काही टीप्स....

पर्नल नेने मराठे's picture
पर्नल नेने मराठे in पाककृती
12 Jan 2009 - 12:13 pm

काही टीप्स....

१) इड्ल्या उरल्या असतील तर दुसरया दिवशी त्याना तिखट, मीठ लावुन फ्रायपॅन वर तेल घालुन फ्राय कराव्यात.
सॉस बरोबर खायला द्याव्यात. सुन्दर लागतात.
२) शिळा भात फ्रिज मधे ठेवुन कडक होतो. ताजा भात कुकरला लावताना हा कडक झालेला भात मोकळा करुन त्यावर
पेरावा. झालेला भात उत्तम होतो व शिळा वापरला जातो.
३) एखादा पदार्थ भान्ड्याला लागला (करपला, म्हणजे कोळसा नव्ह्ये ) असेल तर गॅस बन्द करुन भान्ड्यावर झाकण ठेवावे व ३० मिनिटाने काढावे, खरपुड आपोआप निघते, खरवडावे लागत नाहि, भान्डे घासताना त्रास होत नाहि व पदार्थ फुकटपण जात नाहि.
४) मिरच्या आणल्या की देठ काढुन फ्रिज मध्ये बन्द ड्ब्यात ठेवाव्यात, खुप टिकतात. कोथिम्बीर निवडुन टिशु पेपर मध्ये गुन्डाळुन बन्द ड्ब्यात न धुता ठेवावी, खुप टिकते, वापरताना धुवुन घ्यावी.
५) दुधाचे भान्डे रिकामे झाले कि त्यात कणीक भिजवावी, भान्डे घासताना त्रास होत नाहि व साय फुकटपण जात नाहि,
पोळ्या मऊ होतात.(माझ्या आईला हे मात्र पटत नाहि, तिच्या मते दुधाचे भान्डे फक्त दुधासाठी वापरावे.)
६) साबुदाण्याही खिचडी करताना थोडे दुध घालावे, खिचडी मऊ व खमंग होते.

आपली,
चुचु

प्रतिक्रिया

कुंदन's picture

12 Jan 2009 - 12:16 pm | कुंदन

ते करण्यासाठी काहि टीप्स ?

वल्लरी's picture

12 Jan 2009 - 12:55 pm | वल्लरी

असेच म्हणते..... :)
---वल्लरी

१. गुलाबजाम्सच्या रेडिमेड पिठात थोडं सिमेंट घालून मिसळावं .. ते कडक कोण्या आधी सर्व बाजुनी सुया टोचून ठेवाव्यात, रोडवर टाकल्यास गाड्या पंक्चर होतात , सोफ्यावर ठेवल्यास डोक्यात गेलेल्यांचे पार्श्वभागही पंक्चर होतात.
२. वरण १ आठवडा आंबवत ठेवावे, पुर्ण घरात गुदमरण्याजोगा वास पसरला की काढून घ्यावे , आणि फ्रिज मधे ठेऊन जेल होईपर्यंत ठेवावे , आईसक्रिम वर उत्तम टॉपिंग्ज म्हणून वापरता येते , शिळा कडक झालेला भात त्यावर ड्रायफ्रूट्स पणाने पेरता येतो .
३. साबुदाणे पुर्णपणे भिजु न देता पोह्यांप्रमाने नुसते पाण्यातुन धुवून घ्यावेत, थोडे भाजून घेऊन मग कांदा-लसून टाकून नेहमीप्रमाणे खिचडी करावी , त्यावर शेपु चिरून टाकावी , उत्तम लागते . कच्चा शेवगा तोंडी लावल्यास आहाहा, क्या कहेने.
४.गाजराचा हलवा करताना वांग्याची किंवा मिरचीची देठं फेकून देउ नये , ती देठं आडवी उभी चिरून हलव्यात मिक्स करावीत, त्यात काळ्या मिर्‍या आणि कांद्याची पातही घालावी, मस्त झोंबणारा वास सुटून अल्टिमेट चव चार दिवस जिभेवर रेंगाळते.
६. गहू ४ दिवस कोमट पाण्यात भिजत घालावा, सुवासिक आंबुस वास आला की तो कोणत्याही फ्रुटज्यूस मधे वरून टाकावा , पौष्टीक असते .

