दुवा
लेखनप्रकार
आज अखेर तुझ्या न माझ्यातला अखेरचा दुवा पण निखळला. ते तोंडपाठ असलेले दहा आकडे. गायत्री मंत्रापेक्षा जास्त वेळा म्हटलेले. सकाळी एकमेकांना कॉल करुन उठवण्यापासुन ते गुड नाईटच्या एसेमेस पर्यंतचे तसेच रोजच्या सप्तरंगी प्रवासाचे सोबती ते दहा आकडे .. आज निखळले. एकतर्फी संपर्काचा शेवटचा पुल पण ढासळला. हे तुला पुन्हा गमावण्याइतकेच त्रासदायक, उखडुन टाकणारे.
नवा नंबर तुला कळवावा की नाही या विचारातच मला डोळा लागावा अन मी येउन पोहचावा स्वप्नांच्या धुसर निळसर आभासी जगात ! आता एरवी मला अप्राप्य अशी तु अगदी हाताच्या अंतरावर येउन पोहचावी. तुझ्या हातात असावी एक सुरेख शुभ्र हस्तिदंती लहानशी पेटी. तु त्या पेटीला माझ्याकडे पाहुन मला लक्षात येईल असे हृदयाशी कुरवाळावे अन कुतुहलाने मी दंग होत जावा. स्मृती जागी व्हावी अन आठवावा कुठल्यातरी दुकानात त्या पेटीसाठी तु केलेला हट्ट .. हो तीच ती ! माझ्या चेहर्यावर ओळखीचे स्मित उमटावे, तुलाही त्याच आठवणीची मला लागलेली ओळख पटुन तुही हर्षभरीत व्हावीस.
त्यात आता तु तुझा खाशा महत्वाचा एवज जपुन ठेवलेला असावा. वाळलेल्या फुलाची दांडी, तु अन मी एकत्र लावलेल्या पणतीतली अर्धवट जळालेली वात, कुठल्याश्या चॉकलेटची चमकी, टिचभर कागदाच्या चिठोर्यावर खरडुन लिहलेलं ३ ओळींच पहिलं पत्र, माझा कधीकाळचा शाळाकरी वयातला जुनाट पिवळा पडलेला ब्लॅक अन व्हाईट पासपोर्ट साईजचा फोटो अन असेच बरेच काही. कचरा म्हणुन सहज फेकवले जाणारे. आपल्यासाठीचा हळुवार, खोडकर तरी कधी टोचणार्या आठवणींचा खजिना ! त्या पेटीतला तो एवज पाहुन माझे मन आनंदाने उचंबळुन यावे.
आता हाच आपला संपर्क असे जणु तुला सुचवायचे असावे. तु अबोलच रहावीस अन अबोलच गुप्त व्हावीस त्या आठवणींचा खजिन्यासकट.
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा !
वाचने
9005
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
तुमचा पाकीट का काय म्हणतात ते हरवला काय हो... :(
स्साला!!!! वाईट.
बिपिन कार्यकर्ते
In reply to स्साला!!!! by बिपिन कार्यकर्ते
दरवेळी काय प्रतिक्रीया द्यावी हे ठरवताना ज्याम त्रास होतो.
अगदी अ-प्र-ति-म जमला आहे हा लेख ...
>>स्साला !!!! वाईट ..!
+१, असेच म्हणतो ...
च्यायला यात्री, तु लै नादखुळं लिहतोस बे.
पुलेशु.
------
छोटा डॉन
In reply to +१ by छोटा डॉन
दरवेळी काय प्रतिक्रीया द्यावी हे ठरवताना ज्याम त्रास होतो.खरंय. आणि असं काही वाचलं की फार काही लिहावंसं पण वाटत नाही. बिपिन कार्यकर्ते
In reply to खरंय!!! by बिपिन कार्यकर्ते
सुरेख जमलाय!
In reply to +१ by ब्रिटिश टिंग्या
जबरदस्त... आणि त्याला तसाच सही शेवट भटांच्या ओळींचा...
रंग तुझा वेगळा आंद्या !
In reply to +१ by छोटा डॉन
मलाही वाचल्यावर क्षणभर काय लिहाव हे समजलच नाही...
अतिशय सुंदर :)
- अस्मिता
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.
आनंदयात्री,
खुपच हळवे करणारे लिखाण आणि
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा !
ह्या ओळी तर अप्रतिम.
बरेच दिवसांनी तुझी लेखणी चालली :)
In reply to सुंदर.... by शितल
या ओळी सुरेश भटांच्या !! :)
हम्म....
--अवलिया
हळवे लेखन, हळव्या आठवणी !
In reply to मस्त रे ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१ हेच म्हणते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
छान स्फुट.. शेवटचा सुरेश भटांचा शेर जबर्या...
-- लिखाळ.
In reply to छान स्फुट.. by लिखाळ
(सहमत)बेसनलाडू
हे असलं काही लिहिण्याआधी डिसक्लेमर का काय म्हणतात ते टाकत जा बॉ...जीवाला लय त्रास होतो असं वाचल्यावर!
प्रकाटाआ
आंद्या,
नेहमी सारखंच झकास लिहीलंस रे. खुप दिवसांनी तुझं लेखन वाचलंय. चटका लावायचं काही सोडणार नाहीस तू.
नीलकांत
In reply to झकास रे by नीलकांत
असेच म्हणतो.
शेखर
In reply to झकास रे by नीलकांत
नेहमी सारखंच झकास लिहीलंस रे. खुप दिवसांनी तुझं लेखन वाचलंय. चटका लावायचं काही सोडणार नाहीस तू.
नेहमीप्रमाणे सहमत आहे. परवा कर्वे रोडच्या हाटीलातसुद्धा एकाला असाच चटका लावला होता आंद्याने....
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपरछान!!!
वाळलेल्या फुलाची दांडी, तु अन मी एकत्र लावलेल्या पणतीतली अर्धवट जळालेली वात, कुठल्याश्या चॉकलेटची चमकी, टिचभर कागदाच्या चिठोर्यावर खरडुन लिहलेलं ३ ओळींच पहिलं पत्र,
क्या बात है! यात्रीचं नेहमीप्रमाणे छोटेखानी परंतु अप्रतीम स्फूट! जियो..
तात्या.
बाय द वे यात्री, ही असली भावविभोर स्फूटं खरडत असतोस, लग्नाचं बघ बुवा आता! :)
आपला,
नाथा कामत! :)
In reply to वाळलेल्या by विसोबा खेचर
वाळलेल्या फुलाची दांडी, तु अन मी एकत्र लावलेल्या पणतीतली अर्धवट जळालेली वात, कुठल्याश्या चॉकलेटची चमकी, टिचभर कागदाच्या चिठोर्यावर खरडुन लिहलेलं ३ ओळींच पहिलं पत्र,
आंद्याला इजाजत मधला गुलजार चावला. (आता आंद्याला राखी मिळणार ;-)
(तरी बरं, एका मळकट रेनकोटात अर्धे अर्धे भिजत होतो वगैरे भंकस नाय लिवली. एका रेनकोटात आंद्या स्वतःच मावत नाही, तिथे ही दुसरी स्त्री कशी मावणार ?)
-- सर्किट
(खुद के साथ बातां : रंगा, ह्या यात्रीने स.त.कुडचेडकरांचे 'केतकी पिवळी पडली' वाचलेले दिसते! :? )
चतुरंग
मोबाइल बदलताना जपून ठेवलेले सगळे क्रमांक दिसतात, आणि मनाची चलबिचल होते. (कधीकधी नाव बघून वाटते "हा कोण बरे होता?")
कुण्या खास व्यक्तीबद्दलचा हा शेवटचा दुवा तुटताना किती भावना मनात येतात त्याचे प्रकटन सुरेख केले आहे आनंदयात्री यांनी.
फार सेन्टी लिहिले आहे. जख्म् फार खोलवर दिसते तुमचि.
-- वजीर
तोडलस रे भौ!
अतिशय हळवं लिखाण...
अनामिक
आंद्या यार, हज़ारों ख्वाहिशें ऐसी ..., आकाश से गिरी मैं, इक बार कट के ऐसे .., अंकुर, कॅनव्हास आणी हा दुवा. एक दर्जेदार संग्रह बनत चालला आहे. खरच ते कॉपीराईटचे काय ते बघ. सॅड साँग्जचे जसे चाहते असतात तसे अश्या लेखनाचे देखील असतील.
मुक्तसुनित अश्याप्रकारच्या लेखनाला काय म्हणतात हो?
व्हलेंटाईनच्या मुहुर्तावर हे देखील छान!
आंद्या अरे किती ते हळवं लिखाण रे......... छ्या... या अश्या विषयांवरच्या लेखांना प्रतिक्रिया पण काय द्यावी ते सुचत नाही...... खुप दिवसांनी एवढं चांगलं काहितरी वाचलं यार...... असो. तात्यांनी वर म्हणल्याप्रमाणे आता लग्नाचं काहितरी बघ बाबा..... ;)
असंच छान छान कायम लिहित रहा....... :)
सुंदर!!! अप्रतिम..
In reply to सुंदर!!! by महेंद्र (verified= न पडताळणी केलेला)
त्यात आता तु तुझा खाशा महत्वाचा एवज जपुन ठेवलेला असावा. वाळलेल्या फुलाची दांडी, तु अन मी एकत्र लावलेल्या पणतीतली अर्धवट जळालेली वात, कुठल्याश्या चॉकलेटची चमकी, टिचभर कागदाच्या चिठोर्यावर खरडुन लिहलेलं ३ ओळींच पहिलं पत्र, माझा कधीकाळचा शाळाकरी वयातला जुनाट पिवळा पडलेला ब्लॅक अन व्हाईट पासपोर्ट साईजचा फोटो अन असेच बरेच काही. कचरा म्हणुन सहज फेकवले जाणारे.
:)
खूप "टची" आहे. क्षणभर "देवदास" मधल्या शाहरुख आणि ऐश्वर्याच्या संवादाची आठवण आली.
आपल्याकडून असे काही तरी "चांगले ", "निर्मळ" भावनांकित वाचायला मिळाल्याबद्दल धन्यवाद.
:)
आपण स्वतःला "बदनाम झंझावात" का म्हणवुन घेता, हे अम्मळ कळले आम्हाला!
खूप दिवसांनी "देवचाफ्या"ची आठवण आली.
:)
अजून येऊ देत. (फक्त तेही असेच निर्मळ, पवित्र असू देत.....)
:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
कुणाच्या वेदना कुणाचा विनोद असु शकतो. संवेदनक्षम काळात त्या हळव्या असतात नंतर त्याचा ईनोद होतो आन आपनच त्यावर हसतो. कारण रडक्या मुलाकडे सुरवातीला लक्ष देतात पण सारखाच रडायला लागला तर लोक दुर्लक्ष करायला लागतात.
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी; हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा ! कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा !सुंदर कविता चला दोस्त हो आयुष्यावर बोलु काही प्रकाश घाटपांडे
In reply to वेदने तुन विनोदा कडे by प्रकाश घाटपांडे
एकदम सहमत !!
आंद्याभो यु आर ग्रेट !!! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
मित्रा! तोडलंस रं ...
एकदम हळवं केलसं बघ !!!
In reply to जबरा!!! by हळवा
चामारी कोण रं तु ??
आजच सहजराव आम्हाला खरडवहीत म्हणत होते की हळवा हा आयडी तुझ्याकरता राखुन ठेवला पाहिजे. अन तु आलास पण आयडी घेउन !!
In reply to जबरा!!! by हळवा
आंद्या ! तोडलंस रं ...
एकदम हळवं केलसं बघ !!!
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
एकदम सेन्टी लेख!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सुहास..
मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
झक्कास !!!!
पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!
पाकीट