महाराष्ट्रातील समाजवादी आणि कम्युनिस्ट राजकारणाची थोर परंपरा

मेथांबा's picture
मेथांबा in काथ्याकूट
25 Jan 2009 - 8:33 am
गाभा: 

सर्व कॉम्रेड्सना (कॉम्रेड म्हणजे मित्र हा पण अर्थ होतो) माझा लाल सलाम,

मी एक गिरणगावात वाढलेला सामान्य कम्युनिस्ट कार्यकर्ता. माझ्या लहानपणी मला एसेम जोशी, कॉ. श्रीपाद डांगे, कॉ. गुलाबराव गणाचार्य, कॉ. बी. टी. रणदिवे, कॉ. प्रमिला दंडवते, मृणालताई गोरे, कॉ. गंगाधर बुरांडे यांना जवळून पाहायची संधी लाभली. अतिशय निष्कलंक चारीत्र्याची माणसे ही, धुतल्या तांदळासारखी स्वच्छ.

जर महाराष्ट्रावर समाजवादी आणि कम्युनिस्ट यांची सत्ता येती तर आज महाराष्ट्र प्रगतीपथावर दिसला असता याचे मुख्य कारण म्हणजे डागविरहित समाज नेतृत्त्व. ही लोकं म्हणजे ५२ खणी हिरे होते हिरे. काय एकेकाचा आवाज, बोलण्याची हातोटी, माणसे जोडण्याची कला. वा वा. अतिशय सुंदर. परत एकावरही चुकुन पण कोणी भ्रष्टाचाराचा आरोप करु शकणार नाही. अजातशत्रु म्हणतात की काय तसं.

चला तर मंडळी, आपण एकत्र येऊन या थोर परंपरेचं पुनरुजीवन करुया.

सर्वांना लाल सलाम,
आपला,

मेथांबा

प्रतिक्रिया

विकास's picture

25 Jan 2009 - 9:13 am | विकास

प्रमिला देंडवते आणि मृणाल गोरे या कम्युनिस्ट होत्या? कधी असे ऐकलेले नाही...

तेच एस एम बद्द्ल. ते स्वतःला कम्युनिस्ट म्हणत नसत तर समाजवादी म्हणत.

कदाचीत आपल्याला तसे म्हणायचे नसेलही पण तसा अर्थ त्यातून निघतो. निघाला म्हणून बिघडतही नाही, पण माहीती म्हणून हा प्रश्न विचारला इतकेच.

मेथांबा's picture

26 Jan 2009 - 10:54 am | मेथांबा

हा अर्थ तुलाच अभिप्रेत दिसत आहे. वरील तिघांच्याही नावापुढे मी कॉम्रेड असे लिहिलेले मला तरी दिसत नाही. उगाच खोटे आरोप करून निष्कारण वाद निर्माण करू नकोस.

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Jan 2009 - 9:17 am | llपुण्याचे पेशवेll

खरे आहे विकासराव आणि मेथांबा. विकासरावांनी म्हटल्याप्रमाणे एस. एम. स्वतःला समाजवादी म्हणायचे. एस एम तर खरोखरच फार चांगले होते. अतिशय स्वच्छ चारित्र्याचे होते. कॉ. डांगेंबद्दल तसेच म्हणता येईल.
पुण्याचे पेशवे
Since 1984

अविनाशकुलकर्णी's picture

25 Jan 2009 - 12:10 pm | अविनाशकुलकर्णी

त्यांचि चारित्रे स्वछ्छ असतिल.पण....जर महाराष्ट्रावर समाजवादी आणि कम्युनिस्ट यांची सत्ता येती तर आज महाराष्ट्र प्रगतीपथावर दिसला असता याचे मुख्य कारण म्हणजे डागविरहित समाज नेतृत्त्व..ह्या विधानाला आजचा विनोद ह्या पलिकडे अर्थ नाहि..मुंबईत दिसणारे भय्ये हि समाजवादि नेत्यांचि मुम्बईला देणगी आहे..इदिरा गांधिंनि समाजवादि समाज रचना स्विकरलि होति..संप करणे या पलिकडे लाल लोकांना धंदा नव्हता...कामगारांना इतके प्रचंड अधिकार होते कि एकद्या कायम झालेला कामगाराला कारखानदार नोकरिवरुन जरी तो काम करित असला तरी काढु शकत नव्हता...पब्लिक सेक्टर च्या नावाखालि चराउ कुरणे निर्माण झालि होति..संप बंद म्हणजे नित्याच्या बाबि होत्या..कमुनिस्ट हे परकिय व पराभुत झालेले तत्वज्ञान आहे..गिरणी कामगारांचि वाट लागली होति..रशिया सोडला तर एक्स्पोर्ट कुठेच नव्हता.. बगाराम तुळपुळेला कम्युनिस्ट नेता.. {पब्लिक सेक्टर }प्रयोग म्हणुन कारखाना व्यवस्थापनाचि जबाबदारी दिलि होति पण यश आले नाहि.. बंद करा, हि हाक देण सोप आहे पण कारखाना चालवण हे कौशल्याचे काम आहे..ना.ग.गोरे, फर्नांडिस यानि समाजवादि विचारांचा पराभव मान्य केला होता व मुक्त अर्थ व्यवस्थेच्या बाजुने शेवटि उभे राहिले...जनता दल या कडबोळ्याला दिल्लित संधि दिलि होति राज्य करायचि पण हे राज्य करु शकले नाहित हे जनतेला माहित आहेत..बंगाल मधे आज हि कम्युनिस्टांचे सरकार आहे पण तिथे औषधाला हि नविन कारखाना अनेक वर्षे उभा राहु शकला नाहि...टाटाचा न्यानो तिकडे गेला व टाटाचि ह्या लाल भाईनि काय वाट लावलि हे सा~यांना माहित आहे..मानवि हक्क न मानणा~या, दडपशाइचा व पक्षिय हुकुम शाहिचा ईतिहास असलेल्या,धर्मास अफु समजणा~या ह्या लाल फिलोसॉफिला रशिया ने सुध्धा नकारले व स्टलिन लेनिन यांचे पुतळे उखडुन फेकले..कम्युनिस्टांचे मानवावरील अत्याच्यार पहवयाचे असेल तर बोरिक पास्तरनॅक याचि दॉ झिव्हागो कादंबरी वाचा किंवा सिनेमा पहा...

अविनाश

नितिन थत्ते's picture

25 Jan 2009 - 1:22 pm | नितिन थत्ते

मुंबईत दिसणारे भय्ये हि समाजवादि नेत्यांचि मुम्बईला देणगी आहे

भय्ये ही खास शिवसेनेची मुंबईला देणगी आहे. हिंदुत्वाचे राजकारण करताना शिवसेनेने भाजपच्या गळ्यात गळा घातला आणि हिंदूंची मते गोळा करण्यासाठी भय्यांना जवळ केले. संजय निरुपमला खासदार केले. (शिवसेनेचे मनोहर जोशींपूर्वीचे सर्व राज्यसभा खासदार अमराठी होते... निरुपम, प्रितिश नन्दी, चन्द्रिका केनिया, राम जेठमलानी).

मेथांबा's picture

26 Jan 2009 - 11:54 am | मेथांबा

भय्ये ही खास शिवसेनेची मुंबईला देणगी आहे.

केवळ भय्या हि एकच नव्हे तर इतर अनेक देणग्या आहेत. आज बेळगावासाठी युती तोडण्याच्या खोट्या गप्पा करणारी शिवसेना सत्तेत असताना बेळगावला जाणून बुजून विसरली कारण कन्नड मतांचा टक्का कमी झाला असता. शिवसेनेला फक्त सत्ता हवी. तत्व इ. काही नाही.

बंगालविषयी बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की त्याचा विकास महाराष्ट्राच्या बरोबरीने होत आहे. ते सुद्धा महाराष्ट्रातील काँग्रेसपेक्षा कमी काळ बंगालमध्ये कम्युनिस्टांची सत्ता असताना. रशिया आणि तेथील संस्कृती ही पूर्णपणे वेगळी आहे. जिथपर्यंत अत्याचाराचा प्रश्न आहे, आजचे दलित साहित्य वाचले, महाराष्ट्रासारख्या सुधारणावादी (?) राज्यात खैरलांजी सारखे अत्याचार पाहिले की रशियाला नावे ठेवायचा हक्कच कुठे उरतो आपल्या सर्वांना. कुठे गेले ते सर्व भारतीय संस्कृतीच्या गप्पा मारणारे? गेल्याच वर्षी ३ एप्रिलला पुण्यात संघवाल्यांनी आमच्या कार्यालयावर सशस्त्र हल्ला करून मारपीट केली तो विसरता येणार नाही. http://www.hindu.com/2008/04/03/stories/2008040360821400.htm

मात्र बंगाल आणि रशियाचे नाव घेताना केरळमधील प्रगतीकडे तुम्ही सोयिस्कर दुर्लक्ष केले आहे. केरळचे नावही घेतलेले नाहीत. १००% साक्षरता, स्रियांना मानाची वागणुक हे तर आहेच पण तिथल्या पर्यटन व्यवसायाला आज भारतात तोड नाही. महाराष्ट्राचे तर नावही जगाच्या पर्यटन नकाशावर नाही.

असो. माझा लेख फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. त्याला फाटे न फोडाल तर बरे.

प्रदीप's picture

26 Jan 2009 - 12:22 pm | प्रदीप

बंगालविषयी बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की त्याचा विकास महाराष्ट्राच्या बरोबरीने होत आहे.

ह्याविषयी काही ठोस आकडेवारी दिलीत तरे बरे होईल. कारण गेल्या काही दशकात महाराष्ट्राची वाट लागली आहे हे खरे असले, तरी बंगाल व महाराष्ट्र ह्यांची प्रगति बरोबरीने होत आहे, हे समजणे जरा जड जात आहे.

मेथांबा's picture

28 Jan 2009 - 10:11 am | मेथांबा

ह्याविषयी काही ठोस आकडेवारी दिलीत तरे बरे होईल.

आकडेवारी हे लिहिणार्‍याच्या हातात असते. प्रश्न हा आहे की माणुस किती सुखी आहे. ज्या प्रमाणात इतर प्रांतीयांचे लोंढे (अर्थात तेही आपलेच बांधव आहेत, हा आपपरभाव योग्य नाही, समानता हेच कम्युनिझमचे सुत्र आहे) महाराष्ट्रात येत आहेत त्यात बंगालीबाबुंचे प्रमाण नगण्य आहे. त्यावरुन एकच गोष्ट सिध्ध होते की बंगाली लोक त्यांच्या राज्यात सुखी आहेत.

प्रदीप's picture

28 Jan 2009 - 12:13 pm | प्रदीप

आकडेवारी ही लिहीणार्‍याच्या हातात असते (खरेच?) तसेच आपण केली आहेत तशी "माणुस किती सुखी आह", "बंगालीबाबुंचे प्रमाण नगण्य आहे" असली क्वालिफिकेशन्स सुद्धा लिहीणार्‍याच्या हातात असतात.

हे आपण जे अत्यंत भोंगळ लिहीले आहेत, त्यावर आपलाच विश्वास बसत असेल, तर ह्याबाबतीत पुढे काय बोलणार?

मेथांबा's picture

26 Jan 2009 - 12:20 pm | मेथांबा

कमुनिस्ट हे परकिय व पराभुत झालेले तत्वज्ञान आहे..

जीवनाचे महान तत्वज्ञान घेताना त्यात आपपरभाव कशाला? आणि स्वकीय ते सगळे चांगले मग चातुर्वर्ण्य व्यवस्था चांगली म्हणायची का? आणि पराभव हा जेत्यांचाच होतो, मात्र हे चक्र आहे, आज अंधार तर उद्या उजेड. आणि समृद्धिचा जयघोष होणार्‍या अमेरिकन अर्थव्यवस्थेचा डोलारा कधीही कोसळू शकतो ही स्थिती लक्षात घ्या.

पावासाठी रांगा लावण्याची पाळी तिथे पण लवकरच येणार आहे.

The Predictions For the USA For The Next 4 Years - By Gerald Celente The man who predicted the 1987 stock market crash and the fall of the Soviet Union is now forecasting a revolution in America , food riots and tax rebellions - all within four years, while cautioning that putting food on the table will be a more pressing concern than buying Christmas gifts by 2012.

Gerald Celente, the CEO of Trends Research Institute, is renowned for his accuracy in predicting future world and economic events, which will send a chill down your spine considering what he told Fox News this week.

Celente says that by 2012 America will become an undeveloped nation, that there will be a revolution marked by food riots, squatter rebellions, tax revolts and job marches, and that holidays will be more about obtaining food, not gifts.

"We're going to see the end of the retail Christmas.....we're going to see a fundamental shift take place....putting food on the table is going to be more important that putting gifts under the Christmas tree," said Celente, adding that the situation would be "worse than the great depression".

" America 's going to go through a transition the likes of which no one is prepared for," said Celente, noting that people's refusal to acknowledge that America was even in a recession highlights how big a problem denial is in being ready for the true scale of the crisis.

Celente, who successfully predicted the 1997 Asian Currency Crisis, the subprime mortgage collapse and the massive devaluation of the U.S. dollar, told UPI in November last year that the following year would be known as "The Panic of 2008," adding that "giants (would) tumble to their deaths," which is exactly what we have witnessed with the collapse of Lehman Brothers, Bear Stearns and others. He also said that the dollar would eventually be devalued by as much as 90 percent.

The consequence of what we have seen unfold this year would lead to a lowering in living standards, Celente predicted a year ago, which is also being borne out by plummeting retail sales figures.

The prospect of revolution was a concept echoed by a British Ministry of Defence report last year, which predicted that within 30 years, the growing gap between the super rich and the middle class, along with an urban underclass threatening social order would mean, "The world's middle classes might unite, using access to knowledge, resources and skills to shape transnational processes in their own class interest," and that, "The middle classes could become a revolutionary class."

In a separate recent interview, Celente went further on the subject of revolution in America .

"There will be a revolution in this country," he said. "It's not going to come yet, but it's going to come down the line and we're going to see a third party and this was the catalyst for it: the takeover of Washington, D. C., in broad daylight by Wall Street in this bloodless coup. And it will happen as conditions continue to worsen."

"The first thing to do is organize with tax revolts. That's going to be the big one because people can't afford to pay more school tax, property tax, any kind of tax. You're going to start seeing those kinds of protests start to develop."

"It's going to be very bleak. Very sad. And there is going to be a lot of homeless, the likes of which we have never seen before. Tent cities are already sprouting up around the country and we're going to see many more."

"We're going to start seeing huge areas of vacant real estate and squatters living in them as well. It's going to be a picture the likes of which Americans are not going to be used to. It's going to come as a shock and with it, there's going to be a lot of crime. And the crime is going to be a lot worse than it was before because in the last 1929 Depression, people's minds weren't wrecked on all these modern drugs - over-the-counter drugs, or crystal meth or whatever it might be. So, you have a huge underclass of very desperate people with their minds chemically blown beyond anybody's comprehension."
The George Washington blog has compiled a list of quotes attesting to Celente's accuracy as a trend forecaster.

