✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

संक्रांत कशासाठी

भ
भास्कर केन्डे यांनी
Wed, 01/14/2009 - 07:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6872 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

स
सुनील Wed, 01/14/2009 - 07:49 नवीन

छान

संक्रांतीचा सुरेख वेध घेणारा लेख. तीळगुळाचे लाडू, गुळाच्या पोळ्या आदिंच्या आठवणी करून दिल्यात! संक्रांतीपासून दिवस मोठा व्हायला लागतो हे बरोबर नाही. उ. गोलार्धात २२ डिसेंबर हा सर्वात लहान दिवस. त्यानंतर दिवस मोठा होऊ लागतो तो २१ जूनपर्यंत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 01/14/2009 - 08:12 नवीन

धन्यवाद!

धन्यवाद सुनीलराव! आपण चूक ध्यानात आणून दिलीत. आमच्या गावाकडे संक्रातीपासून दिवस मोठा होतो असे सर्वजन बोलतात त्यामुळे पाठ्यपुस्तकात शिकलेल्या पेक्षा ते जास्त लक्षात राहिले... :) आपला, (गाववाला) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 01/14/2009 - 10:26 नवीन

हे पण तेवढं सरळ नाही आहे

सगळ्यात उशीरा सूर्योदय आणि सगळ्यात लवकर सूर्यास्त २२ डिसेंबरला होत नाहीत. पण दिवसाची लांबी सगळ्यात कमी २२ डिसेंबरला असते. सध्या वेळ नाही आहे, दोनेक दिवसात विस्तृत विवेचन लिहिते. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे
ध
धनंजय Wed, 01/14/2009 - 08:38 नवीन

तिळगूळ आणि अच्चू

माझ्या लहानपणी घरी कन्नड मुलुखातली एक रीत मोठी गोड होती. म्हणजे खरेच "गोड" - ती म्हणजे साखरेची खेळणी बनवणे. याच्या लाकडी साचांना अच्चू म्हणतात, आणि बनलेल्या साखरेच्या खेळण्यांनाही अच्चूच म्हणतात. साखरेचा पाक घट्ट होत-होत त्याची साखर होऊ लागली की लाकडाच्या साच्यांमध्ये तो ओतायचा. हे मोठे कौशल्याचे काम आईचे होते. खेळण्यातली नक्षी नाजूक असली तर पाक अगदी घट्ट होण्यापूर्वी साच्यात ओतावा लागे - पण त्या विशिष्ट क्षणापेक्षा थोडासुद्धा आधी ओतला, तर पाक साच्याच्या भेगांतून बाहेर सांडे, थोडादेखील उशीर केला तर साचा भरण्याआधी पाक गोठून जाई. मला मात्र काय - ती खेळणी खाण्याचीच मजा वाटे!
  • Log in or register to post comments
प
पक्या Wed, 01/14/2009 - 13:41 नवीन

छान लेख.

छान लेख. आवडला. त्यात अजून २ गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. नवीन लग्न झालेल्या सुनेचे तिळवण तिला हलव्याच्या दागिन्यांनी सजवून करतात. शिवाय जावयांचे संक्रांतीचे प्रथमवाण ही खास असते. धनंजयांनी साखरेच्या खेळण्यांची छान आठवण करून दिली. माझी आजी देखील लहानपणी आम्हा नातवंडाना साखरेची खेळणी बाजारातून आणून देत असे. आम्हा मुलांना या साखरेच्या खेळण्याचं फार अप्रूप वाटत असे. खेळायला खेळ आणि खेळून झाल्यावर गोड खाऊ असा दुहेरी फायदा. भौगोलिकदृष्ट्या २२ डिसे. सर्वात लहान दिवस हे बरोबर आहे. पण संक्रातीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते असेच लहानपणापासून ऐकले आहे. उत्तरायणात सूर्य थोडा थोडा उत्तरेला सरकत असल्याने उ. गोलार्धात दिवस मोठा होत जातो. संक्रांतीच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा. तिळगूळ घ्या गोड बोला.
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 01/14/2009 - 20:13 नवीन

अरे हो की... विसरलोच

नवीन लग्न झालेल्या सुनेचे तिळवण तिला हलव्याच्या दागिन्यांनी सजवून करतात. शिवाय जावयांचे संक्रांतीचे प्रथमवाण ही खास असते. अरे हो की... विसरलोच हे मुद्दे. कदाचित जावाई म्हणून मी कोणत्या सणांना सासरवाडीत न गेल्याने झाले असेल. आठवण करुन दिल्याबद्दल आभार! आपण हा मुद्दा जरा विस्ताराने सांगितला असतात तर अजून आनंद झाला असता. धनंजयांनी साखरेच्या खेळण्यांची छान आठवण करून दिली. हेच म्हणतो. आमच्या कडे (मराठवाड्यात) ही प्रथा एवढी रूढ नसल्याने राहून गेली. धनंजयांचे आभार! आपला, (नम्र) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/15/2009 - 12:49 नवीन

संक्रांत

संक्रांत म्हटलं की तीळ-गुळ, तिळाचे लाडू, तीळ लावलेल्या भाकरी, वाला-वांगी-पेरु-बोर वगैरे भाज्यांच्या रसरशीत व खमंग गावराण जेवणाचा अस्वाद, आम्हाला तरी संक्रांत म्हटलं की हे एवढंच आठवतं! :) तात्या.
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे गुरुवार, 01/15/2009 - 20:27 नवीन

भा पो

तात्या, भूक लागलीये वाटतं... बाकी भा पो बरं का...! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/15/2009 - 20:36 नवीन

लेख आवडला !!!

भास्करराव लेख आवडला !!! संक्रातीनंतर तीळ-तीळ थंडी कमी होत जाते असेही म्हणतात. या वर्षी संक्रातीच्या विशेष अफवा नाही आल्या. जावयाने सासूला साडी घ्यायची, ननंदांनी भावजयांना बांगड्या भरायच्या, ...वगैरे इत्यादी. जागतिक मंदीमूळे अफवांना या वर्षी मंदी आली वाटते :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
वात्रट गुरुवार, 01/15/2009 - 20:40 नवीन

टिपिकल सकाळ टाईप....

भास्कर ... तुमचा लेख वाचुन सकाळ मध्ये येणारया लेखांची आठवण झाली...:) लेख आवडला...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा