रेडिओत लहान लहान माणसं बसुन गातात असं मलाही वाटायचं, किती वेळा मी रेडिओ चालु असतांना आत कुणी दिसतय का बघत बसायचो.
भजन, गाणी गाताना त्यांचा पखवाज पेटी किती छोटी असतील. लेदर केस वरील जाळी ही त्यांना आत हवा घेण्यासाठी असते असे वाटायचे. आणि शी शु कसे करत असतील असा प्रश्न पडायचा.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
नकीच
मी जेव्हा आपल्या वयाचा होइन तेव्हा मलाही अशा आठवणी येतील
बाकी याबाबतीत रेडीओ मीरचीवर एक सुंदर जाहीरात आहे त्यांच्या पुरानी जीन्स या कार्यक्रमाची..
असो
दुर नभाच्या पल्याड कोणी
दाटुन येता अवेळ पाणी
केवळ माझ्यासाठी रिमझीमते
केव्हा केवळ भणाणारा पिसाटलेला पिवुन वारा
अनवाणी पायानी वनवणते
कुणी माझे मजसाठी माझ्याशी गुणगुणते
सा रे ग म प.......................
इयत्ता ७वी ते ८ वी पर्यंत असले समज्-गैरसमज दूर होतात. त्यासाठी खूप मोठ्या (म्हणजे अभिजीत इतक्या) वयाची गरज नसते.
लहानपणीचे किस्से तुला आता आठवत नाहीत हे खरं आहे का?
(की, आपण कसे सगळ्यांत लहान आहोत हे जाणवून देण्याचा आटापिटा??)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
आठवतात
पण आम्हे अजुनही जे पराक्रम करतो ते आठवायला त्यांछ्या वयाचे व्हायला लागेल
(प्रसंग, पराक्रमाचे प्रकार बदलले तरी आही अजुनही खुप पराक्रम क्रतो ...)
बाकी खवत बोलु इथे अवांतर नको
दुर नभाच्या पल्याड कोणी
दाटुन येता अवेळ पाणी
केवळ माझ्यासाठी रिमझीमते
केव्हा केवळ भणाणारा पिसाटलेला पिवुन वारा
अनवाणी पायानी वनवणते
कुणी माझे मजसाठी माझ्याशी गुणगुणते
सा रे ग म प.......................
इयत्ता ७वी ते ८ वी पर्यंत असले समज्-गैरसमज दूर होतात. त्यासाठी खूप मोठ्या (म्हणजे अभिजीत इतक्या) वयाची गरज नसते.
=)) लै भारीच हे!
तुझ्यासारखं मलाही लहानपणी पडद्यावर दिसणारे कलाकार गाणी गातात असं वाटायचं. आणि लता मंगेशकर ही एकच बाई गाते हे समजल्यावरतर मी फारच निराश झाले होते.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
मी कलिंगडाची बी गिळली होती तेव्हा उपस्थित आगाउ काकूंनी तुझ्या डोक्यातून आता मोठ्ठे कलिंगडाचे झाड येणार असे सांगितले होते.
असे काही होणार नाही हे आईने हजारदा सांगूनसुध्दा, नंतर बरेच दिवस मी रोज उठल्यावर डोक्याला हात लावून चाचपणी करायचो.
मला आठ्वतय मी ४थीत असताना एकदा बाबांकडे हट्ट करुन कधी नव्हे ते त्यांना कोंबडीची पिल्ले विकत घ्यायला भाग पाडली होती. पाळायला हवीत म्हणुन.............त्याच दरम्यान आजोबांनी ययातीची गोष्ट सांगताना संजिवनी मंत्राबद्दल सांगितले होते.......................एके दिवशी शाळेतुन परतले बघते तर पिल्लु मरुन पडलेले ........रडुन गोंधळ घालायचा तर ऐकायला घरात कुणीच नाही...........आजोबा देखिल मामाकडे गेले होते..........काही सुचत नव्हते आणि मला एकदम आजोबांनी संजिवनी मंत्राबद्दल सांगितलेली गोष्ट आठवली ............त्या पिल्लाला कापसाच्या गादीवर ठेवुन माझे मंत्रोच्चारण सुरु होते ..........काय म्हणत होते ते आता मला देखिल आठ्वत नाही........बराच वेळ सगळे सोपस्कार करुन त्या पिलाला पुन्हा जिवंत करण्याचे प्रयत्न केले...........इतक्यात बाबा आले व त्यांनी तो सगळा गोंधळ बघितला व मला समजावले............कि असे काही घडत नसते..........इत्यादि इत्यादि..............आजोबा मामाकडुन परत आले तरी माझी त्यांच्याशी बट्टि काहि झाली नाही...........निदान काही दिवस तरी!
आता तो प्रसंग आठवला की हसू येते........
पृथ्वी गोल आहे व ती स्वतः भोवती फिरत असते हे ऐकल्यावर पहिला प्रश्न मनात आला की मग आपण पडत कसे नाही?
ज्वालामुखी बद्दल जेंव्हा शाळेत प्रथमच नव्याने अभ्यासक्रमात वाचले तेंव्हा रात्री आपण रहात आहोत तेथे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याचे स्वप्न पडले होते आणि झोपेतच रडुन घरच्यांना नको केल्याचे अजुनही स्मरतेय..........
"अनामिका"
लहानपणी ( म्हणजे मी २-३ री मध्ये असेन), तेव्हा माझ्यासह सर्व मित्राना हा प्रश्न पडला होता की लग्न झाल्यावरच बाळ का होते? (म्हणजे तेव्हातरी तसाच समज होता.). तेव्हा माझ्या एका आत्याचे नुकतेच लग्न झाले होते. आणि मी तिला दुसर्या घरी (सासरी) रहायला जाताना पाहिले होते. ते मी सर्वाना सांगीतले. आम्ही ही चर्चा शाळेपासुन घरी चालत येइपर्यन्त करत होतो. आणि शेवटी हा निष्कर्श काढला. खाणेपिणे बदलले, जागा बदलली कि पित्ताने उलटी होते हे ऐकले होते, आणि चित्रपटात बाळ होण्याच्या आधिपण उलटी होते.. मग आम्ही सर्वानी मिळुन काढलेला निष्कर्श असा - " दुसर्या घरी गेल्यावर खाणे पिणे बदलते, तसेच काही सवयीही बदलतात. याचा परिणाम म्हणुन बाळ होते". आता आठवले की जाम हसु येते..
लेख छान जमला आहे..आणि सगळ्यानकडून प्रतिक्रिया सुद्धा छान मिळाल्या आहेत्...
माझी पण एक समजूत होती म्हणजे.. सिनेमात गाण्यावर नाचणारी/नाचणारा नट/ नटी हीच गात असते. मग एकदम तीला /त्याला सगळं कसं अगदी नीट येतं असं वाटायचं.
गाण्यामधे नेहमीच नट आणि नटी प्रत्येक कड्व्याला वेगवेगळया कपड्यात दिसायचे आणि नेहेमी प्रश्न पडायचा की हे लोक इतक्या पटकन कसे काय कपडे बदलून येतात?
:))
अश्विनि.
पृथ्वी गोल आहे व ती स्वतः भोवती फिरत असते हे ऐकल्यावर पहिला प्रश्न मनात आला की मग आपण पडत कसे नाही?
असा प्रश्न मलाही पडला होता त्यावेळी माझ्या आजोबांनी सांगीतले की ,पृथ्वी फिरल्यावर रात्र होते आणि आपण झोपतो म्हणुन पडत नाही. खुप खरे वाटले मला.
माझी मुलगी वय ३ वर्ष्,मी तिला बदाम खायला देते तिने मला विचारले आई बदाम खाल्यावर काय होत?
मी म्हणाले की बुध्दी वाढते.
तिचा प्रश्न बुध्दी कुठ असते?
मी सांगितले की डोक्यात.
मग तिने विचारले, आई बुध्दी खुप वाढली की कापुन टाकायची का?
मी :S
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
माझे सारे गैरसमज साधारण असेच होते ..
झकास लेख आणी प्रतीक्रिया !!! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
वा!!! छान विषय चर्चिला जातोय.
आई-पप्पा सकाळीच ऑफिसला जायचे. तेव्हा मला वाटायचं की ऑफिसमधे काम म्हणजे नुस्ती पानं लिहून भरवायची आणि ती फाईलला जोडायची. ज्याचे आई/पप्पा सगळ्यात जास्त पानं भरवतात त्यांना सगळ्यात जास्तं पैसे मिळत असणार. एकदा घरी पैशाची चणचण होती तेव्हा एका दुपारी मी माझी दुरेघी वही नुस्ते गोळे गोळे काढून भरवली आणि आईला दिली. म्हणालो की जाऊन तुझ्या ऑफिसमधे दे म्हणजे जास्त पैसे मिळतील. डोळ्यात अचानक आलेलं पाणी लपवत आईनी जवळ घेतलं आणि हसून म्हणाली "वेड्या असे थोडीच पैसे मिळतात?"
माझा एक लांबचा आत्येभाऊ आहे. लहानपणी तो आम्हाला काय वाट्टेल त्या फेका मारायचा. लहानपणी मी तीन चाकी सायकलवरुन फार हिंडायचो. तो भाऊ एक दिवस म्हणाला की अरे ही चालवायला तुला पायडल मारावं लागतं. एक सायकल बनवतोय मी सध्या. तुझ्या ह्या सायकलपेक्षा मोठी. वाटेल ते सामान बसेल त्याच्यात आणि कुठे पण जाता येईल त्याच्यातून - इंग्लंड, अमेरीका. मी विचारलं, "अरे बापरे!!! येवढ्या लांब? मी नाही बाबा पायडल मारणार येवढ्या वेळ". त्यावर तो म्हणाला "अरे येड्या!!! ती पाण्यावर चालेल. तुमची टीव्हीएस फिफ्टी जशी पेट्रोलवर चालते ना तशी आपली सायकल पाण्यावर चालेल. पाणी फुकटच मिळतं. अगदी डबक्यातलं पाणी सुद्धा चालेल आपल्या सायकलला". हे ऐकून मी एवढा हरखून गेला होतो की बास!!! नुस्ती स्वप्नं रंगवायचो मी तेव्हा. तो भाऊ भेटला की मी प्रत्येकवेळी विचारायचो "बनली का रे ती सायकल? " त्यावर त्याचं एकच उत्तर "येडाये का रे तू? गम्मते होय अशी सायकल बनवणं? वेळ लागतो त्याला." कित्येक वर्ष मी त्या सायकलची वाट पहात राहलो आणि मोठं झाल्यावर तो फेकत होता हे लक्षात आलं.