"When CNN wants to know about the Top Trends, we ask Gerald Celente."
- CNN Headline News

"Gerald Celente has a knack for getting the zeitgeist right."
- USA Today

"There's not a better trend forecaster than Gerald Celente. The man knows what he's talking about."
- CNBC

"Those who take their predictions seriously ... consider Gerald Celente and the Trends Research Institute."
- The Wall Street Journal

"Gerald Celente is always ahead of the curve on trends and uncannily on the mark ... he's one of the most accurate forecasters around."
- The Atlanta Journal-Constitution

"Mr. Celente tracks the world's social, economic and business trends for corporate clients."
- The New York Times

"Mr. Celente is a very intelligent guy. We are able to learn about trends from an authority."
- 48 Hours, CBS News

"Gerald Celente has a solid track record. He has predicted everything from the 1987 stock market crash and the demise of the Soviet Union to green marketing and corporate downsizing."
- The Detroit News

"Gerald Celente forecast the 1987 stock market crash, 'green marketing,' and the boom in gourmet coffees."
- Chicago Tribune

"The Trends Research Institute is the Standard and Poors of Popular Culture."
- The Los Angeles Times

"If Nostradamus were alive today, he'd have a hard time keeping up with Gerald Celente."
- New York Post

So there you have it - hardly a nutjob conspiracy theorist blowhard now is he? The price of not heeding his warnings will be far greater than the cost of preparing for the future now. Storable food and gold are two good places to make a start.

दशानन's picture

26 Jan 2009 - 12:26 pm | दशानन

ओ भाऊ !

जरा वाई मराठीतून टायपा की ... आम्हाला काय बी नाय कळाले... !
तसा आधीच विषय डोक्याच्या वरुन जात आहे... त्याला खाली आनावा म्हणून प्रतिसाद वाचत बसलो तर... तुम्ही हे काय टंकले ते काय बी नाय कळालं !

आम्ही जरा अडाणी माणसं... गावाकडची... आम्हाला मराठीचं येते वाचायला फकुस्त !

जरा तेवढं मानावर घेऊन .. मराठील लिव्हलं तर लई आभार होतील साहेब!

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

प्रदीप's picture

26 Jan 2009 - 12:41 pm | प्रदीप

(१) येथे कम्युनिझम कसा राबवला जात आहे (म्हणजे भारतीय कम्युनिस्टांना जसा अभिप्रेत आहे त्या संबंधात*), तसेच

(२) अमेरिका व इतर भांडवलशाही देश (वर आपण निर्देशिल्याप्रमाणे) जवळपास भिकेस लागले, तर चीनची अर्थव्यवस्था कशी तग धरून राहील,

ह्या दोन्ही स्वतंत्र विषयांवर आपली टिप्पणी वाचावयास आवडेल.

* मूळ तत्वप्रणालीशी तेथील आताची राजवट कितपत इमान धरून आहे ह्या अनुषंगाने हे विचारत आहे.

मेथांबा's picture

28 Jan 2009 - 10:39 am | मेथांबा

(१) येथे कम्युनिझम कसा राबवला जात आहे (म्हणजे भारतीय कम्युनिस्टांना जसा अभिप्रेत आहे त्या संबंधात*), तसेच

इथे भारतात योग्य रीतीने आणि धर्मनिरपेक्ष पध्दतीने कम्युनिझम राबवला जात आहे

(२) अमेरिका व इतर भांडवलशाही देश (वर आपण निर्देशिल्याप्रमाणे) जवळपास भिकेस लागले, तर चीनची अर्थव्यवस्था कशी तग धरून राहील,

पैसा हा इथून तिथं जातच असतो. कोणी श्रीमंत होतो आणि कोणी गरिब. अमेरिकेसारखे काही देश गरिब झाले तर क्युबा सारखे काही देश जास्त श्रीमंत होतील. काळजी नसावी.

आता तर पुतीन यांच्या कुशल पुढारीपणामुळे रशिया परत महासत्ता बनेल यात शंका नाही.

प्रदीप's picture

28 Jan 2009 - 12:25 pm | प्रदीप

माझा प्रश्न होता:

[चीन] (हे माझ्या प्रतिसादाच्या विषयात लिहीलेले होते) येथे कम्युनिझम कसा राबवला जात आहे (म्हणजे भारतीय कम्युनिस्टांना जसा अभिप्रेत आहे त्या संबंधात*)

हे आपल्या लक्षात आले नसेल असे नाही. अवघड उत्तरे देण्यापासून आपण अत्यंत हास्यास्पद पळवाटा काढत आहात.

(२) अमेरिका व इतर भांडवलशाही देश (वर आपण निर्देशिल्याप्रमाणे) जवळपास भिकेस लागले, तर चीनची अर्थव्यवस्था कशी तग धरून राहील,

पैसा हा इथून तिथं जातच असतो. कोणी श्रीमंत होतो आणि कोणी गरिब. अमेरिकेसारखे काही देश गरिब झाले तर क्युबा सारखे काही देश जास्त श्रीमंत होतील. काळजी नसावी.

हा, हा, हा......... ज्या चीनचे (आपल्या दृष्टिने प. पू. वगैरे चीन) ६० ~ ७० % उत्पन्न त्या 'भिकेस लागलेल्या अमेरिका व युरोप' ह्यांवर अवलंबून आहे, त्याचे काय होणार, ही काळजी खरे तर तुम्हाला हवी!!!

परतः अवघड उत्तरे देण्यापासून आपण अत्यंत हास्यास्पद पळवाटा काढत आहात.

आपण एक कम्युनिस्ट केडरचे कार्यकर्ते आहात असे आपण लिहीले होतेत, तेव्हा ह्या व इतर विषयांवर गंभीर चर्चा होईल असे वाटले होते. ही फुटकळ उत्तरे हास्यास्पद आहेत खरे तर संतापजनक आहेत).

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Jan 2009 - 10:14 pm | llपुण्याचे पेशवेll

>>हे आपल्या लक्षात आले नसेल असे नाही. अवघड उत्तरे देण्यापासून आपण अत्यंत हास्यास्पद पळवाटा काढत आहात.
अहो ते तर आजकालच्या कमुनिष्टांचे वैषिष्ठ्यच आहे .
>>ही फुटकळ उत्तरे हास्यास्पद आहेत खरे तर संतापजनक आहेत
तुम्हाला कमुनिष्ठांबद्दल संताप येतो? हा द्रोह आहे. याना गोळी घाला.

पुण्याचे पेशवे
Since 1984

विकास's picture

28 Jan 2009 - 10:33 pm | विकास

...कमुनिष्ठांबद्दल...

यावरून कम्युनिस्ट आणि कमी निष्ठ(निष्ठा) असे कुठेतरी सारखे वाटते ;)

मेथांबा's picture

2 Feb 2009 - 12:35 pm | मेथांबा

म्हणजे भारतीय कम्युनिस्टांना जसा अभिप्रेत आहे त्या संबंधात*

अनेक प्रकारचे कम्युनिस्ट आहेत, आमच्यात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. हिंदुत्ववाद्यांसारखे "बाबा वाक्यम् प्रमाणम्" आमच्यात नसते. आमचे विचार आंधळे नाहीत. व्यक्तिप्रमाणे अपेक्षित कम्युनिझम बदलतो. मात्र गरीबांची उन्नती हेच लक्ष्य आहे.

एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार...

प्रदीप's picture

4 Feb 2009 - 10:11 pm | प्रदीप

चीनने माओंच्या निधनानंतर भांडवलदारीशी अत्यंत परिणामकारकरित्या तडजोड केली. १९८० नंतरच्या तेथील नेतृत्वाने हा बदल घडवून आणला. त्यामुळे तेथे एका प्रकारची क्रांतिच झाली असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. चीन आज जो काही आहे, त्यात ह्या तडजोडीचा खूपच मोठा वाटा आहे. ही तडजोड थोडक्यात अशी वर्णता येईल, की जनतेवर अंकुश ठेवण्यास कम्युनिझमच्या मार्गांचा वापर, पण आर्थिक दृष्ट्या बलवान होण्यास भांडवलदारांचे मार्ग अनुसरणे. तेथील जे उद्योगधंदे आहेत तेथे भारतीय कम्युनिस्टांना अंगवळणी पडलेले (कामगारांसाठीचे) उठसूठ आंदोलनाचे मार्ग सहसा उपलब्ध नाहीत. तशी आंदोलने जवळपास होऊच दिली जात नाहीत. आताच बघा--- जागतिक मंदीच्या रेट्यामुळे अधिकांश निर्यातीवर अवलंबून असलेले उद्योगधंदे तेथे झपाट्याने बंद पडताहेत. चिनी नववर्षासाठी आपापल्या गावी गेलेले ('माघारी') सुमारे २० मिलीयन (दोन कोटी) कामगार कामावर परत येणार नाहीत, असे अलिकडेच प्रसिद्ध झाले आहे. हे सर्व कामगार अचानक बेकार झाले, व तसे होतांना त्यांना त्यांच्या कंपन्यांनी काही विशेष काँपेन्सेशन्स दिलेली नाहीत. तसेच अनेक लक्ष कामगार नेहमीच्या एका महिन्याच्या सुट्टीऐवजी दोन- तीन महिन्यांची (बिनपगारी) रजा घेतील. हे समजा भारतात कुठल्या उद्योगाने केले असते, तर गहजब झाला असता. कम्युनिस्टांचे थवे झेंडे फडकवत ठिय्या देऊन बसले असते. हा जो मूलभूत फरक आपल्यात व त्यांच्यात आहे, त्याबद्दल मी आपणास विचारत होतो.

हिंदुत्ववाद्यांसारखे "बाबा वाक्यम् प्रमाणम्" आमच्यात नसते. आमचे विचार आंधळे नाहीत. व्यक्तिप्रमाणे अपेक्षित कम्युनिझम बदलतो.

हिंदूत्ववादी म्हणजे नक्की कोण? हिंदू धर्म इतर काही धर्मांप्रमाणे मोनोथीइइस्ट नाही. त्यामुळे इथे खरे तर व्यक्तिस्वातंत्र भरपूर. हे इतके की अनेकदा काही लोक हिंदू हा धर्म नसून ती एक जीवनपद्धति आहे, असेही प्रतिपादन करतात. हिंदूंच्या जीवनपद्धतिमुळे व जीवनाकडे पहाण्याच्या प्रगतिशील वृत्तिमुळे त्यांनी अनेक जुन्या चालीरिती सहज झुगारून दिल्या (उदा. सति). आजही हिंदू सहजपणे आत्मपरिक्षण करतात, स्वतःच्या जुन्या चालिरीतींबद्दल नापसंति व्यक्त करतात, स्वतःच्या काही भाकडकल्पनांबद्दल चारचौघांसमोर खिल्लीही उडवतात. उदा. ह्याच स्थळावर अलिकडेच झालेली ही चर्चा पहा. ह्यात सर्वसाधारणपणे काहीही चुकते आहे, असे हिंदूंना वाटत नाही.

चीनमधे सांस्कृतिक क्रांतिचे उपद्व्याप केले गेले. त्यात एक पिढी भरडली गेली. ह्या 'क्रांति'चा उद्देश होता, जुने सर्व फेकून देऊन नव्या आचार-विचारांना अंगिकारणे. पण तसे ते झाले नाही. आणि आजही तेथील जनता अनेक जुन्या समजुतिंना कवटाळून बसलेली आढळते. उदा. अगदी शिकलेल्या सवरलेल्या चिनी जनतेतही, व्यक्तिच्या मृत्यूनंतरही तिच्या शरिराचे अथवा त्यातील अवयवांचे दान करणे 'पाप' वाटते. इतर बाबतीत ते कितीही पुढारलेले असले, तरी असल्या अनेक जुन्या विचारांचा त्यांच्यावर जबरदस्त पगडा आहे. तो दूर करण्याच्या एक प्रयत्न अयशस्वी झाला. आणि त्यानंतर तेथील पार्टी असले उद्योग करण्याचा विचारही करात नाही. जे ते आहे ते तसेच स्वीकारून, त्या जुन्या आचारांशी मिळते जुळते घेऊन आजचे तेथील नेतृत्व पुढे जात आहे. ह्या उलट भारतीय कम्युनिस्ट!! हिंदूंच्या विस्कळीत संघटनेमुळे त्यांच्यावर उठसूठ (जशी आता येथे आपण केली आहेत तशी) टिका करणे तसे सोप्पे आहे, हे खरे. पण ह्यामुळे तो समाज आपल्याहून तीव्र अविश्वासाने दूर जात आहे, ह्याची त्यांना पर्वा नाही. म्हणजे इतरस्त्र जे काही झाले, त्यापासून त्यांना काहीही शिकावयाचे नाही!!

जाऊन बघा जरा क्युबा आणि व्हेनेझुएलाचे काय हाल चालू आहेत ते

नितिन थत्ते's picture

25 Jan 2009 - 1:15 pm | नितिन थत्ते

टाटाचा न्यानो तिकडे गेला व टाटाचि ह्या लाल भाईनि काय वाट लावलि हे सा~यांना माहित आहे..
नॅनोला पळवून लावण्याचे काम पूर्वीच्या काँग्रेसी आणि सध्याच्या रालोआ च्या घटक असलेल्या ममता बॅनर्जी यांनी केले.

बाकी समाजवादी पक्षाची शोकांतिका ही त्यांच्या निवडणूक केंद्रित आणि काँग्रेसविरोधाच्या राजकारणामुळे झाली.
निवडणुका जिंकण्याच्या हव्यासातून 'काँग्रेसमधून फुटलेला तो आमचा नेता' अशी स्थिती आली. त्यामुळे क्रमाने त्यांनी लोहिया, जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, चंद्रशेखर, व्ही पी सिंग यांना नेता मानून आपले सर्वस्व त्यांच्यासाठी वेचले. त्यामुळे वेळोवेळी तत्त्वनिष्ठा बाजूला ठेवली. मग तेल गेले तूप गेले अशी स्थिती आली. तसेच काँग्रेसविरोधातून येणारी शक्ती भाजपाने शोषून घेतली.

सखाराम_गटणे™'s picture

26 Jan 2009 - 11:59 am | सखाराम_गटणे™

http://southasia.oneworld.net/Article/amnesty-demands-impartial-enquiry-...

ह्या बद्दल काय मत आहे?

तुमच्या म्हणण्याचा असा अर्थ आहे का? चांगले तत्वज्ञान मुखात असल्याने काहीही करण्याचा परवाना मिळाला आहे?

मेथांबा's picture

28 Jan 2009 - 10:43 am | मेथांबा

तारकुंडेसाहेब गेल्यापासुन आम्नेस्टीची पार वाट लागली. खरे तर तिस्ता सेटलवाड आता त्यावर घ्यायला हवे.

आम्नेस्टीने भारतीय सैन्यावर नाही नाही ते आरोप केलेले आहेत. त्यांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करणे चांगले.

मेथांबा's picture

26 Jan 2009 - 12:06 pm | मेथांबा

बाकी समाजवादी पक्षाची शोकांतिका ही त्यांच्या निवडणूक केंद्रित आणिकाँग्रेसविरोधाच्या राजकारणामुळे झाली.

पण आम्ही चुकांमधुन शिकतो. चुका मोकळ्या मनाने कबुल करतो. चुका या व्हायच्याच, त्याचा बाउ कशाला? आता ताज्या दमाचे, नव्या रक्ताचे तरुण नेते पुढे येत आहेत आणि ते या चुका परत होणार नाहीत याची काळजी घेतीलच की.

नितिन थत्ते's picture

26 Jan 2009 - 12:28 pm | नितिन थत्ते

चुकांपासून शिकतो हे खरे नाही. (मी समाजवाद्यांबद्दल बोलतोय. कम्युनिस्टांबद्दल नाही.) नाहीतर मोरारजींच्या अनुभवानंतर पुन्हा व्ही पी सिंगांना स्वीकारले नसते.

मी आधी दिलेल्या यादीत शरद पवारांचे (काँग्रेसमधून फुटला तो आमचा नेता) नाव विसरलो होतो. तसेच इतर राज्यातलेही नेते असतील.

दुसरे म्हणजे ७७ च्या प्रयोगात संघाचा उंट तंबूत घेतला त्यानंतर पुन्हा ८९ मध्ये त्यांची मदत घेतलीच. नंतर ९८ मध्ये सारी लाज सोडून भाईलोक संघाबरोबर सत्तेत सहभागी झाले.

