागे

कवटी
Wed, 03/18/2009 - 15:11 नवीन
मागे दिसणारी फांदी आणि खास करून फाटा फारच सुचक आहे. पुचिसु कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments

छावी

विनायक प्रभू
Wed, 03/18/2009 - 15:11 नवीन
म्हणजे काय?
  • Log in or register to post comments

छावी

नरेश_
गुरुवार, 03/19/2009 - 13:22 नवीन
...म्हणजे 'छावा'चे स्त्रीलिंगी रुप :-| सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

व्वा रे

सँडी
Wed, 03/18/2009 - 15:33 नवीन
व्वा रे छाव्या! अगदी बोलकं चित्र! केस, निळ्या बटा, झुल्याचा वेग, मुलीचा ड्रेस, लिप्स्टीक, डाव्या हातावरचा तीळ, कमरेचा पट्टा सगळं आवडलं. (नकोसे रंग मनाप्रमाणे बदलुन घेतले.)
  • मुलगी घाबरल्यासारखी वाटते याची कारणं:
  1. झुल्याचा वेग
  2. सगळ्या बाजूंना उडणारा(चुकीचा?)ड्रेस
  3. समोर जमीनीवर उभा/भे असलेला/ले (आम्च्यासारखे, अहिंस्त्र) वात्रट प्राणि!
अवलिवांनी आमच्या मनातलं लिवल्याबद्दल मंडळातर्फे आभार व्यक्त करतो! - झुलेलाल.
  • Log in or register to post comments

अरे हो, पण

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 03/18/2009 - 15:47 नवीन
अरे हो, पण मेरलिन मन्रोच्या त्या सुप्रसिद्ध (या चित्राप्रमाणे) झग्याप्रमाणे तिचा ड्रेस जरी उडत असला तरीही दोन पोशाखात मूळ फरक आहेच ना? ;-) समोर जमीनीवर उभा/भे असलेला/ले (आम्च्यासारखे, अहिंस्त्र) वात्रट प्राणि! सॉरी, एस डब्बल ओ आर ई! असल्या प्राण्यांमुळे मुलींना भीती वाटत नाही. बाकी सुनीलभौ, या ताई कोणत्या जिममधे जातात हो? ;-) (धीट) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सँडी

हा हा ..

स्मिता श्रीपाद
Wed, 03/18/2009 - 16:14 नवीन
बाकी सुनीलभौ, या ताई कोणत्या जिममधे जातात हो? =)) =)) भारिच ग अदिती...:-) आता माझा पण एक प्रश्न (अदिती पासुन प्रेरणा घेउन) :-) : या ताईंनी कुठल्या ब्युटी पार्लर मद्धे हेअरकट केलाय हो? नाही म्हणजे आवडला म्हणुन नाही विचारत..."त्या" ब्युटी पार्लर मधे कोणी कोणी चुकुनही कधी जाउ नये म्हणुन मी सावध करेन...म्हणुन विचारते.. -स्मिता :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

.

सँडी
Wed, 03/18/2009 - 19:46 नवीन
सॉरी, एस डब्बल ओ आर ई! असल्या प्राण्यांमुळे मुलींना भीती वाटत नाही. हो क्का! गुड! जी डबल ओ डी! अश्श्याच मुली आवडतात तसल्या प्राण्यांना! कश्शालाच न भिणार्‍या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

छावी

सँडी
Wed, 03/18/2009 - 15:36 नवीन
छावी म्हणजे काय? घ्या! प्रभु धन्य झालो! ___/\___ विकांताला या! क्लास क्लास खेळु! ;)
  • Log in or register to post comments

लिंगो

विनायक प्रभू
Wed, 03/18/2009 - 15:41 नवीन
आमची लिंगो जरा जुन्या जमान्याची म्ह्णुन कल्ला नाय. क्लास क्लास खेळायला गुर्जी ला बोलवताय? बरे आहे बरे आहे.
  • Log in or register to post comments

हं... आता

अवलिया
Wed, 03/18/2009 - 15:43 नवीन
हं... आता डायलाक मारु नका... माझ्या पोराचे नाव अभिषेक आहे असा... !!! --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

खरां

विनायक प्रभू
Wed, 03/18/2009 - 15:45 नवीन
आता खरां तां सागितला. आता हाय त्याचा काय करुचा.
  • Log in or register to post comments

नव्या जमान्याचा लिंगो

सुनील
Wed, 03/18/2009 - 16:00 नवीन
मास्तर, आता कळ्ळां वै तुकां "छावी" मळ्ळ्यार काय तां? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

वा !

लिखाळ
Wed, 03/18/2009 - 16:29 नवीन
वा ! जलरंगातील चित्राचे विडंबन या नावाखाली कल्पक शीर्षक देऊन चित्र देण्याचा प्रकार अंमळ गंमतशीर वाटला. वास्तविक विडंबन कशाला म्हणावे हे आम्हांस माहित नाही पण शीर्षकाचे विडंबन झाले तरी पुष्कळ ! धागा नक्कीच उघडला जातो आणि त्यात काही मजेदार असेल तर कशाचे विडंबन आहे असे न पाहता प्रतिसाद दिले जातात असे आमचे निरिक्षण आहे. चित्रामधील ललना पाश्चिमात्य पोषाखात असली तरी ती नागपंचमी वगैरेच्या वेळचा खेळ खेळत असावी असे वाटते. तीचे मुक्त सोडलेले केस हे खुल्या समाजव्यस्थेतेचे आणि ग्रामिण मोकळ्या ढाकळ्या जीवनव्यवहाराचे प्रतिक वाटते. ती पाश्चात्यदेशांतच झुल्यावर खेळत असेल तरी माझे मत योग्यच आहे हे दिसते. आता ती भारतात असावी असे माझे मत झाले ते तिच्या नजरेतल्या भीतिकडे पाहून. तिचे डोळे रोखलेले आणी घाबरलेले दिसतात यावरुन एकतर नागपंचमीच्या खेळात दंग असताना नुकत्याच्य पुजलेल्या वारुळातून नागराज बाहेर आलेले असावेत नाहितर दुध, पाणी, हळद-कुंकू या प्रकाराने त्रस्त झालेल्या मुंग्यांनी आसपासच्या सख्यांवर हल्ला केला असावा. चित्रकार ज्या कोनात आहे त्याच कोनात छाविची नजर आहे. याचा अर्थ चित्रकाराने आपली उपस्थिती दाखवल्याने छावी बावरली असावी असेही झाले असावे. यावर खुद्द चित्रकारच काही प्रकाश टाकू शकेल. (ह घ्या हे सां न लगे :) ) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

ठ्ठो !!!

अवलिया
Wed, 03/18/2009 - 16:31 नवीन
वाक्यावाक्याला ठ्ठो ! =)) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

.

सँडी
Wed, 03/18/2009 - 20:05 नवीन
=)) जब्राट! शब्दांचे विध्वंसक हास्यस्फोट घडवुन लोकांच्या पोटाची राखरांगोळी करणारे 'हाहा शत वादी'च आहात आपण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

जब्राट! शब्

लिखाळ
Wed, 03/18/2009 - 21:15 नवीन
जब्राट! शब्दांचे विध्वंसक हास्यस्फोट घडवुन लोकांच्या पोटाची राखरांगोळी करणारे 'हाहा शत वादी'च आहात आपण!
आपण केलेले कौतूक आमच्या समिक्षकलेखणीला नवचैतन्य देणारे आहे. अश्याच तर्‍हेच्या कौतूकाची आम्ही प्रतिसाद लिहिल्यापासून सारखी वाट पाहत असतो हे एव्हाना चाणाक्ष प्रतिसाद-वाचकांनी ओळखलेच असेल ;) 'हाहा शत वादी' सारख्या शब्दबिरुदांनी गौरवल्याबद्दल आपले आभार मानतो. (स्वगत : 'हाहा शत वादी' नक्की काय कौतूकपरच आहे ना? .. नाहितर काहितरी क्रिप्टिक गुगली असायची :? ) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सँडी

'हाहा शत

सँडी
गुरुवार, 03/19/2009 - 06:48 नवीन
'हाहा शत वादी' नक्की काय कौतूकपरच आहे ना? अगदी अगदी! तुमच्या लिखाणाचा फ्यान! (हे रहिलं होतं लिहयचं ;))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

पाश्चात्य पोषाखातली भारतीय ललना

चतुरंग
Wed, 03/18/2009 - 21:32 नवीन
अशाप्रकारची समीक्षा देऊन लिखाळांनी कहर केलेला आहे! ललनेचे डोळे चित्रकारावर रोखलेले असल्याने ती भयकंपित झालेली असावी असा लिखाळांचा कयास असला तरी त्या घाबरण्यामागचे खरे कारण हे चित्रकार नसून प्रत्यक्ष लिखाळ त्या ठिकाणी हजर होते, आणि आता ते आपल्या तैलबुद्धीचा वापर करुन चिकित्सक समीक्षा लिहिणार हे ओळखून ललना घाबरली, हेच असणार ह्याबाबत आम्हाला तिळमात्र शंका नाही! आपल्या समीक्षेचा वारु असा चौखूर (इथे चित्रकलेबद्दल लिहिलेले असल्याने चौरंगी असेही चालेल) उधळलेला सोडून जालावरच्या यच्चयावत विडंबकांना त्यांनी गर्भित इशारा दिलेला आहे असे आम्ही समजतो. मागे एकदा त्यांच्या समीक्षेत भडकमकर मास्तरांची शिकवणी चाहूल देऊन जाते असे मी म्हणालेलो वाचकांना स्मरत असेलच, परंतु इथे मात्र त्यांनी यशस्वीपणे 'लिखाळशैली' विकसित केलेली आहे त्याबद्दल त्यांचे त्रिवार अभिनंदन!!! :) चतुरंग ता.क. वरती 'हाहा शत वादी' अशी पदवी त्यांना देण्यात आलेली निदर्शनास आली. काही काळाने 'लिखाळांच्या समीक्षेची शतपत्रे' असा ग्रंथ प्रसिद्ध होईल असे भाकित आम्ही करतो आहोत! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

पटाच्या

लिखाळ
Wed, 03/18/2009 - 21:40 नवीन
पटाच्या चार कोपर्‍यात स्वतःचेच चार हत्ती उभे राहिले तर राजाला जो चातुरंगिक (चतुरंग=बुद्धीबळ असे गृहितक) आनंद होईल तितका आनंद आज आम्हाला विडंबनकार चतुरंग यांच्या साक्षेपी कौतूकाने झाला. (स्वगत : लिखाळा, 'साक्षेपी कौतूक' वगैरे म्हणजे आता शब्दांचा नळ सोडल्यासारखे होत आहे. आवर स्वतःला ! स्वगत २ : तैलबुद्धी असा उल्लेख अंतु बर्व्यातला आहे..लिखाळा, हा शालजोडितला टोला असेल का?) -- लिखाळ.
ता.क. वरती 'हाहा शत वादी' अशी पदवी त्यांना देण्यात आलेली निदर्शनास आली. काही काळाने 'लिखाळांच्या समीक्षेची शतपत्रे' असा ग्रंथ प्रसिद्ध होईल असे भाकित आम्ही करतो आहोत
आमचेही ता क : अरे वा .. समिक्षेचा वारु उधळल्याने धूळ उडत नसून कौतूक सुमनांचा वर्षाव होतो असे दिसते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

चतुरंग आणि

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 03/18/2009 - 22:38 नवीन
चतुरंग आणि लिखाळ, तुमचे दोघांचेही प्रतिसाद वाचता आले नाहीत. म्हणजे भाषा मराठी असली तरी अर्थ लागला नाही. (चतुरंग आणि लिखाळ हे मुक्तसुनीत यांचेच आय.डी. नाहीत ना अशी पुसटशी शंका नसलेल्या बुद्धीला चाटून गेली.) ;-) प्राजु, तुला आशीर्वाद. तुझ्याही कीबोर्डातून (माझ्या प्रतिसादा)एवढे सुंदर प्रतिसाद गळतील असे उदंड आशीर्वाद! अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

कर्मकहाणी

मुक्तसुनीत
Wed, 03/18/2009 - 22:47 नवीन
लिखाळ अँड रंगा आर आउट टू पुट मी आउट ऑफ बिझनेस , फॉर शुअर ! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हा हन्त हन्त!

