मृगजळामागे धावत राहिलो
वाळूचे इमले बांधत राहिलो
लाटेकडे दुर्लक्ष झाले अन्
चुकले हिशेब मांडत राहिलो
सुखांच्या बेरजा करता करता
समाधान वजा करत राहिलो
पत्त्यांचा बंगला सावरण्यासाठी
वार्याला विरोध करत राहिलो
पुढे जायचे अन् पुढेच जायचे
मागचे सारे विसरत राहिलो
काय सापडले माहीत नाही
खूप काही हरवून बसलो
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1903
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान कल्पना