अविनाशकुलकर्णी's picture

25 Jan 2009 - 5:43 pm | अविनाशकुलकर्णी

कामगारांना इतके प्रचंड अधिकार होते कि एकद्या कायम झालेला कामगाराला कारखानदार नोकरिवरुन जरी तो काम करित असला तरी काढु शकत नव्हता.

या ऍवजी
या पलिकडे लाल लोकांना धंदा नव्हता...कामगारांना इतके प्रचंड अधिकार होते कि एखाद्या कायम झालेला कामगाराला कारखानदार नोकरिवरुन जरी तो काम करित नसला तरी काढु शकत नव्हता.

असे वाचावे..चुकिबद्दल दिल्गीरी

नितिन थत्ते's picture

26 Jan 2009 - 12:40 pm | नितिन थत्ते

कामगारांना इतके प्रचंड अधिकार होते कि एखाद्या कायम झालेला कामगाराला कारखानदार नोकरिवरुन जरी तो काम करित नसला तरी काढु शकत नव्हता

ही दादागिरी लाल नसलेल्या डॉ सामंतांच्या युनियन्स मध्ये होती.
कम्युनिस्टांच्या युनियन साधारणपणे वर्किंग कंडीशन वगैरेसाठी भांडत. सर्व मागण्या पैशाच्या स्वरूपात मागण्याची पद्धत सामंतांनी आणली. दहशतवाद हा देखील मुख्यत्वे त्यांच्याच युनियनमध्ये असे.

मिपाच्या बहुतेक तरूण सदस्यांनी त्या काळात नोकर्‍या केलेल्या नसतील. मी केल्या आहेत म्हणून थोडे अधिकारवाणीने लिहिले आहे.

आज युनियनिझमला नावे ठेवणार्‍या पिढीच्या वडिलांनी या गोष्टीचे फायदे घेतले नाहीत असे म्हणता येईल काय?
युनियन हा प्रगतीच्या आड येणारा अडथळा आहे म्हणून युनियन्च नको असे आता जेट एअरवेज च्या प्रसंगानंतर बहुधा कोणी म्हणू नये.

मेथांबा's picture

26 Jan 2009 - 12:59 pm | मेथांबा

असंघटित कामगारांचे शोषण करणार्‍या भांडवलशाहीचे काय? १२-१४ तास काम करुन घेणार्‍या मालकांचे काय? कम्युनिझमने कामगारांना आवाज दिला, ताठ मानेने जगायला शिकवले. तुम्ही म्हणता तसे काम न करणारा एखादाच कर्मचारी.

नितिन थत्ते's picture

26 Jan 2009 - 1:13 pm | नितिन थत्ते

सहमत

दशानन's picture

26 Jan 2009 - 1:17 pm | दशानन

मेथांबा !

>>>तुम्ही म्हणता तसे काम न करणारा एखादाच कर्मचारी.

=))

एकजात कामचुकार असतात युनियन वालेच !

या ईकड कधी तरी युनियनचा कारभार दाखवतो... !

जिंदल म्हणत... एकदा का कंपनी मध्ये हे युनियन वाले आले की प्रोडेक्शन कमी होणार.... नक्कीच !
जेवढे कामगाराला दिल्याचा ढिल वाजवतात हे युनियन वाले त्याच्या पेक्षा अधिक खातात हे माहीत असेलच तुम्हाला !

म्हणून तर मागे धुतला होता क्रॉग्रेस सरकार ने युनियन वाल्या सगळांना.. गुडगाव मध्ये !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

मेथांबा's picture

28 Jan 2009 - 10:48 am | मेथांबा

जिंदल म्हणत... एकदा का कंपनी मध्ये हे युनियन वाले आले की प्रोडेक्शन कमी होणार.... नक्कीच !

लाल बावटा आहे म्हणुन गिरण्यांच्या जमिनि टिकुन आहेत हे विसरु नका. नाहीतर काँग्रेस, भांडवलदार युतीने सर्व गिरण्यांच्या जमिनी केव्हाच बिल्डरांच्या घशात घातल्या असत्या. कामगार एकात्मतेची ताकद टाटा, बिर्ला, जिंदल सारख्याना कांदा हुंगायला लावते.

नीधप's picture

26 Jan 2009 - 1:26 pm | नीधप

एकांगी विचार आणि भाबडेपणाचा कळस...
प्रत्येक गरीब माणूस हा व्हिक्टिम आणि बिचारा असतो.
आणि प्रत्येक सुखवस्तू माणूस हा हरामखोर, गरिबांना छळून स्वतःचे पोट भरणारा असाच असतो.
अशी या सगळ्या डाव्या बाजूची समजूत असते. त्याचाच हा परिपाक.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

दशानन's picture

26 Jan 2009 - 1:29 pm | दशानन

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

शंकरराव's picture

26 Jan 2009 - 2:53 pm | शंकरराव

+१ सहमत

मेथांबा's picture

28 Jan 2009 - 10:52 am | मेथांबा

एकांगी विचार आणि भाबडेपणाचा कळस...

हेच तुमच्या बाबतीत बोलता येईल. कम्युनिझमवर टोकाचा अविश्वास हा एकांगी विचार आणि कम्युनिझमला टाळून प्रगति होईल हा भाबडेपणा.

सुक्या's picture

26 Jan 2009 - 11:55 am | सुक्या

जर महाराष्ट्रावर समाजवादी आणि कम्युनिस्ट यांची सत्ता येती तर आज महाराष्ट्र प्रगतीपथावर दिसला असता की नाही हे मला माहीत नाही परंतु कम्युनिस्ट लोकांनी प. बंगालची लावलेली वाट पाहता महाराष्ट्राची काय हालत झाली असती याचा अंदाज येउ शकतो. गेली काही वर्षे पाहता महाराष्ट्रही काही खुप प्रगतीपथावर आहे हे म्हणता येत नाही. दुरगामी द्रुष्टी असलेला नेता मिळाला की प्रगती अगदी होतेच. गल्लेभरु नेते मिळाले कि सर्वसंपन्न बिहारचे ही मातेरे होते.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

मेथांबा's picture

26 Jan 2009 - 1:07 pm | मेथांबा

कम्युनिस्ट लोकांनी प. बंगालची लावलेली वाट पाहता महाराष्ट्राची काय हालत झाली असती याचा अंदाज येउ शकतो.

केरळ मधील प्रगती तुम्हाला दिसलेली नाही की तुम्ही काणाडोळा करताय? आणि महाराष्ट्राची आता हालत लागायची काय बाकी आहे? लोडशेडिंग, खराब रस्ते इ.इ. तुम्हाला दिसत नाही म्हणजे तुम्ही नक्की कायमचे अमेरिकावासी दिसता. इथे महाराष्ट्रात फिरकत नाही का आपण?

दशानन's picture

26 Jan 2009 - 1:12 pm | दशानन

जर हे कमुनिस्ट वाले येवढेच चांगले तर ते निवडून का येत नाहीत ? नाही चिरकुटे... मिरकुटे निवडून येतात पण हे कमुनिस्ट वाले का निवडून येत नाहीत ????

केरळ सोडा ओ.. चुकुन कधी कधी शैतान पण पुण्य कर्म करतोच की..... ! अपवाद असतो कधी कधी !
कुमुनिस्ट च्या जागी तर कोणाचे ही सरकार असले असते तर केरळची तीच प्रगती झाली असती जी आज आहे... होत आहे... कारण त्यांचा येवढा भाषा अभिमान, राष्ट्राभिमान व देशा अभिमान कमीच लोकाच्या बघायला मिळतो... !!!! शिक्षणाची ललक आहे त्यांच्यात... मुलगा / मुलगी जन्मली की लगेच तीच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी आई-वडील झटू लागतात.. हे आपल्या कडेच काय.. अगदी पार बंगाल मध्ये पण दिसुन येत नाही !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

मेथांबा's picture

28 Jan 2009 - 11:14 am | मेथांबा

निवडुन येणं आपल्या हातात असत होय. समजा इथं मिपावर शासन कोणी कराव या साठी कौल टाकुन मतदान असत आणि तुमच्या नावाला कौलात एकच तुमच स्वताच मत मिळाल आणि इतर लोक भरगोस मतानं निवडुन आले तर तुमी काय स्वताला दोष देणार काय?

असो. लोक हो, चांगली माणसं निवडुन आणणं तुमच्याच तर हातात आहे. पुढच्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाला दणक्यात मतदान करा आणि स्वच्छ चारित्र्याचे राज्यकर्ते कसे असतात त्याचा पहिल्यांदिच अनुभव घ्या.

प्रदीप's picture

26 Jan 2009 - 1:22 pm | प्रदीप

ची प्रगति जाणून घ्याबी म्हणून मी तेथील सरकारच्या संस्थलावर गेलो. तेथे

Vital Statistics--> Economic Review 2005

येथे गेल्यावर Contents पृष्ठ दिसते:

http://www.keralaplanningboard.org/html/EconomicReview2005/contents.htm

ह्यातील कुठचाही दुवा चालत नाही!!

अन्य काही सरकारी दुवे असले तर ते कृपया द्यावेत.

सुक्या's picture

27 Jan 2009 - 11:23 am | सुक्या

मेथांबा राव,

सहज म्हनुन केरळ विषयी गुगळुन पाहीलं, काही गोष्टी नमुद कराव्या वाटल्या.
केरळाची अर्थव्यवस्था ही प्रमुख्याने अखाती देशात काम करनार्‍या लोकांनी पाठवलेल्या पैशावर अवलंबुन आहे. ५०% लोकांकडे अजुनही शेती हेच एकमात्र उत्पन्नाचे साधन आहे. औद्योगिक विकास काही छोट्या कारखान्यांपलीकडे गेला नाही. पर्यटन , मासेमारी साऱख्या सिजनल रोजगारावर लोक अवलंबुन राहतात. तुम्हाला याला विकास म्हनायचे आहे का?

काही गोष्टीत केरळ बराच पुढे आहे हे मान्य. परंतु केवळ कमुनिस्ट सरकार आहे म्हणुन ते झाले असे मुळीच नाही. विचारधारा समान असेल तर विकासही समान व्हायला हवा. रशिया, बंगाल, केरळ यांचा तौलनीक विचार केला तर तसे दिसत नाही. महाराष्ट्रात लोड्शेडिंग, खराब रस्ते आहेत हे मान्य, बंगाल बघितलाय का? आजही तिथे जंगलात जाउन लाकुड्फाटा आणावा लागतो. कलकत्याचा लालभाइ किती काम करतो ते मला विचारा.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

मेथांबा's picture

28 Jan 2009 - 11:19 am | मेथांबा

विचारधारा समान असेल तर विकासही समान व्हायला हवा.

विकास हा समान व्हायला हवा असे म्हणाल तर अर्थशास्त्राचे विद्यार्थि पण पोट धरधरुन हसतील कारण विकास ही सापेक्ष संकल्पना आहे. ति मोजता येणं कठीण.

सुक्या's picture

28 Jan 2009 - 12:04 pm | सुक्या

विकास ही सापेक्ष संकल्पना आहे हे मान्य. परंतु विकास तर व्हायला हवा. आपली विकासाची संकल्पना काय आहे ते जरा सांगाल का? माझ्या मते प्रत्येकाला उत्पन्नाचे किमान एक साधन, बहुतांश लोकांना एकपेक्षा जास्त साधने, पुरक उद्दोग अन् त्याला पुरक असे इंफ्रास्ट्र्क्चर (मराठी शब्द??) हे सगळे एकत्र म्हणजे विकास. बंगाल अन् केरळ ह्यात बहुतांशी लोकांकडे उत्पन्नाचे केवळ एक साधन आहे. तेही बहुतांशी निसर्गावर अवलंबुन आहे. हा काय विकास झाला? किती लोकांकडे आज तिथे उत्पनाचे एकपेक्षा जास्त साधने आहेत?

हेच उदाहरण महाराष्ट्र किंवा गुजरात चे घेउ. शेती जरी बहुतांशी लोकांचा मुख्य व्यवसाय असला तरी पुरक असे बरेच व्यवसाय लोकांकडे आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा जरी ज्वलंत विषय असला तरी हे पुरक व्यवसाय नसते तर काय हालत झाली असती हा विचार केला तर थरकाप होतो. तेव्हा विकास अन् विचारसरणी ची सांगड घालु नका. विचारसरणी काहीही असली तरी विकास हा नेत्याची दुरद्रुष्टी अन् लोकांचा सहभाग ह्यावर अवलंबुन असतो. संप करुन , गळ्चेपी करुन उधोग बहरत नाहीत, बंद होतात.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

मेथांबा's picture

2 Feb 2009 - 12:40 pm | मेथांबा

कलकत्याचा लालभाइ किती काम करतो ते मला विचारा.

सविस्तर सांगाल तर बरे...

सुक्या's picture

5 Feb 2009 - 2:34 am | सुक्या

मेथांबाराव . .
जुण्या प्रतीसादातुन वाक्य उचलुन पुन्हा शिळ्या कढीला उत आणु नका. आता विचारलेच आहे तर तुटक काही सांगतो याउपर तुम्हाला काही शंका असतील तर खरडवही वापरा.

कलकत्याला कधी पावसाळ्यात गेलाय का? नसेल तर पर्यटन म्हणुन जाउन पहा. चोंदलेली गटारे, रस्त्यावरचा चिखल, चिखलात लोळनारी नारळाच्या कवट्या वगेरे वगेरे पहात घोट्याभर चिखलात चालत ही गटारे कधी साफ झाली होती हे विचारा. बंगालात एक प्रसिध्द म्हण आहे. शब्दश: मला माहीत नाही परंतु तिचा अर्थ असा "ऑफीसात येण्या / जाण्याचा पगार मिळतोय, काम करायचे असेल तर पगार वाढवा". सरकारी कर्मचार्‍याचा दिनक्रम म्हणजे दुपारपर्यंत २/३ वर्तमानपत्रे वाचने आणी त्यावर दुपारचा वेळ काथ्याकुट करत घालवणे. वेळ मिळाला तर थोडे काम. असो.

संपाच एक उदाहरण सांगतो. मी तिथे शिकत असताना काहीतरी संप झाला. (तिथे संपाला / आंदोलनाला कारण लागत नाही). सारे प्राध्यापक संपावर, क्लासेस का सुटी. होस्टेलला कंटाळा आला म्हणुन लायब्ररीत जावे तर रस्त्यावर सायकली टाकुन रस्ता अडवलेला. लब मधे जावं तर तिथेही रस्ता अडवायला लोक हजर. संप जर काही कारणासाठी केला असेल तरी विद्यार्थ्यांना अशी जबरदस्ती का?

लायब्ररीवरुन आठवलं. आमच्या महाविद्यालयाची लायब्ररी पुर्ण संगणकीक्रुत होती. पुस्तके शोधनार आम्ही, घेउन येनार आम्ही पण पुस्तकावरचा बार कोड स्कऍन करुन देताना असे भाव असायचे की वाटायच किती काम करताय हे लोक. या निरागस कामगारांच किती शोषन करतो आम्ही असं उगाचच वाटुन जायचं. अजुनही बर्‍याच गमतीजमती आहेत. तुर्तास एवढेच.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

कवटी's picture

27 Jan 2009 - 12:13 pm | कवटी

केरळ मधील प्रगती तुम्हाला दिसलेली नाही की तुम्ही काणाडोळा करताय?
काय सांगताय? केरळ प्रगत राज्य आहे? आयला मग इतके केरळी आमच्या मुंबैत नोकरी शोधायला आणि करायला का बॉ येतात? अख्या महाराष्ट्रात गावोगावी रस्त्यावर पंक्चर काढायला हे प्रगत लोक का येतात?
उलट कम्युनिस्ट सरकार कधीच न मिळाल्यामुळे वाट लागलेल्या महाराष्ट्रातून केरळात लोंढे जायला हवे होते....
कवटी

http://www.misalpav.com/user/765

प्रदीप's picture

27 Jan 2009 - 12:20 pm | प्रदीप

केरळ प्रगत राज्य आहे? आयला मग इतके केरळी आमच्या मुंबैत नोकरी शोधायला आणि करायला का बॉ येतात?

ह्याच न्यायाने महाराष्ट्रही प्रगत राष्ट्र नाही, कारण हजारो मराठी बांधव परदेशात नोकर्‍या करावयास गेले आहेत व जात आहेत !!

केरळ महाराष्ट्रापेक्षाही प्रगत आहे, असे सांगतांना मेथांबा ह्यांनी काही दुवे द्यावेत, असे म्हणणे रास्त आहे. तसे त्यांनी न केल्यास व ह्या मुद्द्याचा प्रतिवाद करावयाचा असल्यास स्वतः त्याविषयी काही सांख्यिक माहिती काढून ती इथे मांडणे ठीक होईल नाही का?

कवटी's picture

27 Jan 2009 - 1:03 pm | कवटी

ह्याच न्यायाने महाराष्ट्रही प्रगत राष्ट्र नाही,
महाराष्ट्र प्रगत आहे असा दावा कुठेच केलेला नाही. उलट "संपूणपणे प्रगत " अशी संकल्प्नाच अस्तित्वात नाही असे कुणीसे याच चर्चेत म्हटलय...
लेखकाचा सूर साधारण "महाराष्ट्रावर कम्युनिस्टांची सत्ता नाही त्यामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर नाही. पण केरळमधे कम्युनिस्ट सरकार असल्यने तो प्रगतीपथावर आहे." असा दिसला म्हणून वरिल प्रतिसाद दिला.

कवटी

http://www.misalpav.com/user/765

मेथांबा's picture

28 Jan 2009 - 11:31 am | मेथांबा

आयला मग इतके केरळी आमच्या मुंबैत नोकरी शोधायला आणि करायला का बॉ येतात?

ते लोक पैशाचा शोध घेत चंद्रावर जातील आणि तिथं चहाची टपरी टाकतील. त्याचे कारण मानसिकता. आता हेच पहा ना. महाराष्ट्रात हरिण छाप छत्र्या अफाट विकल्या जातात त्याच्या मालकाच्या कच्छ मधील गावात वर्षभरात २ इंच पण पाउस पडत नाही. पण व्यापारी वृत्ती. तिच गोष्ट केरळी लोकांची.

कवटी's picture

28 Jan 2009 - 12:48 pm | कवटी

ते लोक पैशाचा शोध घेत चंद्रावर जातील आणि तिथं चहाची टपरी टाकतील. त्याचे कारण मानसिकता. आता हेच पहा ना. महाराष्ट्रात हरिण छाप छत्र्या अफाट विकल्या जातात त्याच्या मालकाच्या कच्छ मधील गावात वर्षभरात २ इंच पण पाउस पडत नाही. पण व्यापारी वृत्ती. तिच गोष्ट केरळी लोकांची.

ऐकावे ते नवलच... मला वाटले इथे कम्युनिस्टानी केरळात केलेल्या विकासावर चर्चा सुरू आहे... पण इथे तर केरळी आणि गुजराती लोकांच्या व्यापारी वृत्तीवर फाटा फोडण्यात आलाय. (यांच्यात व्यापारी वृत्ती असण्यात तुम्हाला कम्युनिझम चा हात सॉरी लाल बावटा कसा दिसला ते एक मार्क्सच जाणे)

अवांतरः कच्छ मधला एखादा व्यापारी महाराष्ट्रात गावोगावी छत्र्या विकतो आणि महाराष्ट्रातल्या गावोगावी केरळी लोक चहाच्या / पंक्चरच्या टपर्‍या काढतात यातून समान सुत्र काढणार्‍या आपणास कोपरापासून लाल दंडवत !

अवघड उत्तरे देण्यापासून आपण अत्यंत हास्यास्पद पळवाटा काढत आहात.
प्रदीपरावांशी २००% सहमत.

कवटी

http://www.misalpav.com/user/765

मेथांबा's picture

26 Jan 2009 - 12:01 pm | मेथांबा

कॉ. अहिल्या रांगणेकरांचे आणि प्रभाकर संझगिरी यांचे नाव घ्यायला मी विसरलोच होतो. अहिल्याताईंच्या नावाची आठवण करून दिल्याबद्दल प्रदीपरावांना धन्यवाद.

यन्ना _रास्कला's picture

19 Apr 2009 - 11:25 am | यन्ना _रास्कला

अहल्याताईन्च्या स्म्रुतीला विनम्र अभिनंदन.

मेथांबा's picture

26 Jan 2009 - 1:09 pm | मेथांबा

हीन दर्ज्याच्या प्रतिसादाला उत्तर देवुन मी स्वताला खाली नेउ इच्छित नाही.

नीलकांत's picture

26 Jan 2009 - 12:30 pm | नीलकांत

समाजवादी आणि कम्युनिष्ट यातील फरक काय हो?

मी उडत उडत ऐकले आहे की कम्युनिष्ठांना सुभाषबाबू आतापर्यंत देशभक्त आहेत हे मान्यच नव्हतं.
मी असं ऐकलं आहे की भारतावर चीन ने आक्रमण केलं हे सुध्दा यांना मान्यच नव्हतं.
धर्मनिरपेक्षता म्हणजे केवळ हिंदू धर्माला शिव्या देणं अशी काहिशी यांची समजूत आहे.
पश्चिम बंगाल बद्दल कम्युनिष्ठांच्या अनेक भयकारी चमत्काराच्या कथा ऐकून आहे

मी असंही ऐकलं आहे की कम्युनिझम हा असा विचार आहे की ज्यांना तो मान्य नसेल त्यांना संपवण्याचा एकमेव मार्ग कॉमरेडांना माहीती आहे. शोध घेता जगातील समुहहत्या करणार्‍यांत कम्युनिष्ठांचं नाव येणं हे सुध्दा सहज आहे ना?

ऍटॉक्रसी किंवा हुकूमशहा बाबत तुमचं काही विशेष तत्वज्ञान आहे का?

वरील सगळं कितपत खरं आहे हो?
कारण मला काही माहिती नाही. मी एक विनंती करतो की मला माहिती नसलेल्या या विषयावर तुम्ही एखादा लेख लिहावा. म्हणजे माझ्या सारख्या लोकशाहीत परमभाग्य मानणार्‍या लोकांना माहिती पडेल की कम्युनिझम कडे झुकाव असून सुध्दा नेहरुंनी भारतात लोकशाही रूजावी यासाठी प्रयत्न का केले?

(अज्ञ) नीलकांत

नीधप's picture

26 Jan 2009 - 12:49 pm | नीधप

+१
सगळ्या प्रश्नांची उत्तरे वाचायला आवडतील. तिही खरी!!

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मेथांबा's picture

26 Jan 2009 - 1:16 pm | मेथांबा

मी उडत उडत ऐकले आहे की कम्युनिष्ठांना सुभाषबाबू आतापर्यंत देशभक्त आहेत हे मान्यच नव्हतं.

ऐकण्यापेक्षा अभ्यास करा आणि मग बोला. http://mumbaimatters.bombayaddict.com/2006/04/phoenix-mills-because-stor... हे वाचा सुभाषबाबु आणि डांगे यांच्याविषयी.

अहो साहेब ह्या अश्या अभ्यास करण्यासाठीचे अनेक दूवे मी तुम्हाला देऊ शकतो. मग येथे चर्चा करण्याचे प्रयोजन काय? असो. आमच्या प्रश्नांना उत्तरे नसतील (द्यायची) तर राहू द्या. पण उगाच आमच्या महाराष्ट्राला शिव्या देण्याचे काही कारण नाही. महाराष्ट्र हा आज भारतातील सर्वात प्रगत राज्य आहे, विशेषत: गेल्या दिडशे वर्षांच्या समाजप्रबोधनाच्या परंपरेने महाराष्ट्र बराच पुरोगामी झालेला आहे.

पुर्णविकास अशी अवस्थाच अस्तीत्वात नसते. तुमच्या दास कॅपीटल मध्ये असं काही असेल तर मला माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रात काही दोष असतील अशी आम्हाला अपेक्षा आहेच. येत्या काळात जशी प्रगती करू तसेच हे काही प्रश्न दूर होतील आणि काही नव्याने निर्माण होतील.

जसा पुर्णविकास अशी अवस्था नसते असं माझं मत आहे तसंच या जगात काहीच ब्लॅक ऍन्ड व्हाईट (कृष्ण-धवल) नसते असंही आहे. त्यामुळे संपुर्ण जग हे दोन भागात वाटून त्याशिवाय जगात कसलंच मत नाही असं सुध्दा मला मान्य होत नाही. लोकशाहीत तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा पुर्ण अधीकार आहे.

भारतातील आसाम मध्ये विद्यार्थ्यांनी 'आसू' संघटना स्थापन केली आंदोलन केले. त्यावेळी त्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद भारतीय होता. त्या प्रतिसादात आसूचे म्हणने ऐकून घेण्यात आले. हा प्रकार पुढे कॉग्रेसला भारी पडला. आसामात 'असम गण परिषद' निवडून आली. सत्ता बदल झाला. मात्र कुठेच विद्यार्थ्यांवर रणगाडे घातले नाहीत.

आता अश्या अनेक मुद्यांवर मी तुम्हाला अनेक अभ्यासासाठीचे दूवे देऊ शकतो. मात्र त्यात अर्थ नाही. हा न संपणारा वाद आहे.
त्या ऐवजी मी एक सल्ला देतो. बघा पटतंय का ! जर शक्य झाल्यास समाजवादी , साम्यवादी, मार्क्स, लेनीन, माऑ, मानवेंद्रनाथ रॉय, साम्यवादी राजवट, त्यांचा चढता आलेख, पुढे ढासळलेली अर्थव्यवस्था, पुर्व आणि पश्चिम जर्मणीचा किस्सा, फिडेल क्रेष्ट्रो आणि चे गव्हेराचे आंदोलन, क्युबा, आताचा व्हेनेझुएला, नव्वदीच्या काळातील रशीया ( त्यावेळी तो युएसएसाआर होता) आताचा रशीया.

या सर्वांसोबत भारताचे १९९० पर्यंतचे धोरण, सार्वजनीक क्षेत्रातील सरकारची गुंतवणूक, त्याचा नफा - तोटा , निर्गुंतवणूक आणि त्याला कम्युनिष्ठांचा विरोध, आदी अनेक विषयांवर कम्युनिष्ठांची बाजू मांडणारं लेखन मराठीत नाहीच.

या आणि यापेक्षा अधीक तुम्हाला माहिती असलेल्या विषयांवर लेख येऊ द्या. म्हणजे तुमच्या मते आम्हा अभ्यास नसलेल्या लोकांचा काहीतरी अभ्यास होईल.

उगाच आमचा एक दोष दाखवून त्यापेक्षा 'त्यांचे' दोष कमी असे भासवायचे आणि लोकांना लाल सलाम ठोकायचे हे काही बरं नाही.

संविधानावर आधारीत भारतीय लोकशाही हाच भारताचा प्राण आहे असं आमचं मत आहे.

नीलकांत

दशानन's picture

26 Jan 2009 - 2:19 pm | दशानन

आता अश्या अनेक मुद्यांवर मी तुम्हाला अनेक अभ्यासासाठीचे दूवे देऊ शकतो. मात्र त्यात अर्थ नाही. हा न संपणारा वाद आहे.
त्या ऐवजी मी एक सल्ला देतो. बघा पटतंय का ! जर शक्य झाल्यास समाजवादी , साम्यवादी, मार्क्स, लेनीन, माऑ, मानवेंद्रनाथ रॉय, साम्यवादी राजवट, त्यांचा चढता आलेख, पुढे ढासळलेली अर्थव्यवस्था, पुर्व आणि पश्चिम जर्मणीचा किस्सा, फिडेल क्रेष्ट्रो आणि चे गव्हेराचे आंदोलन, क्युबा, आताचा व्हेनेझुएला, नव्वदीच्या काळातील रशीया ( त्यावेळी तो युएसएसाआर होता) आताचा रशीया.

या सर्वांसोबत भारताचे १९९० पर्यंतचे धोरण, सार्वजनीक क्षेत्रातील सरकारची गुंतवणूक, त्याचा नफा - तोटा , निर्गुंतवणूक आणि त्याला कम्युनिष्ठांचा विरोध, आदी अनेक विषयांवर कम्युनिष्ठांची बाजू मांडणारं लेखन मराठीत नाहीच.

टाळ्या... टाळ्या !

ह्याला म्हणातात मराठीत उत्तर .. कुठ हायस भाउ !

येऊ द्या लेखन !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

रामदास's picture

26 Jan 2009 - 3:05 pm | रामदास

समाजवाद काय किंवा साम्यवाद काय त्यांचा राजकीय अर्थ काय, यावर योग्य अशी (पूर्वग्रहदुषीत नसलेली) माहीती वाचायला नक्कीच आवडेल.

strong>शोध घेता जगातील समुहहत्या करणार्‍यांत कम्युनिष्ठांचं नाव येणं हे सुध्दा सहज आहे ना?

कारण बहुतेक समुह हत्या या एका माणसाच्या लहरीपणामुळं झालेल्या आहेत. उदा. इदी अमीन, मुगाबे, हिटलर इ.इ.

चोरीराम कोतवाल's picture

4 Feb 2009 - 3:27 pm | चोरीराम कोतवाल

मी असंही ऐकलं आहे की कम्युनिझम हा असा विचार आहे की ज्यांना तो मान्य नसेल त्यांना संपवण्याचा एकमेव मार्ग कॉमरेडांना माहीती आहे. शोध घेता जगातील समुहहत्या करणार्‍यांत कम्युनिष्ठांचं नाव येणं हे सुध्दा सहज आहे ना?

ऍटॉक्रसी किंवा हुकूमशहा बाबत तुमचं काही विशेष तत्वज्ञान आहे का?

लोकशाहीचा तुम्हाला आलेला कळवळा समजू शकतो पण इथे गेले १ वर्षभर आणीबाणी आहे आणि नुकताच एका सदस्याचा ह्या संकेतस्थळावर अकाली मृत्यु झाला / इथल्या खरोखरच्या कम्युनिष्ठांनी त्याला संपवला हा समुह हत्येचाच एक भाग मानायचा का?

त्या विषयी तुम्ही का गुळणी धरलेली आहे? का त्याचेही काही विशेष तत्वज्ञान आहे? का लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वत: कोरडे पाषाण?

कपिल काळे's picture

26 Jan 2009 - 1:48 pm | कपिल काळे

मेथांब्या इथे एक विकी नावाचा लालभाइ आहे. बाकी सगळे बूर्झ्वा आहेत. उगाच तुझा वेळ वाया नको घालवूस. महाराष्ट्रात तर नकोच . त्यापेक्षा तिकडे विकसीत बंगालात किंवा केरळात जा.

तिथे तुमचे तत्वज्ञान मेथांब्यासारखे मुरलेले आहे. तिथे तुला कसं माहेरी गेल्यासारखं वाटेल.
नाहीतर पावासाठी रांग लाव रशियात जाउन. किंवा पगाराच्याएवजी टायर मिळाल्यावर आपल्याला काय वाटले असे प्रश्न रशियन कामगारांना विचार.
किंवा चीन मध्ये जाउन ऑलिंपिक्स साठी किती घरं जबरदस्तीने पाडली त्याची आकडेवारी जमव. किंवा जिम्नास्टीक, जलतरण, डाइव्हिंग मध्ये पदके मिळवून देणारया बालिकांची आजची परिस्थिती ह्यावर संशेधन केलंस तरी चालेल.