चतुरंग
Wed, 03/18/2009 - 22:56 नवीन
इतक्या प्रयत्नपूर्वक लिहिलेल्या समीक्षेची आणि त्यावरच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादाची अशी एका वाक्यात वासलात लागेल असे आमच्या स्वप्नातही आले नव्हते! "मराठी संस्थळावरील वाचकांच्या मराठी भाषेच्या आकलनाची गुणवत्ता घटली आहे का?" असा कौल टाकता येईल का, ह्याचा विचार करतो आहे! :? अवांतर - प्रयत्ने की बोर्ड बडवता प्रतिसादही गळे! अशी एक नवीनच म्हण मनात डोकावून गेली. ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ही वरची

भाग्यश्री
Wed, 03/18/2009 - 23:24 नवीन
ही वरची जुगलबंदी अशक्य आहे!! =)) लिखाळला अचानक काय झाले आहे?? सागु खाल्ल्याने असं काही होतं का?? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

चतुरंग आणि

भडकमकर मास्तर
Wed, 03/18/2009 - 23:52 नवीन
चतुरंग आणि लिखाळ हे मुक्तसुनीत यांचेच आय.डी. नाहीत ना हे म्हणजे एकट्याने कोर्टावर टेनिस खेळल्यासारखं झालं की... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हो आणि तेही

चतुरंग
गुरुवार, 03/19/2009 - 01:52 नवीन
सिंगल विरुद्ध डबल्स!! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

जबरा!!

पिवळा डांबिस
गुरुवार, 03/19/2009 - 04:18 नवीन
तीचे मुक्त सोडलेले केस हे खुल्या समाजव्यस्थेतेचे आणि ग्रामिण मोकळ्या ढाकळ्या जीवनव्यवहाराचे प्रतिक वाटते. क्या बात है!!!:)) दाद द्यावी तेव्हढी थोडी!!:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

छावी

दिपक
Wed, 03/18/2009 - 16:34 नवीन
छावीचे चित्र आवडले. डोळ्यांचे चित्र काढताना चित्रकार जरा बावरला असावा कारण डावा डॊळा जरा म्हणजे किंचीत म्हणजे थोडासा खाली आला. :)
  • Log in or register to post comments

लिखाळराव..

प्राजु
Wed, 03/18/2009 - 21:25 नवीन
आपणही धन्य आहात.. बापरे!! काही खरं नाही आता.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

जो पर्यन्त टारझन बोलत नाही

chipatakhdumdum
Wed, 03/18/2009 - 21:42 नवीन
जो पर्यन्त टारझन बोलत नाही, तो पर्यन्त हत्ती बोलणार नाही, टारु बोलला नाही, तर मजा नाही,
  • Log in or register to post comments

काही म्हणा..

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 03/19/2009 - 08:46 नवीन
कोणी काही म्हणा..... चित्रातील कन्या छान आहे.
  • Log in or register to post comments

आता

ऋचा
गुरुवार, 03/19/2009 - 12:58 नवीन
आता चित्रांचे ही विडंबन!!!! :O मस्त आहे ...... :D प्रतिसाद तर लैच भारी :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

जोरदार!

क्रान्ति
गुरुवार, 03/19/2009 - 22:28 नवीन
छावी तर जोरदार आहेच, पण प्रतिसाद जास्त भारी आहेत. अदिती, मला वाटत, हे प्रतिसाद वाचले तर छावीचा घाबरटपणा कमी होईल नक्कीच! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा