टोपण नांवे

अरुण वडुलेकर's picture
अरुण वडुलेकर in काथ्याकूट
8 Mar 2009 - 7:01 pm
गाभा: 

मिपावर किंवा अन्यत्रही लेखन करणारे टोपण नांवाने कां लिहितात?

प्रतिक्रिया

घाटावरचे भट's picture

8 Mar 2009 - 7:04 pm | घाटावरचे भट

टोपण नावें घेऊन वादग्रस्त विधाने करणें सोपें असते, म्हणून.... :)

विंजिनेर's picture

8 Mar 2009 - 7:08 pm | विंजिनेर

टोपण नावाने वायफळाचा मळा सहजी पिकविता येतो म्हणुन.
(आणि त्या वायफळाचं नंतर घातलेलं "लोणचं" हे "उपवासाच्या थालीपीठाबरोबर" उत्तम लागतं ;))

अविनाशकुलकर्णी's picture

8 Mar 2009 - 8:04 pm | अविनाशकुलकर्णी

टोपन नावाने लिहिणे हा फार जुना प्रकार आहे..उदा..
केशवसुत,
कुसुमाग्रज
केशव्कुमार
माधव ज्युलियन
गोविंदाग्रज
ईईईई

भडकमकर मास्तर's picture

8 Mar 2009 - 8:11 pm | भडकमकर मास्तर

अहो, खूप मजा असते...
करून बघा...

आपल्याच लेखनाला प्रतिसाद देऊन लेख जालीय सागरात तरंगवायला त्याचा उपयोग करणे , हा टोपणनावाचा सर्वात साधा उपयोग...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

8 Mar 2009 - 10:04 pm | प्रकाश घाटपांडे

नावाला टोपण असले कि कसे सुरक्षित वाटते बरे!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

जृंभणश्वान's picture

9 Mar 2009 - 12:16 am | जृंभणश्वान

टोपणनाव घेतले की आपण कोणतरी लय भारी, मोठ्ठे, फेमस, हुशार वगैरे वगैरे असल्यासारखे वाटते.
-निदान मलातरी :)