करण्यासारखं खूप आहे बघ तुझ्यासारख्या कम्यूनिस्टांना. माझ्यासारख्या भांडवलदारी विचारसरणीच्या लोकसमूहात वेळ नको रे फुकट घालवू. तुझी गरज आहे कम्यूनिझमच्या पुनरुत्थानास!!

अविनाशकुलकर्णी's picture

26 Jan 2009 - 2:01 pm | अविनाशकुलकर्णी

सारखा केरळ चा दाखला का देता... त्यांचि लोकसंख्या किति? तो एक लहान सा प्रदेश आहे..त्याच अर्थ बजेट मुंबई महानगर्पालिकेच्या बजेट हुन लहान आहे.....त्याच्या कम्यनिस्ट पार्टीचा व डांग्यांच्या कम्युनिस्ट पारटिचा संबंध नाहि.. केरळ मधे उद्योग धंदे नाहित..सारे लोक दुबई ,महाराष्ट्रात कामाला आहेत...समाज जिवन ठिक नाहित..सक्तिने धर्मांतर होत आहे....

दशानन's picture

26 Jan 2009 - 2:04 pm | दशानन

मी पण हेच बोंबललो वरती पण ते उत्तर द्यायचे सोडून... दाखले देत बसले आहेत... इकडून तिकडून कॉपी पेस्ट केलेले !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

मेथांबा's picture

2 Feb 2009 - 1:18 pm | मेथांबा

सारखा केरळ चा दाखला का देता...

पण केरळचा दाखला द्यावयाची वेळ माझ्यावर कोणी आणली? महाराष्ट्रातल्या कम्युनिस्ट व समाजवादी पक्षाविषयी मी बोलत असताना रशिया, चीन, क्युबा, बंगाल यांचा विषय कोणी आणला? ज्यांना डांगे व इतर परम आदरणीय कम्युनिस्ट व समाजवादी नेत्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचि संधी मिळत नाहीये तेच जाणुनबुजुन विषयाला फाटे फोडत आहेत.

प्रदीप's picture

4 Feb 2009 - 10:40 pm | प्रदीप

महाराष्ट्रातल्या कम्युनिस्ट व समाजवादी पक्षाविषयी मी बोलत असताना रशिया, चीन, क्युबा, बंगाल यांचा विषय कोणी आणला? ज्यांना डांगे व इतर परम आदरणीय कम्युनिस्ट व समाजवादी नेत्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचि संधी मिळत नाहीये तेच जाणुनबुजुन विषयाला फाटे फोडत आहेत.

राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या आपल्या पक्षाबद्दल आपण नुसते महाराष्ट्रापुरते बोलू शकणार नाही. आजमितीस फक्त म. न. से. बद्दल तसे करता यावे? तसेच आंतराष्ट्रीय घटनांची बरीवाईट दखल आपले पक्षही जाहीरपणे घेत असतातच, त्यात वाईट काही नाही.

चीनचा संदर्भ मी आणला, त्याला प्रमुख कारण हे की आपल्या पक्षाचे चीन हे रोल मॉडेल असावे असे मला वाटते (कुणाच्यातरी खरडीत आपणच माओंचे वाक्य उर्धृत केले आहेतच).

सर्किट's picture

26 Jan 2009 - 2:10 pm | सर्किट (not verified)

हलीच एका गांधीवाद्याने शेवपुरी ह्या स्थळाला थोर मराठी संकेतस्थळांच्या थोर परंपरेत स्थान दिले, नव्हे, मिसळपावासारख्या थोर स्थळाच्या मालिकेत बसवले, त्यामुळे आम्हाला गांधीवादाबद्दल घृणा निर्माण झाली. आणि आम्ही गांधींचे परम शत्रू शहीद भगत सिंगांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करायला सुरुवात केली, तेव्हा असे लक्षात आले, की श. भ. सिं. हे कम्युनिष्ट होते. त्यामुळे आम्ही चिन्यांशी सहमत आहोत (पुढच्या महिन्यात शांघायला जाणार आहो)), आणि कम्युनिष्ट विचारसरणीच भारताला वाचवणार आहे, हे नक्की.

-- सर्किट

मेथांबा's picture

2 Feb 2009 - 1:25 pm | मेथांबा

आणि कम्युनिष्ट विचारसरणीच भारताला वाचवणार आहे, हे नक्की.

अभ्यासपुर्ण शब्दांना आणि सुसंगत विचारसरणीला भाई मेथांबा यांचा लाल सलाम. शेवपुरी मलाही आवडते. तो गरीबांचा पिझ्झा आहे. मात्र त्याचं संकेतस्थळ आहे माहीत नव्हतं. लिंक द्याल का? तिथे शेवपुरीचे फोटो असतील का?

अविनाशकुलकर्णी's picture

26 Jan 2009 - 2:16 pm | अविनाशकुलकर्णी

रामदास स्वामी हे औरंगजेब चे गुप्त हेर होते हे लाल भाईंचे आवडते मत आहे..

सर्किट's picture

26 Jan 2009 - 2:20 pm | सर्किट (not verified)

कारण लालभाई हे "ब्रा. विरोधी" आहेत. त्यमुळेच ते आमचे आवडते आहेत.

-- सर्किट

मेथांबा's picture

2 Feb 2009 - 1:29 pm | मेथांबा

रामदास स्वामी हे औरंगजेब चे गुप्त हेर होते हे लाल भाईंचे आवडते मत आहे..

प्रसिध्ध इतिहासकार अविनाश कुलकर्णी यांनी शोधुन काढले का? का या मनगढंत बाता आहेत? माझ्या लेखाचा आणि या विधानाचा संबंध समजावुन सांगाल का?

दशानन's picture

26 Jan 2009 - 2:25 pm | दशानन

काय बी बना !
ह्यांना पण सलाम केला पाहीजे राव !

सारखं सारखं तोंडावर पडतात पण पुन्हा तोंड वर करुन येता ही मंडळी !

सलाम तुमच्या कार्याला ! सलाम ! सलाम ! सलाम ! --->> एक फुटकळ टिव्ही चॅनल कडून !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

सखाराम_गटणे™'s picture

26 Jan 2009 - 2:40 pm | सखाराम_गटणे™

>>सलाम तुमच्या कार्याला ! सलाम ! सलाम ! सलाम !
साधा सलाम की लाल सलाम ??/

अविनाशकुलकर्णी's picture

26 Jan 2009 - 2:35 pm | अविनाशकुलकर्णी

बंदुकिच्या गोळितुन सत्तेचा उगम असे विध्वंसक तत्वज्ञान असलेला चिन पुरस्क्रुत माऒ चा लाल विषाणु आता भारतात वेगाने पसरत आहे.नेपाळवर कबजा करुन राजेशाहि संपवुन एकमेव हिंदु राष्ट्र संपवुन हा विषाणु भारतात पसरत चालला आहे..

दशानन's picture

26 Jan 2009 - 2:40 pm | दशानन

अहो राहू दे राहू दे !

तुम्ही आता हिंदु खतरे में ... असा जल्लोश नका करु ... राहु दे !

रिल्याक्स !

व्यक्तीगत नका होऊ !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

सखाराम_गटणे™'s picture

26 Jan 2009 - 2:43 pm | सखाराम_गटणे™

>>तुम्ही आता हिंदु खतरे में ... असा जल्लोश नका करु ... राहु दे !
तुम्हाला आक्रोश म्हणायचे आहे काय?

दशानन's picture

26 Jan 2009 - 2:44 pm | दशानन

नाय !

जल्लोशच म्हणायचं होतं !

मुद्दा सापडाला की लोकं जल्लोशच करतात !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

कालिन्दि मुधोळ्कर's picture

26 Jan 2009 - 10:00 pm | कालिन्दि मुधोळ्कर

लाल सलाम,
कम्युनिस्ट पक्ष इतरांपेक्षा चांगले आहेत यात वाद नाही. महाराष्ट्रात संघवाले आणि शिवसेनेचि गुंडगीरी यात लोकांच्या विचारशक्ती अडकली आहे. हा आपलाच करंटेपणा आहे.

हे लोक आत्ताच्या अमेरिकेबद्दल बोलणार नाहित--तो गोता काय कामगारांनी केला?; केरळ बाबत चिडीचूप. क्यूबा? वेनेझुएला?

नीलकांत's picture

26 Jan 2009 - 11:12 pm | नीलकांत

जरा स्पष्ट बोला की राव, वाईच पुढे बोलता येईल. :)

नीलकांत

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Jan 2009 - 12:57 am | llपुण्याचे पेशवेll

खरे आहे . या पेक्षा ही विचारशक्ती कमुनिष्ठांशी निष्ठा दाखवण्यात खर्ची घालावी .. लाल सलाम ठोकावे. अमेरिकेच्या प्रश्नावर कमुनिष्ठपणा हाच कसा उपाय आहे हे सांगावे. महाराष्ट्राने इतके दिवस कमुनिष्ठ न होऊन स्वतःचे किती नुकसान केले यावर व्याख्याने द्यावीत.

म्हणजे पानात टाकायला लागल्यावर आमचे नाना म्हणायचे 'मेल्या! पानात टाकून रे अन्न वाया घालवतोस. त्या पेक्षा खाऊन वाया घालव'

पुण्याचे पेशवे
Since 1984

रामोजी's picture

27 Jan 2009 - 1:33 am | रामोजी

केरळ चे काय सांगता, तिकडे हमालांची लाल युनिअन आहे. माझ्या कडे एकच पेटी होती. मला हमालाची गरज नव्हति. तरीही हमाल माझा बरोबर चालत होते. ट्याक्सी जवळ गेल्यावर जबर्दस्तीने पैसे मागू लागले. शेवटी आरडा ओरडा करून मी त्यांना हाकलले. केरळ मधे जाउन पहा उद्योग धंधे किती डब घाई ला आले आहेत.
शिवसेने ची गुंडगिरी दिसते, बंगाल मधली जाळपोळ, सक्तीचे बंद हे काय राष्ट्र्कार्य आहे. कम्युनिझम ही अफू ची गोळी आहे हेच खरे.

प्रदीप's picture

27 Jan 2009 - 10:29 am | प्रदीप

कालिंदीबाई,

आताच्या अमेरिकेबद्दल मेथांबा ह्यांनी वर काही विख्यात लोकांची वचने दिली आहेत. 'पावासाठीही रांगा लावाव्या लागतील' असे ते म्हणतात. ह्यावर मी त्यांना चीनसंबंधी दोन प्रश्नांवर टिप्पणी करण्यास विनंति केली होती. (ह्यापैकी एक मुद्दा अमेरिकेच्या पडझडीचा चीनवरील परिणाम ह्याच्याशी संबंधित आहे). त्यावर त्यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. आजकालच्या जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे एकच काहीही वेगळे काढून त्याविषयी बोलता येणे अशक्य आहे. एका बलाढ्य देशाचे (भांडवलशाही) 'कोसळणे' (मेथांबांना अभिप्रेत आहे, मला तसे होईल असे व्यक्तिशः वाटत नाही) तर त्याचा परिणाम, भारतीय कम्युनिस्टांना आदर्शस्थानी असलेल्या चीनवर होणारच-- नव्हे तसा तो होतही आहे. त्याचे काय, असा माझा प्रश्न आहे.

केरळाची नक्की किती प्रगति आहे, ह्याविषयी मी त्या सरकारच्या संस्थलावर गेलो, तेथे माहिती धड मि़ळेच ना (ह्याविषयी इथे पहा). नुसतेच केरळ खूप प्रगत आहे, असे म्हणण्यापेक्षा आकडेवारी द्यावी, ही काही फार अपेक्षा नाही?

वेनेन्झुएलाचे काय? तेल आहे, आरडाओरडा करताहेत. ह्यापलिकडे त्याविषयी काय बोलणार?

भारतीय कम्युनिस्टांची चीनविषयीही मते जाणून घेणे आवडेल. मुखत्वे ते चीनी नेतृत्व मानतात. तेव्हा राज्यशकट चालवण्याची जी कार्यपद्धति तेथील राज्यकर्ते अवलंबतात, ती भारतिय कम्युनिस्टांना कितपत मान्य आहे ह्याविषयी जरूर चर्चा व्हावी.

येथे भारतिय कम्युनिस्टांचे स्वातंत्रयुद्धातील 'योगदान', त्यांच्या विचीध सामाजिक व राजकिय विषयावरील भूमिका, त्यांची बलस्थाने, त्यांच्या चुका (त्यांना मान्य असलेल्या व नसलेल्या) ह्या सर्वांवर आनंदाने चर्चा करूया. अर्थातच ह्या विषयावर लोकांच्या भावना तीव्र असल्याने मधे मधे नुसतीच आगपाखड होईल, तिच्ज्याकडे दुर्लक्ष करायचे.

तर आता, मेथांबा अथवा इतर कुणीही माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्याची मी वाट बघतो.

भास्कर केन्डे's picture

27 Jan 2009 - 3:05 am | भास्कर केन्डे

काय पण गंमत आहे बॉ इथे!

चर्चेला एक विषय ठेवायचा, प्रतिसाद आले की त्यांना धुडकावून लावायचे. आरोप करु नको, महाराष्ट्राबद्दलच बोल असे सुनवायचे. स्वतः मात्र सतत केरळाचे उदाहरण द्यायचे. अशा चिमुकल्या राज्याचे जिथे परदेशातून येणारी मदत थांबली तर अर्ध्या घरांत चुली पेटणार नाहीत, जिथे छोट्या-छोट्या गावांतल्या चर्चेसला परदेशी इव्हँजिलिकल संस्थांकडून दरचर्षी करोडोंची रसद मिळते (ती कशी वापरली जाते तो एक वेगळा विषय होऊ शकतो), जिथे कम्युनिस्ट राज्यकर्त्यांच्या गुंडांची संघटीत गुन्हेगारी थक्क करणारी आहे, जिथे विरोधकांचे भर दिवसा गळे चिरले जातात व पोलिसात केसही दाखल करुन घ्यायची मारामार आहे व जिथे स्वतःचे (परदेशातून व पर्यटनातून येणारे वगळून) उत्पन्न आमच्या बीड जिल्ह्यायेवढे सुद्धा आहे का नाही याची खात्री नाही....!!!

जियो कॉम्रेड बंधू जियो!!

बरं तुम्ही आदर्श पूर्वाश्रमीचा रशिया-चीनमधून घेता मात्र तुलना त्यांच्या सोबत नको. मी शिवसैनिक नाही. पण शिवसैनिक वेळोवेळी जिवाची ढाल करुन जनतेची मदत करतात हे मी जवळून पाहिले आहे. मग ते पूर असोत वा दहशतवादी हल्ले. अशी आजच्या काळातली तुम्ही (कॉम्रेडांनी) जीवावर उदार होऊन जनतेसाठी काही केल्याची उदाहरणे तुम्ही देऊ शकाल काय? उलट नक्षलवाद म्हणजे कॉम्रेड अशी एक साखळीच आज तयार झालेली आहे.

कॉ. डांगेंसारखे धुतल्या तांदळासातखे स्वच्छ नेते कधी काळी भारतीय डाव्या विचारसारणीत होते. त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. पण तो आता इतिहास आहे. ते नेते अशा वेळी उदयास आले जेव्हा भांडवलशाही-कम्यूनिझम यांच्यात कोण चूक कोण बरोबर या कसोटीचा निकाल लागला नव्हता. त्यांच्या सदसदविवेक बुद्धीला पटले त्या विचारसारणीला वाहून देऊन त्यांनी समाजसेवा केली. पण त्या कसोटीचा निकाल लागल्यावर, रशियातून कम्यूनिस्टांचा निप्पात झाल्यावर व चीनने कम्यूनिस्टांच्या मूळ विचारसारणीला छेद दिल्यावरही जर तुम्ही स्वतःचीच लाल म्हणत असाल तर एका शिवसैनिकाने तुम्हाला वर दिला तसा प्रतिसाद न अल्यास आश्चर्य वाटेल.

