सुक्ष्म बदल
"तुम्हाला 'रुटिन' चा कंटाळा येत नाही का हो सर" लिफ्ट मधे इती १२ वा माळा
वय वर्षे ३५ असलेल्याना सुद्धा रुटीन चा कंटाळा. तरी बरे दरवर्षी दोन वेळा ऑफिस खर्चाने भारत दर्शन नक्की असते. त्याला पण रुटीनमुळे कंटाळले की काय असा प्रश्न डोक्यात आला.
तसा रुटीन च्या कंटाळ्याबद्द्ल मला रुटीनली प्रश्न विचारला जातो. आणि मी सुद्धा रुटीन उत्तरे देतो.
१. रुटीन कुणाला चुकले आहे.
२. रुटीन मधेच आनंद शोधायचा. वगैरे वगैरे. असो.
काल चिरंजीवांचा २२ वाढदिवस. ऑफिसमधे बायकोचा फोन आला. येताना एक छोटा वॅनिला कप घेउन या. मी आईस्क्रीम टाळतो. घसा सांभाळावा लागतो. आज रात्री साधे फृट सॅलड मला आणि चिरंजीवांना आईस्क्रीम सकट असा बेत असणार ह्याची खात्री झाली. जेवण झाल्यावर समोर काहीतरी वेगळेच मिळाले.
मध्यम आकाराचे चिकू उभे कापलेले होते. वरची साल काढलेली होती. दोन्ही भाग टुथपीक ने जोडलेले होते. अख्खा चिकू एकाच वेळी खायची आज्ञा झाली.
मी निमुट्पणे टुथपीक ला धरुन तो चीकु तोंडात ढकलला. ३ ते ४ वेळा चावल्यावर तोंडात कधी न अनुभवलेली चव आली. चिरंजीव पण खुष. वेगळाच आयटम खाल्ल्याचा आनंद झाला.
चिकू सोलला होता. उभे दोन भाग करुन बी काढल्यावर त्यातील दोन्ही भागातील मोठा चमचा गर काढला होता. एक स्ट्रॉबेरी तशीच उभी कापुन चीकुच्या पोटात विभागलेली होती. परत तीच प्रक्रिया स्ट्रॉबेरीवर पण अजमावण्यात आली होती. स्ट्रॉबेरीच्या पोटात एका भागात मधात मॅरिनेट केलेली किश्मिस तर दुसर्या भागात वॅनिला आईस्क्रीम. आणि मग टुथपीकने परत जोडणी. धरतीवर स्वर्ग सुख मिळाले.
दुसर्या दीवशी सकाळी न्याहरी ला असाच सुक्ष्म बदल दिसला. कालवलेले पातळ पोहे. नेहेमीचे रुटीन. आदल्या दिवशी आणलेल्या शहाळ्याच्या पाण्यामधले थोडे पाणी पातळ पोह्यावर शिंपडून मग मसाल्याबरोबर कालवलेले होते. गुळाच्या ठीकाणी मधाचा प्रयोग झाला होता. पोहे ही डीश इतकी उंच पातळीवर जाते हे सांगुन विश्वास बसणार नाही. बरोबर होते केळ्याचे बन्स. मला बन्स आवडत नाही . "जरा खाउन बघा, वेगळे आहेत"- बायको
आता बन्स मधे काय वेगळे असणार. पीठामधे पिकलेले केळे घालुन केलेली पुरी ही माझी व्याख्या.
"अहो केळे नेहेमीचे. पण आज जरा बदल आहे. वेलची केळी घालुन केले आहेत. चार दिवसानी मोठी मद्रासी केळी घालुन करीन. बघा परत वेगळी चव लागेल." बायको. मी चेहेरा निर्विकार ठेउन बन्स खाल्ले. चव आवडली. नेहेमी पेक्षा वेगळी.
तीच ही न्याहरी, तेच ते जेवण जरा सुक्ष्म बदल केले तर वेगळ्याच पातळीवर जाते. हाच नियम इतर रुटीन ला लगु नाही काय?
जाता जाता: १२ व्या माळ्याला नेमक्या कुठल्या रुटीनचा कंटाळा आला आहे कुणास ठाउक?
वर्गीकरण
जाता जाता
In reply to जाता जाता by विसुनाना
सहमत
In reply to सहमत by श्रावण मोडक
+३ हेच
In reply to +३ हेच by दशानन
+४
In reply to +४ by गणा मास्तर
+६
In reply to +३ हेच by दशानन
रुटीन चेन्ज
हम्म. उगीच
In reply to हम्म. उगीच by अवलिया
३ पत्ती
In reply to ३ पत्ती by विनायक प्रभू
ब्लाईंड
+१ सहमत
वारंवार
In reply to वारंवार by रामदास
+१,
सद्यपरिस्थीति
आपल्या
In reply to आपल्या by रेवती
सेम असेच...
In reply to सेम असेच... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता
तै
In reply to तै by विनायक प्रभू
तैं शी
छान लेख ...
In reply to छान लेख ... by लिखाळ
+१
विप्र, मस्त लेख!
In reply to विप्र, मस्त लेख! by चतुरंग
हं बोलून
रयवार
छापील
विप्र
नेहमीच्या प्रभू श्टाईलमधला लेख..
निर्विकारस्वामी
चिकूची रेसिपी