Skip to main content

(ही 'तिची' माझीच आहे गोष्ट अन...)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 27/01/2009 02:35 या दिवशी प्रकाशित केले.
अनिरुद्ध अभ्यंकरांची 'ही तुझी माझीच आहे गोष्ट पण...' ही सुंदर गजल कालपासून मनात रुंजी घालत होती आणि आज शेवटी समर्पक शब्द सापडताच आम्ही कान पकडले! ;) गाल हा सारे खरे ते सांगतो याचसाठी चुंबने मी टाळतो बायको नडणार अंती जाणतो का तरी 'मीटिंग' मोठी ठेवतो? कोंडली मी वादळे पोटामधे गुरगुराटाने पहा घायाळतो! 'होल वावर, इज अवर' असता इथे मी कुणाची वाट कसली पाहतो! यायची असतेस तेव्हा का मला घोळ थोडा जाहल्यागत वाटतो एकही सीधा दिसेना प्रश्न मज, लाटण्याचा मग सुगावा लागतो! ही 'तिची' माझीच आहे गोष्ट अन कान मी पकडून आता सांगतो! मी इथे हल्ली गळ्यातच छानसा लेउन पट्टा चामड्याचा हिंडतो! चतुरंग
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2518
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

हह फुटलो ना.. :) >> गाल हा सारे खरे ते सांगतो याचसाठी चुंबने मी टाळतो >> बायको नडणार अंती जाणतो का तरी 'मीटिंग' मोठी ठेवतो? क्या बात है :)

=)) या स्मायलीला सार्थ करण्याची ताकद फक्त मिपा वरच पाहिली! ----------------------------------------------------- अपन को क्या...? दिल बोले, तो डन !

शान ........

>> गाल हा सारे खरे ते सांगतो याचसाठी चुंबने मी टाळतो >> बायको नडणार अंती जाणतो का तरी 'मीटिंग' मोठी ठेवतो यायची असतेस तेव्हा का मला घोळ थोडा जाहल्यागत वाटतो वा वा ......


गाल हा सारे खरे ते सांगतो याचसाठी चुंबने मी टाळतो बायको नडणार अंती जाणतो का तरी 'मीटिंग' मोठी ठेवतो? 'होल वावर, इज अवर' असता इथे मी कुणाची वाट कसली पाहतो! =)) हे सर्वात मस्त!

रंगाशेठ, विडंबन उत्तम.. काही ओळीत लयीत घोळ वाटतो आहे.. केशवसुमार.

In reply to by केशवसुमार

तो घोळ तूमच्यासाठीच केला आहे घुट्मळत रहा ... रंगा उत्तम विडंबन करतो तरि केश्या लैत घुटमळतो

हा एक रेकॉर्ड ब्रेक असावा. एकाच गझलेची ३-४ विडंबने! हे ही खूप मस्त. बायको नडणार अंती जाणतो का तरी 'मीटिंग' मोठी ठेवतो? पटलं! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/