दुवा

आनंदयात्री जनातलं, मनातलं
आज अखेर तुझ्या न माझ्यातला अखेरचा दुवा पण निखळला. ते तोंडपाठ असलेले दहा आकडे. गायत्री मंत्रापेक्षा जास्त वेळा म्हटलेले. सकाळी एकमेकांना कॉल करुन उठवण्यापासुन ते गुड नाईटच्या एसेमेस पर्यंतचे तसेच रोजच्या सप्तरंगी प्रवासाचे सोबती ते दहा आकडे .. आज निखळले. एकतर्फी संपर्काचा शेवटचा पुल पण ढासळला. हे तुला पुन्हा गमावण्याइतकेच त्रासदायक, उखडुन टाकणारे. नवा नंबर तुला कळवावा की नाही या विचारातच मला डोळा लागावा अन मी येउन पोहचावा स्वप्नांच्या धुसर निळसर आभासी जगात ! आता एरवी मला अप्राप्य अशी तु अगदी हाताच्या अंतरावर येउन पोहचावी. तुझ्या हातात असावी एक सुरेख शुभ्र हस्तिदंती लहानशी पेटी. तु त्या पेटीला माझ्याकडे पाहुन मला लक्षात येईल असे हृदयाशी कुरवाळावे अन कुतुहलाने मी दंग होत जावा. स्मृती जागी व्हावी अन आठवावा कुठल्यातरी दुकानात त्या पेटीसाठी तु केलेला हट्ट .. हो तीच ती ! माझ्या चेहर्‍यावर ओळखीचे स्मित उमटावे, तुलाही त्याच आठवणीची मला लागलेली ओळख पटुन तुही हर्षभरीत व्हावीस. त्यात आता तु तुझा खाशा महत्वाचा एवज जपुन ठेवलेला असावा. वाळलेल्या फुलाची दांडी, तु अन मी एकत्र लावलेल्या पणतीतली अर्धवट जळालेली वात, कुठल्याश्या चॉकलेटची चमकी, टिचभर कागदाच्या चिठोर्‍यावर खरडुन लिहलेलं ३ ओळींच पहिलं पत्र, माझा कधीकाळचा शाळाकरी वयातला जुनाट पिवळा पडलेला ब्लॅक अन व्हाईट पासपोर्ट साईजचा फोटो अन असेच बरेच काही. कचरा म्हणुन सहज फेकवले जाणारे. आपल्यासाठीचा हळुवार, खोडकर तरी कधी टोचणार्‍या आठवणींचा खजिना ! त्या पेटीतला तो एवज पाहुन माझे मन आनंदाने उचंबळुन यावे. आता हाच आपला संपर्क असे जणु तुला सुचवायचे असावे. तु अबोलच रहावीस अन अबोलच गुप्त व्हावीस त्या आठवणींचा खजिन्यासकट.
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी; हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा ! कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन्‌ कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा !
वर्गीकरण
लेखनप्रकार

40 टिप्पण्या 9,005 दृश्ये

Comments

ज्ञ नवीन

तुमचा पाकीट का काय म्हणतात ते हरवला काय हो... :(

बिपिन कार्यकर्ते नवीन

स्साला!!!! वाईट. बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन नवीन

In reply to by बिपिन कार्यकर्ते

दरवेळी काय प्रतिक्रीया द्यावी हे ठरवताना ज्याम त्रास होतो. अगदी अ-प्र-ति-म जमला आहे हा लेख ... >>स्साला !!!! वाईट ..! +१, असेच म्हणतो ... च्यायला यात्री, तु लै नादखुळं लिहतोस बे. पुलेशु. ------ छोटा डॉन

बिपिन कार्यकर्ते नवीन

In reply to by छोटा डॉन

दरवेळी काय प्रतिक्रीया द्यावी हे ठरवताना ज्याम त्रास होतो.
खरंय. आणि असं काही वाचलं की फार काही लिहावंसं पण वाटत नाही. बिपिन कार्यकर्ते

ब्रिटिश टिंग्या नवीन

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सुरेख जमलाय!

मैत्र नवीन

In reply to by ब्रिटिश टिंग्या

जबरदस्त... आणि त्याला तसाच सही शेवट भटांच्या ओळींचा... रंग तुझा वेगळा आंद्या !

दशानन नवीन

In reply to by मैत्र

सही आंद्या ! खुपच सुरेख लिहले आहे.. ! जख्मी दिल से पुछो... हाल काय है.. दिल का ! *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

अस्मी नवीन

In reply to by छोटा डॉन

मलाही वाचल्यावर क्षणभर काय लिहाव हे समजलच नाही... अतिशय सुंदर :) - अस्मिता *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.

शितल नवीन

आनंदयात्री, खुपच हळवे करणारे लिखाण आणि राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी; हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा ! कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन्‌ कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ! ह्या ओळी तर अप्रतिम. बरेच दिवसांनी तुझी लेखणी चालली :)

प्राजु नवीन

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१ हेच म्हणते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वल्लरी नवीन

In reply to by प्राजु

+२ हेच म्हणते. ---वल्लरी

लिखाळ नवीन

छान स्फुट.. शेवटचा सुरेश भटांचा शेर जबर्‍या... -- लिखाळ.

टिउ नवीन

हे असलं काही लिहिण्याआधी डिसक्लेमर का काय म्हणतात ते टाकत जा बॉ...जीवाला लय त्रास होतो असं वाचल्यावर!

नीलकांत नवीन

आंद्या, नेहमी सारखंच झकास लिहीलंस रे. खुप दिवसांनी तुझं लेखन वाचलंय. चटका लावायचं काही सोडणार नाहीस तू. नीलकांत

इनोबा म्हणे नवीन

In reply to by नीलकांत

नेहमी सारखंच झकास लिहीलंस रे. खुप दिवसांनी तुझं लेखन वाचलंय. चटका लावायचं काही सोडणार नाहीस तू. नेहमीप्रमाणे सहमत आहे. परवा कर्वे रोडच्या हाटीलातसुद्धा एकाला असाच चटका लावला होता आंद्याने....बिडीफुक्या कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विसोबा खेचर नवीन

वाळलेल्या फुलाची दांडी, तु अन मी एकत्र लावलेल्या पणतीतली अर्धवट जळालेली वात, कुठल्याश्या चॉकलेटची चमकी, टिचभर कागदाच्या चिठोर्‍यावर खरडुन लिहलेलं ३ ओळींच पहिलं पत्र, क्या बात है! यात्रीचं नेहमीप्रमाणे छोटेखानी परंतु अप्रतीम स्फूट! जियो.. तात्या. बाय द वे यात्री, ही असली भावविभोर स्फूटं खरडत असतोस, लग्नाचं बघ बुवा आता! :) आपला, नाथा कामत! :)

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by विसोबा खेचर

वाळलेल्या फुलाची दांडी, तु अन मी एकत्र लावलेल्या पणतीतली अर्धवट जळालेली वात, कुठल्याश्या चॉकलेटची चमकी, टिचभर कागदाच्या चिठोर्‍यावर खरडुन लिहलेलं ३ ओळींच पहिलं पत्र, आंद्याला इजाजत मधला गुलजार चावला. (आता आंद्याला राखी मिळणार ;-) (तरी बरं, एका मळकट रेनकोटात अर्धे अर्धे भिजत होतो वगैरे भंकस नाय लिवली. एका रेनकोटात आंद्या स्वतःच मावत नाही, तिथे ही दुसरी स्त्री कशी मावणार ?) -- सर्किट

चतुरंग नवीन

(खुद के साथ बातां : रंगा, ह्या यात्रीने स.त.कुडचेडकरांचे 'केतकी पिवळी पडली' वाचलेले दिसते! :? ) चतुरंग

धनंजय नवीन

मोबाइल बदलताना जपून ठेवलेले सगळे क्रमांक दिसतात, आणि मनाची चलबिचल होते. (कधीकधी नाव बघून वाटते "हा कोण बरे होता?") कुण्या खास व्यक्तीबद्दलचा हा शेवटचा दुवा तुटताना किती भावना मनात येतात त्याचे प्रकटन सुरेख केले आहे आनंदयात्री यांनी.