Finally I will be so matured that I will react to nothing.
च्या मारी!
हा विषय पुन्हा चर्चेला आलेला पाहून गंमत वाटली. शिवाय, स्वतःच्या बालपणीच्या आठवणींत रमण्यापेक्षा लोक आपल्याच पोरांची कौतुकं सांगताहेत. चालू द्या! :)
सगळ्यांचेच आत्तेभाऊ फेकू असतात का? >:P
माझा आत्तेभाऊ पण अशाच फेका मारायचा. तो मुंबईचा आणि मी गरीब बिच्चारा रत्नागिरीचा असल्यानं मला सगळंच खरं वाटायचं. तो म्हणजे, टाटा-बिर्लांच्या अंगाखांद्यावर खेळल्यासारखाच वाटायचा मला! तशीच बंडलं मारायचा. रत्नागिरीत आला, तरी जी कुठली सगळ्यात भारी गाडी दिसेल, त्या गाडीनंच आलो, असं सांगायचा. त्याची फेकूगिरी उशीरा कळली. असो.
माझ्या आजोळी धान्याचं कोठार होतं. धान्याचं म्हणजे - भाताचं. एक भलीमोठी लाकडी पेटी होती. जवळपास सहा फूट उंचीची आणि सात-आठ फूट रुंद. त्यात "भात' ठेवलं जायचं. मला खूप वर्षं वाटत होतं, एवढा "भात' (म्हणजे शिजवलेले तांदूळ) त्यात कशाला करून ठेवत असतील? एवढा भात लागतो कुणाला? आणि टिकतो तरी कसा एवढे दिवस? :SS खूप उशीरा या रहस्याचा उलगडा झाला.
आता माझ्या मुलीचं कौतुक!
कालच स्वयंपाकघरात बसवण्यासाठी एक छोटा पंखा घ्यायला गेलो होतो. (स्त्रीहट्ट! काय करणार?) पासोड्या विठोबाजवळच्या "बिजली' दुकानात मी व बायको आधी पोचलो. आमची कन्या रमत-गमत मागाहून आली. दारात पाऊल टाकल्या टाकल्या वर लटकवलेल्या पंख्यांकडे तिची नजर गेली.
""बाबा, इथे नको पंखे घ्यायला! इथे सगळे अर्धे पंखे आहेत. चला, आपण दुसरीकडे जाऊ!'' पोरीनं आल्याआल्या दुकानदारांची अब्रू काढली. @)
तिथे "डिस्प्ले'साठी लावलेल्या पंख्यांना प्रत्येकी एकेकच पाती होती. ती बघून, तिची तल्लख बुद्धी जागृत झाली होती! सुदैवाने, दुकानदारही (अभावानेच!) विनोदबुद्धीसंपन्न असल्याने आम्ही सगळे हसलो.
मी सिग्नल कधी तोडत नाहीच, पण लाल सिग्नलला थांबायचंच, असा मनस्वीचा कडक नियम! त्यामुळे कधी चुकून लाल सिग्नल असताना डावीकडेही वळलो, तरी तिच्याकडून मोठं प्रवचन ऐकायला लागतं. मग तिची समजूत घालताना नाकी नऊ येतात. तरीही, रस्त्यावर थुंकणारे लोक, गाडी जोरात चालवणारे, सिग्नल नसताना पुढे जाणारे, पांढऱ्या पट्ट्याच्या पुढे चालणारे, यांच्या "अपराधां'चं परिमार्जन आम्हालाच (वेगवेगळी कारणं सांगून) करायला लागतं! :(
मला लहानपणी नेहमी पडणारा प्रश्न-- सूर्य रोज सकाळी पूर्वेला उगवतो आणि संध्याकाळी पश्चिमेला मावळतो.संध्याकाळी पश्चिमेला गेलेला सूर्य दुसर्या दिवशी परत पूर्वेला कसा उगवतो? त्याला रात्रीत पश्चिमेकडून पूर्वेला कोण घेऊन जात असेल?
---विल्यम जेफरसन क्लिंटन
प्रतिक्रिया
अगदी तसेच
चंद्राचे बाबा कोण?
हा हा
नक्कीच
साधारण
आठवतात पण
इयत्ता ७वी
झाड
मला आठ्वतय
लहानपणी (
तुमच्याही
ही.. ही ..ही...
पृथ्वी गोल
>>मग तिने
झकास !!
वा!!! छान
..
हा हा हा...
लहानपणी पडणारा प्रश्न