बरे तुम्ही स्वतःची लाल म्हणत असाल तर आम्हाला त्याचे सोयर सुतक नाही. पण म्हणून ज्यांच्या समाजकार्याच्या पासंगालाही तुमच्या संस्था पुरत नाहीत त्यांच्या नावाने बोटे मोडून तुम्ही स्वतःचे हसे का करुन घेता? महापूर, भुकंप, वादळे, सुनामी, वा आणखी काहीही आपत्ती असो संघावाले जीवाची पर्वा न करता व कसलाही बोलबाला न करता तात्काळ सेवाकार्यात लागलेले असतात. मी त्या त्या ठिकाणी कधीही लालभाईंना पाहिल्याचे स्मरत नाही. चक्रीवादळा नंतर रेल्वेस्थानकावर येऊन पडलेली मदत इच्छित स्थळी पोचवण्यासाठी ममता बॅनर्जी सारख्या संघद्वेष्ट्या मुख्यमंत्र्याला सरकारी यंत्रणा कमी पडू लागली तेव्हा तुमच्या कॉम्रेडांच्या गडात मदत घ्यायची वेळ आल्यावर आठवण झाली ती संघावाल्यांचीच. तेच पुढे त्सुनामी नंतर झाले... प्रचंड हाणी पोचलेल्या दुर्गम खेड्यांत जिथे न्यूज चॅनलवाले जाऊ शकले नाहीत तिथे परदेशी मिशनरी वा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते फिरकतही नव्हते... तिथे पोचून पिडितांचे आश्रू पुसले कोणी? संघावाल्यांनीच. असो. तूर्तास येवढेच... पण मुद्दा हा की आपण एक-दोन इतिहासजमा स्वच्छ कॉम्रेडांचे नावे घेऊन लाल सलाम ठोकल्याने काही होणार नाही. त्यासाठी त्यागी वृत्ती बाळगून व वर्तमानाचे भान ठेऊन समाजकार्याला वाहून घ्यावे लागते. केरळाच्या बाहेर डोके काढून स्वतःला सिद्धा करून दाखवा अन मग बोला.

आपला,
(लोकशाहीवर अगाध श्रद्धा असलेला भारतीय) भास्कर

शिवसैनिक वेळोवेळी जिवाची ढाल करुन जनतेची मदत करतात हे मी जवळून पाहिले आहे. मग ते पूर असोत वा दहशतवादी हल्ले. अशी आजच्या काळातली तुम्ही (कॉम्रेडांनी) जीवावर उदार होऊन जनतेसाठी काही केल्याची उदाहरणे तुम्ही देऊ शकाल काय?

अफाट हिंसाचार करायचा आणि त्यावर पांघरुण घालण्यासाठी २-३ लोकोपयोगी कामे करुन दाखवायची. श्रीकृष्ण आयोगाने ठेवलेला ठपका इतक्यात विसरलात का राव? का मतलबी विसराळुपणा आहे तुमच्याकडे. शिवसेनेच्या नेत्यानी लोकांना करोडो रुपयांचा चुना लावला. आमच्या एका तरी नेत्याबद्दल कोणीतरी भ्रष्टाचाराचा आरोप करु शकतो का? आणि हे जे जिवावर उदार झालेत ते सेनेचे नेते नव्हेत तर सर्वसामान्य कार्यकरते. कुठे होते तेव्हा उध्दव ठाकरे? बिळातुन बाहेर आलेले त्याना तर कोणी पाहिले नाही.

विकास's picture

27 Jan 2009 - 12:28 am | विकास

माझी कम्युनिझम बद्दलची "आत्मियता" ;) येथील इतर प्रतिसाद वाचल्यास समजेल म्हणून आकाशवाणी परत करण्याचे टाळले आणि टाळत आहे.

तरी देखील, "महाराष्ट्रातील समाजवादी आणि कम्युनिस्ट राजकारणाची थोर परंपरा " मधे आपण म्हणत असलेल्या सर्वांबद्दल मला खर्‍या अर्थी आदर आहे आणि राहील. अर्थात त्यातील, "कॉ. गुलाबराव गणाचार्य, कॉ. बी. टी. रणदिवे, कॉ. गंगाधर बुरांडे " बद्द्ल काही माहीती नाही. रणदिव्यांचे केवळ नाव ऐकले आहे. अधिक माहीती आवडेल. वेगळा लेख अवश्य लिहा. ना.ग. गोरे आणि जॉर्ज फर्नांडीसना विसरलात अथवा आवडत नसले तरी त्यांचे योगदान कमी करू नये असे वाटते. कोकण रेल्वे तयार करण्यासाठी स्वतंत्र कोकण रेल्वे कमिशन काढून जॉर्जसाहेबांनी ते काम पुढे करायला मोठी मदत केल्याचे आठवते. तेच मधु दंडवत्यांबद्दल (जरी त्यांनी "मुस्लीम मेल्यानंतरही मातीत जात असल्याने, देशाच्या मातीशी जास्त इमान राखतात" असले बाष्कळ विधान केले असले तरी...).

यातील बर्‍याच नेतृत्वाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी लढा दिल्याचे विसरणे म्हणजे कृतघ्नताच ठरेल. (अर्थात त्यात इत्यरही होते हे विसरता येत नाही. मात्र त्या काळात जगातल्या कामगारांना एकत्र करण्याच्या भानगडीत न पडता, मराठी माणसासाठी सर्वप्रकारच्या मराठी माणसांबरोबर एक होण्याची सक्रीय इच्छाशक्ती त्यांनी दाखवली)

मात्र या लेखासंदर्भात एक प्रश्न पडतो, की जर इतके सगळे आदर्श वगैरे नेते होते तर मार कुठं खाल्ला? त्यांना सत्ता का स्थापता आली नाही? लोक त्यांच्या पाठीमागे का राहीले नाहीत?

माझ्या लेखी समाजवादी नेत्यांनी काँग्रेसला रामराम करून जेंव्हा प्रजासमाजवादी पक्ष काढला तेंव्हाच त्यांनी स्वत:ला कमकुवत केले आणि काँग्रेसमधील अनिष्ठ नेत्यांना सत्तेत ठेवायला अप्रत्यक्ष मदत केली. (अर्थात त्यांचा तसा उद्देश नव्हता हे नक्की!)

कम्यनिस्टांबद्द्ल काय बोलायचे? शब्द अपुरे पडतात... फक्त इतकेच म्हणेन त्या तत्वज्ञानाचा काही उपयोग नाही. जेंव्हा चीन युद्धात देशापेक्षा परदेशी तत्व मोठे समजत देशाच्या शत्रूला जास्तव जवळचे मानले तेंव्हाच त्याच्या मर्यादा समजल्या....

असो,

केदार's picture

27 Jan 2009 - 1:06 am | केदार

लाल लोक ही सध्याच्या इस्लामी टेररिस्ट पेक्षा जास्त टेरर आहेत. त्यांनी किती लोकांना मारले हे इथे पाहा.

http://www.satp.org/satporgtp/countries/india/database/fatalitiesnaxal.htm

निष्कंलंक वैगरे कमी लोक होती. जी सर्वच पक्षात असतात त्यामुळे वरिल उदा चूकीची वाटतात.
अहिंसे सारखच हे तत्वज्ञान ही फसवे आहे. असे नसते तर रशिया लोकशाहीकडे वळले नसते.

१९६२ च्या चिनी युध्दात हे लोक सैन्य पाठवल्यावर गळा काढून रडत होते. ह्या लोकांचे मालक दुसर्‍या देशात आहेत. शिवसैनीक निदान मान्य करतात ही रिमोट कंट्रोल बाळासाहेंबाकडे आहे म्हणून पण हे लोक म्हणजे. छ्या. देशद्रोह्यासारखे वागले त्या काळात. आंदोलन काय अन मोर्चे काय. अरेरे.

कदाचित म्हणूनच आम जनता ह्यांचा सोबत नसते.

लाल सेनेला लाल नाव का पडले ह्याचा शोध घेता मी अश्या निष्कर्षाप्रत आलो आहे की ह्या लोकांना रक्ताचा अभिषेक फार आवडतो. रक्ताचा रंग आल म्हणून हे लाल. वर आकडेवारी पाहा.

कोलबेर's picture

27 Jan 2009 - 1:48 am | कोलबेर

भगतसिंग आणि सुभाषबाबूंसमोर एकमुखाने नतमस्तक होणारे मिपाकर, कम्युनिष्ट आणि समाजवाद्यांचा विषय निघाल्यावर असे होलसेल मध्ये का तुटून पडतात कळत नाही बॉ!

केदार's picture

27 Jan 2009 - 1:52 am | केदार

कारण त्यांच्या कम्युनिझम मध्ये लोकांच्या हत्या समाविष्ट नाहीत. ते आधी देशप्रेमी व नंतर कम्युनिस्ट होते.
तूम्ही आपल्या देशातील सद्य कम्युनिस्टांचा इतिहास समजुन घ्या मग तूम्हाला हा प्रश्नच पडनार नाही.

कोलबेर's picture

27 Jan 2009 - 2:00 am | कोलबेर

मग विरोध त्यांच्या हत्यांना असायला पाहिजे ना...कम्युनिझमला नाही..इथे वेगळेच दिसत आहे!

केदार's picture

27 Jan 2009 - 2:21 am | केदार

नाही विरोध बदलेल्या कम्युनिझमला आहे. मूळ कार्ल मार्क्स तुम्ही वाचा त्यात हत्येवर भर नाही.
दास कॅपीटलने मी ही भारावून गेलो पण ती आयडीयल स्तिथी येत नाही असे नसते तर खुद्द रशियात लेनीन चा पुतळा पडला नसता वा आज रशिया लोकशाहीकडे वळले नसते.

त्याचा हवा तसा अर्थ ह्या लोकांनी लावून घेतला आहे व ही लोक हूकूमशहा झाले आहेत ही वस्तुस्तिथी आहे. कम्युनिस्ट असनारे इतर देश बघा, सगळीकडे हुकमशाही आहे.

भारतीय कम्युनिस्ट ( ह्यालाही एक पार्टी नाही, मार्क्स, लेनीन ब्ल्बा ब्ला अश्या स्वतःच्या इगोत ह्या लोकांनी कम्युनिझमच्या पण पार्ट्या काढल्या आहेत) वा चिनी कम्युनिझम वा इव्हन रशिया ह्यांचा बेस हा सशस्त्र क्रांतीवरच आहे. . ते होणारच दुसरा पर्याय नाही. मग लोकशाही योग्य की हुकूमशाही हा वाद परत सुरु करायला हरकत नाही. कम्युनिझम व्यवस्था ही लोकशाही व्यवस्थे विरुध्द आहे. केरळ वा बंगाल इथला कम्यूनिझम खरा नाही कारण तो भारतीय संविधानाशी सहमत (म्हणजे लोकशाही पध्दतीने निवडनुका घेणारा ) आहे. त्या कम्युनिझमच्या नावाखाली दक्षिन महाराष्ट्रात वाट्टेल ते अत्याचार होताना मी स्वतः पाहीलेत. (किनवट तालुका, नांदेड जिल्हा) ह्या तालूक्या शेजारीच अदिलाबाद हा आंध्राचा तालूकाही आहे. तेथे नक्षलवादी गरिब जनतेवर किती अत्याचार करतात हे देखील पाहीले आहे.

झार ह्या मनोवृत्तीला नाहीसे करन्यासाठी कम्युनिझम़ (कदाचीत) योग्य होता वा एक पर्याय होता, पण नंतर कम्युनिस्टच झार होतात कारण माणासाचा मूळ स्वभाव हा पॉवर वेडा असने हा आहे. मग ही पॉवर एकदा का क्रांतीमुळे आली की मग संपले. ती लोक इतरांवर अत्याचार करणार. हा मूळ गाभा म्हणून माझा विरोध.

अहो फार लांब कशाला जाता, इथे मिपा वर मी काही दिवस येतोय, त्यात तात्याने बरेचदा आणिबाणी लावून काही लेख काढून टाकले तर इथली लोक दुसरीकडे जाऊन मिपावर लोकशाही नाही असा गोंधळ घालताना वाचला आहे. मग मला सांगा साध्या लेखनावर बंदी घातली तर आपण लोकशाही नाही म्हणतो ( ते ही जालावरील एका छोट्या समुदाय असनार्‍या साइटीवर) मग आपल्या देशावर हुकमशाही कम्यूनिस्टांनी केलेले राज्य आवडेल का? म्हणून विरोध.

(तात्या हलेक घ्या, उदा म्हणून वापर केला इतकेच, आनी ते चपखल बसत होते म्हणून.)

असा एकतरी देश दाखवा जिथे कम्युनिझम मस्त नांदतोय. एकही नाही. चिन देखील आता प्युर कम्युनिस्ट राहीला नाही तर तो मिक्सड आहे. त्या चौकात जाहीर हत्याकांड करनारा चिन (प्युअर कम्युनिस्ट) आणी आज अमेरिकेच्या अध्यक्षांना त्यांचा कडे बोलावनारा चिन हे वेगळे आहेत.

(लोकशाही जपनारा व वाढविनारा) केदार

कोलबेर's picture

27 Jan 2009 - 3:15 am | कोलबेर

तुमची लोकशाहीची कळकळ समजते. पण नुकतेच सुभाषबाबूंवर लिहिलेल्या लेखात हा उल्लेख बघितला आणि इथे मोठमोठे प्रतिसाद देणार्‍यांनी तिकडे का बरे काहीच मत नोंदवले नाही ह्याचे आश्चर्य वाटले इतकेच.

त्यांची राजकीय विचारसरणी ही फॅसिझम आणि कम्युनिझम यांचे मिश्रणाची होती.ज्यास त्यांनी 'साम्यवाद' हे नाव दिले होते.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर काही वर्षे तरी authoritarian rule असला पाहिजे असे त्यांचे म्हणने होते.

भगतसिंग आणि सुभाषबाबूंसमोर एकमुखाने नतमस्तक होणारे मिपाकर, कम्युनिष्ट आणि समाजवाद्यांचा विषय निघाल्यावर असे होलसेल मध्ये का तुटून पडतात कळत नाही बॉ!

भगतसिंग आणि सुभाषबाबूच कशाला वरचा माझा प्रतिसाद पाहीला तर त्यातील सर्वांचा आदर करायला कमीपणा वाटला नाही... तरी देखील याचा अर्थ म्हणून कम्युनिझम बरोबर आहे असे म्हणणे, म्हणजे जरा अतीच झाले. वर केदारने दिलेला दुवा पहा आणि नक्षलवाद्यांचे स्मारक बांधण्यात सार्थकता मानणारे अधुनिक कम्युनिस्ट पहा (जे अमेरिकेत राहतात/राहायचे!).