- टारझन कुमार

पर्नल नेने मराठे's picture

12 Jan 2009 - 12:19 pm | पर्नल नेने मराठे

करु हो हळुहळु.....=))
चुचु

परिकथेतील राजकुमार's picture

12 Jan 2009 - 12:52 pm | परिकथेतील राजकुमार

हळदि कुंकु झाले की घरी खुपसे फुटाणे उरतात, त्यांचे काय करावे ??

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

सुनील's picture

12 Jan 2009 - 12:54 pm | सुनील

हळदही उरत असेल. त्याचे काय करायचे? ;)

सुनील हळदीराम

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पर्नल नेने मराठे's picture

12 Jan 2009 - 12:55 pm | पर्नल नेने मराठे

फुटाणे गुलाब्जाम मधे घालावेत =))

चुचु

पर्नल नेने मराठे's picture

12 Jan 2009 - 1:01 pm | पर्नल नेने मराठे

हळदही उरत असेल. त्याचे काय करायचे?

नेक्स्त इयर सथि थेववे

चुचु

मऊमाऊ's picture

12 Jan 2009 - 1:16 pm | मऊमाऊ

मी तुझ्या आईशी सहमत आहे :)

पर्नल नेने मराठे's picture

12 Jan 2009 - 1:17 pm | पर्नल नेने मराठे

मी तुझ्या आईशी सहमत आहे

हम्म... :S

चुचु

मिना भास्कर's picture

13 Jan 2009 - 3:37 am | मिना भास्कर

दुधाचे भांडे थोडे कोमट पाणी घालून धूवून घ्या. त्या पाण्याने कणीक भिजवावी. म्हणजे हेतू ही साध्य आणि आईच्या मताला ही सहमती. बरोबर ना?

मिना भास्कर's picture

13 Jan 2009 - 3:37 am | मिना भास्कर

दुधाचे भांडे थोडे कोमट पाणी घालून धूवून घ्या. त्या पाण्याने कणीक भिजवावी. म्हणजे हेतू ही साध्य आणि आईच्या मताला ही सहमती. बरोबर ना?

पर्नल नेने मराठे's picture

13 Jan 2009 - 9:59 am | पर्नल नेने मराठे

बरोबर....
चुचु

विसोबा खेचर's picture

13 Jan 2009 - 9:15 am | विसोबा खेचर

टिपांबद्दल धन्यवाद..

अनंता's picture

24 May 2009 - 3:56 pm | अनंता

मिरच्या आणल्या की देठ काढुन फ्रिज मध्ये बन्द ड्ब्यात ठेवाव्यात
मिरच्या की देठं?

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

रेवती's picture

24 May 2009 - 4:55 pm | रेवती

माझ्या आईला हे मात्र पटत नाहि, तिच्या मते दुधाचे भान्डे फक्त दुधासाठी वापरावे
हे माझी आईही म्हणते.....ती दुधाच्या भांड्यात पाणी घालून ते दुधी रंगाचे पाणी बर्‍याच गोष्टीत वापरून टाकते.
हे काय ?म्हणून विचारायचे नाही.......नाहीतर आजकालच्या मुलींना .........

रेवती

वेताळ's picture

24 May 2009 - 5:36 pm | वेताळ

आमच्या मांजरासमोर ठेवते.(भांड्यातील दुध संपल्यानंतर) आमचे मांजर ते भांडे न कंटाळता १० मिनटात साफ करते.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

पर्नल नेने मराठे's picture

24 May 2009 - 5:43 pm | पर्नल नेने मराठे

कहिहि काय :o

चुचु