वजीर नवीन

फार सेन्टी लिहिले आहे. जख्म् फार खोलवर दिसते तुमचि. -- वजीर

सहज नवीन

आंद्या यार, हज़ारों ख्वाहिशें ऐसी ..., आकाश से गिरी मैं, इक बार कट के ऐसे .., अंकुर, कॅनव्हास आणी हा दुवा. एक दर्जेदार संग्रह बनत चालला आहे. खरच ते कॉपीराईटचे काय ते बघ. सॅड साँग्जचे जसे चाहते असतात तसे अश्या लेखनाचे देखील असतील. मुक्तसुनित अश्याप्रकारच्या लेखनाला काय म्हणतात हो? व्हलेंटाईनच्या मुहुर्तावर हे देखील छान!

मिंटी नवीन

आंद्या अरे किती ते हळवं लिखाण रे......... छ्या... या अश्या विषयांवरच्या लेखांना प्रतिक्रिया पण काय द्यावी ते सुचत नाही...... खुप दिवसांनी एवढं चांगलं काहितरी वाचलं यार...... असो. तात्यांनी वर म्हणल्याप्रमाणे आता लग्नाचं काहितरी बघ बाबा..... ;) असंच छान छान कायम लिहित रहा....... :)

महेंद्र (verified= न पडताळणी केलेला) नवीन

सुंदर!!! अप्रतिम..

मृगनयनी नवीन

In reply to by महेंद्र (verified= न पडताळणी केलेला)

त्यात आता तु तुझा खाशा महत्वाचा एवज जपुन ठेवलेला असावा. वाळलेल्या फुलाची दांडी, तु अन मी एकत्र लावलेल्या पणतीतली अर्धवट जळालेली वात, कुठल्याश्या चॉकलेटची चमकी, टिचभर कागदाच्या चिठोर्‍यावर खरडुन लिहलेलं ३ ओळींच पहिलं पत्र, माझा कधीकाळचा शाळाकरी वयातला जुनाट पिवळा पडलेला ब्लॅक अन व्हाईट पासपोर्ट साईजचा फोटो अन असेच बरेच काही. कचरा म्हणुन सहज फेकवले जाणारे. :) खूप "टची" आहे. क्षणभर "देवदास" मधल्या शाहरुख आणि ऐश्वर्याच्या संवादाची आठवण आली. आपल्याकडून असे काही तरी "चांगले ", "निर्मळ" भावनांकित वाचायला मिळाल्याबद्दल धन्यवाद. :) आपण स्वतःला "बदनाम झंझावात" का म्हणवुन घेता, हे अम्मळ कळले आम्हाला! खूप दिवसांनी "देवचाफ्या"ची आठवण आली. :) अजून येऊ देत. (फक्त तेही असेच निर्मळ, पवित्र असू देत.....) :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

प्रकाश घाटपांडे नवीन

कुणाच्या वेदना कुणाचा विनोद असु शकतो. संवेदनक्षम काळात त्या हळव्या असतात नंतर त्याचा ईनोद होतो आन आपनच त्यावर हसतो. कारण रडक्या मुलाकडे सुरवातीला लक्ष देतात पण सारखाच रडायला लागला तर लोक दुर्लक्ष करायला लागतात.
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी; हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा ! कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन्‌ कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा !
सुंदर कविता चला दोस्त हो आयुष्यावर बोलु काही प्रकाश घाटपांडे

अनिल हटेला नवीन

In reply to by प्रकाश घाटपांडे

एकदम सहमत !! आंद्याभो यु आर ग्रेट !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

हळवा नवीन

मित्रा! तोडलंस रं ... एकदम हळवं केलसं बघ !!!

आनंदयात्री नवीन

In reply to by हळवा

चामारी कोण रं तु ?? आजच सहजराव आम्हाला खरडवहीत म्हणत होते की हळवा हा आयडी तुझ्याकरता राखुन ठेवला पाहिजे. अन तु आलास पण आयडी घेउन !!

सुनील नवीन

एकदम सेन्टी लेख! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पारिजातक नवीन

झक्कास !!!! पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!