उद्या गांधींना मानायचे याचा अर्थ मुळासकट गांधीवाद मानायचा असा अर्थ घेतला तर काय होईल? - भारताला सैन्यपण ठेवता येणार नाही आणि तुम्हाआम्हाला कोळंबीपण (मांसाहार) खाता येणार नाही :-) चालणार आहे का? मग असे म्हणायचे का, गांधींच्यापुढे नतमस्तक होतात आणि मग चिकनवर तुटून पडतात? असे कसे बॉ? ;)

आणि कोणी सांगावे? जर भगतसिंग / सुभाषबाबू हयात असते आणि कम्युनिस्टांचा आचरटपणा करू लागले असते तर त्यांनापण विरोधच झाला असता. पण त्यांची महती बघता, ते कम्युनिस्टम्हणून नंतर राहून स्वत:चे आणि देशाचे इमान चीन आणि रशियाला विकायला गेले असते असे वाटत नाही...अर्थात या जर-तरच्या गोष्टी झाल्या.... दुर्गापूजा करणार्‍या कलकत्ताच्या कम्युनिस्टांना विचारून बघा, भगतसिंगसारखे नास्तिकतेसंदर्भात अतिशय स्पष्ट विचार स्वतःचे मरण दोन दिवसांवर ठेपलेले असताना तरी ते करू शकतील का ते...

सखाराम_गटणे™'s picture

27 Jan 2009 - 9:22 am | सखाराम_गटणे™

भगतसिंग आणि सुभाषबाबूंसमोर एकमुखाने नतमस्तक होणारे मिपाकर, कम्युनिष्ट आणि समाजवाद्यांचा विषय निघाल्यावर असे होलसेल मध्ये का तुटून पडतात कळत नाही बॉ!
राजे,, एकमुखाने तुटून पडतात

रामोजी's picture

27 Jan 2009 - 2:31 am | रामोजी

कम्युनिझम आणि मुस्काट्दाबी (न जमल्यास हत्या ) एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. महाराष्ट्रात कम्युनिझम असता तर ईथे मुक्त चर्चा होउ शकली असती काय? क्युबा, च्यायना मधील आंतर जाला वर ची बंधने पहा ना...

एकलव्य's picture

27 Jan 2009 - 7:30 am | एकलव्य

यांचे नाव यादीतून निसटले आहे. फार मोठा (जायंट या अर्थाने) माणूस!

कम्युनिस्ट विचारसरणी चांगली किंवा वाईट यावर स्वतंत्र वाद करता येइल. ( मेथांबास्टाईल ;) किंवा नीलकांतस्टाईल :) ) पण यांतील काही (सर्वांविषयी माहिती नाही म्हणून) मंडळी दिग्गज होती आणि चारित्र्य सांभाळून होती हे खरेच. आपल्या पिढीला तितकीशी माहिती नाही पण स्वातंत्र्यानंतर लगेचच्या काळात तसेच आणीबाणीच्या काळापर्यंत महाराष्ट्रातील ह्या मंडळींचा थोडाफार चांगला प्रभाव असलेला दिसतो.

नीधप's picture

27 Jan 2009 - 9:58 am | नीधप

या सगळ्याच लोकांच्या कर्तुत्वाबद्दल नव्याने ओळख करून घ्यायला नक्कीच आवडेल. पण हे चांगले होते म्हणून समाजवाद ग्रेट असं तुणतुणं वाजवणं हा मूर्खपणा..
(एकलव्य वाजवतोय असं म्हणायचं नाही. इथे इतर आहेत वाजवणारे त्यांच्याबद्दल आहे हे.)

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

एकलव्य's picture

28 Jan 2009 - 3:58 pm | एकलव्य

वाजविणारा मेथांबा असला की समाजवादाची कशी वाट लागते ते ही चर्चा पाहिली की कळेलच! चीअर्स!!

I think the best way to discredit your opponent is to find out the craziest person on your enemy's side of the spectrum and give him credence. That crazy person and his theories will bury your opponent much more easily.

- एकलव्य

नीधप's picture

27 Jan 2009 - 9:58 am | नीधप

या सगळ्याच लोकांच्या कर्तुत्वाबद्दल नव्याने ओळख करून घ्यायला नक्कीच आवडेल. पण हे चांगले होते म्हणून समाजवाद ग्रेट असं तुणतुणं वाजवणं हा मूर्खपणा..
(एकलव्य वाजवतोय असं म्हणायचं नाही. इथे इतर आहेत वाजवणारे त्यांच्याबद्दल आहे हे.)

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मेथांबा's picture

2 Feb 2009 - 1:39 pm | मेथांबा

स्मरण करुन दिल्याबदद्ल धन्यवाद. खरोखरच हि यादी इतकी मोठि आहे की ५-१० नावे राहुन गेली असतीलच.

http://www.vandemataram.com/biographies/patriots/patwardhan.htm

नितिन थत्ते's picture

27 Jan 2009 - 8:16 am | नितिन थत्ते

गेल्या १५-२० वर्षांत रशिया कम्युनिझम कडून लोकशाहीकडे (भांडवलशाहीकडे) वळला आहे. त्या काळात रशियाची प्रगती झाली आहे की अधोगती झाली आहे? याबाबत मिपाकरांपैकी कोणाकडे काही माहिती असेल तर ती सांगावी. किंवा दुवे द्यावेत. प्रगती म्हणजे जीवनमान, दारिद्र्यरेषा व त्याखालील जनतेची संख्या, जीडीपी, महागाई दर, धान्योत्पादन, औद्योगिक उत्पादन, आरोग्य सेवा वगैरे. कम्युनिझम संपतानाची खरी परिस्थिती काय होती हे पोलादी पडद्यामागे लपलेले होते हे गृहीत धरून त्यानंतर ३ वर्षे ते आतापर्यंत अशी प्रगती मोजायला हरकत नाही.

खराटा
(येथे उत्तम काथ्या कुटून मिळेल)

केदार's picture

27 Jan 2009 - 9:38 am | केदार

साठी ही लिंक बघा. https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/rs.html...

त्यातले इकॉनॉमी सेक्शन बघा.

गेले ५ वर्षे ब्रिक बी आर आय सी ही टर्म तूम्ही ऐकली असेल. त्यातला आर म्हणजे रशिया.

नितिन थत्ते's picture

27 Jan 2009 - 9:55 am | नितिन थत्ते

तुलनात्मक माहिती गेल्या १०- १२ वर्षांतील मिळाली तर हवी आहे.

खराटा
(येथे उत्तम काथ्या कुटून मिळेल)

दशानन's picture

27 Jan 2009 - 10:01 am | दशानन

हा हा !

हे तुमचं बरं हाय.. त्यामायला आम्ही काय विचारलं तर तुम्ही उत्तर देत नाही.... कोणी उत्तर दिलेले तर तुम्ही संतुष्ट होत नाही... !

अजब तुझे सरकार !

* प्लिज हे खराटा... नाव बदला हो... तुम्ही वयाने मोठे दिसता उगाच तुमचा अपमान केल्या सारखं वाटतं तुमचं नाव घेतल्यावर ;)

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

नितिन थत्ते's picture

27 Jan 2009 - 10:23 am | नितिन थत्ते

जे उत्तर दिले होते त्यात फक्त २००८ चीच माहिती होती. म्हणून पुन्हा विचारले.

खराटा
(येथे उत्तम काथ्या कुटून मिळेल)

केदार's picture

27 Jan 2009 - 10:40 am | केदार

रशीया हा कम्युनिस्ट देश होता, तिथे पारदर्शकता न्हवती. गेल्या काही वर्षात स्तिथी बदलली तरी तूम्ही जे कम्पॅरिझन मागत आहात ते नेटवर उपलब्ध नाही बहुदा. तरिही शोधकार्य चालू आहे. त्या लिंक मध्ये असे लिहीले आहे की गेल्या १० वर्षाच्या ग्रोथ रेट ७ टक्के आहे. एक इकॉनॉमी अभ्यासक म्हणून सांगतो हा रेट खरच खूप जास्त आहे, ते ही सलग १० वर्षे.

लक्षात आलेली गोष्ट -त्यांचा डेटाही ते जनतेला सांगत नाहीत ते कसले कम्युनिस्ट? पेक्षा आपली जातीत- आरक्षणात व सर्व गोष्टीत होरपळलेली लोकशाही बरी, निदान नेटावर आकडे तरी लगेच मिळतात. आकडे लिहील्यावर कोणाचा खुन होत नाही.

नितिन थत्ते's picture

27 Jan 2009 - 10:37 am | नितिन थत्ते

मेथांब्याने चर्चा सुरू केली होती समाजवादी व कम्युनिस्ट नेत्यांचे चारित्र्य आणि त्यांनी केलेले राजकारण. आपण काथ्या कुटतोय कम्युनिझम चांगला की वाईट याचा.

खराटा
(येथे उत्तम काथ्या कुटून मिळेल)

दशानन's picture

27 Jan 2009 - 10:40 am | दशानन

कम्युनिस्टपणा कळाल्या शिवाय त्याच्या नेताचे चारित्र्य व त्यांनी केलेले राजकारण ह्यावर चर्चा होऊ शकत नाही असा माझा समज आहे... व तो समज बरोबर होता हे तुम्हाला दोन पानं भरुन आलेल्या प्रतिसादातून दिसलेच असेल..

अरे कोणी आहे का.... ह्याचा भाग दोन चालू करा राव.. टाका कोणी तरी क्रमशः

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

प्रदीप's picture

27 Jan 2009 - 10:51 am | प्रदीप

जर महाराष्ट्रावर समाजवादी आणि कम्युनिस्ट यांची सत्ता येती तर आज महाराष्ट्र प्रगतीपथावर दिसला असता याचे मुख्य कारण म्हणजे डागविरहित समाज नेतृत्त्व. ही लोकं म्हणजे ५२ खणी हिरे होते हिरे. काय एकेकाचा आवाज, बोलण्याची हातोटी, माणसे जोडण्याची कला. वा वा. अतिशय सुंदर. परत एकावरही चुकुन पण कोणी भ्रष्टाचाराचा आरोप करु शकणार नाही. अजातशत्रु म्हणतात की काय तसं.

चला तर मंडळी, आपण एकत्र येऊन या थोर परंपरेचं पुनरुजीवन करुया.

ही सर्व माणसे शुद्ध राजकिय व सामजिक चारित्र्याची होती, हे अगदी खरे. त्याबद्दल कुणालाही प्रतिवाद करता येण्यासारखा नाही. पण असेच रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांविषयीही म्हणता येईल. तेथेही अशीच निस्पृह सेवाभाव असणारी माणसे. हेच काही गांधीवाद्यांबद्दलही म्हणता येईल.

स्वच्छ चारित्र्य हे जरी लाख मोलाचे असले, तरी ही माणसे ज्या पक्षांसाठी कार्यरत आहेत, त्यांची सामाजिक व राजकिय ध्येयधोरणे काय आहेत, हेही तितकेच महत्वाचे आहे.

नितिन थत्ते's picture

27 Jan 2009 - 11:23 am | नितिन थत्ते

माणूस स्वच्छ चारित्र्याचा असला म्हणून त्याची धोरणे मान्य करावीत असे नाही. लोकशाहीत धोरण महत्त्वाचे म्हणून पक्ष महत्वाचा.

म्हणून आमचे मेथांब्याला उत्तर
माणूस चांगला आहे हो पण तो ज्या धोरणाचे प्रतिनिधित्व करतो ते धोरण आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही त्यांना मत देणार नाही.
दुसरे म्हणजे कोणी कितिही चांगला असला तरी त्याला निवडून यायलाच हवे. तो चांगला आहे म्हणून त्याला तसाच आमचा प्रतिनिधी म्हणून आम्ही नाही मान्य करणार.

कारण कोण आमचा प्रतिनिधी व्हावा हे आम्ही निवडणुकीने न ठरवता मीडियाने किंवा इतर कोणी (गिव्हन म्हणून) ठरवणे म्हणजेच हुकूमशाही.

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

मेथांबा's picture

4 Feb 2009 - 12:39 am | मेथांबा

नुकत्याच गेटवे इथे झालेल्या प्रदर्शनात लोकांनी भ्रष्ट राजकारण्यांवर सडकुन टीका केली व माणुस पाहुन मत द्या असे म्हटलं ते कशासाठी असेल?

प्रदीप's picture

4 Feb 2009 - 10:27 pm | प्रदीप

कॉ. मेथांबा साहेब,

समजा आपल्या भागातून रा. स्व. संघाचे एक कार्यकर्ते निवडणूकीस उभे राहिले. आपली राजकिय मते त्यांच्या अगदी विरूद्ध आहेत, (तरी हे मान्य व्हावे की तिथेही अनेक निस्पृह, तळमळीने जनकार्य करणारे कार्यकर्ते आहेत)*. तेव्हा मग आपण त्यांना निव्वळ ह्याच कारणांसाठी मत द्याल का? 'माणूस पाहून मते द्या' असे जे म्हणतात ते उद्वेगाने म्हणतात. पण मते देतांना नुसत्याच सामाजिक चारित्र्याचा निकष लावणे हे काही राजकिय परिपक्वतेचे लक्षण नाही, हे आपल्याला मान्य व्हावे.

[*स्वच्छ सामाजिक चारित्र्याचे कार्यकर्ते कम्युनिस्ट, (पूर्वीच्या) समाजवादी व रास्वसंघात बहुतांश आहेत, हा काही योगायोग नाही. ह्या सर्वच संघटनात माणसे तावून सुलाखून घेतली जातात, व तशीच ती कार्य करत रहातात. बाजारबुणग्यांना तिथे थारा नाही].

नीलकांत's picture

27 Jan 2009 - 10:56 am | नीलकांत

समाजवादी आणि कम्युनिष्ट विचारसरणीच्या लोकांच्या राजकारणाची चर्चा करायची मात्र त्यात कम्युनिझम कुठे येता कामा नये? हे कसब नाही बुवा आपल्यात. :)

जर महाराष्ट्रावर समाजवादी आणि कम्युनिस्ट यांची सत्ता येती तर आज महाराष्ट्र प्रगतीपथावर दिसला असता याचे मुख्य कारण म्हणजे डागविरहित समाज नेतृत्त्व.

याचा अर्थ काय? हेच ना की मेथांबांना महाराष्ट्रात प. बंगाल किंवा त्यांच्या दृष्टीने (महाराष्ट्रापेक्षाही ) प्रगत केरळ सारखी कम्युनिष्ट राजवट अपेक्षीत आहे. अश्या वेळी कम्युनिझम वर चर्चा अपेक्षीतच आहे ना भौ !

एवढ्यावरही जर कम्युनिझम सोडुन ही चर्चा होत असेल तर मग मला माझ्या मेसची आठवण दाटून येते. तुरीच्या वरणात डाळीचे कण येऊ नये यासाठी आमच्या मेसवर कसोशिने प्रयत्न चालतात. ;)

ह्या चर्चेत सुध्दा एकंदरीत ओघ असाच दिसतो आहे की आम्ही हवं ते बोलू , जाहिर चर्चा करू मात्र आम्हाला प्रश्न विचारायचे नाही. विचारायचे असतील तर विचारा आम्ही उत्तरे देणार नाही. आम्ही आधी ठरलेलं तेवढंच बोलू.
खरं तर आमचं कसं सगळं शिस्तीत ठरलेलं आहे. आधी लाल सलाम म्हणायचा, नंतर आमच्या गेलेल्या नेत्यांची नावे घ्यायची. सगळ्या महाराष्ट्राला त्यांच्या आदरभाव आहे.

असं करतांना हळूच यशवंतरावांपासून ते पवारांपर्यंतच्या सगळ्याच मुख्यमंत्र्यांच्या कर्तुत्वाला आव्हाण द्यायचे , यावर कुणी उसळला की त्याला संघाचा किंवा महाराष्ट्रात शिवसेनेचा म्हणून शिव्या द्यायच्या. आमचं कसं सगळं प्रखर आहेना ! कॉम्रेड..... लाल सलाम !

माझ्या सुरूवातीच्या काही बाळबोध प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी वेळ आहे कुणाला?

नीलकांत

प्रदीप's picture

28 Jan 2009 - 12:41 pm | प्रदीप

नीलकांत,

तुझ्या कुठल्याच प्रश्नांना मेथांबा ह्यांजकडून तरी उत्तरे मिळणार नाहीत व मिळालीच ती कशी संतापजनक असतील त्याचा नमुना वर तू बघितला असशीलच.

