Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by झंडू बाम on Mon, 03/16/2009 - 18:02
  • Log in or register to post comments
  • 8103 views

प्रतिक्रिया

Submitted by अभिरत भिरभि-या on Mon, 03/16/2009 - 18:28

Permalink

अरे वा

सुंदर गाणे दिसतेय .. गाणे ऐकण्यासाठी जालावरचा दुवा मिळेल काय ?? अभिरत
  • Log in or register to post comments

Submitted by झंडू बाम on Mon, 03/16/2009 - 19:06

In reply to अरे वा by अभिरत भिरभि-या

Permalink

दुवा

http://www.youtube.com/watch?v=JYKwuwVB-08
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 03/16/2009 - 21:16

In reply to अरे वा by अभिरत भिरभि-या

Permalink

मूळ

आशाताईंच्या आवाजातलं गाणं इथेही सापडलं. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on Mon, 03/16/2009 - 20:39

Permalink

स्वतः चि. त्र्यं. खानोलकर..

आरती प्रभूंची कविता खरच दुर्बोध आहे...कळली तर ग्रेसनाच कळेल. तेच तसे म्हणत होते एका कार्यक्रमात! दुसरी शक्यता एखादा मराठीचा प्राध्यापक शोधा. कळली तर खरच इथे लिहा....
  • Log in or register to post comments

Submitted by चकली on Mon, 03/16/2009 - 21:40

Permalink

इथे बघितले का?

या ब्लॉगवर छान लिहलय..वाचनिय आहे.. http://bolaacheekadhee.blogspot.com/2006/12/blog-post.html चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Tue, 03/17/2009 - 08:28

In reply to इथे बघितले का? by चकली

Permalink

धन्स चकली

त्या ब्लॉगवर खरंच खूप सुरेख अर्थ लिहिलाय.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Mon, 03/16/2009 - 21:41

Permalink

मला असं वाटतंय की....

पहिल्या दोन ओळीत जे म्हटलंय ते एकच आहे...जसे की समईच्या शुभ्र कळ्या.....म्हणजे वाती ....उमलवून लवतात म्हणजे आधी पेटतात आणि मग हळूहळू विझतात. तसेच केसात माळलेली/फुललेली जाई नंतर कोमेजून गळुन पडते. अर्थात हा झाला सरळ अर्थ पण ह्यातला गर्भितार्थही समजू शकेल असाच आहे.....आधी जीवन फुलते आणि मग मरणाच्या रुपात कोमेजते. अशाच तर्‍हेने प्रत्येक दोन ओळींचा एकमेकींशी काही तरी संबंध दाखवलाय असे वाटते. आता ह्या अंगाने विचार केला तर कविता उलगडत जाईल. त्यात एक सरळ शब्दश: अर्थ असेल आणि दुसरा गर्भितार्थ. आता करा प्रयत्न. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by १००मित्र on Sat, 06/27/2020 - 21:36

In reply to मला असं वाटतंय की.... by प्रमोद देव

Permalink

असाही विचार !

हं , असाही विचार असू शकेल. खरच, कविता हा त्या त्या काविचाच मुलुख ; उगा आपण त्यात शिरायचा यत्न करायचा इतकंच !
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Tue, 03/17/2009 - 08:45

Permalink

एक अर्थ

अर्थनिर्णयनाबद्दल मी अन्यत्र जे लिहिले ते इथे कॉपी/पेस्ट करतो आहे. (इथे चालेल असे वाटते. अन्यत्र - अगदी योग्य संदर्भात असूनही - भृकुटीभंग होतात ; तो धोका इथे तरी नाही ! :-) ) जेव्हा एखाद्या गुंतागुंतीच्या गोष्टीतून निरनिराळे अर्थ निघू शकत असतील किंवा एकूण ती गोष्ट समजायला क्लिष्ट असेल तर त्याच्या अनेक अर्थांबद्दल चर्चा घडताना दिसते. ब्रह्मसूत्रे हे एक उदाहरण. एकेका सूत्रामध्ये छोट्याश्या विधानांमध्ये मोठा आशय भरलेला आहे असे मानले जाते. त्याबद्दल अर्थातच बरीच भवति-न-भवति घडत असते. थोडा विचार करता , "परमार्थ" हा शब्द सुद्धा , मानवी आयुष्याच्या अनेकानेक अर्थांपैकी सर्वात महत्त्वाचा - कारण ईश्वरासंदर्भातला - या गोष्टीचे सूचन करतो. थोडक्यात "इंटरप्रिटेशन" या इंग्रजी शब्दाला प्रतिशब्द म्हणजे अर्थनिर्णयन. आता प्रस्तुत कवितेबद्दल : या कवितेचा मला जाणवलेला अर्थ : एका नवपरिणितेच्या मनातले तरंग. पहा तुमच्यापैकी कुणाला हा(ही) अर्थ लागतो का !
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Tue, 03/17/2009 - 20:43

Permalink

अर्थ

बोलाचीच कढीवर खरच अगदी सुन्दर अर्थ दिलाय. अगदी समर्पक वाटतो. असंच नवपरिणितेच्या भावना व्यक्त करणारं आरती प्रभु यांचंच आणखी एक गीत म्हणजे "नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत!" धन्यवाद चकली! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

Submitted by प्रशांत उदय मनोहर on Wed, 11/02/2011 - 21:48

In reply to अर्थ by क्रान्ति

Permalink

+१

असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by साबु on गुरुवार, 11/03/2011 - 13:41

Permalink

भावसरगम...

एकदा भावसरगम कार्यक्रम ऐकायला गेलो असताना बाळासाहेबानी या गाण्याचे विश्लेशण केले होते. ही कविता एक गर्भवतीचे बाइचे मनोगत आहे असे त्यानी सान्गितलेले आठवते.
  • Log in or register to post comments

Submitted by १००मित्र on Sat, 06/27/2020 - 21:38

Permalink

"दिठी " म्हणजे काय ?

भिवयांच्या फडफडी (पापण्या फडफडतात ना ?) दिठी च्या हि मागे पुढे ..... (अगम्य)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com