आज पण मला आठवतं, तिची आणि माझी पहिली भेट... तिला पाहुन मी इतकी जोरात ओरडली होती, कि माझ्या दोन्ही रुम-पार्टनरस(रु-पा) पळत आल्या होत्या. तो दिवस तिचा आमच्या रुम मधला पहिला दिवस होता.
आणि तेव्हा पासुन ती आमच्या रुम मधे तळ ठोकुन बसली. जा जा म्हंट्ल तरी बयेच जायच नाव नाही, सर्व करुन झालं होतं अगदी धक्का मारुन, हाकलुन.. पण ती नुसती निर्लज्ज..
हळुहळु तिला माहीत झालं होत की मला ती अजिबात आवडत नाही, मग काय मी जेव्हा एकटी रुम वर असणार तेव्हा त्या बाईसाहेब अगदी थांबल्याच पाहिजे.. ~X( हळुह्ळु मला तिची भिती कमी वाट्त होती पण ती मला कधी रुम मधे आवडलीच नाही. माझ्या रु-पा मात्र तिला माझी "best friend" म्हणु लागल्या होत्या...
अशी ती माझी नावडती मैत्रिण 'पाल' (तीच भिंतीवरची). आम्ही तिचं नाव 'चिंकी' ठेवल होतं.
एकदा आम्हाला होस्टेलच्या पायरीवर एक 'सरडा' दिसला होता तेव्हा माझ्या रु-पा ने त्याला चिंकीचे आजोबा असं म्हंटल होतं...
नंतर कॉलेज संपेपर्यंत चिंकीचा मुक्काम आमच्याच रुम मधेच होता.. आज पण जेव्हा जेव्हा मी चिंकीची जुळी बहिण बघते तेव्हा तेव्हा मला चिंकीची आठवण येते.
चिंकी हा माझा पहीला वहीला लेख तुला समर्पित.
वाचने
4530
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
असेच काहि
नंतर
बेस्ट फ्रेंड!
बरे वाटले
सोप्पं आहे...
In reply to बरे वाटले by जृंभणश्वान
एका 'क्ष'
In reply to बरे वाटले by जृंभणश्वान
ईईईईईईईईईईई
In reply to एका 'क्ष' by परिकथेतील राजकुमार
लै भारी *
In reply to एका 'क्ष' by परिकथेतील राजकुमार
कोठेतरी वाचले की
हा हा
In reply to कोठेतरी वाचले की by योगी९००
कोणाला ?
In reply to कोठेतरी वाचले की by योगी९००
पाल..! आमची
मुद्दा
In reply to पाल..! आमची by विसोबा खेचर
हा हा हा
लै
पाल..
ह. ह. पु. वा.
In reply to पाल.. by मुक्ता २०
मगर/सुसर
जरा कल्पना
In reply to मगर/सुसर by योगी९००