नुसतीच पोकळ घोषणाबाजी, आक्रस्ताळेपणा, हे काय दर्शवते? आपण जे (बहुधा) स्वेछेने अंगिकारले आहे, त्याविषयी कन्विक्शन (मराठी प्रतिशब्द?) नाही. निव्वळ पी. डी*. काहीतरी सांगते म्हणून ते खरे मानायचे व इतरांना सांगत सुटायचे. आणी ह्याची करोलरी (मराठी प्रतिशब्द?) अशी की पी. डी. ज्याबाबतीत मूग गिळून बसते, त्याबद्दल प्रश्न जर आलेच तर स्वतःचीच बनवाबनवी करून घ्यायची (नुसते फालतू घोषणात स्वतः ला मग्न करून घ्यायचे!)

*पी. डी.: पीपल्स डेमॉक्रसी: मा. क. प. चे मुखपत्र

जर आत्याबाईंना मिशा असत्या तर.....

काका म्हटले असते.

महेंद्र's picture

27 Jan 2009 - 2:07 pm | महेंद्र

अगदी सुरुवातीच्या सुमारास, १९२५ साली भा,क,प, ची स्थापना ही रशियातील कम्युनिस्ट पक्षाची शाखा म्हणुनच झाली होती.
१९२० च्या सुमारास गांधी विरुध्द लेनीन हे पुस्तक लिहुन डांगे ह्याने गांधींना कःपदार्थ लेखण्याचा बौद्धीक दिवाळखोरपणा दाखवला होता.
गांधींचे नेत्रुत्व बलशाली होऊ नये म्हणुन झालेला हा पहिलाच प्रयत्न!जे ह्या प्रयत्नाला बळि पडले ते कम्युनिस्ट पक्षात गेले होते.ईंग्रजांच्या गुलामगिरीतुन भारत मोकळा झाला की त्याला रशीयातील कम्युनिस्ट पक्षाचा वेठबिगार म्हणुन ह्या पक्षाला कार्य करावे लागले.
१९२८ सालच्या सहाव्या अंतर राष्ट्रीय साम्यवादी अधीवेशनात , भारतातल्या स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध करण्यात यावा असा आदेश देण्यात आला होता.रणदिवेला ही रशीयाची भुमिका पुर्ण पणे मान्य होती. त्या आदेशानुसार साम्यवाद्यांनी स्वातंत्र्य आंदोलनाच्या पाठीत खंजीर खुपसला.

१९३५ सालच्या आंतरराष्ट्रिय परिषदेत रशियाचे धोरण बदलले., त्या परिशदेने भारतिय स्वातंत्र्य लढ्यास पाठींबा द्यावा असे सुचवले.त्या आदेशानुसार डांगेनी कॉंग्रेस मधे प्रवेश केला.त्यांनीच १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्य सैनीकांना पकडुन ब्रीटीशांच्या हवाली करुन त्या लढ्याला नेस्तनाबुत करण्याचा प्रयत्न केला होता.

१९६२ साली झालेल्या चीन हल्ल्याला पाठींबा द्यायचा की नेषेध करायचा ह्या मुद्यावरुन कम्युनिस्ट पक्षत डांगे आणि रणदिवे गटात प्रचंड मतभेद झाले. आणि १९६४ साली एकसंघ असलेला कम्युनिस्ट पक्ष फुटला. डांगेच्या अधिपत्या खाली मूळ ”सीपीआय कार्यरत राहिला तर रणदिवे गटाने स्वतःला सीपीआय (माक्सीस्ट ) म्हणवणे सुरु केले.
या नव्या पक्षाने चीनी सैन्याचे मुक्तीदाता म्हणुन स्वागत केले ..तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी पक्षाच्या बहुसंख्य नेत्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली बरेच दिवस तुरुंगात देखिल ठेवले होते.
हर्किशनसींग सुरजीत , नंबुद्रीपाद , ज्योती बसु हे सर्व प्रकाश कामत ज्या पक्षाचे समर्थन करीत आहेत त्याचे संस्थापक मेंबर्स होते.

डांगे ह्यांच्या पक्षातच नंतर फाटाफुट झाली आणि त्यांना पक्षातुन निकासित करण्यात आले.. त्यानंतर प्रकाश करंत ह्यांच्याकडे नेत्रुत्व आले .. पुढे काय झाले सगळे जाणताच!!!!
केवळ दोन कोपर्यात शिल्लक असलेल्या ह्या पक्षाशी हात मिळवणि करुन त्याला सामर्थ्य संपन्न करण्याचे महत्कार्य कॉंग्रेस ने केले आहे आणि आता त्याचिच फळे भोगताहेत...
डॉ. सन येत्सेन आणि चँग के शेक यांच्या नेत्त्रुत्वाखालील चीन मधिल राष्ट्रिय राष्ट्रीय स्वातंत्रयाचा लढा रशियाच्या आदेशा नुसार माओ त्से तुंग्ने संपुर्णपणे आपल्या नियंत्रणात आणुन त्या देशातिल साम्य्वादी हुकुमशाही १९४९ साली स्थापन केली.
त्याचप्रमाणे व्हिएतनाम मधे हो ची मिन्ह याने रशियाच्या आदेशाखाली तेथिल राष्ट्रीय स्वातंत्र्य लढा साम्यवादी पक्षाच्या नियंत्रणाखाली आणून प्रथम फ्रांस आणि नंतर जापान व अमेरिकेचा पराभव करित साम्यवादी हुकुमशाही १९७६ साली स्थापन केली.
ईंडोनेशियात मात्र रशियाचे प्रयत्न सफल झाले नाहित.

भारतात डांगे ह्याने माओ त्से तुंग आणि हो चि मिन्ह प्रमाणे राष्ट्रिय स्वातंत्र लढयाचे नेत्रुत्व करुन तो रशियाच्या साम्राज्यशाही च्या नियंत्रणाखाली आणावा अशी योजना ह्होती . परंतु भारतिय साम्यवादि पक्षाच्या अंतर्गत कलहामुळे आणि दुसर्या महायुद्धा मुळे चेंज झालेल्या आंतरराष्ट्रिय परिस्थिती ही योजना पुर्ण हौउ शकली नाही.hyach sobat , महात्मा गांधी ( ह्यांनी केलेल हेच एक मोठ्ठं कामं) आणि सरदार पटेल ह्यांच्या सतर्कते मुळे रशियाचा डाव पुर्ण मांडण्या पुर्वीच मोडला गेला.

तरिही निराश न होता, भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा त्याला आपल्या प्रभावाखाली आणण्याचे प्रयत्न डांगे ह्याच्या थ्रु सुरुच ठेवले होते. आपली बुद्धि गहाण ठेवलेल्या आणि भारत स्वतंत्र झाला आहे हे लक्षात न घेता १९५०साली ह्या डांगे ने रशियाला जाउन स्टॅलिन कडुन भारतात राजनिती कशि करावी ह्याचे मार्गदर्शन घेतले...

मला फक्त ह्याचंच वाईट वाटतं की ईतक्या देशद्रोही कारवाया केलेला पक्ष आज कॉंग्रेसला जवळचा वाटतो पण भा ज प केवळ हिंदुंना सपोर्ट करतो म्हणुन जवळ नको आहे......... व्हॉट अ शेम...

आजही बर्याच लोकांना कम्युनिस्ट पक्ष हा केवळ द्वेशावर राजकारण करतो हेच कळत नाही ह्याचं वाईट वाटतं.

दशानन's picture

27 Jan 2009 - 2:12 pm | दशानन

१९६४ साली एकसंघ असलेला कम्युनिस्ट पक्ष फुटला. डांगेच्या अधिपत्या खाली मूळ ”सीपीआय कार्यरत राहिला तर रणदिवे गटाने स्वतःला सीपीआय (माक्सीस्ट ) म्हणवणे सुरु केले.
या नव्या पक्षाने चीनी सैन्याचे मुक्तीदाता म्हणुन स्वागत केले ..तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी पक्षाच्या बहुसंख्य नेत्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली बरेच दिवस तुरुंगात देखिल ठेवले होते.

L)

काय तरी चुकते आहे असे तुम्हाला वाटत नाही :?

नेहरु ~X( १९६२ जय जवान जय किसान ! शास्त्रीजी हवे होते ना त्या काळी !

X( काय तरी टंकायचे म्हणून टाका लागला आहे काय तुम्ही ?

इतिहासामध्ये काल कालावधीला किती महत्व असते ते आमच्या सारख्या इतिहासात नापास झालेल्यांना विचारा !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

प्रदीप's picture

27 Jan 2009 - 2:37 pm | प्रदीप

माहिती रोचक आहे. जैनांनी दर्शविल्याप्रमाणे मा. क. प. पूर्वीच्या एकसंध कम्युनिस्ट पक्षातून १९६२ ते १९६३ ह्या दरम्यान फुटला असावा असे वाटते. पण ह्या तपशिलाने तसा काही फार फरक पडत नाही.

डांगे हे एक (तत्कालिन कम्युनिस्ट नेत्यांप्रमाणेच) समर्थ नेते होते, त्या सर्वांनीच आपापल्या निष्ठेपायी बर्‍याच खस्ता खालेल्ल्या आहेत, तेव्हा त्यांचा, तसेच रणदिवे ह्यांचा उल्लेख एकेरी व्हावा हे खटकले.

विएटनाममध्ये जपानी नव्हते, ते तर चीनमध्ये होते. तेव्हा १९३० पासून १९४९ पर्यंत माओ , चिआंग कै ह्सेक व जपानी आक्रमक ह्या दोन्ही आघाड्यांवर लढले.

चीन व व्हिएटनाम येथील जनताही अनुक्रमे माओ चेदाँग व हो चि मिन्ह ह्यांच्या पाठीशी होती. जनतेचा ह्या दोन्ही लढ्यास भरघोस पाठिंबा नसता तर ह्या दोन्ही राजवटी सत्तेवर आल्या नसत्या. ह्या दोन्ही लढ्यांच्या मागे त्या त्या नेत्यांचा अतुलनीय पराक्रम व असीम नेतृत्व होते, त्यांना अनुल्लेखून चालणार नाही. तेव्हा ते जे काही तेथे झाले ते निव्वळ रशियन षडयंत्राचा भाग म्हणून झाले असे म्हणणे चुकिचे आहे.

भारतीय कम्युनिस्ट नेतृत्वाची घोडचूक (जी ते आजतागायत करत आले आहेत) ही की देशभावनेला त्यांनी अजिबात किंमत दिली नाही. माओने ही चूक केली नाही. आणि आजही चिनी जनता राष्ट्रकर्तव्य सर्वोच्च मानते.

विकास's picture

28 Jan 2009 - 10:43 am | विकास

>>>भारतीय कम्युनिस्ट नेतृत्वाची घोडचूक (जी ते आजतागायत करत आले आहेत) ही की देशभावनेला त्यांनी अजिबात किंमत दिली नाही. माओने ही चूक केली नाही. आणि आजही चिनी जनता राष्ट्रकर्तव्य सर्वोच्च मानते.

एकदम बरोब्बर!

बाकी महेंद्र यांनी दिलेल्या रोचक इतिहासातील (एकेरी संबोधने आणी सनावळीची चूक सोडल्यास) अजून एक व्यक्ती राहीली असे वाटते ज्याचे नाते समाजवाद्यांशी आहे - मानवेंद्रनाथ रॉय. ज्येष्ठ समाजवादी (आणि यशवंतरावांसारखे कॉग्रेसी) नेते, ज्येष्ठ पत्रकार हे स्वतःला रॉयीस्ट म्हणवून घेण्यात धन्यता मानतात. या रॉय यांचा इतिहास वाचल्यावर ह्यांचे का कौतूक केले जाते हा एक मोठा प्रश्न पडला होता...असो.

महेंद्र's picture

27 Jan 2009 - 2:39 pm | महेंद्र

वर्ष चुकलं.. १९६२ वाचणे.. teMvha neheru hote..

श्री जोर्ज फर्नाण्डिस यान्चे कडुन आजकालच्या राजकारणी लोकानि खुपच शिकण्यासारखे आहेत. स्वच्छ चारित्र म्हणजे काय ते याना बघुनच कळते. श्री प्रमोद महाजन सन्रक्षण मन्त्रि असताना एका कार्यक्रमात साथी जोर्ज हि तेथे आले, प्रमोदजी ना पेप्सी दिलि गेलि पण श्री जोर्ज फर्नाण्डिस यानी विनम्र पणे चहाचि मागणी केली व तोच घेतलाहि.
जोर्ज फर्नाण्डिस यान्चे राजकिय गुरु श्री राम मनोहर लोहिया हे हि तितकेच थोर सद ग्रुहस्थ. त्यानि आयुष्यभर लग्न न करिता देशाचिच सेवा केलि. त्यन्चे सोबत एक खानसामा सदैव असायचा. सकाळि त्याने चहा त्याना दिला कि त्यान्चा पहिला प्रश्न असायचा : "तुमने पि चाय?" उत्तर होकारार्थी आल्यासच ते चहा पित असत.

शंकरराव's picture

29 Jan 2009 - 6:51 pm | शंकरराव

बकरी (*त्ता म्हणने नको म्हणून) चले शेर कि चाल..
कम्युनिष्टांनी चहाची मगणी करावी म्हणजे फार उच्च असे काय केले हो ?
"तुमने पि चाय?" म्हणनारे ही लाखोंनी पडले आहे ह्या देशात, संस्क्रुतीच आहे ती आपली

अहो त्याच फर्नाण्डिसां मागे शस्त्रास्त्र खरेदी प्रकरणी भ्रष्टाचाराचा ससेमिरा मागे लागला आहे.
आता चाहाचे काय देण ते सांगा ?

तुम्हि तरि तुमच्या बायकोला विचारता काय? चहा घेतला कि नाहि?
फर्नाण्डिसां मागे शस्त्रास्त्र खरेदी प्रकरणी भ्रष्टाचाराचा ससेमिरा मागे लागला होता तो इन्टरनेट जनित पीत पत्रकारितेचा किळसवाणा हिडिस बिभत्स कळस होता जो वेळिच निपटला गेला होता. विसरलात कि काय हो?
तुम्हि शन्करराव चव्हाण तर नाहित ना? कारण त्यना काहि पत्रकार शन्खोबा असे म्हणत होते म्हणुन विचारले.

शंकरराव's picture

4 Feb 2009 - 12:52 am | शंकरराव

मी फक्त 'शंकरराव' आहे. :-)

आता काहि पत्रकार फर्नांडीसला फाटक्या तोंडाचा असे ही म्हणत, तुम्ही म्हणनार का ?
मग फाटक्या तोंडाचा फर्र फर्र करित "चहा घेतला कि नाहि?'' कसे विचारेल ?

स्वामी योगेश... तुझे लग्न झाले आहे का ? नाही म्हणजे स्वामी ... योगेश.. नावानी ब्रम्हचारी वाट्तो.
परत "चहा घेतला कि नाहि?''
असे विचारणारे लाख्खो च्या संखेने आहेत आपल्या संस्क्रुतीत ... नवल ते काय ?
मला सांग "चहा घेतला कि नाहि?'' ही त्यांची कोड ल्यांगवेज तर नव्हती ना ?? ;-)
मी .. नुस्ता चाहाच काय पण नाश्ता, जेवन .. आणखी बरेच काही घेतलेका सर्वांना विचारत असतो.. असो, तर तुझ्या बायलोलाही विचारेन चहा घेतला का ? ह. घे ;-)

अविनाशकुलकर्णी's picture

4 Feb 2009 - 11:49 pm | अविनाशकुलकर्णी

.