Skip to main content

मी

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 08/03/2009 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
मी मुक्त तरीही बन्धनात मी फुलाफुलाच्या स्पन्दनात मी मंद ज्योत ती मीच तेवती, विरघळणा-या चन्दनात मी कधी मीरेची एकतारी मी कधी राधेच्या मन्थनात मी वससी माझ्या अंतरात तू, अविरत तुझिया चिंतनात मी कळी पाकळी फुलवित जाते जणु भ्रमराच्या गुन्जनात मी पारिजातकापरी शिंपिले सौख्य तुझ्या रे अंगणात मी तुझ्या प्रीतीचा चन्द्र जडविला नक्षत्रांच्या कोंदणात मी भाग्यदैवता, तुलाच जपले भाळावरच्या गोंदणात मी! महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1498
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

>> मुक्त तरीही बन्धनात मी फुलाफुलाच्या स्पन्दनात मी मंद ज्योत ती मीच तेवती, विरघळणा-या चन्दनात मी 'विरघळणार्‍या' ऐवजी 'झिजणार्‍या' म्हणायचे होते का ? सही /- आगरी बोली - आगरी बाना.

सुंदर..! खुप छान लिहीता.. विरघळणा-या शब्दच योग्य वाटतो..!

विरघळणे हा शब्द एकजीव होणे, एकरूप होणे या अर्थाने वापरला आहे. झिजणे हा थोडा एकतर्फी किंवा त्रासदायक प्रकार वाटू शकतो ना गृहिणीच्या संदर्भात! [मी एकटीच झिजते या घरासाठी! बाकी कुणाला काय त्याच? वगैरे वगैरे!] क्रान्ति