हो ते आहेच.
लहान मुलांना समजावून सांगणं म्हणजे अवघड काम असतं.
मित्र आजकाल खेळायला का थांबत नाही?
त्याचे बाबा घरी का असतात?
ते आजारी आहेत का?
अश्या प्रश्नांची उत्तरं देणं अवघड असतं ("माझी आई असं सांगत होती" असं त्याला जाऊन सांगायलाही कमी करत नाहीत.)
माझ्या मैत्रिणीच्या मुलानं बाहेर जाऊन सगळ्यांना सांगितलं की आजकाल आई बाबा बरीच भांडणं करतात.
हे सगळं बघून मुलांच्या प्रश्नाला योग्य उत्तर शोधून काढताना नाकी नऊ येतात.
रेवती
हा धागा टाकताना एका पालकांने विचारलेला प्रश्न डोक्यात घोळत होता.
एक मुलगा १० वीत. दुसरी मुलगी ४ थीत.
मुलगी सारखे प्रश्न विचारते.
बाबा आता मॅक्डोनाल्ड ला का नेत नाहीत.
आईस्क्रिम का आणत नाहीत.
गाडीने फिरायला का नेत नाहीत.
ह्या वर्षी दिवाळीला कपडे का आणले नाहीत.
तु पहिल्यासारखी हसत का नाहीस.
आता ह्याला मी काय उत्तर देणार.
नोकरी जाऊ शकते. अशीच परिस्थिती कायम राहील असे नाही पण कधीतरी कठिण काळ येऊ शकतो.
आपल्याला वाटते त्यापेक्षा मुले समंजस आणि शहाणी असतात! त्यांना बरेच कळते. आईबाप आपल्याला विश्वासात घेऊन सांगताहेत म्हटल्यावर मुलेही समजून घेऊ शकतात.
जेव्हा परिस्थिती सुधारेल त्यावेळी परत आपण नवीन गोष्टी घेऊ शकतो एवढे समजले म्हणजे झाले.
ही आठवण/सवय मुलांना त्यांच्या मोठ्या वयात उपयोगी पडते. परिस्थिती वाईट आली तर आपण ह्यातून पूर्वी कधीतरी गेलोय त्यावेळी जीवनशैलीत केलेले बदल त्यांना मार्गदर्शक ठरु शकतात. असा अनुभव धक्क्याची तीव्रता कमी करतो हे निश्चित!
चतुरंग
>>हे माझे हौशी मत प्रदर्शन आहे. पंगतीत बसल्यावर अर्धी लाकडं पोचलेली म्हातारी उखाणा घेते तसंच.<<
हा हा .. हे मस्तंच !
चर्चा छानच आहे.. उद्बोधक आहे.
-- लिखाळ.
अजुन पिक्चर खुप बाकी आहे.
हा सुर मंदी वरच्या चर्चेत बर्याच ठीकाणी दीसतो. म्हणजे परीस्थीतीती अजुन वाईट कशा प्रकारे होउ शकते हे कोणी सांगु शकेल का ? का हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे .
प्रतिक्रिया
हो ते
अगदि बरोबर
धागा
जमेल तसे सांगायला पाहिजे की
>>हे माझे
रामदास
+१ सहमत काकांचे बरोबर आहे.
अजुन
प्रश्न इतकाच आहे की
१+