मागे कधीतरी मोठा थोरला मराठी ग्रंथ हाती लागला होता, दुर्दैवाने ग्रंथाचे नाव आणि काहीच आठवत नाही. लेखक सातवळेकर किंवा असेच काही होते का असे वाटते (पण आठवत नाही). परंतु त्यात सर्व जातींची वैशिष्ट्ये आणि ते लोक मूळ कुठून आले असतील त्यासंबंधीचे तर्क होते असे आठवते. ग्रंथाची माहिती असल्यास जाणत्यांनी प्रकाश पाडावा.
भारतीय संस्कृतीचा इतिहास या नावाचे सातवळेकरांचे एक पुस्तक पाहिलेले समरते (वाचलेले नाही.)
सुनिलराव,
आपला लेख छानच आहे. आणि प्रतिसाद सुद्धा भारी. ही सर्व चर्चा पुन्हा एकदा निवांत वाचाविशी वाटते आहे.
-- लिखाळ.
अपेक्षेप्रमाणेच मूळ लेखापेक्षाही काही प्रतिक्रियांमधून अधिक रोचक आणि उद्बोधक माहिती मिळाली. किंबहुना, कुतुहल जागवणे हाच या लेखाचा मूळ हेतू असल्यामुळे, तो बर्याच प्रमाणात यशस्वी झाला असे म्हणायला हरकत नाही.
मानवी स्थलांतरांचे मुख्य्त्वे तीन भागांत वर्गिकरण करता येईल -
१) घाऊक स्थलांतर - ज्यात एखादा समाज संपूर्णपणे आपल्या मूळ स्थानापासून दूर होऊन अन्यत्र जातो.
२) किरकोळ स्थलांतर - ज्यात समाजाचा एखादा हिस्सा वेगळा होऊन दुसरीकडे जातो आणि मूळ समाजाशी त्याचा फारसा संबंध न उरलेल्यामुळे, एक वेगळा समाज म्हणून उदयास पावतो.
३) वैयक्तिक स्थलांतर - यांना सांप्रतच्या मराठीत "अनिवासी" असा शब्द आहे!!!
समाज हा व्यक्तींचा बनलेला असला तरी, एखाद्या व्यक्तीला लागू होणारे गुणविशेष समाजाला लागू होतातच असे नाही. म्हणूनच, वरीलपैकी तिसरा प्रकार हा वैयक्तिक स्थलांतराचा असल्यामुळे समाजाच्या स्थलांतरात मोडत नाही.
स्थितिशीलता हे समाजाचे वैशिष्ठ्य. अगदी न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या गृहितकाचा आधार घेऊन असे म्हणता येईल की, जोवर कोणतीही बाह्य शक्ती (अवर्षण, जुलुम्-जबरदस्ती, परकीय आक्रमण इ) कार्य करीत नाही, तोवर समाज ढिम्म हलत नाही!!!
सातवळेकरांच्या पुस्तकाचा उल्लेख वर आलाच आहे पण मला वाटते अत्रे यांच्या (आचार्य नव्हेत) गावगाडा ह्या पुस्तकातूनही बरीच रोचक माहिती मिळू शकेल. ही दोन्ही पुस्तके वाचण्याची इच्छा आहे, बघू या कधी योग येतो.
चर्चेत भाग घेतलेल्या सर्वाचे आभार!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
गावगाडा - आत्रे (अत्रे नव्हेत)
पुस्तक एक सर्वसाधारण जातींचा अंदाज येण्यासाठी उत्तम आहे. अगदी आजचा अभ्यास करायचा झाल्यास इतिहासात कुठल्या प्रथेचे मूळ कुठे आहे ह्याचा पर्स्पेक्टिव्ह यायला मदत करणारे आहे.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
मटा ने निवडलेल्या उत्तम १५० पुस्तकात त्रिंबक नारायण आत्रे यांचे गावगाडा आहे. वरदा बुक्स ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
कुमार केतकरांनी इथे त्याचा परिचय दिला आहे
मुक्त सुनीत ने हे पुस्तक वाचले आहे.
आता आपल्याला गावगाडा ई बुक स्वरुपात भविष्यात वाचता येईल. इथे पहा
खुप सुंदर पुस्तक आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
प्रतिक्रिया
ग्रंथ?
भारतीय
धन्यवाद!
गावगाडा -
गावगाडा - त्रिंबक नारायण आत्रे