मिसळ आणि भेळ

महेन्द्र's picture
महेन्द्र in काथ्याकूट
19 Sep 2007 - 7:22 pm
गाभा: 

सन्माननिय मिसळ कट्टेकरांनो

कृपया मिसळ आणि भेळ यातील वेगळे पण विशद करण्याचा प्रयत्न करा

सर्व महानुभावांनी आपले मत नोंदवावे ही नम्र विनंती

प्रतिक्रिया

अप्पासाहेब's picture

20 Sep 2007 - 10:48 am | अप्पासाहेब

मिसळ बैठ्कीची लावणी आहे तर भेळ उभ्याउभ्याने करावयाचा डिस्को आहे.

विसोबा खेचर's picture

20 Sep 2007 - 11:05 am | विसोबा खेचर

'बैठकीची लावणी' आणि 'उभ्या उभ्या करायचा डिस्को' या उपमा अतिशय आवडल्या..:)

टीकाकार-१'s picture

20 Sep 2007 - 10:56 am | टीकाकार-१

२ वेगळे पदार्थ आहेत हे.

विसुनाना's picture

20 Sep 2007 - 11:24 am | विसुनाना

मातीच्या तालमीतला (-नाटकाच्या नव्हे) जयसिंग घोरपडे : किराणा दुकानातला (- घराण्यातला नव्हे) जिग्नेश शहा :: मिसळ : भेळ

(ह.घ्या. कोणत्याही व्यक्तीसमुहास दुखावण्याचे आमच्या मनात नाही.)

झकासराव's picture

20 Sep 2007 - 11:48 am | झकासराव

तात्या मिसळ आणि भेळ समोर असताना "उपमा" आठवावा.
अरे रे काय हे. :)
हलकेच घ्या बर. :)
मी दोन्हीचा भक्त आहे.
मिसळ मधे डोळ्यातुन आणि नाकातुन पाणी आणण्याची शक्ती आहे. भेळ मधे नाही.

लिखाळ's picture

20 Sep 2007 - 5:42 pm | लिखाळ

मिसळीबरोबर पाव चांगला लागतो. भेळेबरोबर नाही.
--लिखाळ.

तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

वरदा's picture

21 Sep 2007 - 7:43 am | वरदा

मिसळ हा फारच पोट भरणारा पदार्थ आणि भेळ हलकी फुलकी.....मिसळ तिखट आणि मसालेदार तर भेळ चटपटीत......

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Sep 2007 - 7:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिसळ म्हणजे राखी सावंत तर भेळ म्हणजे सुप्रिया सुळे ! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

21 Sep 2007 - 7:54 am | विसोबा खेचर

मिसळ म्हणजे राखी सावंत तर भेळ म्हणजे सुप्रिया सुळे ! ;)

क्या बात है! म्हन्जी बिरुटे सायबास्नी सावतांची राखी आवडते म्हनायची! :)

आपला,
तात्या मिका!

भेळेचा घोर अपमान!

विशुमित's picture

28 Dec 2016 - 2:26 pm | विशुमित

मग "स्मृती" ला भेळ म्हणा चटपटीत वाटेल...!!

तर्री's picture

21 Sep 2007 - 1:28 pm | तर्री

हा तर मिसळी चा घोर अपमान........

झकासराव's picture

23 Sep 2007 - 2:49 pm | झकासराव

मिसळ म्हणजे जाफरानी जर्दा घातलेल जास्त चुना घातलेल पान तर भेळ म्हणजे ज्यादा गुलकंद वाल मसाला पान :)
मला पानातील तशी जास्त माहिती नाही एखाद्या जाणकार तांबुलभक्षी ने अधिक चांगल्या प्रकारे लिहिता आल तर पहा. :)

सर्किट's picture

24 Sep 2007 - 4:42 am | सर्किट (not verified)

वा ! अगदी खरे....

(तांबूलप्रेमी) - सर्किट

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Mar 2008 - 8:58 pm | llपुण्याचे पेशवेll

मिसळ म्हणजे मस्त भोला-बनारस, कलकत्ता १२०-३२ सारखे तिखट पान. आणि भेळ म्हणजे फूलचंद १२०-३०० सारखे थोडे गोड पण आनंददायी पान. :) :)
(असुरावादी -'गो' पाल)
डॅनी.
पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर's picture

23 Sep 2007 - 3:14 pm | विसोबा खेचर

मिसळ हा अस्स्ल मराठमोळा पदार्थ. भेळ हा का कुणास ठाऊक, पण मला उगिचंच तो गुजराथी पदार्थ आहे असं वाटत आलेलं आहे! :)

मिसळ खाताना कुणी सोबत नसलं तरी चालतं, कारण लालभडक रश्श्यात पाव बुडवून खाताना बराचसा वेळ घाम आणि नाकातोंडातलं पाणी पुसण्यातच जातो, भेळ खाताना मात्र एखादी छानशी मैत्रिण सोबत असेल तर फारच छान. एकूंणच भेळ हा हसीमजाक करत करत कुटुंबियांसोबत, मित्रमंडळींसोबत खाण्याचाही पदार्थ आहे. मस्त चटपटीत भेळ! कांदा, कैरी, झकासशी चिंचगुळखजुराची चटणी, हिरव्या मिरच्यांची चटणी घालून केलेली मस्त चटपटीत भेळ! वा वा..

गरमागरम मिसळ सक्काळच्या टायमाला खावी, तर भेळ संध्याकाळी!

छ्या..! आमच्या मिसळीला शृंगार वगैरे काही कळत नाही! :) ती सजते, फुलते ती एखाद्या यष्टीष्टँडवरील, किंवा पोलिस स्टेशनाजवळील किंवा एखाद्या मारुतीच्या देवळाजवळील टपरीत! :)

परंतु या जागा भेळेला मात्र शोभून दिसत नाहीत हो!

एखाद्या छानश्या समुद्र किनार्‍यावर, एखाद्या गोड मुलीसोबत मावळतीचे रंग पाहता पाहता खाल्लेल्या भेळेची चव काही औरच! आमच्या नशिबी असे काही भेळ खायचे प्रसंग आलेले आहेत त्या दिवसांची आठवण आजही आमच्या मनात त्या भेळेइतकीच रेंगाळते आहे. हल्ली त्या सर्व गोड मुली रस्त्यात भेटल्या की "अले शोनुल्या, तो बघ तात्यामामा! त्याला पापी दे पाहू!" असं आपल्या लेकाला म्हणतात..!

मग आम्ही मनात म्हणतो, "अगं गधडे, त्या संध्याकाळी, समुद्रकिनारी इतकी रंगात आली होतीस तेव्हा आम्ही तुझ्याकडे....."

जाऊ द्या....:)

आपला,
तात्यामामा शिरवळकर!

राजे's picture

23 Sep 2007 - 3:19 pm | राजे (not verified)

तात्या,
एकदम जबरा फरक दाखवला आहे भेळ व मिसळ मधील... क्या बात है..

तर मग तात्या मामा काय करतात जेव्हा तो कार्टा गालावर पापी देतो तेव्हा ????

राजे
(*हेच राज जैन आहेत)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Sep 2007 - 9:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिसळ आणि भेळ यातला फरक सहीच !
किती व्याप सांभाळता,कधी किती ताप सांभाळता,
देवगडात चक्कर ,शेअर मार्केट,संगीत,कुटुंब,मित्र परिवार !
आणि
एखाद्या छानश्या समुद्र किनार्‍यावर, एखाद्या गोड मुलीसोबत मावळतीचे रंग पाहता पाहता खाल्लेल्या भेळेची चव !
क्या बात है, तात्या !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सृष्टीलावण्या's picture

19 Mar 2008 - 5:43 pm | सृष्टीलावण्या

गरमागरम मिसळ सक्काळच्या टायमाला खावी, तर भेळ संध्याकाळी!

मी म्हणेन भेळेला वेळेची बंधन घालू नयेत. ती कधीही खायला छानच.

मिसळ मात्र सक्काळी सक्काळी गरमागरम खावी. आमच्या इथे दादरमध्ये त्यातल्या त्यात माने मिसळ प्रसिद्ध आहे (नाहीतर, इतर ठिकाणच्या मिसळी म्हणजे एकतर कालचे उरलेले सरवायचे ठिकाण किंवा ब्राह्मणी जाड ओले पोहे घातलेल्या गोड चवीच्या, मामलेदारची मिसळ आठवूनच हळहळायला होते).

आम्ही पूर्वी दर रविवारी मानेकडून लालभडक तर्रीदार तर्री उसळ घरी आणायचो, दोन लादी बुरून पाव
(कडक पाव) आणि गोकुळदास गांठियावाल्याचे फरसाण आणि हाणायचो जोरदार नाक डोळे पुसत. त्या उसळीचा घमघमाट हात धुतले तरी दिवसभर हाताला. काय मसाला बनवतो माने, मानलं बुवा. पण फरसाण निवडताना इतकी कंजूसी का करतो हरामखोर कोणास ठाऊक. नाहीतर त्याच्या कडेच मिसळ खाल्ली असती आयुष्यभर.

>
>
धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...

इनोबा म्हणे's picture

19 Mar 2008 - 5:52 pm | इनोबा म्हणे

फरसाण निवडताना इतकी कंजूसी का करतो हरामखोर कोणास ठाऊक. नाहीतर त्याच्या कडेच मिसळ खाल्ली असती आयुष्यभर.
पुण्यात नाही करत.

धैर्य दे अन नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...
परमेश्वरा,ऐकतोयस का रे!

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

पाटीलभाऊ's picture

27 Dec 2016 - 3:38 pm | पाटीलभाऊ

सुंदर प्रतिसाद

लिखाळ's picture

23 Sep 2007 - 9:43 pm | लिखाळ

मिसळ म्हणजे वन डे क्रिकेट मॅच...भेळ म्हणजे ट्वेंन्टी - ट्वेंन्टी
(ज्यांना ट्वेंन्टी - ट्वेंन्टी जास्त आवडते त्यांनी आलटापलट करुन म्हणावे:)
-- लिखाळ.

तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

नंदन's picture

24 Sep 2007 - 3:40 am | नंदन

भेळ म्हणजे मुंबईसारखी. अठरापगड पदार्थांच्या मिश्रणातून स्वतःची निराळीच चव घेऊन येणारी. झटपट, वेळ न दवडता कामचलाऊ पोट भरायला उपयुक्त. शिवाय ती खरी रंगते ती बाहेर -- खासकरून गिरगाव किंवा जुहू चौपाटीवर. घरी कुरमुरे आणून, चटण्या बनवून केलेली भेळ ही टोफू तंदुरी चिकनसारखीच दयनीय वाटते.

मिसळ म्हणाल तर कोल्हापूरसारखी. अस्सल मर्‍हाटमोळी. तिखटजाळ, ठसकेदार पण तितकीच चवीवरुन जीव ओवाळून टाकावा अशी. पण भेळेसारखी सार्‍यांच्याच पचनी पडेल अशी नाही. 'मी आहे ही अशी आहे. आवडले तर ठीक, नाहीतर राम राम' असा रोखठोक 'तेगार' मिरवणारी.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

सर्किट's picture

24 Sep 2007 - 4:45 am | सर्किट (not verified)

भेळ ही प्रेयसीला बायको बनवण्याच्या प्रयत्नातली भागीदार.
मिसळ ही नवीन बायकोला आअयुष्यभराची सोबतीण बनवण्यातल्या प्रयत्नातली भागीदार.
दोन्ही मस्तच !

- सर्किट

भेळ ही बायको खायचा पदार्थ आहे
मिसळ ही मित्रांबरोबर हाणायची असते
बायको आणि मित्र यांच्यात आहे तेवढाच फरक भेळ आणि मिसळ यात आहे..
( हवे तर यासाठी तात्यांकडुन तज्ञांचे मत घ्या)

तात्या विंचू's picture

19 Mar 2008 - 7:43 pm | तात्या विंचू

असे कोणाला विचारत बसू नका....खाउन बघा....

उदय ४२'s picture

19 Mar 2008 - 8:07 pm | उदय ४२

दादर मध्ये माने मिसळिचा पत्ता काय?(मिसळीतला रस्सा भूरकणारा)

सुधीर कांदळकर's picture

19 Mar 2008 - 10:14 pm | सुधीर कांदळकर

ऐकतोय. पण ब्रून मिसळ हेहि पहिल्यांदाच ऐकतोय.

तात्यांची व सर्किटरावांची प्रतिक्रिया आवडल्या. लाजबाब.

धन्यवाद सृलाताई
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

vcdatrange's picture

27 Dec 2016 - 8:41 am | vcdatrange

बादवे,

मिपावर ओळख झालेल्या एका मित्रवर्याने नाशकात भेळेचे दुकान थाटलयं, पुणे रोडवर आंबेडकर नगरला.. आम्ही चकरा मारतोय हल्ली.....

या तुम्ही पण

vcdatrange's picture

27 Dec 2016 - 8:41 am | vcdatrange

बादवे,

मिपावर ओळख झालेल्या एका मित्रवर्याने नाशकात भेळेचे दुकान थाटलयं, पुणे रोडवर आंबेडकर नगरला.. आम्ही चकरा मारतोय हल्ली.....

या तुम्ही पण

बोका-ए-आझम's picture

27 Dec 2016 - 11:08 am | बोका-ए-आझम

उपनगरच्या जवळ?

बोका-ए-आझम's picture

27 Dec 2016 - 11:08 am | बोका-ए-आझम

उपनगरच्या जवळ?

vcdatrange's picture

27 Dec 2016 - 6:49 pm | vcdatrange

विजय ममता जवळ

पुंबा's picture

27 Dec 2016 - 3:40 pm | पुंबा

मस्त. असे जुने धागे जुन्याजाणत्या लोकांनी बाहेर काढावेत. आमच्यासारख्या नव्या लोकांना फायदा होईल.

सांरा's picture

27 Dec 2016 - 7:15 pm | सांरा

सर्व महानुभावांनी आपले मत नोंदवावे ही नम्र विनंती

इतर धर्म चालतील का

निल्या१'s picture

29 Dec 2016 - 7:32 am | निल्या१

ब-याच जणांनी भेळ म्हणजे गोड असे वर्णन केले आहे. मराठवाड्यातली भेळ जबरा तिखट असते. काही ठिकाणची साधी भेळ डोक्याला घाम व चेह-याला मुंग्या येतील इतकी तिखट असते. तितकीच हवी हवीशी वाटणारी. दर १२ मैलावर भाषा बदलते म्हणतात तशी भेळही बदलते. प्रत्येकाला आपल्या गावचीच भेळ भारी वाटण स्वाभाविक आहे. पण फक्त पुण्यातली भेळ ज्यांनी खाल्ली त्यांना "हाय कंबख्त तू ने भेळ खाई ही नही" असे म्हणावे लागेल.