लालजी देसाईंचे (पु लंच्या रविवार सकाळ मधले गायक) निधन

मिसळपाव's picture
मिसळपाव in जनातलं, मनातलं
14 Jan 2009 - 6:39 am

मित्राकडून बातमी मिळाली की लालजी देसाई गेले. पु लंच्या 'रविवार सकाळ' मधे अतिशय बहारदार गाणं असायचं त्यांचं. थोड्याशा भीमसेनांच्या ढंगात ते 'उगीच का कांता' असं काही सुरेख रंगवतात की व्वा! श्रीकांत मोघेने थोडा वात्रटपणा केल्यावर लालजी, 'कांSSS ता SSSSSS' अशी नाजुक हरकत घेतात नी श्रीकांत मोघेंची 'अग आई ग' अशी दाद जाते !! कींवा 'धरणीSSSSS' म्हणून ठासून दाखवतानाचा आवेश, कानडी ढंगात गायला सुरूवात केल्यावर त्याच 'धरणीSSSSसंग'ला 'वा..वा..वा' अशी श्रीकांत मोघेंची मॅचिंग दाद.....छे. शंभरवेळा कॅसेटवर पाहीलंय, पण परत पाहिन तेव्हा हा माणूस आता आपल्यात नाही याची बेचैनी वाटेल.

कुठल्यातरी पुस्तकामधे वाचल्याचं स्मरतं की खरं म्हणजे त्याना स्टेजवर काम करायची भीती होती. पण पु ल नी त्याना सांगितलं की "तुला असं काम देतो की तुला जास्त संवादच असणार नाहीत". खरोखरच, रविवार सकाळ मधे त्यांच्या सुंदर गाण्याव्यतिरीक्त त्याना अगदि दोन-तीनच वाक्य आहेत!

या दगदगीच्या आयुष्यात निखळ आनंदाचे चार क्षण देणारया या कलाकाराला नमस्कार. कोणी सांगावं, हे जग सोडून जिथे कुठे ते गेले तिथे पु ल परत भेटले म्हणून ते खुश असतील!! तसंच असो.

कलासंगीतनाट्यप्रकटनविचार

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

14 Jan 2009 - 7:46 am | विसोबा खेचर

नारायणराव बालगंधर्वांची भक्ति आणि गायकी हे लालजींचे वैशिष्ठ्य..!

मी एकदोनदा स्वतंत्र कार्यक्रमात लालजींचे गाणे ऐकले आहे. नारायणरावांची अनेक पदं लालजी खूप सुंदर गायचे. या गुणी कलाकाराला माझी विनम्र आदरांजली!

आपला,
(नारायणरावांचा प्रेमी) तात्या.

लालजींचे गाणे कुठे शोधता येईल

मिसळपाव's picture

6 Aug 2020 - 8:58 pm | मिसळपाव

हे एक बघा - https://www.youtube.com/watch?v=nYywfTx7UwA याआधी काही वर्षांपूर्वी सुद्धा मला तरी या व्यतिरिक्त काही सापडलं नव्हतं.

(ट्रंक उघडून जुनंपानं बघत बसलाय? !!)