जोराने एवढ्या ओरडू नकोस थोडावेळ थांब
उशिरा झोपले रात्री , अंगाला चढलाय आम
टक टक तुझी सदा चालू असते
जग सारे तुझ्याभोवती घुटमळत असते.
२४ तास तुझे न चुकता जागतोस
अर्ध्या पेक्षा जास्त त्यात आम्हालाच राबवतोस.
ऑफीस चालू बंद करण्याची तुझ्यात असते ताकद
आम्हाला मात्र सुट्टीची मोजावी लागते किंमत.
नको तेव्हाच कधीतरी बंद पडतोस
आणि कामाचा सगळ्या बट्याबोळ करतोस.
जन्मा पासुन मरणा पर्यंत तुझा असतो सहवास
एखाद दिवस नसशील तर दिवस होतो भकास.
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1608
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुप्पच
मस्त